हे बाजरीचे सुधारित वाण शेतात पेरून मिळवा भरघोस उत्पन्न

गरिबांचे पीक म्हणून बाजरीची शेती महाराष्ट्रात प्रचलित आहे. हे एक महत्वाचे तृणधान्य पीक आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी बाजरीचे पीक घेणे शेतीतून उत्पन्न घेण्याचा एक हमखास उपाय आहे. कारण कमी पाण्यात सुद्धा बाजरीचे पीक तग धरू शकते आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळवून देऊ शकते. चला तर जाणून घेऊया बाजरीचे सुधारित वाण कोणकोणते आहेत याची सविस्तर माहिती. तसेच भरघोस उत्पादन देणाऱ्या बाजरीच्या संकरित वाणांचा जातींविषयी तसेच बाजरीची लागवड कशी करतात याबद्दल आवश्यक ते संपूर्ण ज्ञान. जेणेकरुन बाजरीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना कमी खर्चात भरघोस उत्पादन घेता येईल. रब्बी हंगाम 2024 साठी सरकारने बाजरी सह विविध बियाणे अनुदान योजना अंतर्गत लाभासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या योजनेचा अवश्य लाभ घ्या.

बाजरीच्या सुधारित वाणांच्या जाती

1) समृद्धी

हे बाजरीचे सुधारित वाण अत्यंत कमी कालावधीत म्हणजेच सुमारे 60 ते 65 दिवसांत तयार होते. या सुधारित वाणाची लागवड केल्यास 20 ते 22 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळवून देण्यास सक्षम आहे. या बाजरीच्या सुधारित वाणाचे दाणे टपोरे असतात. चाऱ्याचा विचार करता हे बाजरीचे सुधारित वाण प्रती हेक्टर 4 ते 5 टन कडब्याचे उत्पादन देते.

2) परभणी संपदा (PPC 6)

हे बाजरीचे सुधारित वाण सुद्धा सुमारे 85 ते 90 दिवसांत तयार होते. या सुधारित वाणाची लागवड केल्यास 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळवून देण्यास सक्षम आहे. या बाजरीच्या सुधारित वाणाचे दाणे टपोरे असतात. चाऱ्याचा विचार करता हे बाजरीचे सुधारित वाण प्रती हेक्टर 4 ते 4.5 टन कडब्याचे उत्पादन देते. तसेच हे वाण बाजरी पिकावर पडणाऱ्या गोसावी रोगास प्रतिकारक असते. याचे दाणे राखी रंगाचे असतात.

3) धनशक्ती (ICTP 8203)

हे बाजरीचे सुधारित वाण सुद्धा अत्यंत कमी कालावधीत म्हणजेच सुमारे 70 ते 80 दिवसांत तयार होते. या सुधारित वाणाची लागवड केल्यास 15 ते 20 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळवून देण्यास सक्षम आहे. या बाजरीच्या सुधारित वाणाचे दाणे टपोरे असतात. चाऱ्याचा विचार करता हे बाजरीचे सुधारित वाण प्रती हेक्टर 4 ते 5.5 टन कडब्याचे उत्पादन होऊ शकते. याचे दाणे सुध्दा राखी रंगाचे आढळून येतात.

4) आय. सी. एम. व्ही. 221 (ICMV 221)

हे बाजरीचे सुधारित वाण अंदाजे 75 ते 80 दिवसांत तयार होते. या सुधारित वाणाची लागवड केल्यास 17 ते 20 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळवून देण्यास सक्षम आहे. या बाजरीच्या सुधारित वाणाचे दाणे टपोरे असतात. हे बाजरीचे सुधारित वाण प्रती हेक्टर सुमारे 6 टन कडब्याचे उत्पादन मिळवून देते.

5) डब्ल्यू. सी. सी. 75 (WCC 75)

हे बाजरीचे सुधारित वाण सुमारे 85 ते 90 दिवसांत तयार होते. या सुधारित वाणाची लागवड केल्यास 15 ते 20 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळवून देण्यास सक्षम आहे. या बाजरीच्या सुधारित वाणाचे दाणे मध्यम आकाराचे असतात. हे बाजरीचे सुधारित वाण प्रती हेक्टर 4.5 ते 5 टन कडब्याचे उत्पादन देण्यास सक्षम आहे. पशुपालक शेतकरी हे बाजरीचे वाण चाऱ्यासाठी मोठया प्रमाणात वापरतात.

6) जायंट बाजरा (Giant Bajra)

चारा उत्पादन घेण्यासाठी जे बाजरीचे सुधारित वाण लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात वापरतात. या सुधारित वाणापासुन प्रती हेक्टर 15 ते 20 टन चारा उत्पादित होतो. चारा पिकासाठी एक चांगला पर्याय म्हणून या वाणाचा विचार केला जाऊ शकतो.

7) पूसा-23 (M.H. 169)

हे बाजरीचे सुधारित वाण चमकदार पानाचे वाण असून या वाणाच्या झाडाची उंची सुमारे 165 से.मी. असते. घट्ट पट्टी आणि पिवळ्या रंगाचे परागकण ही या वाणाच्या पिकाची ओळख असते.
या वाणाच्या पिकाचा कालावधी 80 ते 85 दिवस असतो 20 ते 30 क्विंटल प्रति हेक्‍टरी उत्पादन देणारे हे बाजरीचे सुधारित वाण अनेक रोगांना प्रतिकार करण्यास सक्षम असते. अवर्षण ग्रस्त भागात सुद्धा हे बाजरीचे सुधारित वाण परल्यास विपरीत परिस्थितीत पीक तग धरून अपेक्षित उत्पादन देऊ शकते.

8) एच. एच. बी. 67-2

हे बाजरीचे सुधारित वाण सुमारे 62 ते 65 दिवसात उत्पादन देण्यायोग्य होते. तसेच या वाणाची रोपे सुमारे 260 ते 280 सें.मी. वाढतात. या वाणाच्या बाजऱ्याचे सिटे कठोर, केसाळ असतात तसेच 22 ते 25 से.मी. लांब आकाराचे असून त्यांचा रंग पिवळा असतो. प्रति हेक्टर 25 ते 30 क्विंटल उत्पादन देणारे हे बाजरीचे सुधारित वाण महारोगास प्रतिकारक असते. कमी पाण्यात सुद्धा हे पीक तग धरते.

बाजरीचे सुधारित वाण आणि संकरीत वाण

बाजरीच्या संकरित वाणांच्या जाती

1) सबुरी (R.H.R.-B.H. 8926)

हे बाजरीचे संकरित वाण असून हे वाण अत्यंत कमी कालावधीत सुमारे 60 ते 65 दिवसांत तयार होते. या संकरित वाणाची लागवड केल्यास 26 ते 32 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळवून देण्यास सक्षम आहे. या बाजरीच्या संकरित वाणाचे दाणे टपोरे असतात. चाऱ्याचा विचार करता हे बाजरीचे संकरित वाण प्रती हेक्टर सुमारे 6 टन कडब्याचे उत्पादन देते.

2) शांती (R. H. R.- B.H. 8924)

हे बाजरीचे संकरित वाण असून हे वाण सुमारे 80 ते 85 दिवसांत तयार होते. या संकरित वाणाची लागवड केल्यास 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळवून देण्यास सक्षम आहे. या बाजरीच्या संकरित वाणाचे दाणे टपोरे असतात. चाऱ्याचा विचार करता हे बाजरीचे संकरित वाण प्रती हेक्टर सुमारे 5 ते 6 टन कडब्याचे उत्पादन देते.

3) पी. के. व्ही. राज

हे बाजरीचे संकरित वाण असून हे वाण सुमारे 60 ते 65 दिवसांत तयार होते. या संकरित वाणाची लागवड केल्यास सुमारे 28 ते 29 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळवून देण्यास सक्षम आहे. या बाजरीच्या संकरित वाणाचे दाणे टपोरे असतात. चाऱ्याचा विचार करता हे बाजरीचे संकरित वाण प्रती हेक्टर सुमारे 5 ते 6 टन कडब्याचे उत्पादन देते.

