चिंतेत टाकणारी बातमी, या शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे पैसे बंद होणार

पीएम किसान योजनेचे पैसे महत्वाची अपडेट : केंद्र सरकारच्या वतीने सुरू 2016 पासून करण्यात आलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेमुळे देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत असून त्यांचे भविष्य आर्थिक पातळीवर सुरक्षित होताना दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितार्थ वेळोवेळी लाभदायक योजना राबवत असतात त्यापैकीच ही एक योजना. मात्र पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना चिंतेत टाकेल अशी एक बातमी आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे पैसे बंद होणार आहेत. कारण या महत्वाकांक्षी योजनेचे काही नियम आता बदलले आहेत. चला तर जाणून घेऊया काय आहेत हे बदललेले नियम आणि कोणत्या शेतकऱ्यांना या नवीन नियमांचा फटका बसणार आहे याबद्दल सविस्तर माहिती.

या शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे पैसे बंद होणार

अपात्र ठरल्यास वार्षिक एकूण 12 हजारांच होणार नुकसान

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना राबविणे सुरू केले आहे. त्यामुळे पीएम किसान योजनेसाठी जे शेतकरी या नवीन नियमांमुळे अपात्र ठरणार आहेत, त्यांचा नमो शेतकरी योजनेचा लाभ सुद्धा आपोआपच बंद होणार आहे. कारण आता पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेत नोंदणी केली आहे तोच डेटा घेऊन नमो शेतकरी योजना राबविण्यात येत आहे.

लाडकी बहिण योजनेतून या महिलांना वगळण्यात येणार

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत भारत सरकार देशातील गरीब शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देत आहे. आणि राज्य सरकार नमो शेतकरी योजनेतून 6 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देत आहे. मात्र अपात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. परिणामी या शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे पैसे बंद जर झाले तर नमो योजनेचे पैसे सुद्धा मिळणे बंद होईल.

या शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे पैसे बंद होणार

कोणत्या नियमामुळे होणार पैसे बंद

शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला उत्सुकता असेल की नेमका हा नियम कोणता आहे ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे पैसे बंद होणार आहेत? तर तो नियम म्हणजे यापुढे प्रत्येक कुटुंबातील फक्त एकच व्यक्तीला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे. एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य जर या योजनेचा लाभ घेत असतील तर या नियमांतर्गत अशा सर्व शेतकऱ्यांचा लाभ तत्काळ बंद करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार आता कुटुंबातील फक्त एक सदस्य योजनेचा लाभ घेऊ शकत असल्यामुळे त्याच कुटुंबातील इतर शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे पैसे बंद होणार आहेत. याशिवाय या योजनेत पात्र राहण्यासाठी आता नवीन अर्ज करताना पती, पत्नी आणि मुलांचे आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.

ही एक चूक झाली तर पी एम किसान योजनेचे पैसे होणार कायमचे बंद

एकाच कुटुंबातील अनेक सदस्य घेत आहेत लाभ

या योजनेची 2016 साली सुरवात झाली तेव्हापासून एका कुटुंबातील एका पेक्षा जास्त सदस्यांनी पीएम किसान योजनेसाठी अर्ज करून लाभ मिळवत आहेत. मात्र आता सरकारच्या नवीन नियमानुसार अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहावे लागणार असून या शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे पैसे बंद होणार आहेत.

विसाव्या हफ्त्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक असेल अनिवार्य

राज्य सरकारच्या वतीने अॅग्रीस्टॅक योजनेतून शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी आता कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार क्रमांक जोडणी नवीन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना बंधनकारक करण्यात आली असून शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र ही अट फेब्रुवारी महिन्यात देण्यात येणाऱ्या 19 व्या हप्त्याला लागू नाही. त्यामुळे पुढील हफ्ता शेतकऱ्यांना मिळण्यास काहीच अडचण नाही. परंतु नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पती पत्नी तसेच कुटुंबातील १८ वर्षांखालील सदस्याची आधार नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. असे न करणाऱ्या शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे पैसे बंद होऊ शकतात.

लाभ निरंतर मिळावा यासाठी आधार ई केवायसी आवश्यक

पीएम किसान सन्मान योजनेत पात्र लाभार्थ्यांची संख्या 96 लाख 67 हजार आहे. भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे लाभार्थ्यांची संख्या 95 लाख 95 हजार इतकी असून अजूनही 78 हजार लाभार्थ्यांनी भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या नाहीत. तसेच ई केवायसी प्रमाणीकरण केलेल्यांची संख्या 95 लाख 16 हजार इतकी आहे. तर अजूनही एक लाख 89 हजार शेतकऱ्यांनी अद्याप ई केवायसी पूर्ण केलेले नाही. पीएम किसान योजनेचे पैसे बंद होऊ नये तसेच इतर कुठलीही गैरसोय टाळण्यासाठी तुमच्या शेतीची भूमी अभिलेख नोंद तसेच ई केवायसी वेळीच पूर्ण करून निश्चिंत व्हा.

योजनेचा 19 वा हफ्ता कधी मिळणार?

केंद्र सरकारकडून अद्याप तरी पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता लाभार्थ्यांना केव्हा मिळणार याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र काही मीडिया रिपोर्ट्स नुसार या योजनेचा 19 वा हफ्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment

error: Content is protected !!