हे कांद्याचे सुधारित वाण देईल हेक्टरी 35 टन उत्पादन, जाणून घ्या 20 सुधारित जाती

कांद्याचे सुधारित वाण 2024 : राज्यातील असंख्य शेतकऱ्यांसाठी कांदा हे अत्यंत महत्वाचे तसेच भरघोस उत्पादन मिळवून देणारे पिक आहे. कांद्याची लागवड आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत आपले राज्य प्रथम क्रमांकावर असते. राज्यात अंदाजे 1 लाख हेक्टरावर कांद्याची लागवड केल्या जात असून यामध्ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगाव, धुळे, अहमदनगर, सातारा इत्यादी जिल्हे हे कांदा लागवडीसाठी राज्यात अग्रेसर आहेत. नाशिक जिल्हा कांदा लागवडीच्या बाबतीत देशभरात लोकप्रिय आहे.

देशाच्या एकूण उत्पादनांपैकी महाराष्ट्रात 37% आणि भारतात 10% कांदा उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात होत असल्यामुळे नाशिक जिल्ह्याचा कांदा उत्पादनाच्या संदर्भात गौरवशाली इतिहास आहे. आज आपण कांदा लागवड करून भरघोस उत्पादन मिळवून देणारे काही कांद्याचे सुधारित वाण आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जेणेकरुन शेतकरी बांधवांच्या ज्ञानात भर पडेल. आणि त्यांना त्यांच्या भागातील जमिनीनुसार स्थानिक तज्ञांच्या मार्गदर्शन अनुसार लागवडीचा योग्य निर्णय घेण्यास मदत होईल.

1) फुले सफेद

हे कांद्याचे सुधारित वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून कागल भागातील पांढऱ्या कांद्याच्या पिकामधून विकसित केल्या गेला असून 1994 साली हे सुधारित वाण प्रसारित करण्यात आले. पांढरे कांदे गोलाकार तसेच मध्यम आकाराचे असतात. याशिवाय ते निर्यातीस योग्य असतात तसेच या कांद्यामध्ये घन पदार्थांचे प्रमाण 13% असते.हे कांद्याचे सुधारित वाण 25 ते 30 टन प्रति हेक्टर उत्पादन मिळवून देते.

2) एन. 2-4-1

निफाड येथील संशोधन केंद्राने 1960 साली विकसित केलेला हा वाण महात्मा फुले कृषी
विद्यापीठाच्या पिंपळगाव बसवंत येथील कांदा संशोधन केंद्राने रबी हंगामासाठी वाढवला असून या जातीचे कांदे गोलाकार, मध्यम ते मोठ्या आकाराचे तसेच कांद्याचा रंग विटकरी लाल असतो. हे कांद्याचे सुधारित वाण साठवणीसाठी अत्यंत उत्तम असल्याचे निदर्शनास आले आहे. निर्यात करण्यासाठी सुद्धा ही जात चांगली ठरते. या कांद्याचे सुधारित वाण लागवड केल्यानंतर सुमारे 2 महिन्यांनी काढणीयोग्य होतात. या कांद्याच्या सुधारीत जातीचे उत्पादन हेक्टरी 30 ते 35 टन इतके होते. यामध्ये घन पदार्थचे प्रमाण 12-13% असते. हे कांद्याचे सुधारित वाण रांगडा हंगामासाठी सुद्धा उपयुक्त ठरते.

3) पुसा रेड

हे कांद्याचे सुधारित वाण नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान संस्थेने रबी हंगामासाठी 1975 साली विकसित केले असून या वाणाचा कांदा गोलाकार, चपटा आणि गर्द लाल रंगाचा दिसून येतो. हे कांद्याचे सुधारित वाण लागवडीनंतर 125 ते 140 दिवसांत काढणीसाठी तयार होतात. या जातीचे उत्पादन हेक्टरी सरासरी 25 ते 30 टन इतके मिळते. घन पदार्थांचे प्रमाण 12-13% असते. ही कांद्याची सुधारित जाती आपल्या राज्यात रांगडा आणि रब्बी हंगामास योग्य उत्तम आहे.

