नांदेड रोजगार महाकुंभ : राज्यव्यापी रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी

नांदेड रोजगार महाकुंभ 2026: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती’ या संकल्पनेनुसार ‘रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र’ हा राज्यव्यापी उपक्रम राबविण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभर एकाच दिवशी, एकाच वेळी ५०० ठिकाणी रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात येणार आहेत. नांदेड जिल्ह्यात बेरोजगार व नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात २२ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.

नांदेड नांदेड रोजगार महाकुंभ: जिल्ह्यातील मेळावे स्थळे

नांदेड रोजगार महाकुंभ 2026 अंतर्गत देगलूर महाविद्यालय, उदगीर रोड, देगलूर; श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सोनखेड, ता. लोहा; ग्रामीण औद्योगिक प्रशिक्षण संस्था, माळाकोळी, ता. लोहा; श्री साईबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शंकरनगर, ता. बिलोली; ग्रामीण औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विष्णुपुरी, नांदेड; श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कंधार; ग्रामीण औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नेहरूनगर, कंधार; लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद; संत बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय, कामठा, ता. अर्धापूर; हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर; श्री दत्त आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स सिनियर कॉलेज, हदगाव; दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकर; ग्रामीण एसीएस महाविद्यालय, वसंतनगर, मुखेड येथे रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच किनवट, मुदखेड, नायगाव, उमरी, माहूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्येही मेळावे होणार आहेत. नांदेड शहरातील जिल्हा कौशल्य विकास केंद्र, श्री गुरुगोविंदसिंघजी आयटीआय, शासकीय तंत्रनिकेतन आणि श्री हजूर साहिब आयटीआय येथेही प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन आहे.

विविध ठिकाणी रोजगार महाकुंभ 2026: वाचा संपूर्ण माहिती
हिंगोली
कोल्हापूर
मुंबई
धाराशिव

नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन नोंदणी

नांदेड रोजगार महाकुंभ व प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या बेरोजगार तसेच नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी जॉब सीकर रजिस्ट्रेशन फार्म भरून आपली प्राथमिक माहिती अचूकपणे नोंदवावी. नोंदणीसाठी https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7 या लिंकवर जावे.

उद्योग व नियोक्त्यांसाठी ऑनलाइन नोंदणी

नांदेड रोजगार महाकुंभ 2026 मेळाव्यात सहभागी होऊन उपलब्ध रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड करू इच्छिणारे उद्योग, उद्योग समूह, एमएसएमई, आस्थापना व नियोक्त्यांनी एम्पलॉयर रजिस्ट्रेशनच्या https://forms.gle/Mrz8Gc3ofqq37wwr6 या लिंकवर फॉर्म भरून आवश्यक माहिती अचूक व पूर्णपणे सादर करावी.

सहायक आयुक्तांचे आवाहन

जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी तसेच विविध उद्योग, उद्योग समूह, एमएसएमई, आस्थापना व नियोक्त्यांनी या नांदेड रोजगार महाकुंभ व प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी आणि उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर, नांदेड (दूरध्वनी : ०२४६२-२५१६७४, मोबाईल : ९२७२४८४१६१, ई-मेल : nandedrojgar01@gmail.com) यावर संपर्क साधावा.

माहितीचा अधिकृत स्रोत: जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा
लेखक : भूषण इंगळे
लेखक : भूषण इंगळे
मुख्य विश्लेषक (सरकारी योजना व कृषी क्षेत्र)
लेखक महाराष्ट्रातील विविध **सरकारी योजना, आधुनिक शेती तंत्रज्ञान, शेतकरी कल्याण, रोजगार आणि फायनान्स** अशा महत्वपूर्ण विषयांचे अभ्यासक व लेखक आहेत. आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी बांधवांपर्यंत अत्यंत अचूक, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती सोप्या भाषेत पोहोचवणे, हेच त्यांच्या "कामाची बातमी" या व्यासपीठाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Leave a Comment