4) एम. एच. 179 (MH 179)

हे बाजरीचे संकरित वाण असून हे वाण सुमारे 85 ते 90 दिवसांत तयार होते. या संकरित वाणाची लागवड केल्यास 25 ते 26 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळवून देण्यास सक्षम आहे. या बाजरीच्या संकरित वाणाचे दाणे टपोरे असतात. चाऱ्याचा विचार करता हे बाजरीचे संकरित वाण प्रती हेक्टर सुमारे 5 ते 6 टन कडब्याचे उत्पादन देते.

यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारीच्या या सुधारित जातींची लागवड करून घ्या लाखों रुपयांचे उत्पन्न

5) श्रद्धा (R. H. R.-B. H. 8609)

हे बाजरीचे संकरित वाण असून हे वाण अत्यंत कमी कालावधीत म्हणजेच सुमारे 72 ते 80 दिवसांत तयार होते. या संकरित वाणाची लागवड केल्यास 25 ते 27 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळवून देण्यास सक्षम आहे. या बाजरीच्या संकरित वाणाचे दाणे टपोरे असतात. चाऱ्याचा विचार करता हे बाजरीचे संकरित वाण प्रती हेक्टर सुमारे 5 ते 6 टन कडब्याचे उत्पादन देते.

6) आदिशक्ती

हे बाजरीचे संकरित वाण असून हे वाण अत्यंत कमी कालावधीत म्हणजेच सुमारे 72 ते 80 दिवसांत तयार होते. या संकरित वाणाची लागवड केल्यास सरासरी 30क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळवून देण्यास सक्षम आहे. या बाजरीच्या संकरित वाणाचे दाणे टपोरे असतात. चाऱ्याचा विचार करता हे बाजरीचे संकरित वाण प्रती हेक्टर सुमारे 6 ते 7 टन कडब्याचे उत्पादन देते. बाजरीच्या बहुतेक सर्वच दाण्यांचा रंग राखी असतो.

7) ए. एच. बी. 1666 (A.H.B. 1666)

हे बाजरीचे संकरित वाण असून हे वाण अत्यंत कमी कालावधीत म्हणजेच सुमारे 75 ते 80 दिवसांत तयार होते. या संकरित वाणाची लागवड केल्यास 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळवून देण्यास सक्षम आहे. या बाजरीच्या संकरित वाणाचे दाणे टपोरे असतात. चाऱ्याचा विचार करता हे बाजरीचे संकरित वाण प्रती हेक्टर सुमारे 6 ते 8 टन कडब्याचे उत्पादन देते. औरंगाबाद संशोधन केंद्र यांच्याकडून हे बाजरीचे संकरित वाण तयार करण्यात आले असून गोसावी रोगास प्रतिकारक्षम असते.

8) तुर्की बाजरी

हे सुधारित वाण तुर्की देशातील असून या वाणाचे पीक सुमारे 12 फूट उंच असते. तर या तुर्की बाजरीचे सुधारित वाणाचे कणीस तब्बल 4 ते साडेचार फुटाचे असल्यामुळे हे तुर्की बाजरीचे सुधारित वाण शेतात पेरून भरघोस उत्पादन घेता येते. या तुर्की बाजरीची लागवड केल्यास उत्पादन तब्बल 50 ते 60 टन प्रति हेक्टर एवढे होऊ शकते. सध्या राज्यातील बरेच यशस्वी शेतकरी तुर्की बाजरीचे सुधारित वाण त्यांच्या शेतात पेरून प्रचंड उत्पादन घेत आहेत. हे वाण अनेक रोगांना प्रतिकारक्षम असून कमी पाण्यात सुद्धा तग धरते.

