चीन देशातील शेती प्रगत का आहे? ही आहेत कारणे

चीनकडे बहुधा वाणिज्य, भू-राजकारण आणि राजकीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पाहिले जाते. चीन देशाने केलेली एकंदर प्रगती वाखणाण्याजोगी आहे. चिनी शेती आज नवनवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रचंड पुढारलेली आणि विकसित आहे. देशांतर्गतच काय तर चीनच्या शेतीविषयक धोरणांचा आज जागतिक स्तरावर प्रभाव दिसून येत आहे. क्रांतिकारी माओवादी काळापासून आजपर्यंतच्या चिनी शेतीत खूप मोठ्या प्रमाणावर उत्क्रांती घडून आलेली आहे. आज आपण चीन देशातील शेती प्रगत का आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चीन देशातील शेती प्रगत का आहे याची काही प्रमुख कारणे आपण बघुयात.

उत्कृष्ट पाणी व्यवस्थापन

चीनने सिंचन पद्धती जसे की स्प्रिंकलर, ठिबक आणि पाइपलाइनचा वापर वाढवून शेतीमध्ये पाण्याच्या वापराची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणावर सुधारली आहे. इतकंच काय तर चीन देशाने समुद्राच्या पाण्यावर भाताची शेती विकसित केली आहे आणि उच्च प्रदेशात आणि कोरडवाहू भाताच्या जातींची सुद्धा लागवड केली आहे. पाण्याच्या स्त्रोतांचा कार्यक्षम वापर करून शेतीला प्रगत बनविण्याचे धोरण आखून त्यानुसार अंमलबजावणी करण्यात चीनचा हातखंडा आहे. आपण नेहमी विचार करतो की चीन देशातील शेती प्रगत का आहे. तर त्यांचा शेती या व्यवसायाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन लक्षात घेणे सुद्धा आवश्यक आहे.

चीन देशातील विकसित सेंद्रिय शेती

चीन देशातील सेंद्रिय शेती खूपच विकसित झालेली असल्यामुळे अन्न उत्पादनात झपाट्याने वाढ होत आहे आहे. देशाच्या वाढत्या अन्न सुरक्षेच्या चिंतेमुळे चीन देशाने काही दशकांपूर्वीच शेतीकडे लक्ष देऊन त्यानुसार कार्यक्षमरित्या शेतीविषयक उपक्रम राबवून मेहनत केल्यामुळेच चीन देशातील शेती प्रगत का आहे या प्रश्नाचे उत्तर आपल्या लक्षात येईल. एकंदर देशातील सरकारची महत्वाकांक्षी अंमलबजावणी या चीन देशातील प्रगत शेतीसाठी उपयुक्त ठरली आहे. आपल्याला कदाचित माहीत असेल की सेंद्रीय शेतीच्या बाबतीत चीन देशातील जवळपास प्रत्येक भूभाग सजग आणि सुसज्ज आहे.

चीन देशातील शेती प्रगत का आहे? ही आहेत कारणे

स्मार्ट शेती करण्याकडे कल

चीन देशातील शेती प्रगत का आहे या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला असता तुम्हाला ऐकून कुतूहल वाटेल की चीन देशाने बिग डेटा आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा कृषी उत्पादनात समावेश केला आहे. या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर शेतीतील लागवड, व्यवस्थापन आणि कापणी या सर्व बाबींमध्ये प्रभावीपणे केला जातो. आपल्या देशात मात्र अजूनही नवीन प्रगत तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण चीनच्या खूप मागे आहोत याबद्दल दुमत नसावे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतीसह इतर अनेक क्षेत्रांत करण्याची कला चीन देशाला अवगत असल्यामुळेच चीन देशातील शेती प्रगत का आहे या प्रश्नांचे उत्तर तर मिळतेच मात्र चीन महासत्ता म्हणून का उदयास येत आहे याचे उत्तर सुद्धा आपल्याला अगदी सहज मिळते.

आपत्ती निवारण कौशल्य

सध्याच्या युगात ग्लोबल वॉर्मिग मुळे विविध नैसर्गिक संकटे येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकासह अनेक प्रकारची हानी होत असते. चीन देशाने आपली पीक आपत्ती माहिती प्रणाली आज इतकी प्रगत केली आहे की बऱ्याच अंशी होणारे नुकसान अगदी सहजरीत्या कमी करण्याचे जणू कौशल्यच चीन देशाने विकसित केले आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. यासाठी चीनने डिजिटल आणि बुद्धिमान आपत्ती निरीक्षण केंद्रे तयार केली आहेत.

चीन देश हा हवामानशास्त्र, आपत्कालीन व्यवस्थापन आणि जलसंधारण विभागांसोबत लवकर चेतावणी आणि अंदाज क्षमता सुधारण्यासाठी सतत काही ना काही नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावत असतो. चिन देशातील शेती प्रगत का आहे असे प्रश्न पडण्यापेक्षा भारतातील शेती चीनच्या तुलनेत मागास का आहे या प्रश्नाचे उत्तर शोधायला सुरुवात करून आवश्यक बदल करणे सुद्धा आपल्या देशातील शेती विकासात सुधारणा करण्यासाठी आवश्यक आहेत. निश्चितच त्यासाठी सरकारच्या महत्वाकांक्षी धोरणांची गरज आहेच.

चीनची प्रिसिजन सीडिंग प्रणाली

चीन देशातील शेती प्रगत का आहे याचे अजून एक कारण म्हणजे अचूक बीजन सुधारण्यासाठी चीन BeiDou नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (BDS) सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढविण्यासाठी मोलाची कामगिरी केली आहे. आज शेतीतील चीन देशातील शेतकऱ्यांची अद्वितीय प्रगती पाहता चीन देशातील शेती प्रगत का आहे याची निश्चितच जाणीव झाल्यावाचून राहत नाही.

स्मार्ट सिंचन आणि व्यवस्थापन

चीन देश हा शेतीतील सिंचन सुधारण्यासाठी स्मार्ट सिंचन पद्धतीचा प्रभावीपणे वापर करतो. स्मार्ट सिंचन पद्धतीचा वापर केल्याने अगदी कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घेणे शक्य होते. तसेच उपलब्ध पाण्याचा उत्तम वापर कसा करावा याचे प्रशिक्षण सुद्धा चीन देशातील शेतकऱ्यांना देण्यात येते. त्यामुळे तेथील बहुतांश शेतकरी शेती हा व्यवसाय प्रगत कसा करावा याबाबत सजग आणि अनुभवी आहे. याउलट आपल्या शेतात आजही बहुतांश शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करण्यास प्रतिबद्धता दाखवतात. परिणामी आजही आपल्याकडे असलेल्या एकूण शेतीतून चीनच्या तुलनेत खुपच कमी उत्पादन आपल्या शेतकऱ्यांना होते हे विसरता येणार नाही.

आधुनिक ड्रोनचा प्रभावी वापर

चीन देश हा वनस्पतींच्या आणि शेती पिकांच्या संरक्षणासाठी आधुनिक ड्रोनचा वापर करतो. आधुनिक ड्रोनचा प्रभावी वापर केल्यामुळे शेतीतील बहुतांश सर्वच प्रकारच्या कामांत कार्यक्षमता येते तसेच शेतीची कामगिरी सुविधाजनक होते. चीन देशातील शेती प्रगत का आहे या प्रश्नांचे एक उत्तर हे आधुनिक ड्रोन सुद्धा आहेत हे लक्षात घ्या.

चीन देशातील शेती प्रगत का आहे? ही आहेत कारणे

स्मार्ट ट्रॅक्टर आणि अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त अवजारे

चीन देशांत तुम्हाला बहुतांश शेतकऱ्याकडे अगदी प्रगत ट्रॅक्टर दिसतील. याशिवाय त्यांची शेतीसाठी असलेली अवजारे सुद्धा अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी असतात. शेतजमिनीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी तसेच शेतीतील विविध कामगिरी कमी शारीरिक बळ वापरून अत्यंत प्रभावीपणे करण्यासाठी शेतकरी हे आधुनिक तंत्रज्ञान सह सुसज्ज असलेले ट्रॅक्टर आणि अवजारे यांचा वापर करून भरघोस उत्पादन घेत असते. आज चीन बऱ्याच क्षेत्रात प्रगती करत असून शेती हे क्षेत्र त्यापैकी एक सर्वाधिक महत्वाचे तसेच प्रगतीपथावर असलेले क्षेत्र आहे.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment