आज देशातील अनेक शेतकरी शेतीला जोड म्हणून दुधाचा व्यवसाय करत असल्यामुळे शेतकऱ्यांकडे बैल, गाय, म्हैस यांच्यासारखे पाळीव जनावरे ही असतातच. याच पाळीव प्राण्यांच्या शेणाच्या गोवऱ्या विकून महिन्याला तब्बल तीस हजार रुपये महिना कमावणे अगदी सहजशक्य आहे. आज राज्यातील ग्रामीण भागात अनेक शेतकरी शेतीत जास्त उत्पन्न मिळत नाही म्हणून हवालदिल झालेले आहेत. तसेच त्यांचे पुत्र बेरोजगार म्हणून हिंडत आहेत. तर शेतकरी बांधवांनी शेणाची गोवरी विकण्याचा व्यवसाय सुरू केल्यास त्यांना भक्कम आर्थिक लाभ होऊ शकतो. आजच्या या शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करू शकणाऱ्या शेणाच्या गोवऱ्या विकून तब्बल तीस हजार रुपये महिना कमावण्यासाठी काय करावे लागेल याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत.
शेणाच्या गोवऱ्यांचा व्यावसायिक दृष्ट्या वापर करून अर्थार्जन
शेतकरी मित्रांनो शेणखतापासून गोवऱ्या आपले पूर्वज अनेक पिढ्यांपासून तयार करून त्यांचा वापर चुलितील इंधन म्हणून वापरत आलेले आहेत. मात्र याच गोवऱ्यांचा व्यावसायिक वापर करून म्हणजेच शेणाच्या गोवऱ्या विकून महिन्याला तब्बल तीस हजार रुपये कमावता येऊ शकतात. शेणापासून गोवऱ्या थापून त्या वाळत घालून दोन दिवसांत तयार होत असल्यामुळे हा बिन खर्चाचा, बिगर भांडवलाचा तसेच अगदी सोप्पा व्यवसाय आहे हे विसरू नका. टाकावू पासून टिकावू या धोरणाचा अवलंब करून आपण शेणाच्या गोवऱ्या विकून महिन्याला तब्बल तीस हजार रुपये कमवू शकतो इतकी मागणी या शेणाच्या गोवऱ्याना शहरात मिळते.
या कामांसाठी शेणाच्या गोवरीला प्रचंड मागणी
आजच्या काळात सुद्धा शेणाच्या गोवऱ्याना प्रचंड मागणी आहे. अंत्यविधी, होमहवन, पाणग्यांचा स्वयंपाक, विविध मंदिरे याशिवाय अनेक मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सुद्धा शेणाच्या गोवऱ्यांना प्रचंड मागणी असते. शहरात सुद्धा गोवऱ्या वरील कार्यांसाठी लागतात. मात्र शहरात जास्त जनावरे नसल्यामुळे शेण उपलब्ध नसते. परिणामी शहरात शेणाच्या गोवऱ्या मिळणे कठीण होते. महिन्याला तीन हजार गोवऱ्या जरी तयार केल्या तर त्या शेणाच्या गोवऱ्या विकून महिन्याला तब्बल तीस हजार रुपये आरामात कमावता येतील. म्हणजे अनेक शेतकरी शेणाच्या गोवऱ्या बनवून मोठ्या प्रमाणात पैसे कमावत आहेत.
खडकाळ जमिनीत ऊसाचे एकरी 120 टन उत्पादन घेणारा अशिक्षित शेतकरी
यासाठी तुम्हाला जास्तीचे कष्ट सुद्धा पडत नाहीत. रोज सकाळ-संध्याकाळ दोन गायीचे म्हशीचे शेण गोळा करुन त्या शेणाच्या सकाळी एक तास देऊन गोवऱ्या तयार करता येतील. त्यामुळे शेणाच्या गोवऱ्या विकून महिन्याला तब्बल तीस हजार रुपये कमावणे हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून चला लागा कामाला आणि करा या फायदेशीर व्यवसायाचा श्रीगणेशा.
गावातील शेण करा गोळा किंवा हे करा
शेतकऱ्यांनो तुमच्याकडे जर मुबलक प्रेमात शेणाची उपलब्धता नसेल तरीही तुम्ही तुमच्या भागातील शेण जमा करू शकाल आणि त्यापासून शेणाच्या गोवऱ्या बनवू शकाल. किंवा यासाठी गावातील महिलांना शेणाच्या गोवऱ्या बनवायला सांगून एक ते तीन रुपयाला एक या किंमतीला त्यांच्याकडून शेणाच्या गोवऱ्या विकत घेऊन सुद्धा तुम्ही हा शेणाच्या गोवऱ्याचा फायदेशीर व्यवसाय सुरू करू शकता. गावात तुम्हाला मुबलक शेण मिळेल. किंवा गावातील गरजू महिला तुम्हाला गोवऱ्या बनवून देतील. त्यामुळे त्यांना सुद्धा तुमच्या माध्यमातून दोन पैसै मिळतील.
कुठे विकायच्या या शेणाच्या गोवऱ्या?
शेतकरी मित्रांनो तुम्ही हा लेख मन लावून वाचत आहात मात्र एक प्रश्न तुमच्या डोक्यात लेखाच्या सुरुवातीपासून घर करून आहे. आणि तो प्रश्न म्हणजे शेणाच्या गोवऱ्या विकायच्या तरी कशा आणि कुठे? तसेच या शेणाच्या गोवऱ्या विकून महिन्याला तब्बल तीस हजार रुपये मिळायचे तरी कसे? तर आता या प्रश्नांचे उत्तर लक्षपूर्वक वाचा. तुम्ही जर अमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या ऑनलाईन विक्रीच्या वेबसाईटवर शेणाच्या गोवऱ्या शोधल्या तर तुम्ही त्यावर असलेली एका शेणाच्या गोवरीची किंमत पाहून खूपच धक्का बसेल.
सेंद्रिय शेती करुन बचत गटाच्या तब्बल 2 हजार महिला झाल्या मालामाल
या गावातील महिलांनी विकली तब्बल 15 रुपयाला एक या दराने शेणाची गोवरी
आज वरील सर्वच वेबसाईटवर शेणाची एक गोवरी चक्क 10 ते 15 रुपयाला विकल्या जात आहे. 5 ते 6 गोवऱ्या एका पॅकमध्ये टाकून त्यांची तब्बल 50 ते 80 रुपयांना विक्री केल्या जात आहे. म्हणजे विचार करा शेतकरी मित्रांनो शेणाच्या गोवऱ्या ऑनलाईन मार्केटवर विकून किती नफा मिळवत आहेत काही लोक. मग आपण का करू शकत नाही इतका सोपा आणि फायदेशीर व्यवसाय जो तुम्हाला शेणाच्या गोवऱ्या विकून महिन्याला तब्बल तीस हजार रुपये मिळवून देऊ शकतो.
तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, मात्र शेणाच्या गोवऱ्या विकण्याचा हा व्यवसाय बऱ्याच जणांनी सुरू केला आहे. यात महिला अग्रेसर आहेत. दौंड तालुक्यातील नानगाव येथील महिलांनी चक्क अमेझॉन वेबसाईटवर गाई-म्हशीच्या शेणाच्या गोवऱ्या ऑनलाईन पद्धतीने विकून त्या महिला महिन्याला हजारो रुपये कमावत आहेत. अमेझॉन या वेबसाईट वर शेणाच्या गोवऱ्या विकणारे नानगाव हे राज्यातील पहिले गाव ठरले आहे. येथील महिलांनी एक बचत गट तयार केला असून या बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी हा शेणाच्या गोवऱ्या विकून महिन्याला तब्बल तीस हजार रुपये उत्पन्न मिळवून देणारा फायदेशीर ऑनलाईन व्यवसाय यशस्वीपणे सुरू केला आहे.