खासगी कंपन्यांची संकरित वाणे

वर दिलेल्या सुधारित आणि संकरित वाणाशिवाय अनेक खासगी कंपन्या उदा. प्रोऍग्रो 9444, 86 एफ. 64, 86 एफ. 13, 86 एम. 66, एन.एच. एम. 73, एन. एच. एम. 75, या खासगी संकरित वाणांची सुद्द्धा लागवड करून भरघोस उत्पादन घेता येऊ शकते. तुमच्या शेतजमिनीच्या मगदुरा प्रमाणे योग्य वाण निवडून लागवड केल्यास भरघोस उत्पादन घेण्याची शक्यता दृढ होते. पिकाचे योग्य नियोजन करून शेतीत अभ्यासपूर्ण नवनवीन प्रयोग करून होऊन पिकाच्या उत्पादनात वाढ करून आपली आर्थिक प्रगती साधता येत असते.

4 फूट लांबीचे कणीस असणारी तुर्की बाजरी

बाजरी लागवडीयोग्य हवामान

बाजरीचे पीक पाण्याचे प्रमाण कमी असलेल्या भागात विशेषकरून खरीप हंगामात घेतले जाते. सध्याचा काळात रब्बी हंगामात सुद्धा शेतकरी या पिकाची लागवड करून प्रचंड उत्पादन घेतात. किमान 50 सें. मी. पर्जन्यमान झाले तरीही हे पीक बाजरीचे पीक चांगले उत्पादन मिळवून देण्यास सक्षम असते. बाजरी लागवडीस योग्य तापमान 20 ते 30 अंश सेल्सिअस असते. याशिवाय उष्ण हवामान, प्रखर सुर्यप्रकाश व हवेत कमी आर्द्रता अशा प्रकारचे हवामान या पिकास पोषक ठरते.

बाजरी लागवडीयोग्य जमीन

बाजरीचे सुधारित वाण तुमच्या शेतीत लावता येऊन चांगले उत्पादन घेता येऊ शकते कारण जवळपास सगळ्याच प्रकारच्या शेतजमिनीत जे पीक घेता येते. मात्र उथळ अथवा अतिहलक्या जमिनीत न घेता हलकी ते मध्यम खोल जमीनीची बाजरी निवड करावी.

गव्हाच्या या सुधारित जातींची लागवड करून मिळवा एकरी 40 क्विंटल पर्यंत भरघोस उत्पादन

पूर्वमशागत अशी करा

तुम्हाला तुमच्या शेतात बाजरीचे सुधारित वाण पेरायचे असेल तर सर्वप्रथम लोखंडी नांगराने जमिनीची 15 सें. मी. खोल नांगरणी करून घ्या. त्यानंतर कुळवाच्या 2-3 पाळ्या द्याव्या.
जमिनीतील काडी कचरा वेचून जमीन स्वच्छ करून घ्या. आणि हेक्टरी 10 ते 15 गाड्या चांगले कुजलेले शेणखत पूर्वमशागत करतानाच शेतजमिनीत मिसळा.

बाजरीचे सुधारित वाण पेरणीचा हंगाम

बाजरीची शेती करताना या पिकाची जून महिन्यात पडल्यानंतर करा. मात्र पेरणीसाठी पाहिला पाऊस चांगला पडू द्या. पेरणीची योग्य वेळ 15 जून ते 15 जुलै ही असून वेळेवर पेरणी अधिक उत्पन्न मिळवून देऊ शकते. उशिरा पेरणी केल्यास गोसावी अथवा अरगट रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता दाट शक्यता असते हे लक्षात घ्या. परिणामी बाजरीच्या उत्पन्नात घसरण होते.

हेक्टरी बियाणे व बिजप्रक्रिया

बाजरीचे सुधारित वाण एक हेक्टर शेतजमिनीसाठी सुमारे 4 किलो बियाणे लागते. तुम्हाला जर चाऱ्याचे पीक घ्यायचे असेल तर त्यासाठी 10 किलो प्रति हेक्टर बियाणे पेरणीसाठी लागेल. पेरणी करण्यापूर्वी अॅझेटोबॅक्टर जीवाणू संवर्धन खत 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास चोळा. ही प्रक्रिया केल्यानंतर बियाणे सावलीत सुकू द्या आणि मगच पेरणीसाठी वापरा.

पेरणीची पद्धत

बाजरीचे सुधारित वाण पेरण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या.शेत ओलवून वापसा आल्यानंतरच शेतात पेरणी करा. ज्या शेतजमिनीत पेरणी करायची आहे तेथे ५ ते ७ मीटर लांबीचे 3 ते 4 मीटर रुंदीचे सपाट वाफे तयार करून घेणे आवश्यक आहे. दोन चाड्याच्या पांभरीने पेरणी करा. पेरणी करत असताना दोन ओळीमध्ये 45 से.मी. तसेच दोन रोपांमध्ये 25 से.मी. अंतर ठेवा. बाजरीचे सुधारित वाण पेरल्यास प्रती हेक्टर अंदाजे दीड लाख रोपे लागवड करता येतात. पेरणी ३ किंवा 4 सेंटिमीटर पेक्षा खोल नसावी.

वाटाण्याच्या या सुधारित जाती मिळवून देतील 2 महिन्यात लाखो रुपयांचा निव्वळ नफा

खत व्यवस्थापन

तुम्हाला जर बाजरीचे सुधारित वाण पेरून भरघोस उत्पादन घ्यायचे असेल तर माती परीक्षण करून त्यानुसारच रासायनिक खतांचा वापर करणे उपयुक्त ठरेल. साधारणपणे मध्यम दर्जाच्या शेतजमिनीसाठी हेक्टरी 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश या मात्रेत खत पुरवठा करावा.तसेच हलक्या दर्जाच्या शेतजमिनीत 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश खतांचा वापर करा. मात्र पेरणीच्या वेळी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश द्यायला विसरू नका. त्यानंतर 25 ते 30 दिवसांनी अर्धे नत्र द्यावे. तसेच झिंकची कमतरता असलेल्या शेतजमिनीत हेक्टरी 20 किलो झिंग सल्फेट पेरणी करताना अवश्य वापरा.

बाजरी पिकाची विरळणी

तुम्ही पेरणी केलेले बाजरीचे सुधारित वाण रोपांची संख्या प्रती हेक्टर योग्य व मर्यादित राहण्यासाठी पेरणी केल्यानंतर 20 दिवसांनी विरळणी करा. दोन रोपातील अंतर १० से.मी. असावे. उगवण विरळ झाल्यास उगवणीनंतर 7 ते 8 दिवसांनी नांगे भरून घ्या.

आंतरमशागत अशी करा

तुमच्या शेतातील तणांचा बंदोबस्त करण्यासाठी गरजेनुसार एक ते दोन वेळा मजुरांच्या साहाय्याने खुरपणी तसेच दोनदा कोळपणी करून घ्यावी लागेल. पेरणी केल्यापासून सुरुवातीचा एक महिना तुमचे शेत तणमुक्त ठेवणे खूपच महत्त्वाचे असते. पेरणीनंतर पहिल्या महिन्याच्या कालावधीत तण व पीक यांच्यात हवा, पाणी, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी स्पर्धा चाललेली असते.

एकात्मिक तण नियंत्रण

तुम्ही एकात्मिक तण नियंत्रण पद्धतीमध्ये योग्य तणनाशकाची 1 किलो प्रतिहेक्टरी फवारणी करू शकता. तसेच पेरणी झाल्यानंतर परंतु पीक उगवण्यापूर्वी 500 लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारणी करा. पेरणीनंतर सुमारे एक महिन्याने खुरपणी करून घ्या.

पाणी व्यवस्थापन

बाजरी पिकाला साधारणपणे 30 ते 35 सेंटिमीटर पाण्याची आवश्यकता असते. बाजरीचे सुधारित वाण पेरून झाल्यानंतर पाणी देणे शक्य असल्यास दिवसांनी हलके पाणी द्या. त्यानंतर 10 ते 12 दिवसांच्या अंतराने 4 ते 5 वेळा पाणी देण्याची प्रक्रिया सुरू ठेवा.पेरणी नंतर 20 ते 25 दिवसांनी फुटवे फुकट असण्याच्या कालावधीत दुसरे पाणी आणि 60 ते 65 दिवसांनी म्हणजेच पीक पोटरीत असताना दूसरे पाणी द्या. बाजरी पिकास पाण्याची सोय असल्यास पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते.

कीड व्यवस्थापन

बाजरी पिकावर येणाऱ्या किडी आणि त्यांचे नियंत्रण याबद्दल आपण महत्वाची माहिती पाहणार आहोत. लक्षात घ्या बाजरी पिकावर पडणाऱ्या केसाळ अळी, खोड किडा आणि खोड माशी यांसारख्या किडीकडे दुर्लक्ष केल्यास उत्पादनात खूप मोठी घसरण दिसून येते. त्यामुळे किडींचे योग्य वेळी नियंत्रण करणे अगत्याचे ठरते.

केसाळ अळी पाने खाऊन टाकते. त्यामुळे बाजरीचे पीक निस्तेज होते. हा अळीचा बंदोबस्त करण्यासाठी क्लोरोपायरीफॉस 1.5 टक्के भुकटी प्रती एकर 20 किलो शांत हवेत धुरळणी करा. याशिवाय खोड किडा आणि खोड माशी पिकांचा वाढणारा शेंडा कुरतडत असतात त्यामुळे येणारी पणे वेडीवाकडी येऊन रोपाची वाढ खुंटते. तसेच कणीस सुद्धा पूर्णपणे भरत नाही. या खोड किडी अन् खोड माशीचे नियंत्रण करण्यासाठी सुद्धा क्लोरोपायरीफॉस 1.5 टक्के भुकटी प्रती एकर 20 किलो शांत हवेत धुरळणी करण्याची शिफारस केली जाते.

रोग व्यवस्थापन

केवडा आणि गोसावी रोगांचे नियंत्रण करण्यासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास वर दिलेली बीजप्रक्रिया करावी. पिकातील रोगग्रस्त झाडे समूळ नष्ट करावीत. रोग येण्याची संभाव्यता अधिक वाटल्यास योग्य रोग निवारक फवारण्या कराव्यात. केवडा आणि गोसावी रोगग्रस्त शेतजमिनीत पुन्हा बाजरीचे पीक घेऊ नये. बाजरीचे सुधारित वाण पेरणीसाठी वापरावे म्हणजे या रोगांचा धोका कमी होतो. अरगट रोगासाठी 20 टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया करणे फायदेशीर ठरते. उशिरा पेरणी केल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. पिकाची फेरपालट केल्यास करपा रोगाला आळा घालता येतो.

बाजरी पिकाची काढणी आणि उत्पादन

बाजरीचे सुधारित वाण अनुसार सरासरी 70 ते 100 दिवसांनी हे पीक काढणीयोग्य होते. कणसातील दाणे कडक होऊन कणीसाचा दांडा पिवळा झाला की पीक काढणी साठी तयार झालं अस समजावं. पीक काढणीस तयार झाले की पिकाची काढणी करून घ्यावी. त्यानंतर 2..3 दिवस कणीस उन्हात वाळू द्यावी. नंतर बाजरीचे धान्य तयार करता येते. दरवर्षी पाऊस पडण्याचे सरासरी संभाव्यता असलेल्या भागात तसेच पाण्याची सोय असलेल्या शेतजमिनीत 40 ते 50 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन आरामात घेतल्या जाऊ शकते. मात्र हलक्या आणि मध्यम दर्जाच्या शेतजमिनीत 25 ते 30 क्विंटल आणि अवर्षणप्रवण क्षेत्रात प्रती हेक्टर सरासरी 20 ते 25 क्विंटल उत्पादन मिळते.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment