…अन्यथा निराधार योजना लाभार्थ्यांना मिळणारा पगार होईल बंद

तात्काळ करा या पूर्तता, अन्यथा निराधार योजना लाभार्थ्यांना मिळणारा पगार होईल बंद : राज्यांतील असंख्य विधवा, अपंग, दुर्धर आजाराने ग्रस्त गरजू लोकांना त्यांचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी राज्य सरकारकडून संजय गांधी निराधार योजना मार्फत अनुदान देण्यात येतं. मात्र या योजनेच्या कार्यपद्धतीत आता बदल झाला असून काही महत्वाचा गोष्टींची लाभार्थ्यांना पूर्तता करणे आवश्यक आहे,अन्यथा निराधार योजना लाभार्थ्यांना मिळणारा पगार होईल बंद. तर या योजनेचे अनुदान सुरू राहण्यासाठी कोणत्या महत्वाच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत याची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.

आता डीबीटी प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात जमा होईल अनुदान

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील विविध तालुक्यातील लाभार्थ्यांना माहे फेब्रुवारी 2025 पासुन अनुदान अर्थसहाय्य केवळ डीबीटी पोर्टल द्वारे थेट खात्यात जमा होणार असून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले आवश्यक कागदपत्रे तहसिल कार्यालयाच्या संजय गांधी निराधार योजनेच्या शहरी व ग्रामीण शाखेत जमा करावे लागणार आहेत, अन्यथा निराधार योजना लाभार्थ्यांना मिळणारा पगार होईल बंद. राज्यातील विविध तहसील कार्यालय यांचे मार्फत अशाप्रकारचे आवाहन करण्यात आले आहे.

तात्काळ करा तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत संलग्न

याबाबत एक शासन निर्णय जारी करण्यात आला असून त्यानुसार सर्वच लाभधारकांना त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत संलग्न करून घेणे अनिवार्य असेल, सदर योजनेतील लाभार्थ्यांची विहीत विवरणपत्रात माहिती भरुन डि.बी.टी. (DBT) पोर्टलवर अपलोड करुन वैयक्तिक लाभाच्या सर्व योजनांचे सर्व लाभ तातडीने डी.बी.टी. मार्फत लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा करण्याच्या मुख्य सचिवांनी सुचना दिलेल्या आहेत, असे न केल्यास निराधार योजना लाभार्थ्यांना मिळणारा पगार होईल बंद याची नोंद घ्यावी.

वृद्ध निराधार लोक

बँक खाते आधारशी लिंक नसल्यास फेब्रुवारी पासून निराधार योजना लाभार्थ्यांना मिळणारा पगार होईल बंद

संजय गांधी निराधार योजना मार्फत अनुदान मिळणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना हे महत्वाचे काम करावे लागणार आहे. जिल्हा पातळीवरून डिबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड (आधार प्रमाणीकरण झालेल्या व आधार प्रमाणीकरण न झालेल्या) लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025 या दोन महिन्यांचे अनुदान थेट डिबीटी पोर्टल मार्फत वितरीत करण्यात येणार आहे. तसेच ऑन बोर्ड नसलेल्या म्हणजेच अद्याप पर्यंत बँक खाते आधार कार्ड सोबत संलग्न नसलेल्या लाभार्थ्यांना पुर्वीच्याच पारंपारीक पध्दतीने (बिम्स प्रणालीव्दारे) हे अनुदान देण्यात येणार आहे.

करा या गोष्टींची पूर्तता अन्यथा निराधार योजना लाभार्थ्यांना मिळणारा पगार होईल बंद

बिम्स प्रणालीव्दारे संजय गांधी निराधार योजना अनुदान वितरणाची सुविधा ही फक्त जानेवारी 2025 या महिन्यापर्यंत उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यानंतर फेब्रुवारी महिन्यात ऑफलाईन पद्धतीने हे अनुदान देण्यात येणार नाही. परिमाण संजय गांधी निराधार योजना मार्फत अनुदान मिळणाऱ्या ज्या लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत संलग्न केलेले नसेल त्यांना या अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे. तसेच याशिवाय आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तहसील कार्यालयातील निराधार योजना विभागात जमा करावे लागणार आहेत, अन्यथा संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना मिळणारा पगार होईल बंद. आणि याची जबाबदारी ही त्या लाभार्थ्यांवर असणार आहे.

बांधकाम कामगार पेटी योजना, घरबसल्या करा अर्ज

ही कागदपत्रे करावी लागतील तहसील कार्यालयात सादर

संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी आपले अद्यावत आधारकार्ड, बँक खाते, आधार व बँक खात्याशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक, अपंग प्रमाणपत्र आणि जीवन प्रमाणपत्र या सर्व कागदपत्रांची झेरॉक्स प्रत संजय गांधी निराधार योजनेच्या ग्रामीण व शहरी शाखेत सादर करावी लागणार आहे. असे न केल्यास आपल्या संपुर्ण माहितीची ऑनलाईन डीबीटी पोर्टलमध्ये नोंद घेता येणे शक्य होणार नाही. सदर नोंद न झाल्यास संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ बँक खात्यावर शासनाकडुन जमा करणे शक्य होणार नाही.

याबाबत नंतर लाभार्थ्यांची कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही याची पूर्णपणे जबाबदारी त्या त्या लाभार्थ्यांची असणार आहे, असे विविध तालुक्यातील तहसिलदार यांनी जनहितार्थ सूचना जारी केल्या आहेत. संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना मिळणारा पगार होईल बंद, ही गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता तसेच बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करून घेऊन पगार मिळण्यास अडचणी येऊ न देणे याबाबत तत्काळ कृती करणे हेच प्रत्येक लाभार्थ्यांच्या हिताचे आहे. तरी सर्व लाभार्थ्यांनी आवश्यक असलेल्या या गोष्टी आजच करून घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ई श्रम कार्ड नोंदणी आणि अपडेट अशी करा घसबसल्या 5 मिनिटात

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment