रब्बी हंगाम बियाणे अनुदान योजना 2024; असा करा ऑनलाईन अर्ज

राज्यातील बहुतांश शेतकरी बांधव हल्ली रब्बी हंगामासाठी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. यंदाच्या रब्बी हंगामासाठी राज्य सरकारकडून बियाणे अनुदान योजना अंतर्गत 50 टक्के आणि 100 टक्के अनुदानावर बियाणे वाटप करण्यात येत आहे. अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळितधान्य पीक योजनेंतर्गत पीक प्रात्यक्षिके, तसेच प्रमाणित बियाण्यांचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे.

mahabdt seed subsidy scheme 2024 official website, online apply process

या पिकांच्या बियाण्यांसाठी मिळणार अनुदान

यंदाच्या रब्बी हंगामासाठी जी पिके या बियाणे अनुदान योजना अंतर्गत समाविष्ट आहेत गी आहेत हरभरा, गहू, जवस, करडई, भूईमूग व मोहरी. राज्य सरकारच्या अधिकृत महाडीबीटी प्रणालीद्वारे या पिकांचे बियाणे अनुदान लाभासाठी अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.

रब्बी हंगामासाठी गव्हाच्या एकरी 40 क्विंटल भरघोस उत्पादन देणाऱ्या सुधारित जाती

या घटकांत मिळणार 100 टक्के अनुदान

मित्रांनो ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला 2 पर्याय मिळतील त्यापैकी पीक प्रात्यक्षिके या पर्यायाला तुम्ही निवडले तर तुम्हाला बियाण्यांवर 100 टक्के अनुदान मिळणार आहे पीक प्रात्यक्षिक घटक अंतर्गत एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात 100 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. मात्र यामध्ये तुम्हाला जुने बियाणे मिळणार नाही. फक्त नवीन बियाणे हे एकच ऑप्शन असेल.

या घटकांसाठी मिळणार 50 टक्के अनुदान

या ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला दिलेला दुसरा पर्याय म्हणजे प्रमाणित बियाणे. तुम्ही जर या पर्यायावर क्लिक करून अर्ज सादर करणार असाल तर तुम्हाला प्रमाणित बियाणे या घटकासाठी एकूण 50 टक्के अनुदान मिळणार आहे. प्रति शेतकरी मर्यादा 2 हेक्टर ठेवण्यात आली असून यामध्ये तुम्हाला नवीन आणि जुने बियाणे दोन्ही प्रकारचे बियाणे उपलब्ध करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करताना निवड कराल त्या बियाण्याचा लाभ दिला जाणार आहे.

असा करा ऑनलाईन अर्ज

रब्बी हंगामासाठी बियाणे अनुदान योजना अंतर्गत लाभासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही राज्य सरकारचे अधिकृत संकेतस्थळ https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login वर जाऊन तुम्ही आधीच नोंदणी केलेली नसल्यास मुख्य पेजवर जाऊन नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करून तुमच्यासमोर नोंदणी करा असा पर्याय येईल त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल. या अर्जात तुमची वैयक्तिक माहिती, शेतीविषयक माहिती आणि बँकेचा तपशील व्यवस्थित भरून नोंदणी पूर्ण करा.

रब्बी हंगामासाठी बियाणे अनुदान योजना आधिकृत वेबसाईट आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया

ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्याकडे लॉग इन करण्यासाठी तीन पर्याय येतील त्यापैकी OTP पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक टाकून दिलेला captcha भरून ओके पर्यायावर क्लिक करावे लागेल. एवढं केलं की तुमच्या आधार सोबत संलग्न मोबाइल नंबरवर एक OTP येईल तो दिलेल्या रकान्यात अचूकपणे टाकायचा आहे. तुम्ही यशस्वीरीत्या लॉग इन केलं की तुम्हाला मुख्य पृष्ठ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, नवीन नियमावली जाहीर, होणार कार्यवाही

यानंतर तुमच्या समोर विविध शासकीय कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करायचे पेज उघडेल. यापैकी बियाणे अनुदान योजना या पर्यायावर क्लिक केलं की अर्ज तुमच्यासमोर येईल. यात तुम्हाला कोणत्या पिकासाठी, किती क्षेत्रात लागवड करायची आहे याची माहिती द्यावी लागेल. तसेच प्रमाणित बियाणे तसेच बियाणे प्रात्यक्षिक यापैकी ज्या घटकानुसार लाभ घ्यायचा असेल तर निवडावे लागेल. याची निवड केली की मग तुम्हाला त्यानुसार बियाण्याच्या वाणाची नावे दिसतील त्यापैकी तुमच्या आवडीची बियाणे जी असतील त्यावर क्लिक करावे लागेल. हे सगळं भरून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल. नंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या सादर केला असा पॉप अप तुम्हाला दिसेल.

या अर्जासाठी भरावा लागणारा शुल्क

रब्बी हंगामासाठी बियाणे अनुदान योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज भरून झाल्यावर अर्जाचा ऑनलाईन शुल्क 26.60 रुपये ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल.

या रब्बी हंगामात हरभऱ्याच्या या सुधारित जातीचे वाण मिळवून देईल प्रचंड उत्पादन

या पद्धतीने होईल अर्ज मंजूर

तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सादर केलेला अर्ज कृषी अधिकारी यांच्याकडून मूल्यमापन करून त्यानुसार तुम्ही पात्र असाल तर तुमचा अर्ज मंजूर करण्यात येईल. अनुदान जितक्या शेतकऱ्यांना द्यायचे आहे त्या प्रमाणात जर खूप जास्त अर्ज प्राप्त झाले असतील तर लॉटरी पद्धतीने निवड केल्या जाते एकदा तुमचा अर्ज मंजूर झाला की काही दिवसातच कृषी विभागातील कृषी सहाय्यक अधिकारी तुम्हाला कॉल करून लाभ घेण्याची माहिती देतील. तुमच्या जवळच्या शासकीय कृषी कार्यालयात तुम्हाला रब्बी हंगामासाठी बियाणे अनुदान योजना अंतर्गत बियाण्यांचे वाटप करण्यात येईल.

ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर सरकारच्या या महाडीबीटी रब्बी हंगामासाठी बियाणे अनुदान योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करायचा असेल तर अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 6 ऑक्टोबर 2024 ठरविण्यात आली होती. मात्र अद्यापही अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू असून संपूर्ण ऑक्टोबर महिना अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरु असू शकते. त्यामूळे लवकरात लवकर सदर वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करून आपल्याला बियाणे अनुदान योजना अंतर्गत लाभ घेता येईल याची नोंद घ्यावी. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अजूनही सुरू असून हि एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या बियाणे अनुदान योजना लाभासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

बियाणे अनुदान योजना अंतर्गत निवड प्रक्रिया

शेतकरी बांधवांनो, बियाणे अनुदान योजना अंतर्गत आलेल्या अर्जांची छाननी केल्या जाते. जेवढ्या प्रमाणात लाभ द्यायचा असतो त्यापेक्षा जास्त प्रमाणात शेतकऱ्यांचे अर्ज सादर केल्या गेले असल्यास बियाणे अनुदान योजना अंतर्गत लॉटरी पद्धतीने ड्रॉ केला जातो. आणि या लॉटरीतून ज्या शेतकऱ्यांचे नाव येईल त्यांना थेट लाभ दिल्या जातो. मात्र बऱ्याच वेळा अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी बहुतांश शेतकऱ्यांनी महा डी बी टी पोर्टल द्वारे बियाणे अनुदान योजना सारख्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेतला आहे.

तुम्हाला सुध्दा सदर बियाणे 50 टक्के आणि 100 टक्के अनुदानावर मिळू शकते यात शंका नाही. तुम्हाला फक्त तुमच्या वेळेतील 5 ते 10 मिनिटे देऊन वर सांगितल्या प्रमाणे ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. तुमची निवड झाली असेल तर तुमच्या भागातील कृषी अधिकारी तुम्हाला कॉल करून याबाबत माहिती देईल. तसेच तुमच्या तालुक्याच्या सरकारी कृषी विभागात जाऊन तुम्हाला मोफत बियाणे योजना अंतर्गत चांगल्या दर्जाच्या सुधारित वाणांची बियाणे उपलब्ध करून देण्यात येतील.

योग्य बियाणे वाणाची निवड अशी करा

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर बियाणे अनुदान योजना अंतर्गत योग्य बियाणे निवडायला कठीण वाटत असेल तर या वेबसाईट वर तुम्हाला रब्बी हंगामासाठी विविध पिकांचे सुधारीत आणि संकरित वाणांची सविस्तर माहिती प्रत्येक वाणासाठी वेगवेगळी पोस्ट लिहून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. लागवडीसाठी शेतजमीन आणि त्या त्या क्षेत्राचे हवामान यानुसार योग्य बियाणे निवड करणे म्हणजेच भरघोस उत्पादन मिळविण्याच्या दिशेने पहिले यशस्वी पाऊल असते. तरी आपण आपल्या शेतीच्या गुणवत्ता अनुसार तसेच तुमच्या भागातील वातावरण जाणून घेऊन सदर बियाणे अनुदान योजना अंतर्गत योग्य वाणाची निवड करून जास्तीत जास्त उत्पादन घेऊन आर्थिक प्रगती साधावी हीच सदिच्छा.

राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल चे महत्व

आपण जर एक जागरूक शेतकरी असाल तर आपले सरकारच्या या अधिकृत वेबसाईटवर नक्कीच नोंदणी करून झालेली असेल. कारण सरकारच्या या अधिकृत संकेतस्थळावर आपल्याला सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेकानेक कल्याणकारी योजनांची माहिती मिळेल. आणि थेट अर्ज करून विविध शेतीच्या उपयोगाची उपकरणे आणि औजारे यांचा लाभ घेता येईल. शेतकऱ्यांना कुठ्ल्याही योजनांची सविस्तर माहिती आपल्याला या संकेतस्थळाच्या माध्यमातून सरकार पुरवत असते. आणि जागरूक नागरिक वेळोवेळी या पोर्टल वर लॉग इन करून नवीन नवीन योजनांचा लाभ सुद्धा घेत असतात. फक्त फवारणी पंपच नाही तर ट्रॅक्टर अनुदान योजना, ठिबक सिंचन योजना, तुषार सिंचन योजना, बियाणे अनुदान योजना यांसारख्या विविध योजनांचा लाभ आपल्याला शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरून घेता येऊ शकतो.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment