नविन गव्हाचे वाण विकसित : शेतकऱ्यांना साधिक उत्पन्न घेता यावे यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने अनेक सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येत असतात. आता गव्हाचे वाण विकसित केल्या गेले आहे. तसेच शासनाच्या वतीने विविध महत्वाकांक्षी योजना देखील अंमलात आणल्या जातात. अशीच एक आनंदाची बातमी देशभरातील शेतकरी बांधवांसाठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 11 ऑगस्ट 2024 रोजी पिकांच्या 109 नवीन वाणांचे (Crop Variety) प्रकाशन केले होते. या 109 जातींपैकी दोन गव्हाच्या आहेत, त्यापैकी एका महत्वाच्या गव्हाचे वाण जातीचे नाव पुसा गहू शरबती (HI 1665) आहे. या वाणाचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होऊन भरघोस उत्पादन मिळेल असा विश्वास व्यक्त केल्या जात आहे.
केंद्र सरकारने जाहीर केल्या एकूण 109 वाणांच्य्या जाती
केंद्र सरकारद्वारे काही दिवसांपूर्वी पिकांच्या 109 जाती जाहीर करण्यात आल्या आहेत, यामध्ये दोन जाती गव्हाच्या वाणाच्या आहेत. यापैकी एक पुसा शरबती गव्हाची जात असून जी 110 दिवसांत पिकते, तसेच प्रति हेक्टर 33 क्विंटलपर्यंत उत्पादन देण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या वाणाला जास्त सिंचनाची आवश्यकता नाही. ही जात तीव्र उष्णता आणि दुष्काळ सहन करण्यास सक्षम आहे. पुसा गहू शरबती (HI 1665) जातीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील चांगले दाणे. या दाण्यांमध्ये झिंकचे प्रमाण 40.0 पीपीएम पर्यंत असते, शिवाय ही बायोफोर्टिफाइड जात आहे. ही गव्हाच्या वाणाची नवीन जात विशेषत: मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या मैदानी भागात लागवडीसाठी विकसित केली गेली आहे.
काय आहेत या नवीन विकसित गव्हाचे वाणाची वैशिष्ट्ये
गव्हाची ही जात ICAR प्रादेशिक केंद्र इंदूरने विकसित केली असून गव्हाची ही जात हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यास प्रबळ आहे, मुख्यतः पश्चिम आणि दक्षिण भारतात गव्हाच्या विस्तारासाठी हे वाण विकसित करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
या गव्हाचे वाण बद्दल महत्वाची माहिती
सदर गव्हाचे वाण उत्पादन क्षमतेबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास ही जात 33 क्विंटल/हेक्टरपर्यंत (मर्यादित सिंचन परिस्थितीत) उत्पन्न मिळवून देऊ शकते. पण संभाव्य धान्य उत्पादन 43.5 क्विंटल प्रति हेक्टर आहे. तसेच गव्हाची ही जात 110-115 दिवसांत तयार होते. या जातीच्या गव्हाची उंची 85-90 सेमी असून 1000 दाण्यांचे वजन 44 ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले आहे. काळा आणि भुरा तांबेरा रोगास या जातीचे पीक प्रतिकारक आहे.
गव्हाची मागणी वाढल्यामुळे उत्पादनात वाढ
आहार संतुलनासाठी आवश्यक घटक असलेल्या गव्हाची मागणी प्रचंड असते.सध्या जनतेमध्ये पोळी तसेच पराठे यांच्यासाठी आवश्यक असलेल्या गव्हाची मागणी प्रचंड वाढली आहे आता अनेक शेतकऱ्यांनी गव्हाची लागवड करण्यास सुरुवात सुद्धा केली आहे. पूर्व भारतातही अशीच परिस्थिती आहे. याच कारणामुळे मागील काही वर्षात गव्हाखालील क्षेत्र वाढले असून हे क्षेत्र 34 दशलक्ष हेक्टरवर पोहोचले आहे. अशा परिस्थितीत, पुसा गव्हाची शरबती (HI 1665) ही जात महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडूमध्ये गव्हाच्या विस्ताराची योजना नावारूपास येऊन शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळवून देऊ शकते.