समोच्च शेती काय प्रकार आहे? जाणून घ्या रोचक माहिती

भारतातील सर्वच भागात विविध प्रकारची शेती होत असते. खेड्यातील जवळपास सत्तर टक्के लोकांचा प्राथमिक व्यवसाय शेती हाच आहे. आज आपण समोच्च शेती काय असते याबद्दल महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. शेतीचे विविध प्रकार असतात. सामान्यपणे शेतजमिनीत केलेली शेती, हवेत केलेली शेती, प्रशस्त इमारतीत केलेली शेती, टेरेसवर केलेली शेती, डोंगर पठारावर केलेली शेती इत्यादी. त्यापैकीच समोच्च शेती हा नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता बऱ्याच शेतकऱ्यांना असेल. ही बाब लक्षात घेता सदर माहितीपूर्ण लेखातून आवश्यक ती सविस्तर माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. चला तर बघुया समोच्च शेती बद्दल महत्वाची माहिती.

समोच्च शेती (Contour Farming)म्हणजे काय?

ही शेती किंवा नांगरणी ही समोच्च बाजूने नांगरणी करून लागवड करण्याची अशी पद्धत आहे, ज्यामध्ये वर आणि खाली (उभ्या) ऐवजी उतार (आडव्या) प्रकारे केल्या गेलेली शेती आहे. यामध्ये फरो उताराला समांतर न ठेवता लंब नांगरतात. समोच्च शेतीला टेरेस शेतीचे समानार्थी मानले जाते; तथापि, समोच्च शेती उताराच्या नैसर्गिक आकारात बदल न करता त्याचे अनुसरण करते, तर टेरेस फार्मिंग भिंती बांधते आणि उताराचा आकार बदलून सपाट क्षेत्र तयार करते जे पाण्यासाठी पाणलोट तयार करते आणि धूप नियंत्रित करण्यासाठी ऊपयुक्त ठरते.

समोच्च शेती काय प्रकार आहे? जाणून घ्या रोचक माहिती

भौगोलिक दृष्टीने, समोच्च ही समान उंचीला जोडणारी काल्पनिक रेषा आहे. टेकड्यांवर थोड्या थोड्या अंतरावर सपाट भाग करून केल्या जाणारी शेती म्हणजेच समोच्च शेती. टेकड्यांवर केल्या जाणाऱ्या या शेतीत चित्रात दाखविल्याप्रमाणे साधारणपणे उतारावर थोड्या थोड्या उंचीवर सपाट जागा केलेली जाते. त्यावर पीक लागवड केली जाते. अशी शेती केल्यास ओलावा आणि मृदा संवर्धन टिकून राहते आणि जास्त वाहणाऱ्या पाण्याचा योग्य वापर केल्या जातो. समोच्च बंडिंग ही मातीची होणारी धूप कमी करण्यासाठी समोच्च बाजूने म्हणजेच चढ उतारावर तयार केलेली माती संवर्धनाची एक प्रभावी योजना आहे.

समोच्च शेतीची वैशिष्ट्ये काय आहेत?

शेतकरी मित्रांनो समोच्च शेतीमुळे मातीची धूप कमी होण्यास मदत होते तसेच पिकाची भरघोस वाढ होते. परिणामी जैविक विविधता आणि वन्यजीवांच्या अधिवासाला अनुकूलता प्राप्त होते. जागतिक स्तरावर शेकडो दशकांपासून ज्या टेकड्यांमध्ये समोच्च शेती केली जात आहे, अशा भागांतील शेतकरी पिढ्यानपिढ्या शेतीविषयक ज्ञानाची देवाणघेवाण करून शेतीला अधिकाधिक फायद्याचे बनवत असतात. लक्षात घ्या समोच्च शेती ही एक श्रम-केंद्रित बाब असल्याने जगातील विविध भागांतील आदिवासी लोक समोच्च शेती करताना दिसून येतात.

पाण्याच्या प्रवाहाला अनुकूल असलेल्या उतारावर शेती करणे हा एक मोठा अडथळा असतो. मात्र टेकड्यांवर थोड्या थोड्या अंतरावर जमीन सपाट करून पाण्याचा प्रवाह कमी होतो ज्यामुळे ते पाणी जमिनीत झिरपून या पाण्याचा शेतीसाठी वापर केल्या जातो. अशा प्रकारे केलेली शेती ही पाण्याचा कार्यक्षमतेने वापर करण्यास अनुकूल असते. यामुळे पोषक तत्वांचा अपव्यय टाळते, कृत्रिम खतांची सुद्धा जास्त आवश्यकता पडत नाही.

आजच्या काळात हवामानात अमुलाग्र बदल होत असल्यामुळे पावसात अनियमितता निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग त्रस्त आहे हे आपल्याला माहित आहेच. मात्र समोच्च शेती जमिनीची धूप रोखते, या शेतीत पाण्याचा सदुपयोग करता येतो आणि जमिनीची उत्पादकता वाढण्यास मदत होते. याच कारणामुळे शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतजमिनीत अधिक उत्पन्न घेता येणे शक्य होते.

समोच्च शेतीतून माती सुपीक होऊन आर्द्रता नियंत्रित होते. म्हणून शेतीतील पिकाच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी समोच्च शेती मोलाचा हातभार लावते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या प्रकारच्या शेतीत पीक विविधीकरण सुद्धा शक्य असते. याचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांना होतो.

या प्रकारची शेती ही जगातील बऱ्याच भागांतील टेकड्यांवर राहणाऱ्या लोकांच्या संस्कृतीत रुजलेली एक पारंपारिक प्रथा आहे. विशेषतः ग्रामीण भागातील डोंगराळ भागात राहणारे लोक समोच्च शेती करतात. या शेतीत पिकणारी धान्ये तसेच भाजीपाला निरोगी आणि वैविध्यपूर्ण आहार पुरविण्याचे कार्य करते.

समोच्च शेती काय प्रकार आहे? जाणून घ्या रोचक माहिती

भारतातील समोच्च शेतीबद्दल माहीती

या प्रकारची शेती म्हणजे भारतामध्ये अवलंबले जाणारे पारंपारिक शेती तंत्र असून पावसाचे पाणी वाचवण्यासाठी सर्वात सोपी आणि प्रभावशाली उपक्रम आहे. ही शेती विशेषकरून डोंगराळ, मध्य-पहाडी आणि उप-उष्णकटिबंधीय भागात बदलत्या उंचीवर केल्या जाते ज्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात उतार म्हणजेच डोंगराळ भाग अस्तित्वात आहे. परंतु ही शेती/बंडिंग उपक्रम मृदा आणि जलसंधारण (SWC) उपाय म्हणून कमी उंचीवरील मैदानी भागातही समोच्च शेती केल्या जाते. या प्रकारच्या शेतीत मातीची धूप रोखण्यासाठी तसेच शेतातील मातीची आर्द्रता वाढवण्यासाठी बंधारे किंवा कड (माती आणि/किंवा दगडांनी बनवलेले) तयार केले जातात.

ही शेती ही विविध कृषी पर्यावरणीय परिस्थितीत केली जाते. सर्व हवामान झोन किंवा <5° उतार असलेल्या <500 मिमी वार्षिक पर्जन्यमान असलेल्या प्रदेशांमधील टेकड्यांमध्ये, बंडिंग किंवा समोच्च लागवडीचा वापर करून विशेषकरून पारंपरिक पद्धतीने ही शेती केल्या जाते
ज्या प्रदेशात सरासरी 500 ते 700 मिलीमीटर वार्षिक पाऊस होतो अशा प्रदेशात समोच्च शेती अनुकूल ठरते.

डोंगराळ भागांमध्ये जमिनीचा ऱ्हास कमी करण्यासाठी ही शेती हे एक महत्त्वाचे रामबाण तंत्र म्हणून ओळखले जाते. समोच्च शेती ही भारतातील इंडो-गंगेचे मैदान, कोरडवाहू आणि वाळवंटी प्रदेश, दक्षिण द्वीपकल्पीय भारत, मध्य भारत आणि किनारी भाग या सर्व प्रदेशांत केल्या जाते.

जाणुन घ्या चीन देशातील शेती प्रगत असण्याची अचंभित करणारी कारणे

समोच्च शेती: एकूण लागवड क्षेत्र, भौगोलिक क्षेत्र आणि लागवडीची माहिती

आपल्याला नक्कीच प्रश्न पडला असेल की समोच्च शेतीखाली भारतात किती क्षेत्र आहे? तर जाणून घ्या की क्षेत्रफळ आणि शेततळे निश्चित करण्यासाठी संपूर्ण भारतभर कोणत्याही व्यापक अभ्यासाच्या अभावामुळे समोच्च शेतीबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे. परंतु स्टेकहोल्डर्सनी प्रदान केलेल्या माहितीनुसार सिक्कीमच्या डोंगराळ राज्यात बहुतेक शेती समोच्च क्षेत्राखाली आहे. सिक्कीम राज्यात या शेतीचे अंदाजे 50,000 हेक्टर क्षेत्र आहे. कर्नाटकात ही प्रथा राज्यातील भौगोलिक स्थितीनुसार थोडी वेगळी आहे. मात्र असे असले तरी ढोबळ अंदाज असा आहे की पावसावर अवलंबून असलेल्या सपाट जमिनींमधील सुमारे 5-10 टक्के लागवडीखालील क्षेत्र आणि बहुतेक डोंगराळ भागात ही शेती करण्यात येते.

पारंपारिकपणे, समोच्च शेती ही मुख्यतः हिमालयीन प्रदेशात आणि पश्चिम घाटात उदरनिर्वाह करण्यासाठी या प्रकारची शेती केल्या जाते. मात्र मागील काही वर्षांमध्ये ही शेती देशाच्या इतर अनेक भागांमध्ये सुद्धा झपाट्याने वाढत आहे. विशेषकरून मोठ्या शेतकऱ्यांनी मैदानी भागात या प्रकारच्या शेतीचा अवलंब केला आहे.

भारतातील किती शेतकरी ही शेती करतात?

आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे आपल्या देशात थोड्या जास्त प्रमाणात सर्वच प्रकारची शेती केल्या जाते. समोच्च शेती ही एक सामान्य प्रथा असल्याने, सरकार किंवा इतर एजन्सी कृषी सर्वेक्षणांमध्ये त्याचा समावेश करत नाहीत, याचा अर्थ असा की संपूर्ण भारतामध्ये शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येची आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र सिक्कीममधील कृषी विभागाने सार्वजनिक केलेल्या माहीतीनुसार सिक्कीम राज्यात अंदाजे 35,000 शेतकरी या पद्धतीचा वापर करत आहेत. कर्नाटकात, कोरडवाहू शेती प्रकल्प, UAS, बंगळुरू मधील भागधारकांनी सल्लामसलत केली आहे, असा अंदाज आहे की राज्यातील 30 टक्के पेक्षा कमी मोठे शेतकरी आणि 5-10 टक्के लहान आणि सीमांत शेतकरी या पद्धतीचे पालन करतात.

ही शेती भारतातील कोणत्या राज्यांत प्रचलित आहे?

समोच्च शेती ही भारतात कमी-अधिक प्रमाणात केल्या जात असली तरी, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर आणि उत्तर-पूर्वेकडील काही प्रमुख राज्ये आहेत. हिमाचलमध्ये, डोंगराळ जिल्ह्यांमध्ये उदा. शिमला, सिरमौर, कांगडा, मंडीचे काही भाग, सोलन या भागांत समोच्च शेती करणारे शेतकरी आढळून येतात. याशिवाय, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या दक्षिणेकडील राज्ये, राजस्थानच्या कोरडवाहू प्रदेशात तसेच पूर्व घाटाच्या काही भागांमध्येही या प्रकारच्या शेतीचा विशेष प्रभाव आहे. विशेषत: महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांत ही शेती करण्यात येते.

मुंबईत आजही शेती केल्या जाते का? तुम्हाला माहित नसलेली रोचक माहिती

भारतात ही शेती अंतर्गत कोणती प्रमुख पिके घेतली जातात?

या शेतीमध्ये सर्व प्रकारच्या पिकांची लागवड करणे शक्य आहे. स्थलाकृति, हवामान आणि स्थानिक घटक कोणती पिके घेतली जातात हे ठरवतात. भागधारकांनी सल्लामसलत केली की सिक्कीमच्या पहाडी राज्यात मका, तांदूळ आणि भाज्यांची लागवड केली जाते आणि हिमाचल प्रदेशात वाटाणा, बटाटा, मका, डाळी, बाजरी, टोमॅटो, शिमला मिरची, लसूण आणि आले. हिमाचलमधील सिरमोरमध्ये, पावसाळ्यात, उतार असलेल्या जमिनीमुळे शेतकरी वाटाणा या पिकांचे उत्पादन घेऊ शकतात.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment