महामेष योजनेंतर्गत शेळी मेंढीसह विवीध अनुदान, शेवटची तारीख आली जवळ

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना २०२४

महामेष योजना अंतर्गत शेळी मेंढीसह भटक्या जमाती क या मागास प्रवर्गातील धनगर आणि तत्सम समाजातील मेंढपाळ कुटुंबांना एकूण 4 योजना अंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. एकूण चार योजना पुढील प्रमाणे १) राजे यशवंतराव होळकर महामेष योजना, या योजने अंतर्गत एकूण 15 घटकांसाठी लाभार्थी निवड होणार असून इतर योजना पुढील प्रमाणे आहेत. २) मेंढ्यांसाठी चराई अनुदान योजना ३) शेळी मेंढी पालन साठी जागा खरेदी अनुदान योजना आणि ४) कुक्कुट पक्षांच्या खरेदी आणि संगोपन साठी अनुदान योजना. चला तर जाणून घेऊया या योजनेच्या अटी शर्ती, निकष, पात्रता, शेवटची तारीख,अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट, वगळण्यात आलेले जिल्हे, आवश्यक कागदपत्रे या सर्व बाबींबाबत सविस्तर माहिती.

महामेष योजना अंतर्गत शेळी मेंढीसह विवीध अनुदान, शेवटची तारीख, पात्रता, आवश्यक कागदपत्रे संपूर्ण माहिती

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना २०२४ मधील एकूण १५ घटक

१) कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सोई सुविधेसह २० मेंढया १ मेंढानर असा मेंढीगट ७५% अनुदानावर वाटप करणे (स्थायी)
२) स्थलांतर पद्धतीने मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सोई सुविधेसह २० मेंढया १ मेंढानर असा मेंढीगट ७५% अनुदानावर वाटप करणे (स्थलांतरीत)
३) ज्यांच्याकडे स्वतचे २० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ४० पेक्षा कमी मेंढया आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा १ नरमेंढा ७५% अनुदानावर वाटप करणे.
४) ज्यांच्याकडे स्वतचे ४० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ६० पेक्षा कमी मेंढया आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा २ नरमेंढे ७५% अनुदानावर वाटप करणे.
५) ज्यांच्याकडे स्वतचे ६० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ८० पेक्षा कमी मेंढया आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा ३ नरमेंढे ७५% अनुदानावर वाटप करणे.


६) ज्यांच्याकडे स्वतचे ८० किंवा त्यापेक्षा अधिक परंतु १०० पेक्षा कमी मेंढ्या आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा ४ नरमेंढे ७५% अनुदानावर वाटप करणे.
७) ज्यांच्याकडे स्वतचे १०० किंवा त्यापेक्षा अधिक मेंढया आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित प्रजातीचा ५ नरमेंढे ७५% अनुदानावर वाटप करणे.
८) ज्यांच्याकडे स्वत: च्या २० मेंढया व १ मेंढानर अशा एकूण २१ मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ४० मेंढ्यापेक्षा कमी अशा मेंढ्याच्या एका ठिकाणी राहून स्थायी स्वरूपाचे मंढी पालनासाठी पायाभूत सोई – सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थायी)
९) ज्यांच्याकडे स्वतः च्या २० मेंढ्या व १ मेंढानर अशा एकूण २१ मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक परंतु ४० मेंढ्यापेक्षा कमी अध्था मेंढ्यांच्या स्थलांतरीत स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थलांतरीत).
१०) ज्यांच्याकडे स्वतः च्या ४० मेंढ्या व २ मेंढानर अशा एकूण ४२ मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक अशा मॅक्यांच्या एका ठिकाणी राहून स्थापी स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थायी)


११) ज्यांच्याकडे स्वतः च्या ४० मेंढ्या व २ मेंढानर अशा एकूण ४२ मेंढया किंवा त्यापेक्षा अधिक अशा मेंढ्यांच्या स्थलांतरीत स्वरूपाचे मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थलांतरीत)
१२) एका ठिकाणी राहून स्थायी स्वरूपाचे मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थायी) (१०० ग्रॅम प्रती दिन प्रती मेंढी याप्रमाणे माहे एप्रिल ते जुलै या ४ महिन्याच्या कालावधी करिता)
१३) भटकंती करणारे स्थलांतरीत स्वरूपाच्या मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान वाटप (स्थलांतरीत) (१०० ग्रॅम प्रती दिन प्रती मेंढी पाप्रमाणे जून ते जुलै या २ महिन्याच्या कालावधी करिता)
१४) कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्याचा मुरघस करण्याकरिता घासड्या बांधण्याचे पंत्र (Mini Sailage Baler cum Wrapper) खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान वाटप
१५) पशुखाद्य कारखाने उभारणीसाठी ५०% अनुदान वाटप

