कापूस आणि सोयाबीन अनुदान लाभासाठी अशी करा घरबसल्या ई-केवायसी

कापूस आणि सोयाबीन अनुदान मिळण्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या शेतीवर या पिकांची नोंद आहे त्यांनी घरबसल्या ई केवायसी करण्यासाठी खालील वेबसाईट वर जावे.
https://scagridbt.mahait.org/ या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला login आणि disbursement status हे दोन पर्याय दिसतील. त्यामध्ये तुम्हाला disbursement status पर्याय निवडायचा आहे.

त्यानंतर तुम्हाला तुमचा आधारकार्ड क्रमांक टाकून कॅप्चा कोड भरायचा आहे. त्यानंतर केवायसी पद्धती ही OTP निवडा. त्यानंतर Get Aadhar OTP या पर्यायावर क्लिक करा.तुमच्या आधार सोबत लिंक असलेल्या मोबाईलवर एक OTP येईल. तो ओटीपी दिलेल्या रकान्यात टाकून गेट data या पर्यायावर क्लिक करा. आता तुमचा ओटीपी व्हेरिफाय झालेला असेल. त्यानंतर ok या पर्यायावर क्लिक केलं की झाली तुमची ई-केवायसी पूर्ण.

कापूस आणि सोयाबीन अनुदान लाभासाठी ई पीक पाहणी अट रद्द

दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी एक शासन निर्णय काढून सरकारने सन 2023 च्या कापूस आणि सोयाबीन अनुदान लाभासाठी राज्यातील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीची अट रद्द केली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची ई पीक पाहणी नोंद नसल्यामुळे आधी अशा शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले होते. मात्र आता ई-पीक पाहणीची अट रद्द करून संबंधित तलाठ्यांकडे 7/12 उताऱ्यावर सोयाबीन व कापूस या पिकाची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकाची लागवड केली आहे पण ई- पीक पाहणीमध्ये पोर्टलवर नोंद नाही अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा आता आनंदाची बातमी आहे. मात्र संबंधित तलाठ्यांकडे 7/12 उताऱ्यावर या पिकाच्या लागवडीची नोंद असायला हवी. अशा सर्व शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले आहे.

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनामार्फत कापूस आणि सोयाबीन अनुदान देण्याची अंमलबजावणी सरकारद्वारे ३० ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली होती. सदर अनुदान वाटप प्रक्रियेत येत असलेल्या विविध सोडविण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिनांक 2 सप्टेंबर रोजी आढावा बैठक घेतली . या बैठकीला कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे, कृषी संचालक विजयकुमार आवटे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी यांची उपस्थिती होती.

वेबसाईट वर ॲक्सेस मिळण्यास येत आहेत तांत्रिक अडचणी

त्यामुळे शेतकऱ्यांची माहिती अपलोड करुन ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सुरळीत होत नाही आहे. कापूस आणि सोयाबीन अनुदान लाभासाठी ई केवायसी करण्यासाठीं शेतकरी वर्ग गर्दी करत आहे. मात्र वेबसाईट वर येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईन ई केवायसी करण्यास विलंब होत आहे. एकाचवेळी अनेक शेतकरी लॉग इन करत असल्यामुळे सुद्धा मध्ये मध्ये ही वेबसाईट हँग होत असल्याचे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे.

कापूस आणि सोयाबीन अनुदान योजनेतील सुमारे 21 लाख शेतकऱ्यांची ई केवायसी अद्याप बाकी

कापूस आणि सोयाबीन अनुदान लाभ मिळविण्यासाठी पात्र ठरलेले 96 लाख शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत फक्त 68 लाख शेतकऱ्यांनीच ई केवायसी केलेली आहे. अजूनही 21 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांची ई केवायसी प्रक्रिया प्रलंबित आहेत. सदर अनुदानाची रक्कम ही dbt प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी त्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तुम्ही जर अद्यापपर्यंत ऑनलाईन ई केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या.

तातडीने अनुदान प्रक्रिया पूर्ण करण्याचे धनंजय मुंडे यांचे निर्देश

दरम्यान या बैठकीत कापूस आणि सोयाबीन अनुदान वाटपात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवून शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी तत्काळ अंमलबजावणी पूर्ण होऊन कापूस आणि सोयाबीन उत्पादक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सदर अनुदान जमा करण्याचे निर्देश कृषी मत्र्यांकडून देण्यात आले. या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या असल्या तरीही विविध अडचणी मात्र कायम असून पात्र शेतकऱ्यांच्या नावाचा घोळ अजूनही जसाच्या तसा आहे.

राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक असलेल्या तसेच कापूस आणि सोयाबीन अनुदानाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी महत्वाची आनंददायी बातमी आहे. सदर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहेत. मात्र त्यासाठी ई केवायसी करणे आवश्यक आहे.

तांत्रिक अडचणी लवकरात लवकर सोडवून लाभ देण्याचे निर्देश

या बैठकीत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या बैठकीत कापूस आणि सोयाबीन अनुदान वाटपाच्या प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी तसेच महसूल विभागाच्या सहाय्याने युद्ध पातळीवर सोडवून शेतकऱ्यांना पुढील आठवड्यापासून म्हणजेच सप्टेंबर पासून अर्थ सहाय्य थेट पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्धा एकरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर अर्धा एकरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या शेतजमिनी क्षेत्र अनुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार अर्थसहाय्यास मंजुरी मिळाली आहे.

‘या’ योजनेतून महिलांना मिळत आहे 10 हजाराचा घरगुती भांडी संच

कापूस आणि सोयाबीन अनुदान; इतका निधी झाला आहे मंजूर

2023 च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन पीक घेतलेल्या शेतकऱ्यांना सरकारने 2 हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान जाहीर केले आहे. त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना 4 हजार 194 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार 548 कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2 हजार 646 कोटी रुपये असे सर्व मिळून एकूण 4 हजार 194 कोटी रुपये अनुदान सरकारकडून मंजूर झाले आहे.

राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामातील ई पीक पोर्टलवर नोंद असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 रु. तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5000 रु. (2 हेक्टरच्या मर्यादेत) इतके अर्थसहाय्य मंजूर करण्याचा शासननिर्णय 29 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आला होता. मात्र 27 सप्टेबर 2024 च्या शासन निर्णय प्रमाणे पिकाच्या ई-पीक पाहणी नोंदीची अट रद्द करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान रक्कम जमा

राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या शब्दानुसार मागील वर्षी भाव पडल्याने नुकसान झालेल्या राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाप्रमाणे अर्थसहाय्य करण्याच्या योजनेतून आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणाली पद्धतीने शेतकऱ्यांना थेट अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात करण्यात आली असून 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे यासाठी 2 हजार 399 कोटी रूपयांची आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आली. प्रति हेक्टर पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर 2389 कोटी 93 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना त्यांची ई केवायसी पूर्ण झाल्यानंतर पैसे मिळणार आहेत.

कापूस व सोयाबीन पिकाची मदत देण्यासाठी अनावरण करण्यात आलेले संकेतस्थळ कोणते आहे?

राज्यातील कापूस आणि सोयाबीन साठी ज्या शेतकऱ्यांना सदर निधी वितरीत होणार आहे असे शेतकरी खालील अधिकृत वेबसाईट वरून आपल्या मोबाइल वरून निधी बँकेत जमा झाला की नाही हे चेक करू शकणार आहेत. आधिकृत संकेतस्थळ लिंक

https://scagridbt.mahait.org

या लिंक वर आपल्याला चेक करता येणार आहे.


कापूस व सोयाबीन पिकाची मदत मिळाली की नाही ऑनलाईन असं करा चेक

कापूस व सोयाबीन पिकासाठीचे दहा हजार रुपये असे करा mobile मध्ये चेक

१) पुढील अनुदान वेबसाईट लिंकवर क्लिक करून ओपन करा. https://scagridbt.mahait.org


२) सोयाबीन कापूस अनुदान वेबसाईट ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला वरती लाल चौकोनात “Disbursement Status” वर क्लिक करावे लागेल.

३) नंतर Disbursement Status पेज दिसेल त्यात आपला आधार क्रमांक तसेच कॅप्चा कोड टाकून Get Aadhaar OTP पर्याय वर क्लिक करावे लागणार आहे. त्यानंतर आपल्या आधार सोबत लिंक केलेल्या मोबाइल नंबर वर एक ओटीपी येईल तो टाकायचा आहे.

४) हा OTP टाकल्यानंतर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीचे अपडेट विषयीची सविस्तर माहिती आपल्यासमोर उघडेल.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment