आता घरबसल्या वारसा नोंद करता येणार, जाणून घ्या अधिकृत वेबसाईट

घरबसल्या वारसा नोंद अधिकृत वेबसाईट : वारंवार तलाठी कार्यालयाच्या चकरा मारून थकले आहात? कधी तलाठी हजर नसतो, तर कधी कुठला कागद घरीच राहतो. सगळच असेल तर तलाठी वारस नोंद करण्यासाठी एक ते 2 हजार मागतो? या सर्वच कटकटीतून दूर करण्याची महत्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांनो तुम्हाला आता वारसा नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात चकरा मारायची आणि मनस्ताप करून घ्यायची अजिबात गरज नाही. कारण आता घरबसल्या वारस नोंद करता येणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती आजच्या या लेखातून देण्याचा प्रयत्न करत आहोत.

तर बातमी अशी आहे की, राज्य सरकारने महसूल विभागांतर्गत काही दिवसांपूर्वी महत्वाचा निर्णय घेतला असून त्यानुसार आता घरबसल्या वारसा नोंद आणि इतर कामकाज आता ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. राज्य सरकारच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे सामान्य शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आता घरबसल्या वारसा नोंद करता येणार, ई हक्क प्रणाली काय आहे, जाणून घ्या अधिकृत वेबसाईट

या कामांसाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

आता घरबसल्या वारसाची नोंद करता येणार आहेच, त्याशिवाय बोजा दाखल करणे, बोजा कमी करणे, नवीन वारस नोंद करणे, ई करार करणे , मयत झालेल्या लोकांचे नावे कमी करणे इत्यादी सर्व कामे तुम्हाला घरबसल्या करणे शक्य होणार हे. पूर्वी या सर्व कामांसाठीसाठी तलाठी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागून वेळेचा प्रचंड अपव्याव व्हायचा. मात्र आता सरकारने घरबसल्या वारस नोंद करण्यासाठी ऑनलाईन माध्यम उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याने इतर सर्व कामांसह घरबसल्या वारस नोंद करता येणार आहे.

या शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे पैसे होणार कायमचे बंद

या कारणांमुळे तलाठी कार्यालयात व्हायची गर्दी

वर नमूद केलेल्या कामांसाठी तलाठी कार्यालयात प्रचंड गर्दी होत असते. गर्दीमुळे नागरिकांचा वेळ वाया जाऊन त्यांची कामे हे वेळेवर होत नसत. नोंदी करण्यासाठी सातत्याने तलाठी कार्यालयात जावे लागायचे. आणि अजून एक महत्वाची बाब म्हणजे राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये एकाच तलाठी कडे दोन ते तीन गावांचा कारभार देण्यात आला असल्यामुळे त्यांच्यावर असलेला कामाचा ताण जास्त होत असल्याने तलाठी कार्यालयात नागरिकांच्या कामांची दखल घेतल्या जात नसे. नागरिकांची आर्थिक पिळवणूक देखील बऱ्याच तलाठी कडून होत असे. अगदी फुकटात होणाऱ्या छोट्या मोठ्या कामांसाठी कमिशन द्यावे लागायचे. या सर्व अनुचित प्रकाराचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी राज्य सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता घरबसल्या वारस नोंद करता येणे सहज शक्य होणार आहे.

लाडकी बहिण योजनेतून या महिलांना वगळण्यात येणार

यासाठी ई हक्क प्रणालीचा वापर होणार

आता महत्वाच्या घरबसल्या वारसा नोंद करण्यासाठी राज्य सरकार महसूल विभागाच्या कामासाठी ई हक्क प्रणालीचा वापर करणार आहे. या ई हक्क प्रणालीद्वारे राज्यातील नागरिक घरबसल्या वारसा नोंद करणे, बोजा दाखल करणे, बोजा कमी करणे, ई करार करणे , मयत झालेल्या लोकांचे नावे कमी करणे यांसारखी अनेक महत्त्वाची कामे ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या करणार आहेत. ई हक्क प्रणालीचा वापर करून आता शेतकऱ्यांना घरबसल्या वारसा नोंद करण्याची मुभा मिळणार आहे.

काय आहे ही ई हक्क प्रणाली?

शेतकऱ्यांनो ई हक्क प्रणाली ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली अशी व्यवस्था आहे ज्यात अनेक शेतीविषयक कामे घरबसल्या करता येणे शक्य होणार आहे. या ई-हक्क प्रणालीच्या माध्यमातून शेतकरी घरबसल्या वारस नोंद तसेच इतर 7 ते 8 प्रकारचे फेरफार अर्ज केल्या जाऊ शकतात. यात सातबारावर बोजा चढवणे, कमी करणे, नाव दुरुस्त करणे, ई-करार करणे इत्यादी सेवांसाठी अर्ज करता येतो. याशिवाय अर्जाची सद्यस्थिती सुद्धा घरबसल्या वेबसाईटच्या माध्यमातून तपासता येते.महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं शेतकऱ्यांना ऑनलाईन सुविधा पुरविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून ई-हक्क प्रणाली विकसित करण्यात आली आहे. तुम्हाला आता तुमच्या मोबाईलच्या साहाय्याने सुद्धा बरीच शेतीविषयक कार्यालयीन कामे करता येणार आहेत.

ही आहे घरबसल्या वारस नोंद करण्यासाठी वेबसाईट

शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न पडल असेल की घरबसल्या वारसा नोंद आणि इतर कामे करण्यासाठी असणारी ही ई प्रणाली वेबसाईट कोणती आहे. तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, नोंद कुठे करायची?

आता घरबसल्या वारसा नोंद करता येणार, जाणून घ्या अधिकृत वेबसाईट

दरम्यान हे सर्व कामे करण्यासाठी महसूल विभागाच्या https://pdeigr.maharshtra.gov.in या वेबसाईट च्या माध्यमातून ही घरबसल्या वारसा नोंद सारखी सर्वच कामे होणार आहेत. सदर वेबसाइट शासनाची अधिकृत वेबसाइट आहे. या संकेतस्थळाचा वापर कसा करावा याची इत्यंभूत माहिती आपण पुढील लेखात देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र आता घरबसल्या वारस नोंद सारखी इतर महत्वाची कामे ऑनलाईन पद्धतीने होणार हे ऐकून तुम्हाला आनंद झाला का याबाबत कमेंट करून तुमचा अभिप्राय अवश्य कळवा.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment

error: Content is protected !!