महामेष योजना अंतर्गत वरील सर्व घटकांसाठी लाभार्थी निवडीचे निकष / अटी व शर्ती :-


  • १. सदर योजना केवळ भटक्या जमाती (भज-क) या प्रवर्गातील लाभार्थ्यांना लागू असेल.
    २. लाभधारकाचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.
    ३. लाभधारकाची निवड करताना, महिलांकरिता ३० टक्के व अपंगाकरिता ३ टक्के आरक्षण देण्यात यावे
    ४. या योजने अंतर्गत भटक्या जमाती (भज – क) प्रवर्गातील बचत गटांना / पशुपालक उत्पादक कंपन्याना लाभार्थी म्हणून प्राधान्य देण्यात येईल.
    ५.लाभार्थ्यास आधार कार्ड सोबत संलग्न करण्यात यावे.
    ६. ज्या लाभधारकांना किंवा कुटुंबातील व्यक्तीस या आधी महामेष योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे अशा लाभधारकांना यामध्ये पुन्हा अर्ज करता येणार नाही.

  • ७. पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत गेल्या ३ वर्षामध्ये लाभ घेतलेल्या व्यक्तीस किंवा कुटुंबातील व्यक्तीस या योजने अंतर्गत पुन्हा अर्ज करता येणार नाही.
    ८. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस अर्ज करता येईल.
    ९. स्थायी पद्धतीने मेंढी पालन करणाऱ्या लाभार्थ्यांना शेड बांधण्याकरिता स्वतः ची जागा असणे आवश्यक आहे.
    १०. अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवे त किंवा सेवा निवृत्ती वेतनधारक / शासकीय पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य, केंद्र शासन / स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य / पदाधिकारी / लोकप्रतींनिधी नसावा.

महामेष योजना अंतर्गत निवडीनंतर सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे –


१) जातीचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याचा)
२) आधार कार्ड
३) रेशन कार्ड
४) बँक पासबुक
५) मेंढी पालन करण्याच्या पद्धतीबाबत संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र (बंधपत्र नमुना क्र. १ नुसार)
६) अपत्य स्वयंघोषणा पत्र (बंधपत्र नमुना क्र. २ नुसार)
७) शेड बांधकामासाठी स्वत:ची किमान १ गुंठा जागा उपलब्ध असल्याबाबत ७/१२ उतारा किंवा मिळकत प्रमाणपत्र
८) वैरण उत्पादनाकरीता किमान १ एकर जागा उपलब्ध असल्याबाबतचा पुरावा खालील प्रमाणे,
स्वतःचे नावे जमीन असल्यास जमिनीचा ७/१२ उतारा किंवा
अर्जदाराच्या नावे जमीन नसल्यास (कुटुंबीयांपैकी) संमतीपत्र देणाऱ्या व्यक्तीच्या नावाच्या शेतजमिनीचा ७/१२ उतारा व रु. १००/- रुपयाच्या मुद्रांकावर नोटरी करून संमतीपत्र (बंधपत्र नमुना क्र. ३ नुसार) किंवा
अर्जदाराने भाडे तत्वावर शेतजमीन घेतली असल्यास शेतजमीन मालकासोबत केलेल्या भाडेकराराची सत्यप्रत रु. १००/- च्या मुद्रांकावर नोटरी करून (बंधपत्र नमुना क्र. ४ नुसार)
९) स्वयंघोषणा पत्र (बंधपत्र नमुना क्र. ५)
१०) दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)

महामेष योजना अंतर्गत मेंढ्यांसाठी चराई अनुदानाचे स्वरूप

राज्यातील भटक्या जमाती-क या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील मेंढपाळ कुटूंबांना राज्यस्तरीय योजनेंतर्गत माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिमाह रु. ६०००/- असे एकूण रु. २४०००/- चराई अनुदान

टीप :-

  1. महामेष योजना अंतर्गत ही या आर्थिक वर्षात राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे २ जिल्हे वगळता उर्वरीत ३४ जिल्ह्यात राबवली जाणार आहे .
  2. सदर योजनेंतर्गत राज्य शासनाने वेळोवेळी अधिसूचीत केलेल्या केवळ भटक्या जमाती (भज-क) या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजामधील ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान २० मेंढया व १ मेंढानर एवढे पशुधन असेल, अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात यावा.

घरेलु कामगारांच्या कुटुंबांसाठी एकूण 14 योजना सुरू, वाचा संपूर्ण माहिती

  • लाभार्थी निवडीचे निकष / अटी व शर्ती :-

  • १. सदर योजनेचा लाभ राज्य शासनाने वेळोवेळी अधिसूचित केलेल्या केवळ भटक्या जमाती (भज-क) या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजामधील ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान २० मेंढया व १ मेंढानर असलेल्या मेंढपाळ कुटुंबातील एका व्यक्तीस लाभ घेता येईल.
    २. लाभधारकाचे वय १८ वर्षापेक्षा कमी नसावे व ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.
    ३. लाभधारकांची निवड करताना, महिलांकरिता ३०% व दिव्यांगाकरिता ३% आरक्षण देण्यात यावे.
    ४. लाभार्थ्यास आधार कार्ड सोबत संलग्न करण्यात यावे.
    ५. अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवा निवृत्ती वेतनधारक / शासकीय पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य, केंद्र शासन / स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य / पदाधिकारी/ लोकप्रतींनिधी नसावा.
  • महामेष योजना संदर्भात शासनाचा उद्देश :-
    १. राज्यातील मेंढपाळ कुटुंबांना पावसाळ्यात चराई करिता जून ते सप्टेंबर या ४ महिन्याच्या कालावधीमध्ये चराई अनुदान देऊन या व्यवसायास चालना देणे.
    २. राज्यातील मेंढ्यांच्या संख्येमध्ये सातत्याने होत असलेली घट थांबविणे किंबहुना त्यामध्ये वाढ करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
    ३. राज्यातील मेंढीपालन व्यवसायास चालना देऊन ग्रामीण रोजगार निर्मिती करणे.
  • महामेष योजना वैशिष्टे :-
    १. मेंढी पालन व्यवसाय हा पुर्णपणे स्थलांतरित पध्दतीने केला जातो. मेंढपाळ त्यांच्या मेंढ्याकरिता चारा व पाण्याच्या शोधात साधारणपणे माहे ऑक्टोबर पासून भटकंती करीत असतात. भटकंती काळात मेंढपाळ त्यांच्या मेंढ्याकरिता चारा व पिण्याचे पाण्याच्या शोधात सतत स्थलांतरण करत असतात. पावसाळी हंगामामध्ये मुळस्थानी मेंढपाळ परत आल्यानंतर त्या भागामध्ये पाऊस फार अत्यल्प होत असल्यामुळे चारा उपलब्ध होत नाही.
    २. जुन ते ऑक्टोबर या काळात मेंढपाळ नजीकच्या स्थानिक ठिकाणी, नदी किनारी, शेतकर्‍यांच्या बांधावर तसेच नजीकच्या वन क्षेत्रावर त्यांच्या मेंढ्यांची चराई करीत असतात. हल्लीच्या काळामध्ये शेतकरी शेतामध्ये तणनाशक तसेच कीटकनाशक औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहे. तसेच राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण सुरू असल्यामुळे बर्‍याच रसायन कंपण्यामधील कचरा पाणी नदी-नाल्यामध्ये सोडण्यात येते. त्यामुळे भटकंती काळात मेंढ्यांचा संपर्क या विषारी रसायनांसी आल्यामुळे विषबाधा होण्याचे प्रकार नेहमी घडत असतात. यामुळे मेंढपाळांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. दिवसेंदिवस ही समस्या वाढत असल्यामुळे या कालावधी मध्ये त्यांच्या मेंढ्यांना चारा उपलब्ध करणेकरिता मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे चराई करिता शासनाकडून अर्थ सहाय्य उपलब्ध झाल्यास त्यांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

ई श्रम कार्ड योजनेमध्ये मिळत आहेत महिन्याला हजार रुपये, असे करा घरबसल्या चेक

शेळी मेंढी पालनसाठी जागा खरेदी अनुदान

भटक्या जमाती-क या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील भूमीहीन मेंढपाळ कुटुंबासाठी राज्यस्तरीय योजनेंतर्गत अर्ध बंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्याकरीता जागा खरेदीसाठी किंवा ३० वर्षाच्या भाडे करारावर जमीन भाड्याने घेण्यासाठी अनुदानस्वरुपात एकवेळचे एकरकमी अर्थसहाय्य

टीप :-

  1. महामेष योजना ही या आर्थिक वर्षात राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे २ जिल्हे वगळता उर्वरीत ३४ जिल्ह्यात राबवली जाणार आहे .
  2. उक्त मागास प्रवर्गातील ज्या मेंढपाळ कुटूंबाच्या मालकी हक्काची महाराष्ट्र राज्यात कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही प्रकारची शेतजमीन नाही, अशा भूमीहीन मेंढपाळ कुटूंबातील कोणत्याही एका सदस्यास (पुरुष किंवा स्त्री) महामेष योजना अंतर्गत लाभ देण्यात यावा.
  • लाभार्थी निवडीचे निकष / अटी व शर्ती :-
    १. महामेष योजना राज्य शासनाने वेळोवेळी अधिसुचित केलेल्या केवळ भटक्या जमाती (भज-क) या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीमधील ज्या मेंढपाळ कुटुंबांच्या मालकी हक्काची महाराष्ट्र राज्यात कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही प्रकारची शेतजमिन नाही अशा भुमिहीन मेंढपाळ कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यास (पुरूष किंवा स्त्री) या योजनेचा लाभ घेता येईल.
    २. लाभधारकाचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.
    ३. लाभधारकांची निवड करताना, महिलांकरिता ३०% व दिव्यांगाकरिता ३% आरक्षण देण्यात यावे.
    ४. लाभार्थ्यास आधार कार्ड सोबत संलग्न करण्यात यावे.
    ५. अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवा निवृत्ती वेतनधारक / शासकीय पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य, केंद्र शासन / स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य / पदाधिकारी/ लोकप्रतींनिधी नसावा.
    ६. यापूर्वी पशूपालन संबंधीत योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

महामेष योजना संबंधी सरकारचा उद्देश काय आहे?


  • १. राज्यातील भटकंती करणाऱ्या धनगर व तत्सम समाजातील पशुपालकांना पारंपारिक पद्धतीने करित असलेल्या मेंढी/ शेळी पालन या व्यवसायापासून त्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करून देणे व त्याद्वारे त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यास मदत करणे.
    २. राज्यामध्ये बंदिस्त शेळी/मेंढी पालन व्यवसायास चालना देणे.
    ३. मेंढीपालन व्यवसायामध्ये अर्धबंदिस्त किंवा बंदिस्त मेंढीपालन ही संकल्पना प्रभावीपणे राबविणे.
    ४. मेंढीपालनाचा पारंपारिक व्यवसाय असणाऱ्या समाजातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.
    ५. राज्यामधील शेळयांच्या संख्येमध्ये वाढ करून राज्याच्या कृषी व संलग्न क्षेत्रातील स्थुल उत्पन्न वाढीच्या दराचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करणे.
    ६. स्थायी स्वरूपाच्या ठाणबंद पद्धतीने मेंढीपालन करण्यासाठी पशुपालकांना आकर्षित करून त्यांना स्थैर्य निर्माण करून देणे.
    ७. राज्यातील मेंढयांच्या संख्येमध्ये सातत्याने होत असलेली घट थांबविणे किंबहुना त्यामध्ये वाढ करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
    ८. राज्यातील मेंढीपालन व्यवसायास चालना देऊन ग्रामीण रोजगार निर्मिती करणे.
  • महामेष योजना संबंधी लाभाचे स्वरूप :-
    १. महामेष योजना राज्य शासनाने वेळोवेळी अधिसुचित केलेल्या केवळ भटक्या जमाती (भज-क) या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीमधील ज्या मेंढपाळ कुटुंबांच्या मालकी हक्काची महाराष्ट्र राज्यात कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही प्रकारची शेतजमिन नाही अशा भुमिहीन मेंढपाळ कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यास (पुरूष किंवा स्त्री) या योजनेचा लाभ देय असेल.
    २. या योजनेमध्ये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून भुमिहीन मेंढपाळ कुंटुंबासाठी अर्ध बंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्याकरिता किमान १ गुंठा जागा खरेदी करण्यासाठी जागेच्या किंमतीच्या ७५% अथवा किमान ३० वर्षासाठी भाडेकरारावर जागा घेण्यासाठी भाडयापोटी द्यावयाच्या रक्कमेच्या ७५% रक्कम एकवेळेचे एकरकमी अर्थसहाय्य म्हणुन कमाल रु. ५०,०००/- एवढे अनुदान वाटप करणे.
    ३. सदर योजनेमध्ये ७५% हिस्सा राज्य शासनाचा व २५% हिस्याची रक्कम लाभार्थ्यांने उभारणे आवश्यक आहे.
    ४. २० मेंढया/शेळया व १ मेंढानर/बोकड एवढे पशुधन संगोपन करण्याकरिता सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे जागेची आवश्यकता असते.
    २० + १ मेंढी / शेळी गटासाठी शेड बांधकाम

I. २१ प्रौढ मेंढया/शेळयांसाठी १० चौ. फुट प्रमाणे २१० चौ. फुट
II. २० कोकरांसाठी प्रत्येकी ५ चौ. फुट प्रमाणे १०० चौ. फुट एकुण बांधकाम ३१० चौ. फुट

मोकळया जागेस कुंपण उभारणी योजनेचे स्वरूप

I. २१ प्रौढ मेंढया/शेळयांसाठी २० चौ. फुट प्रमाणे ४२० चौ. फुट
II. २० कोकरांसाठी प्रत्येकी ५ चौ. फुट प्रमाणे १०० चौ. फुट एकुण ५२० चौ. फुट क्षेत्रास कुंपण

५. २० मेंढया / शेळया व १ मेंढानर / बोकड एवढे पशुधन संगोपन करण्याकरिता एकुण शेड बांधकामाकरिता ३१० चौ. फुट व ५२० चौ. फुट क्षेत्रास कुंपण असे एकुण ८३० चौ. फुट जागेची तसेच चाऱ्याची साठवणुक करण्याकरिता लागणारी जागा विचारात घेऊन साधारणपणे १००० चौ. फुट म्हणजेच १ गुंठा जागा पुरेशी आहे.

कुक्कुट पक्षांच्या खरेदी आणि संगोपन साठी अनुदान

महामेष योजना अंतर्गत ग्रामीण परिसरातील कुक्कुट पालनास चालना देणेसाठी भटक्या जमाती (क) या प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीसाठी ७५ टक्के अनुदानावर चार आठवडे वयाच्या सुधारीत देशी प्रजातीच्या १०० कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अर्थसहाय्य

टीप :-

  1. महामेष योजना राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता, उर्वरित ३४ जिल्ह्यांमधील महागनगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व कटक मंडळे वगळून इतर भागात ही राबवली जाणार आहे.
  • लाभार्थी निवडीचे निकष / अटी व शर्ती :-

  • १. लाभार्थी हा भटक्या जमाती (क) या धनगर व तत्सम जमाती प्रवर्गातील जात प्रमाणपत्र धारण करणारा व १८ ते ६० या वयोगटातील असावा.
    २. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ देण्यात यावा.
    ३. परसातील कुक्कुटपालनासाठी निवडलेल्या लाभार्थ्याकडे स्वतःची पुरेशी जागा असावी.
    ४. लाभार्थी निवडताना भटक्या जमाती – क या प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीतील ३० टक्के महिला व ३ टक्के दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात यावे.
    ५. व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी महामंडळ यांनी सदर योजनेचे सनियंत्रण करावे व योजनेची प्रसिद्धी करावी.
    ६. अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवा निवृत्ती वेतनधारक / शासकीय पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य, केंद्र शासन / स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य / पदाधिकारी/ लोकप्रतींनिधी नसावा.

महामेष योजना अंतर्गत या योजनांचा घेण्यास अर्ज करण्याची शेवटची तारीख

महामेष योजना अंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबर २०२४ ही असून २६ तारखेपर्यंतच अर्जदारांना त्यांच्या अर्जात बदल करता येऊ शकतो. तुम्ही सदर केलेल्या अर्जाची पावती डाऊनलोड करण्याची प्रक्रिया मात्र २६ सप्टेंबर नंतर दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात येईल.

कोणत्या जिल्ह्यातील नागरिकांना महामेष योजना अंतर्गत लाभ मिळणार नाही?

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना, चराई अनुदान योजना, मेंढी पालन साठी १ गुंठा जागा खरेदी योजना आणि परसातील कुक्कुट पालन योजना मुंबई आणि मुंबई उपनगर वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यांत राबविण्यात येणार आहे.

वरील नमूद घटक १ ते १३ साठी पालघर , ठाणे, सिंधुदुर्ग,रत्नागिरी रायगड आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी लक्षांक नसल्यामुळे सदर जिल्ह्यातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

वरील नमूद घटक १४ आणि १५ साठी पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, गोंदिया, यवतमाळ, हिंगोली, गडचिरोली, नागपूर,अकोला, रत्नागिरी साठी लक्षांक नसल्यामुळे सदर जिल्ह्यातील नागरिकांना महामेष योजना अंतर्गत अर्ज करता येणार नाहीत.

महामेष योजना संबंधी महत्वाच्या बाबी आणि अर्ज सादर करण्याची वेबसाईट

अर्जदारास त्यांची कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सदर वेबसाईट वर एक विंडो उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच महामेष योजना अंतर्गत अर्जदारांची प्रतीक्षा यादी पुढील पाच वर्षांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. सदर विवीध योजनांचा लाभ घेण्यासाठीचे अधिकृत संकेतस्थळ https://mahamesh.org या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. तूम्ही अर्ज सादर केल्यानंतर त्याची पडताळणी होऊन तुमचा अर्ज पात्र ठरल्यास तुम्हाला सदर वेबसाईट वर कागदपत्रे अपलोड करायची आहेत. त्यांनंतर तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होऊन पात्र अर्जदारांना लाभ देण्यात येणार आहे.

महामेष योजना अंतर्गत लाभासाठी कोण पात्र नाही?

(1) राज्यातील भटक्या जमाती – क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमाती व्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील सदस्य
या योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र नाहीत.
2) मुंबई व मुंबई उपनगर या जिल्ह्यामधील व्यक्ती योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र नसेल.
(3) १८ वर्षापेक्षा कमी व ६० वर्ष वयापेक्षा जास्त असलेले व्यक्ती योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र नाहीत.
4) एका कुटुंबातील एका पेक्षा जास्त व्यक्ती योजनेमध्ये अर्ज करण्यास पात्र नसेल.
5) अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या
सेवेत किंवा सेवानिवृत्ती वेतनधारक / शासकीय पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य, केंद्र शासन / स्थानिक
स्वराज्य संस्थेचे सदस्य / पदाधिकारी / लोकप्रतीनिधी या योजनेकरिता पात्र नाही.
6) ज्या लाभधारकांना किंवा कुटुंबातील व्यक्तीस या आधी “राजे यशवंतराव होळकर महामेष योजने”
अंतर्गत लाभ मिळालेला आहे अशा लाभधारकांना “राजे यशवंतराव होळकर महामेष योजने” मध्ये
पुन्हा अर्ज करता येणार नाही. तथापि इतर ३ योजनेकरिता अर्ज करण्यास पात्र असेल.
7) स्व: मालकीची किमान एक गुंठा जागा नसलेले व्यक्ती “राजे यशवंतराव होळकर महामेष योजने” मधील
घटक क्रमांक १, ८, १० व १५ मध्ये अर्ज करण्यास पात्र नसेल.
8) स्वत:च्या २० पेक्षा कमी मेंढ्या असलेल्या कुटुंबातील सदस्यांना “मेंढ्याकरिता चराई अनुदान” या
योजनेमध्ये लाभ घेता येणार नाही.
9) ज्या मेंढपाळ कुटुंबांच्या मालकी हक्काची महाराष्ट्र राज्यात कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही प्रकारची
शेतजमिन आहे अशा मेंढपाळ कुटुंबातील कोणतेही सदस्य “शेळी-मेंढी पालानासाठी जागा खरेदी
अनुदान” या योजनेचा अर्ज करण्यास पात्र नाहीत.
10) राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत आणि कटक मंडळातील व्यक्तीस “कुक्कुट पक्षांच्या खरेदी आणि संगोपन साठी अनुदान” या योजने अंतर्गत अर्ज करता येणार नाही.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment