कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वितरणासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मंडळनिहाय शिबिरे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वितरण व तपासणीसाठी दि. १० ते १७ दरम्यान सर्व तालुक्यांत मंडळनिहाय शिबिरे आयोजित करण्यात आले आहेत. या शिबिरांमध्ये पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करता येईल तसेच उपलब्ध नोंदी व पुराव्यांची पडताळणी केली जाईल. आपला हक्क आपल्या दारी मिळविण्यासाठी नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा.

तारीखमंडळ
दि. १०गारज, शिउ**कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वितरणासाठी जिल्ह्यात मंडळनिहाय शिबिरे**

जिल्ह्यात मंडळनिहाय शिबिरे आयोजीत

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वितरण व तपासणीसाठी दि. १० ते १७ दरम्यान सर्व तालुक्यांत मंडळनिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करता येईल तसेच उपलब्ध नोंदी व पुराव्यांची पडताळणी केली जाईल. आपला हक्क आपल्या दारी मिळविण्यासाठी नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा.

अपर तहसिल छत्रपती संभाजीनगर (एकूण मंडळ – ५)

तारीखमंडळ
दि. १०भावसिंगपुरा
दि. ११पंदरपूर
दि. १२कांचनवाडी
दि. १५उस्मानपुरा
दि. १७छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर (एकूण मंडळ – ९)

तारीखमंडळ
दि. १०चौका
दि. ११वरुड काझी, पिसादेवी
दि. १२शेकटा, लाडसावंगी
दि. १५चिकलठाणा, करमाड
दि. १६कचनेर, चितेपिंपळगाव

पैठण (एकूण मंडळ – १२)

तारीखमंडळ
दि. १०पाचोड, आडूळ
दि. ११आपेगाव, विहामंडवा
दि. १२पैठण, पिंपळवाडी
दि. १५बालानगर, नादर
दि. १६ढोरकीन, निलजगाव
दि. १७बिडकीन, लोहगाव

फुलंब्री (एकूण मंडळ – ५)

तारीखमंडळ
दि. १०आळंद
दि. ११बाबरा
दि. १५पिरबावडा
दि. १६वडोद बाजार

खुलताबाद (एकूण मंडळ – ४)

तारीखमंडळ
दि. १०खुलताबाद
दि. ११वेरुळ
दि. १२सुलतानपूर
दि. १३बाजारसावंगी

कन्नड (एकूण मंडळ – १०)

तारीखमंडळ
दि. १०नाचनवेल, पिंचोली, लिंबाजी
दि. ११देवगाव रंगारी, चापानेर
दि. १२हतनूर, चिकलठाण
दि. १३कन्नड-नागाव
दि. १५करंजखेडा

सिल्लोड (एकूण मंडळ – ११)

तारीखमंडळ
दि. १०भराडी, बोरगाव बाजार, आमठाणा
दि. ११सिल्लोड, पालोद, निल्लोड
दि. १५अंभाई
दि. १६अजिंठा, शिवना
दि. १७गोळेगाव बु., उंडणगाव

सोयगाव (एकूण मंडळ – ४)

तारीखमंडळ
दि. ११सोयगाव, साबळदवारा
दि. १५जंरडी
दि. १६बनोटी

गंगापूर (एकूण मंडळ – १३)

तारीखमंडळ
दि. १०वाळूज, तुर्काबाद
दि. ११आसेगाव, गाजगाव
दि. १२हर्सूल, डोणगाव
दि. १५सिद्धार्थ वडगाव, गंगापूर
दि. १६मांजरी, जामगाव
दि. १७भेंडाळा, शेदूरवाडा

वैजापूर (एकूण मंडळ – १२)

तारीखमंडळ
दि. १०गारज, शिउर
दि. ११लोणी खु., जागेफळ
दि. १२खंडाळा, बोरसर
दि. १५लासूरगाव, महालगाव
दि. १६बाबतरा, नागमठाण
दि. १७वैजापूर, घायगाव

 

प्रक्रिया सुलभ व पारदर्शक करण्याच्या सूचनाकुणबी प्रमाणपत्र प्रक्रिया सुलभ व पारदर्शक करण्याच्या सूचना न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांनी दिल्या. उपलब्ध नोंदी, वंशावळ व पुराव्यांची नियमानुसार पडताळणी करून पात्र व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुलभ करावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले. कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
मराठा आरक्षण जीआर डाउनलोड कराशासन निर्णय व यंत्रणांचे सहकार्यहैदराबाद गॅझेटच्या अनुषंगाने कार्यवाही करताना शासन निर्णयातील तरतुदींचा विचार करून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करावी. ग्राम व तालुका पातळीवरील यंत्रणांनी अर्जदारांना आवश्यक नोंदी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे, अशा सूचना देण्यात आल्या. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या सूचना दिल्या. पात्र नागरिकांनी आपल्या जवळच्या मंडळातील शिबिरात उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा किंवा पडताळणी करून घ्यावी.

माहितीचा अधिकृत स्रोत: जिल्हा माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा
लेखक : भूषण इंगळे
लेखक : भूषण इंगळे
मुख्य विश्लेषक (सरकारी योजना व कृषी क्षेत्र)
लेखक महाराष्ट्रातील विविध **सरकारी योजना, आधुनिक शेती तंत्रज्ञान, शेतकरी कल्याण, रोजगार आणि फायनान्स** अशा महत्वपूर्ण विषयांचे अभ्यासक व लेखक आहेत. आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी बांधवांपर्यंत अत्यंत अचूक, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती सोप्या भाषेत पोहोचवणे, हेच त्यांच्या "कामाची बातमी" या व्यासपीठाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Leave a Comment