पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेलेएक छोटेसे गाव म्हणजे नारायणगाव. येथे राहणारा हर्षद नेहेरकर नावाचा एक उमदा तरुण. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या नांदी न लागता तरुणाने शेती करण्याचा निर्णय घेतला. घरी वडिलोपार्जित 25 एकर शेती. त्या 25 एकरात त्याने डाळिंब बाग फुलविली. पण शेतातील कुठलीही जागा वाया जाऊ नये यासाठी या तरुणाने शेतीच्या बांधावर गवती चहाची लागवड केली. आणि काय गंमत, या गवती चहा लागवड मधून हा तरुण शेतकरी महिन्याला तब्बल 1 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावत आहे. अशाप्रकारे आपले चातुर्य वापरून शेताचा पुरेपूर उपयोग करून घेणाऱ्या या युवा शेतकऱ्याचे परिसरात कौतुक होत आहे.
23 वर्ष वय असलेल्या या तरुणाने आपल्या 25 एकर शेताच्या बांधावर गवती चहा पेरून घेत असलेले हे भरघोस उत्पन्न पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.चला तर जाणून घेऊया ya गवतीचहा लागवडीसाठी हर्षद कसे व्यवस्थापन करतो.
गवती चहा पिकाला जास्त लक्ष देण्याची गरज नसते.
गवतीचहा साठी हर्षदला फार लक्ष देण्याची आवश्यकता नसते. त्याने या पिकाला पाणी देण्यासाठी फक्त 2 पाईप सोडले असून फक्त अधून मधून या गवतीचहा पिकाला तो फवारणी मात्र आवर्जून करत असतो. शेतीचा धुरा पडीक राहण्यापेक्षा या जमिनीचा इतका चांगला वापर करून भक्कम असा नफा घेणारा हा तरुण शेतकरी कौतूहकाचा विषय ठरला आहे.
गवतीचहा आरोग्यासाठी हितकर असतो. तसेच गवतीचहाला प्रचंड मागणी सुद्धा असते. या सर्व गोष्टी हेरून हर्षद ने खरच कमाल केली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
हर्षद या गवती चहाची विक्री कशी करतो?
पुण्यातील जुन्नर तालुक्यात अनेक खासगी खरेदीदार असून मॉल चे कलेक्शन सेंटर सुद्धा आहेत. त्यामुळे हर्षदला आपला माल विकणे सोयीस्कर होते. या कलेक्शन सेंटर द्वारा हर्षद त्याचा माल थेट विक्री करतो. त्याचा हा गवतीचहा अनेक मॉल तसेच विविध सुपर मार्केटमध्ये विकल्या जातो. हर्षदकडून दररोज खरेदीदार मालाची खरेदी करत असतात. 40 ते 80 रुपये दरम्यानचा भाव प्रती किलो मागे हर्षद ला मिळतो. त्यामुळे माल विक्रीची सुद्धा जास्त कटकट होत नाही.
हर्षद करत असलेल्या डाळींब लागवड चे त्याला भरघोस उत्पन्न मिळते ते वेगळेच. पण स्वतःची चाणाक्ष बुध्दी वापरून शेतातील धुऱ्याच्या पडीक जागेचा सुद्धा उपयोग करून आर्थिक उन्नती साधता येऊ शकते असे उदाहरणच या युवा शेतकऱ्याने राज्यातील इतर होतकरू शेतकरी बांधवांना घालून दिले आहे.
हर्षद गवती चहा विकून प्रती महिना एक लाख उत्पन्न कसे मिळवतो?
हर्षद दररोज 50 ते 80 किलो गवती चहाची विक्री करतो. याबाबत किमान वजन अन् किमान दर जरी विचारत घेतला तरीही कमीत कमी 1 लाख वीस हजार रुपयांची गवतीचहाची विक्री हर्षद करतो. परिणामी महिन्याला किमान एक लाख वीस हजार रुपये विक्री आरामात होते. यासाठी हर्षदला येणारा एकंदर खर्च वजा करता त्याला एक लाख रुपये प्रति महिना निव्वळ नफा प्राप्त होतो.
डाळींब बागेत हर्षद ने घेतली तब्बल 7 आंतरपिके
हर्षद नेहरकर ने आपल्या डाळिंब बागेत चक्क 7 आंतरपिके घेऊन भरघोस उत्पन्न घेण्याचा विक्रम केला आहे. या आंतरपिकांच्या माध्यमातून तो दर 2 वर्षाला एकरी 6 लाख रुपयांचा शुद्ध नफा मिळवत असून शेतीत वेगवेगळे प्रयोग करण्याची कला असलेला हा तरुण शेतकरी आज युवा यशस्वी शेतकरी बनला आहे.
राज्यातील इतर शेतकरी वर्गासाठी हे एक चांगले उदाहरण आहे. पारंपरिक शेतीत बदल करून काहीतरी नावीन्यपूर्ण प्रयोग आपल्या शेतात केल्यास त्याचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होतो हे वेळोवेळी सिद्ध होत असते. गरज असते ती फक्त मानसिकता बदलून शेतीत नवीन नवीन प्रयोग करण्याची. शेतकरी राजा जगाचा पोशिंदा असून सध्या तोच चिंतेत दिसत असतो. तर शेतकरी मित्रांनो आपल्याला ही परिस्थिती बदलून नवीन उपक्रम तसेच नावीन्यपूर्ण प्रयोग अन् आधुनिक शेतीचा अवलंब करणे अगत्याचे ठरते.
गवती चहा आरोग्यास हितकारक, अनेक फायदे
गवती चहा हा मानवी आरोग्यास अत्यंत फायदेशीर असून त्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. पोटात दुखणे, आम्लपित्त, गॅस यांसारख्या त्रासात गवतीचहा अत्यंत उपयुक्त आहे. अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीसेप्टिक, अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल, अँटीपायरेटिक, एनाल्जेसिक, अँटीडिप्रेसस, अँटी-एजिंग, अँटी-कॅन्सर सारख्या गुणधर्मांनी समृद्ध असलेला गवती चहाला आपण आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवून आपले आरोग्य निरोगी ठेवू शकतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, गवतीचहाचे सेवन गॅस्ट्रिक अल्सरचा धोका कमी करते. तसेच गवतीचहाच्या पानांचे तेल पोटाच्या अनेक आजारांवरही रामबाण औषध म्हणून प्रचलित आहे.
गवती चहाचा सुगंध खूप छान असल्यामुळे या सुगंधामुळे तुमचे टेन्शन कमी होण्यास मदत होते . जेव्हा गवती चहाचे सेवन केल्या जाते त्यावेळेस त्याच्या सुगंधामुळे आपली चिंता आणि तणाव कमी होतो. तसेच झोपेच्या समस्या असतील तर त्या सुद्धा नाहीशा करण्याची किमया गवती चहात आहे. गवती चहा मध्ये अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात. अशावेळी हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. तोंडातील इन्फेक्शन सारख्या समस्या सुद्धा नाहीशा होण्यास मदत होते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अहवालानुसार, गवती चहाच्या तेलात स्ट्रेप्टोकोकस म्युटान्स बॅक्टेरियाशी लढण्याची क्षमता असते, परिणामी तोंडाला आलेली दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.
गवती चहा अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजांनी युक्त असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. याचे दररोज सेवन केल्याने अनेक आजारांपासून बचाव करता येऊ शकतो. एका संशोधनानुसार,गवती चहामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करण्यात मोलाचा वाटा असतो. इतकंच नाही तर यात असलेले अँटीऑक्सिडंट्स कोरोनरी रक्तवाहिन्यांमधील पेशींचे डिसफंक्शन थांबविण्यास सहाय्य करतात.
गवती चहाचे वैज्ञानिक नाव सिम्बोपोगॉन सायट्राटस आहे. त्याला इंग्रजीत lemongrass असे सुद्धा म्हटले जाते. गवती चहा हृदयरोग रोखण्यासाठी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतो. मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरच्या मते, लेमनग्रासमध्ये सिट्रल आणि जेरेनियम नावाची दोन दाहक-विरोधी संयुगे असतात. ज्यामुळे शरीरातील जळजळ कमी कमी होऊन लाभ मिळतो. कधीकधी काही जणांना हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक होतो. अशावेळी याचे नियमित सेवन लाभदायक ठरू शकते. गवती चहा हृदयरोग रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडते. .