शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आता शेतमालास स्थानिक बाजारपेठेत भाव मिळत नाही म्हणून काळजी करायचे कारण नाही. कारण आता तुम्हाला समुद्र मार्गे थेट तुमचा शेतीमाल निर्यात करून या मालाची चांगली किंमत मिळणार आहे. यासाठी सरकारकडून अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र हे तुम्हाला कसे शक्य करता येईल याबद्दल सविस्तर माहिती बघुया.
ही आहे निर्यातीसाठी योजना
राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल विकून बक्कळ नफा मिळवावा तसेच महाराष्ट्रातून शेतीमालाच्या निर्यातीस जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, फर्म, सहकारी संस्था, निर्यातदार यांचा निर्यातीमध्ये थेट सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने कृषि पणन मंडळामार्फत समुद्रमार्गे शेतमाल निर्यात वाहतुकीसाठी अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत आहे.
योजनेचे निकष आणि अटी शर्ती
शेतकरी मित्रांनो तुमचा शेतीमाल निर्यात करण्यासाठी जर तुम्हाला या अर्थसहाय्य योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत. तसेच काही नियम आहेत. चला तर जाणून घेऊया या योजनेसाठी असलेल्या अटी शर्ती आणि निकष याविषयी इत्यंभूत माहिती.

शेतीमाल निर्यात करण्यासाठी अर्थसहाय्य योजनेमध्ये नमुद केलेल्या देशात व विहित केलेल्या शेतमालाची समुद्रमार्गे निर्यात करण्याची इच्छा असलेले शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, फर्म, सहकारी संस्था, निर्यातदार यांना दर वर्षी 50000 रुपये प्रति कंटेनर (20 फुटी किंवा 40 फुटी) अनुदान देण्यात येते. अनुदानाची कमाल मर्यादा प्रति लाभार्थी एक लाख रुपये आहे.
लाभार्थींनी शेतीमाल निर्यात अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळविण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्जासोबत संबंधित कागदपत्रे तसेच ज्या पुरवठादार कंपनीकडून कंटेनर उपलब्ध केलेला आहे त्याचे देयक सादर करणे बंधनकारक आहे.
शेतीमाल निर्यात अर्थसहाय्य योजना ही निश्चित केलेले देश आहेत त्याच देशांत निर्यात केल्या जाणार आहे. तसेच फक्त शेतमालाच्या उत्पादनासाठी लागू असेल.
शेतीमाल निर्यात अर्थसहाय्य योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, फर्म, सहकारी संस्था, निर्यातदार यांच्यासाठी लागू आहे.
उन्हाळ्यात या 5 फळपिकांची लागवड करून व्हा मालामाल
सदर योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पहिला टप्पा म्हणजे कृषी पणन मंडळाकडे पुर्वसंमतीसाठी अर्ज सादर करावा लागणार आहे.
शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, फर्म , सहकारी संस्था, निर्यातदार यांनी समुद्रमार्गे कंटेनरच्या साहाय्याने थेट निर्यात करणे अनिवार्य असणार आहे.
समुद्रमार्गे शेतीमाल निर्यात अर्थसहाय्य योजना 01 एप्रिल 2021 पासून राबविण्यात येत आहे.

या देशात निर्यात करता येणार
शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतमालास चांगल्यात चांगला भाव मिळावा यादृष्टीने तुम्ही तुमचा शेतीमाल शेतीमाल निर्यात करण्याचे ठरवले असेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की अमेरिका, ऑस्ट्रेलिया, साऊथ कोरिया, कजाकीस्थान, अफगाणीस्थान, इराण, रशिया, मॉरिशस, युरोपियन समुदाय, कॅनडा यासह इतर देशांमध्ये तुम्हाला तुमचा शेतमाल निर्यात करता येणार आहे.
समुद्रमार्गे शेतीमाल निर्यात का आहे फायदेशीर?
शेतकरी बंधुंनो जगातील बऱ्याच देशांचे अंतर भारतापासुन जास्त असल्यामुळे फळे व भाजीपाला विमानमार्गे निर्यात केल्या जातो. मात्र यामध्ये एक अडचण आहे. वाहतुकीकरिता विमानाचे भाडे जास्त असल्यामुळे परदेशी बाजारपेठेत माल जास्त दराने विकावा लागतो. पण समुद्रमार्गे शेतीमालाची निर्यात केल्यास वाहतुकीस येणारा खर्च खूप कमी होतो. परिणामी सामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची भरघोस किंमत मिळणे शक्य होते.

समुद्रमार्गे शेतीमालाची निर्यात करण्याचे तोटे सुद्धा जाणून घ्या
बळीराजाने कष्टाने पिकविलेल्या पिकाची समुद्रमार्गे निर्यात करणे हा पर्याय जरी उपलब्ध असला आणि किफायतशीर असला तरी त्यांचा माल समुद्रमार्गे निर्यात करण्याच्या प्रक्रियेत हवाई वाहतुकीच्या तुलनेत अधिक वेळ लागतो. तुम्हाला तर माहीतच आहे की फळे आणि भाजीपाला हा शेतीमाल नाशवंत स्वरुपाचा असल्यामुळे बरेच निर्यातदार शेतकरी समुद्रमार्गे निर्यात करायला घाबरतात. कारण त्यांच्या मालाचे नुकसान होऊन त्यांना मिळणारा भाव कमी होऊ शकतो. तसेच त्यांचे नुकसान सुद्धा होऊ शकते.
गावरान कोंबडी पालन व्यवसायाबद्दल संपुर्ण माहिती, असा मिळवा बक्कळ नफा
जास्तवेळ टिकणारा शेतीमाल निर्यात करणे फायद्याचे
समुद्रमार्गे जास्त कालावधी पर्यंत खराब न होणारा शेतीमाल समुद्रमार्गे निर्यात करून शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ होऊ शकतो. त्यामुळे समुद्रमार्गे निर्यात करण्यास प्रोत्साहन देणे सुद्धा आवश्यक ठरते. आपल्या राज्यात समुद्रमार्गे कृषीमालाच्या निर्यातीला जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या निर्यातीत वाढ व्हावी म्हणून समुद्रमार्गे आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी अनुदान देण्यासाठी ही शेतीमाल निर्यात अर्थसहाय्य योजना सुरू केली असून या कल्याणकारी योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आपला माल परदेशात विकून बक्कळ भाव मिळवू शकतात.
अर्ज कुठे करावा लागतो?
तुम्हाला सुद्धा तुमच्या शेतीत पिकविलेला शेतीमाल निर्यात करण्यासाठी अर्थसहाय्य योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज सदर करावा लागेल. त्यानंतर तुमच्या अर्जावर विचार केला जाऊन तुम्हाला लाभ देण्यात येईल.
या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते?
शेतकरी मित्रांनो ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे.त्यामुळे या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, फर्म , सहकारी संस्था, निर्यातदार घेऊ शकतात.
किती अर्थसहाय्य मिळणार?
तुम्हाला अर्ज करावयाचा असल्यास आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आल्यास तुमच्या शेतलाच्या समुद्रमार्गे निर्यातीसाठी दर वर्षाला कमाल एक लाख रुपये पर्यंत अनुदान स्वरूपात अर्थसहाय्य मिळू शकते.