4) अर्का निकेतन

ही कांद्याची सुधारित जाती बंगलोर येथील भारतीय बागवानी संशोधन संस्थेने नाशिक येथील स्थानिक वाणांतून 1987 साली विकसित केली असून या जातीचे कांदे गोलाकार, बारीक मानेचे असून त्यांचा रंग आकर्षक गुलाबी असतो. या जातीचा कांदा अत्यंत तिखट असून साठवणीसाठी उत्तम ठरतो. सामान्य तापमानाला हे कांद्याचे सुधारित वाण 110 ते 120 दिवसात तयार होते. या कांद्याच्या सुधारीत जातीची लागवड केल्यास 30 ते 35 टन प्रति हेक्टर उत्पादन मिळवून देण्यास सक्षम ठरते. हे कांद्याचे सुधारित वाण रब्बी आणि रांगडा या दोन्ही हंगामात लागवडयोग्य असून यामध्ये घन पदार्थांचे प्रमाण 12-14% आहे.

5) ॲग्री फाऊंड लाईट रेड

विशेषकरून रबी तसेच उन्हाळी हंगामासाठी हे कांद्याचे सुधारित वाण नाशिक येथील एन. एच. आर. डी. एफ . या संस्थेकडून विकसित करण्यात आले आहे. या वाणाचे कांदे फिकट लाल असून त्यांचा आकार गोल आणि मध्यम असतो. तसेच या जातीच्या मोठ्या आकाराच्या कांद्याची चव तिखट असते. हे कांद्याचे सुधारित वाण हेक्टरी 30 ते 32 टन उत्पादन देणाऱ्या वणापैकी एक आहे. साठवणीसाठी सुध्दा ही कांद्याची सुधारित जात चांगली आहे. मुख्यत्वेकरून नाशिक भागासाठी ही जात योग्य आहे. निर्यात करण्यासाठी सुद्धा हे वाण उत्तम असते. यामध्ये घन पदार्थांचे प्रमाण 13-14% असते.

6) एन. 257-91

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्याकडून हे कांद्याचे सुधारित वाण रबी हंगामासाठी विकसित केल्या गेले असून या जातीचा कांदा पांढरा, मध्यम गोल आणि चपट्या आकाराचा असतो. तसेच हे कांद्याचे सुधारित वाण साठवणीच्या बाबतीत सुद्धा चांगले ठरते. ही कांद्याची सुधारित जात लागवड केल्यानंतर 110 ते 120 दिवसांत काढणीसाठी तयार होते. या जातीपासून हेक्टरी 25 ते 30 टन उत्पादन मिळते.

7) ॲग्री फाऊंड व्हाईट

राष्ट्रीय बागवानी संशोधन आणि विकास प्रतिष्ठान (एन. एच. आर. डी. एफ) नाशिक ह्या
संस्थेने ही जात मध्यप्रदेश राज्यात निमाड भागातील रबी हंगामात उत्पादन केल्या जाणाऱ्या स्थानिक वाणातून निवड पद्धतीने विकसित करण्यात आली असून या कांद्याच्या सुधारीत जातीची कांदे आकाराने गोलाकार आणि आकर्षक असतात. तसेच त्यांचा रंग पांढरा असतो, सुमारे 4 ते 6 सें.मी. व्यासाचे हे कांदे असून यामध्ये घन पदार्थांचे प्रमाण 14-15 % असते. या जातीच्या कांद्याची साठवणक्षमता सुद्धा उत्तम असते. हे कांद्याचे सुधारित वाण 160 ते 165 दिवसांत काढणीस तयार होते. या कांद्याच्या जातीचे उत्पादन हेक्टरी सरासरी 20 ते 25 मेट्रिक टन असते. खरीप व रब्बी दोन्ही हंगामात लागवडीसाठी हे कांद्याचे सुधारित वाण योग्य आहे.

8) फुले सुवर्णा

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 1997 साली हे कांद्याचे सुधारित वाण विकसित केले असून महाराष्ट्रातील तिन्ही.हंगामात या जातीतून उत्पादन घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. कृषी विद्यापीठाकडून यलो टेक्सास आणि एन 2-4-1 या वाणांच्या संकरातून हे नवीन वाण विकसित केले आहे. या जातीचे कांदे पिवळ्या किंचित विटकरी रंगाचे तसेच गोलाकार, घट्ट मध्यम तिखट असतात. हे वाण निर्यात आणि साठवणी करण्याच्या बाबतीत योग्य असतात. या जातीच्या पिकाच्या कालावधीबाबत सांगायचे झाल्यास 110 दिवसांत पीक तयार होते. या कांद्याच्या सुधारीत जातीची लागवड केल्यास सरासरी 23-24 टन प्रति हेक्टर एवढे उत्पादन सहज मिळू शकते.

एकरी 40 क्विंटल पर्यंत उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या सुधारित जाती, अशी करा लागवड

9) फुरसुंगी (एन.एच.आर.डी.एफ)

हे कांद्याचे सुधारित वाण 110 ते 120 दिवसांत काढणीसाठी तयार होते. एनएचआरडीएफ-फुरसुंगी जातीचा कांदा आकर्षक लाल रंगाचा तसेच गोलाकार असतो. यामुळे या जातीच्या कांद्याला उत्तम बाजारभाव मिळतो. एनएचआरडीएफ-फुरसुंगी जातीच्या वाणाची लागवड केल्यास त्यापासून प्रतिहेक्टरी 38 ते 40 मेट्रिक टन एवढे भरघोस उत्पादन मिळते. उन्हाळी कांद्याप्रमाणेच या सुधारित जातीचा कांदा काढणी केल्यानंतर 5 ते 6 महिने साठवणूक करता येण्याच्या क्षमतेचा आहे. हे कांद्याचे सुधारित वाण करपा, बुरशीजन्य रोगांना प्रतिकारक असते.

10) भीमा रेड

कांदा लागवड करण्यास ही एक सुधारित जात सुद्धा चांगली असून राज्याची भौगोलिक परिस्थिती बघता या जातीची लागवड करण्यास हवामान अनुकूल असते. या वाणाची खरीप, लेट खरीप आणि रब्बी अशा तीनही हंगामांमध्ये हे कांद्याचे सुधारित वाण लागवडयोग्य आहे. या जातीची कांदे आकाराने मध्यम गोलाकार असतात. या जातीच्या कांद्याची साठवणूक सुद्धा करता येते.
या जातीच्या पिकाचा कालावधी 115 ते 120 दिवस असतो. हेक्टरी 21 ते 22 टन उत्पादन कांद्याच्या सुधारीत जाती पासून मिळू शकते. या जातीची लागवड खरीफ हंगामात करणे अधिक फायदेशीर ठरते.

हेक्टरी 35 टन पर्यंत उत्पादन देणारे कांद्याचे सुधारित वाण, एकूण 20 वाण, संपुर्ण माहिती
कांदा लागवड करताना शेतकरी बांधव

11) भीमा सुपर

खरीप आणि रांगडा अशा दोन्ही हंगामासाठी हे कांद्याचे सुधारित वाण लागवडयोग्य आहे. खरीप हंगामासाठी पिकाचा कालावधी 100 ते 105 दिवसांचा असून यापडून हेक्टरी 21 ते 22 टन उत्पादन मिळते.

12) भीमा शक्ती

हे कांद्याचे सुधारित वाण खरीप हंगामात लागवडीसाठी फायदेशीर ठरते. मात्र रांगडा हंगामात सुद्धा या वाणाची लागवड करता येऊ शकते. या जातीचे कांदे गोलाकार असून त्यात घनतेचे प्रमाण 12 ते 13 टक्के असते. या जातीच्या पिकाचा कालावधी 120 ते 130 दिवस असतो. हेक्टरी 35 ते 40 टन इतके प्रचंड उत्पादन मिळवून देऊ शकणारे हे कांद्याचे सुधारित वाण आहे.

13) N.H.R.D.F.-Red-4

हे कांद्याचे सुधारित वाण रब्बी हंगामासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. या जातीच्या मोठ्या कांद्याचा आकार गोलाकार असून त्यांची मान पातळ असते. याचा रंग गडद लाल असून व्यास 5.5 ते 6.25 सेमी असतो. उच्च उत्पादनक्षमता असलेले हे कांद्याचे सुधारित वाण असून कांदा वाण असून या जातीचे पीक 110 ते 120 दिवसात काढणीस तयार होते. या सुधारीत जातीपासून सरासरी 35 ते 40 मेट्रिक टन एवढे उत्पादन प्रति हेक्टर शेतजमिनीसाठी मिळू शकते. मात्र हे वाण उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि इंफाळ या राज्यांसाठी रब्बी हंगामात लागवडीसाठी योग्य असून या राज्यांसाठी या वाणाची शिफारस करण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी शिफारस नसल्यामुळे कांद्याच्या या सुधारित जातींची पेरणी शेतकऱ्यांनी करणे उचित ठरणार नाही.

14) बसवंत 780

महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कांदा संशोधन केंद्र, पिंपळगाव (बसवंत ) येथे स्थानिक वाणातून सन 1986 मध्ये हे कांद्याचे सुधारित वाण विकसित करण्यात आले असून या जातीचे* कांदे गोलाकार असतात. आणि त्यांचा रंग आकर्षक गडद लाल असतो. या सुधारीत जातीचे कांदे काढणीनंतर 3-4 महिने टिकून राहतात आणि त्यांचा रंग देखील फिकट होत नाही. या जातीच्या कांद्यात डेंगळे तसेच जोडकांद्याचे प्रमाण खूपच कमी असते. या वाणाच्या कांद्याला उत्तम बाजारभाव सुद्धा मिळतो. या जातीचे पीक 100 ते 110 दिवसांत काढणीयोग्य होते. खरीप हंगामासाठी महाराष्ट्रात हे कांद्याचे सुधारित वाण खूपच प्रसिद्ध आहे. या जातीपासून सरासरी 25 ते 30 टन प्रति हेक्टर एवढे उत्पादन मिळते.

हरभऱ्याच्या या सुधारित आणि संकरित जाती मिळवून देतील प्रचंड उत्पन्न, व्हाल मालामाल

15) एन. 53

नाशिक येथील स्थानिक वाणातून ही कांद्याची सुधारित जाती 1960 साली प्रसारित केल्या गेली असून या जातीचे कांदे गोलाकार आणि चपटे असतात. त्यांचा रंग जांभळट लाल असून हे कांदे तिखट असतात. हे कांद्याचे वाण सुद्धा खरीप हंगामासाठी आपल्या राज्यात तसेच उत्तर प्रदेश मध्ये कमालीचे लोकप्रिय आहे. या सुधारित जातीची लागवड केल्यास सरासरी 25 ते 30 मेट्रिक टन प्रति हेक्टर उत्पादन मिळते.

16) अर्का कल्याण

भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्था, बंगळुरू येथून कळवण भागातील स्थानिक वाणातून विकसित करण्यात आलेले हे कांद्याचे सुधारित वाण आहे.
या जातीचे कांदे आकाराने गोल, रंगाने गर्दलाल तसेच चवीने तिखट असतात. या कांद्याच्या सुधारीत जातीचा पीक कालावधी 100 से 110 दिवसांचा असतो. या वाणापासून 25 ते 30 टन प्रति हेक्टरी उत्पादन मिळते.

17) अँग्री फाऊंड डार्क रेड

हे कांद्याचे सुधारित वाण नाशिक येथील राष्ट्रीय बागवानी संस्थेव्दारे स्थानिक वाणातून 1987 साली विकसित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ही कांद्याची सुधारीत जाती खरीप हंगामासाठी योग्य ठरते. या जातीचे कांदे गर्द लाल रंगाचे असून चवीला मध्यम तिखट तसेच आकाराने गोल असतात.
या जातीच्या पिकाचा कालावधी 90 ते 100 दिवस इतका असून हे कांद्याचे सुधारित वाण लागवड केल्यास 20 ते 27 मेट्रिक टन प्रति हेक्टर उत्पादनक्षम असते.

18) फुले समर्थ

ही कांद्याची सुधारित जाती महात्मा फुले कृषी विद्यापीठाने खरीप आणि रांगडा हंगामासाठी स्थानिक वाणातून विकसित करण्यात आले आहे. या जातीचे आकाराने उभट गोल असून त्यांचा रंग चमकदार गर्द लाल असतो. या जातीच्या कांद्यांची मान बारीक असते. तसेच पातीची वाढ मर्यादित राहून कांदा पोसण्याचा वेग अधिक असतो. लवकर पीक तयार होणाऱ्या वाणांपैकी हे एक कांद्याचे सुधारित वाण असून या कांद्याचे पीक तीन ते चार आठवडे आधीच काढणी योग्य होते. खरीप हंगामात 75 ते 85 दिवसांत तर रांगडा हंगामात 85 ते 100 दिवसांत या जातीचे पीक तयार होते. या जातीच्या कांद्याच्या पिकाचा सरासरी कालावधी 80 ते 90 दिवस इतका असून खरीप हंगामात याचे उत्पादन सरासरी हेक्टरी 25 मेट्रिक टन आणि रांगडा हंगामात 30 ते 35 मेट्रिक टन प्रति हेक्टर एवढे मिळते.

19) भीमा सुपर

हे कांद्याचे सुधारित वाण जम्मू, पंजाब, हरियाणा, दिल्ली, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या खरीफ रांगडा हंगामासाठी फायदेशीर असते. खरीप हंगामामध्ये या पिकाचा कालावधी 100 ते 105 दिवसांचा असतो. आणि रांगडा हंगामामध्ये पिकाचा कालावधी 110 ते 120 दिवसांचा असतो. या वाणाची उत्पादन क्षमता प्रती हेक्टरी 20 ते 22 टन तसेच रांगडा हंगामामध्ये हेक्टरी 40 ते 45 टन इतकी असते. या वाणाची साठवण क्षमता खरीप हंगामामध्ये 1 ते दीड महिना तसेच रांगडा हंगामामध्ये 3 महिन्यांपर्यंत असते. या जातीचे कांदे कांदे एका डोळ्याचे असल्यामुळे मालास योग्य बाजारभाव मिळतो.
हे कांद्याचे सुधारित वाण फुलकिडे व बुरशीजन्य रोगांसाठी मध्यम प्रमाणत प्रतिकारक असते.

20) भीमा किरण

हे कांद्याचे सुधारित वाण पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये विशेषकरून रब्बी हंगामासाठी प्रसारित करण्यात आले आहे. या वाणाच्या पिकाचा कालावधी 125 ते 135 दिवसांचा असतो. सरासरी उत्पादनाबाबत बोलायचे झाल्यास हे वाण हेक्टरी 28 ते 32 टन उत्पादन देण्यास सक्षम असते. याची साठवण क्षमता 5 ते 6 महिने इतकी प्रदीर्घ असते. ही कांद्याची सुधारित जात सुद्धा बुरशीजन्य रोगांसाठी मध्यम प्रमाणत प्रतिकारक असते.

वाटाण्याच्या या सुधारित जाती फक्त 2 महिन्यात देतील लाखोंचे उत्पन्न, लागवडीची पद्धत घ्या जाणून

रांगड्या कांद्याचे व्यवस्थापन असे करा

तुम्हाला जर कांद्याच्या सुधारित वाण पेरून भरघोस उत्पादन घ्यायचे असेल तर काही गोष्टी लक्षात घ्या. एक एकर कांदा लागवडीसाठी दोन गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करा. एक एकर शेतात कांदा लागवड करण्यासाठी दोन ते तीन किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया महत्वाची असून प्रति किलो बियाण्यास 2 ग्रॅम कार्बेन्डाझिम हे बुरशीनाशक चोळा. पूर्वमशागत करताना 200 किलो शेणखतासोबत 500 ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हिरीडी वापरून जमिनीत मिसळा.

रोपवाटिकेत ठिबक किंवा स्प्रिंकलर सिंचन पद्धतीचा वापर करण्यासाठी जमिनीपासून 10 ते 15 सें.मी. उंच, 1 ते 1.2 मीटर रूंद आणि गरजेनुसार लांब गादीवाफे जमिनीच्या उताराला आडवे तयार करून घ्या. असे केल्यामुळे कांदा रोपांची वाढ एकसारखी होण्यास मदत होते. तसेच पाणी फार काळ साचून राहत नाही त्यामुळे रोपे कुजत किंवा सडत नाही. याशिवाय लावणीच्या वेळी सहज उपटून काढता येतात आणि रोपांच्या गाठी जाड व लवकर तयार होण्यास हातभार लागतो. वाफे तयार करताना दर 1600 ग्रॅम नत्र, 400 ग्रॅम स्फुरद, 400 ग्रॅम पोटॅश प्रति 200 चौरस मीटर याप्रमाणे योग्य मात्रेत खत व्यवस्थापन करा.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment