मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सरकारने सूरू केली आहे. ज्या महिला निकषात बसणार नाहीत अशा महिलांना लाडकी बहिण योजनेतून मिळालेले पैसे सरकारला परत करावे लागणार आहेत. यामध्ये सरकारने कोणते निकष ठेवले आहेत आणि त्यानुसार कोणत्या बहिणींचे लाभ रद्द होणार आहेत याबाबत माहिती घेऊया.
नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेच्या महिला लाभार्थ्यांना बसू शकतो फटका
केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचा लाभ राज्यातील 19 लाख 20 हजार 85 हजार महिला लाभार्थी घेत आहेत. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत आहेत. अशा महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रूपये जमा करण्यात येत आहेत. मात्र आता निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार ज्या अर्जाबाबत तक्रारी आल्या आहेत.अशा महिलांच्या माझी लाडकी बहिण योजना अर्जाची छाननी होणार आहे.
अन्यथा निराधार योजनेचे पैसै होणार बंद, वेळीच पूर्ण करा या गोष्टी
ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज भरणाऱ्या महिला होणार बाद
माझी लाडकी बहिण योजना जेव्हा सुरू झाली होती, त्यावेळी महिलांची खूप धावपळ झाली होती. योग्य माहितीच्या अभावी ग्रामीण भागातील बहुतांश महिलांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही प्रकारे अर्ज सादर केले होते. मात्र अशा महिलांना आता जोरदार फटका बसणार आहे. अशा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज ज्या महिलांनी सादर केले आहेत, त्यांना या योजनेतून वगळण्यात येण्याची शक्यता आहे.
निराधार योजनेच्या लाभ घेत असलेल्या महिला होणार बाद
अनेक महिला ज्या संजय गांधी योजनेसारख्या निराधार योजनेचा लाभ घेत होत्या त्यांनी सुद्धा लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घेतला. मात्र आता पडताळणी करून अशा सर्व महिलांना देण्यात येणारा लाभ रद्द करण्यात येणार आहे. अशा महिलांकडून आतापर्यंत मिळालेली सर्व रक्कम सुद्धा वसूल केल्या जाऊ शकते.
आता शेतकऱ्यांना वेळेवर मिळणार पिकविम्याची रक्कम, रिमोट सेन्सर पद्धतीने झटपट होणार शेताची पाहणी
या सर्व निकषांत न बसणाऱ्या महिलांचा लाभ होईल बंद
वरील निकषांच्या व्यतिरिक्त आणखी काही निकष आहेत ज्यांची पूर्तता न करणाऱ्या महिला लाभार्थ्यांना माझी लाडकी बहिण योजनेतून वगळण्यात येणार आहे.
कुटुंबाचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचा माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणे आता शक्य होणार नाही.
कुटुंबातील कोणत्याही एखाद्या सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन असेल तर त्या कुटुंबातील लाभार्थी महिलांना माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणे बंद होईल.
शासकीय नोकरी असलेल्या महिलांना सुद्धा माझी लाडकी बहिण योजनेतून रद्द करण्यात येणार आहे.
राज्य किंवा केंद्र शासनाच्या इतर सरकारी योजनेचा लाभ घेणारे असतील तर त्यांना लाभ देण्यात येणार नाही.
ज्या महिला महाराष्ट्रातून लग्न करुन दुसऱ्या राज्यात किंवा देशाबाहेर गेल्या त्यांना मिळणारा लाभ बंद होईल.
ही पडताळणी सरसकट नाही
माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे होणारी ही अर्जाची छाननी सरसकट सर्व लाभार्थ्यांची करण्यात येणार नाही तर तक्रार येणाऱ्या महिलांच्या अर्जांचीच केली जाणार आहे. अपात्र असतानाही लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज यातून बाद केले जातील यात शंका नाही. योजनेसाठी जे निकष आहेत त्या निकषानुसारच लाभ दिल्या जाणार आहे. मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे. निकषांचा विचार जरी केला तरी राज्यातील लाखो महिलांना याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या महिन्यापासून मिळतील 2100 रुपये
माझी लाडकी बहिण योजनेची रक्कम वाढविण्यात येण्याची घोषणा महायुती सरकारकडून निवडणुकीच्या वेळीच करण्यात आली होती. आता राज्यभरातील लाभार्थी महिलांना हे 2100 रुपये प्रति महिना कधीपासून सुरू होईल याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. तर नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच म्हणजेच एप्रिल महिन्यापासून महिलांना दर महिन्याला 2100 रुपये मिळायला सुरुवात होणार असल्याची चर्चा आहे.
छगन भुजबळ यांनी दिला अपात्र महिलांना इशारा
महायुती सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांनी लाडकी बहिण योजनेबद्दल त्यांचे मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले ज्या लाडक्या बहिणींना माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे दिल्या गेले, आता ते परत घेण्यात काहीच अर्थ नाही. सरकारने ते पैसै परत घेऊ नये. मात्र यापुढे ज्या महिला सदर योजनेच्या नियमात बसत नाहीत, त्यांनी स्वतःहून यादीतील नावे काढून घ्यावे. अपात्र महिलांनी अर्ज मागे न घेतल्यास त्यांच्याकडून दंडासह वसुली करता येईल. जे झाले ते झाले. सरकारने अपात्र लाडक्या बहिणींना आतापर्यंत पैसे भेट म्हणून देऊ केले. असे छगन भुजबळ यांनी म्हटले. आता छगन भुजबळ यांनी केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यावर महायुती आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते नेमकी काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे कुतूहलाचा विषय असेल.