राज्यातील असंख्य शेतकरी बांधवांना आतुरता असलेला नमो शेतकरी योजनेचा पुढील हफ्ता केव्हा मिळणार याबद्दल सविस्तर माहिती
राज्यातील असंख्य शेतकरी वर्गासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी योजनेचा पुढील हफ्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या मागील हफ्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. नमो शेतकरी योजनेचा पुढील हफ्ता राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा करण्यात येईल याबद्दल महत्वाची माहिती हाती आली आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
शेतकरी मित्रांनो पीएम किसान सम्मान निधी योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जात आहे आता त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाद्वारे नमो शेतकरी योजना राबवण्यात येत आहे . या योजने अंतर्गत सुद्धा वार्षिक 6 हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. केंद्र शासनाद्वारे 6 हजार रुपये तसेच राज्य शासनाद्वारे 6 हजार एकूण 12 हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात.
![शेतकऱ्यांसाठी खुशखबर, नमो शेतकरी योजनेचा पुढील हफ्ता दिनांक, महत्वाचा अपडेट शेतकऱ्यांसाठी खुशखबर, नमो शेतकरी योजनेचा पुढील हफ्ता दिनांक, महत्वाचा अपडेट](https://kamachibatmi.com/wp-content/uploads/2024/08/Screenshot_2025-01-28-08-49-47-29.png)
नमो शेतकरी योजनेचा पुढील हफ्ता कधी मिळणार याबद्दल राज्यातील तमाम शेतकऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा पुढील हफ्ता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून त्यासाठी ज्या नागरिकांची ई केवायसी करायची बाकी असेल त्यांनी शिघ्रगातीने ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे.
आधीचे बाकी असलेले हफ्ते सुद्धा वितरीत
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्वच पात्र शेतकऱ्यांनामागील हफ्ता वितरीत करून त्यांच्या शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या पैशांमध्ये एकप्रकारचा मोलाचा वाटा उचलला आहे. जा शेतकऱ्यांचे तांत्रिक अडचणींमुळे आधीचे हफ्ते बाकी होते, अशा शेतकऱ्यांना सुद्धा राहिलेले सर्व हफ्ते वितरीत करण्यात आले आहेत. नमो शेतकरी योजनेचा पुढील हफ्ता सुरळित मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी के वाय सी करणे अनिवार्य आहे.
शासनाच्या शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना
राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत असते. नुकतीच एक महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने सुरू केली असून या योजनेचे नाव मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना असे असून या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे पुढील 5 वर्षाचे वीजबिल मोफत करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे. या योजनेमुळे राज्यातील बहुसंख्य शेतकरी बांधवांचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
![शेतकऱ्यांसाठी खुशखबर, नमो शेतकरी योजनेचा पुढील हफ्ता दिनांक, महत्वाचा अपडेट शेतकऱ्यांसाठी खुशखबर, नमो शेतकरी योजनेचा पुढील हफ्ता दिनांक, महत्वाचा अपडेट](https://kamachibatmi.com/wp-content/uploads/2024/08/Screenshot_2024-08-21-20-27-56-97.png)
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील शेतकरी बांधवांना बऱ्याच दिवसापासून नमो शेतकरी योजनचा पुढील हफ्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा असते. तांत्रिक अडचणीमुळे ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत काही हफ्ते मिळाले नाहीत, त्यांना सुद्धा ते मिळावे यासाठी सरकार युद्ध पातळीवर अंमलबजावणी करत असल्यामुळे या योजनेचा हफ्ता वितरीत करण्याच्या प्रक्रियेत विलंब झाला होता.
पीएम किसान योजनेच्या पुढील हफ्त्याची तारीख ठरली. या दिवशी होणार बँक खात्यात जमा
कधी मिळणार नमो शेतकरी योजनेचा पुढील हफ्ता?
आता शेतकरी बांधव मिळालेल्या नमो शेतकरी योजनेचा पुढील हफ्ता दिनांक जाणून घेण्यासाठी आतुर आहेत. मागील हफ्त्याचा निधी त्यांचा बँक खात्यात आला तेव्हा त्यांना आर्थिक मदत झाली होती. राज्य सरकार कडून महिलांसाठी सुद्धा माझी लाडकी बहिण योजना सुरू असून या योजनेच्या माध्यमातून दरमहा 1500 रूपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात येतात . आज नमो शेतकरी योजनेचा पुढील हफ्ता दिनांक लवकरच जाहिर होणार असून सहाव्या हफ्त्याचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे वृत्त अनेक वृत्त्त संकेतस्थळावर पाहायला मिळत आहे. मात्र अद्यापपर्यंत सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा पुढील हफ्ता दिनांक जाहीर करण्यात आला नाही.
या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सन्मान योजनेतून वगळण्यात येणार
शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा पुढील हफ्ता दिनांक आपल्याला माहीत पडला आहे. मात्र आता या योजनेतून काही शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे. तर हे शेतकरी कोणते आहेत याची माहिती बघुया. सदर योजनेंतर्गत 2019 पूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या नावावार शेत जमिनीची नोंद आहे फक्त अशाच शेतकऱ्याच्या कुटुंबातील पती-पत्नीपैकी एकाला आणि 18 वर्षांवरील मुलांना लाभ मिळेल असा नियम आहे.
परंतु सध्या राज्यासह देशभरातील बरेच शेतकरी 2019 नंतर शेतजमीन नावावर झालेले शेतकरी तसेच त्याच शेतकऱ्यांची माहेरकडील जमीन नावावर असल्याने त्यांची पत्नी असे एकच कुटुंबातील दोघेही पती पत्नी पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घेत असल्याचे सरकारी यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे. परिणामी अशा बोगस शेतकऱ्यांना या कल्याणकारी योजनांतून वगळण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने ही नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. हीच नियमावली राज्य सरकारकडून सुद्धा जाहीर होणार असून यामुळे नियमांत न बसणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पुढील हफ्ता मिळणार नाही.
नवीन नोंदणी करण्यासाठी फॉर्मर आयडी अनिवार्य
शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या नियमांत पीएम किसान योजनेच्या धर्तीवर बदल करण्यात आले असून योजनेच्या नवीन हफ्त्याची नोंदणी करण्यासाठी आता फॉर्मर आयडी क्रमांक अनिवार्य करण्यात आला असून नमो किसान योजनेच्या सर्वच लाभार्थ्यांना विसाव्या हफ्त्यापासून फॉर्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढावा लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र अद्याप काढले नसेल त्यांनी तलाठी किंवा सी.एस.सी. सेवा केंद्रावर जाऊन काढून घ्यावे. याशिवाय नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांचे आधार कार्ड प्रमाणीकरण या योजनेसोबत करावे लागणार आहे.या सर्व गोष्टी केल्याशिवाय पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता मिळणार नाही याची नोंद घ्यावी.