मोहरी सुधारित जात आपल्या शेतात पेरून भरघोस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची आपल्या देशात काही कमी नाही. देशात अनेक शेतकरी आता मोहरी लागवडीकडे वळत आहेत. या पिकाच्या लागवडीसाठी हवामान आणि शेतजमिनी अनुसार कोणत्या सुधारित जातींची लागवड करणे योग्य राहील याबाबत बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम असतो. जर चुकीची मोहरी सुधारित जात वापरल्या जाऊन पेरणी केल्या गेली तर त्याचा उत्पादनावर अनिष्ट परिणाम नक्कीच होतो. शेतकरी बांधवांनो तुम्हाला खाली मोहरीच्या अपेक्षित उत्पादन देणाऱ्या काही सुधारित वाणांची सविस्तर माहिती या लेखातून मिळेल.
जेणेकरुन तुम्ही तुमच्या भागातील हवामान तसेच तुमची शेतजमीन यांच्या अनुकूलतेनुसार योग्य वाणाची निवड करायला मदत होईल. आणि परिणामी अधिकाधिक उत्पादन मिळून तुमच्या उत्पन्नात भर होईल हा या माहितीपूर्ण लेखाचा मुख्य हेतू आहे. एक गोष्ट मात्र लक्षात घ्या. हा लेख फक्त माहितीसाठी असून तुमच्या भागातील कृषी तज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेऊनच योग्य मोहरी वाणाची निवड करायला विसरु नका. चला तर जाणून घेऊया मोहरीचे विविध सुधारित वाण आणि त्यांच्यापासून मिळणारे उत्पादन यांची इत्यंभूत माहिती.
आर. एच. 1424
ही मोहरी सुधारित जात कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उपयूक्त आहे. भरघोस उत्पादन देणारी ही जात मोहरीच्या जुन्या RH 725 पेक्षा अधिक उत्पादन देण्यास सक्षम आहे. या मोहरी वाणाच्या पिकाचा कालावधी करून 130 ते 139 दिवसांचा असून या मोहरी सुधारित जात पासून 23 ते 26 क्विंटलपर्यंत प्रती हेक्टरी उत्पादन मिळते. या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण सुमारे 40.05% इतके असते. याचे तेल काढून झाल्यानंतर उरलेला पेंढा पाळीव जनावरांना ढेप म्हणून देतात.
आर. एच. 1706
हे मोहरी सुधारित वाण बागायती शेतीसाठी प्रचंड उत्पादन मिळवून देणारी जात असून केवळ उत्पन्नाच्या दृष्टीनेच नव्हे, तर पोषक तत्वांच्या दृष्टीनेही ही जात अत्यंत उपयुक्त आहे. या जातीमध्ये 2 टक्क्यांपेक्षा कमी इरुसिक ॲसिडचे प्रमाण असून यात फॅटी ॲसिड नसते. परिणामी या जातीच्या मोहरीला चांगली मागणी असते. परिणामी ही मोहरी सुधारित जात शेतात करून शेतकरी बांधव भरघोस उत्पादन मिळवू शकतात.ही मोहरी सुधारित जात 140 दिवसांत काढणीस पूर्णपणे तयार होते. उत्पादनाचा विचार केला तर प्रती हेक्टर 27 क्विंटलपर्यंत उत्पादन हे मोहरी सुधारित वाण आरामात मिळवून देऊ शकते.. या वाणाच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण 38% असते.
आर.एच. 725
जास्तीत जास्त लागवड केल्या जाणाऱ्या जातींपैकी हे एक मोहरी सुधारित वाण जुन्या जातींपैकी एक असून शेतकरी बांधवांची आवडती जात आहे. हरियाणा कृषी विद्यापीठाने ही मोहरी सुधारित प्रसारित केली आहे. या मोहरी वाणाच्या पिकाचा कालावधी 136 ते 143 दिवसांचा असतो. तर या जातीपासून 20 ते 25 क्विंटल प्रति हेक्टर एवढे भरघोस उत्पादन मिळते. लांब शेंगा येणाऱ्या या जातीची लागवड देशातील अनेक राज्यांत केल्या जाते. प्रत्येक शेंगीत 17 ते 18 दाणे पाहायला मिळतात. दाण्यांचा आकार सुद्धा मोठा असतो. मोहरीचे अधिकाधिक उत्पादन देणाऱ्या जातींपैकी हे एक खात्रीशीर सुधारित वाण आहे.
आर. एच. 30
हे मोहरी सुधारित वाण कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उपयूक्त आहे. भरघोस उत्पादन देणारी ही जात अधिक उत्पादन देण्यास सक्षम आहे. या मोहरी वाणाच्या पिकाचा कालावधी करून 130 ते 135 दिवसांचा असून या मोहरी सुधारित जात पासून 18 ते 20 क्विंटलपर्यंत प्रती हेक्टरी उत्पादन मिळते. या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण सुमारे 39% इतके असते. ही मोहरी सुधारित जात हरियाणा, पश्चिम राजस्थान या राज्यातील विविध भागांसाठी लागवडीस उत्तम असून या भागातील कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरली आहे
आर. एच. 761
ही मोहरी सुधारित जात कमी पाण्याच्या प्रदेशात तसेच कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक आहे. भरघोस उत्पादन देणारी ही जात प्रती हेक्टरी 25 ते 27 क्विंटल उत्पादन मिळवून देते. या मोहरी वाणाच्या पिकाचा कालावधी करून 136 ते 145 दिवसांचा असतो. या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण सुमारे 37 ते 39% इतके असते. साधारणपणे 45 ते 50 दिवसांत या जातीच्या मोहरीच्या झाडाला फुले येऊ लागतात. देशाच्या विविध भागांत हे मोहरी सुधारित वाण लागवडीसाठी वापरल्या जाते.
पुसा बोल्ड
ही मोहरी सुधारित जात महाराष्ट्र राज्यातील विविध भागांसह गुजरात, दिल्ली आणि राजस्थानच्या प्रदेशात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत आहे. भरघोस उत्पादन देणारी ही जात मोहरीच्या इतर वाणांप्रमानेच जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देते. या मोहरी वाणाच्या पिकाचा कालावधी करून 130 ते 145 दिवसांचा असून या मोहरी सुधारित जात पासून 18 ते 20 क्विंटलपर्यंत प्रती हेक्टरी उत्पादन मिळते. या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण सुमारे 42% इतके असते. मोहरीच्या सर्वात प्रसिद्ध जातींपैकी ही एक जात आहे.
राज विजय
ही मोहरी सुधारित जात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांसाठी विकसित करण्यात आली असून कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उपयूक्त आहे. या मोहरी वाणाच्या पिकाचा कालावधी इतर जातींच्या तुलनेत खूपच कमी असून हे मोहरी सुधारित वाण 120 ते 130 दिवसांचा असून या मोहरी सुधारित जात पासून 20 ते 25 क्विंटलपर्यंत प्रती हेक्टरी उत्पादन मिळते. या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण सुमारे 37 ते 40.% असते. याचे तेल काढून झाल्यानंतर उरलेला पेंढा पाळीव जनावरांना ढेप म्हणून देतात.या जातीची ऑक्टोबर महिन्यात पेरणी करण्याची शिफारस केली जाते.
पुसा 00-31
दिल्ली येथील पुसा संस्थान यांच्याकडून 2017 साली प्रसारित करण्यात आलेली ही मोहरी सुधारित जात हरियाणा,उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यातील विविध भागात लागवडीसाठी वापरली जाते. हे मोहरी सुधारित वाण बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उपयूक्त आहे.या मोहरी वाणाच्या झाडाला पिवळ्या रंगाचे दाणे येतात. पिकाचा कालावधी करून 130 ते 140 दिवसांचा असून या मोहरी सुधारित जात पासून 23 ते 25 क्विंटलपर्यंत प्रती हेक्टरी उत्पादन मिळते. या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण सुमारे 40.56% इतके असते. मोहरी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच व्यापारी वर्गात सुद्धा ही पुसा 00-31 जात विशेष प्रसिद्ध आहे.
जवस पिकाच्या लागवडीसाठी 10 सुधारित वाणांची सविस्तर माहिती
सीता
ही मोहरी सुधारित जात मोहरी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूपच उत्तम आहे. भरघोस उत्पादन देणारी ही जात असून या मोहरी वाणाच्या पिकाचा कालावधी करून 100 ते 110 दिवसांचा असून या मोहरी सुधारित जात पासून 8 ते 10 क्विंटलपर्यंत प्रती हेक्टरी उत्पादन मिळते. या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण सुमारे 40.% पर्यंत असते. हे मोहरी सुधारित वाण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी लागवडीस योग्य आहे.
टी. एम. 4
ही मोहरी सुधारित जात महाराष्ट्रातील कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उपयूक्त आहे. भरघोस उत्पादन देणारी ही जात राज्यातील शेतकऱ्यांत विशेष लोकप्रिय असलेल्या जातींपैकी एक आहे. या मोहरी वाणाच्या पिकाचा कालावधी करून 90 ते 95 दिवसांचा असून या मोहरी सुधारित जात पासून 12 ते 15 क्विंटलपर्यंत प्रती हेक्टरी उत्पादन मिळते. या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण सुमारे 37 ते 39% असते. याचे तेल काढून झाल्यानंतर उरलेला पेंढा पाळीव जनावरांना ढेप म्हणून देतात.
टी. पी. एम. 1
ही मोहरी सुधारित जात कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उपयूक्त आहे. भरघोस उत्पादन देणारी ही जात मोहरीच्या जुन्या RH 725 पेक्षा अधिक उत्पादन देण्यास सक्षम आहे. या मोहरी वाणाच्या पिकाचा कालावधी करून 90 ते 95 दिवसांचा असून या मोहरी सुधारित जात पासून 12 ते 14 क्विंटलपर्यंत प्रती हेक्टरी उत्पादन मिळते. या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण सुमारे 40% पर्यंत असते. अधिक उत्पादन देणारी ही मोहरी सुधारित जात भुरी रोगास प्रतिकारक असते. पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांसाठी अतिशय लाभदायक असलेल्या या मोहरी वाणाचे दाणे पिवळ्या रंगाचे असतात.
वरुणा
ही मोहरी सुधारित जात कोरडवाहू तसेच बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या मोहरी वाणाच्या पिकाचा कालावधी करून 100 ते 105 दिवसांचा असतो. ही मोहरी सुधारित जात 15 ते 18 क्विंटलपर्यंत प्रती हेक्टरी उत्पादन देण्यास कार्यक्षम ठरते. या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण सुमारे 37% असते. महाराष्ट्रातील विविध भागांत या मोहरी सुधारित वाणाची लागवड करण्याची शिफारस केल्या गेली आहे.
शताब्दी ए. सी. एन. 9
हे मोहरीचे सुधारित वाण 40 ते 42 दिवसांत फुलोऱ्यावर येते. या वाणाच्या 100 दाण्यांचे वजन 3 ते 4 ग्रॅम असते. काळसर करड्या रंगाची ही मोहरी सुधारित जात प्रती हेक्टरी 10 ते 12 क्विंटल उत्पादन देते. तसेच या जातीच्या मोहरी पिकाचा कालावधी 95 ते 105 दिवसांचा असतो. या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण 32 ते 40 टक्के इतके असते. या सुधारित वाणाची लागवड राज्यातील विविध भागात केल्या जाऊ शकते.
एन. आर. सी. एच. बी. 101
या मोहरीच्या सुधारित वाणाच्या पिकाचा कालावधी 105 ते 115 दिवसांचा असून साधारणपणे 51 ते 54 दिवसांत झाड फुलोऱ्यावर येते. या जातीच्या मोहरीचा रंग काळसर असतो. तसेच 100 दाण्याचे वजन 3 ते 3.5 ग्रॅम इतके असते. हेक्टरी 8 ते 10 क्विंटल उत्पादन देणाऱ्या या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण 35 ते 40% असते. राज्यातील कोरडवाहू शेती करणारे शेतकरी या वाणाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करत असल्याचे पाहायला मिळते.
जी. एम. 3
ही मोहरी सुधारित जात 105 ते 115 दिवसांत पीक काढणीसाठी सज्ज होते. पीक फुलोऱ्यावर येण्याचा कालावधी पेरणीपासून 51 ते 53 दिवसांचा असतो. या जातीच्या मोहरीच्या 100 दाण्यांचे वजन सुमारे 3.5 ते 5 ग्रॅम असते. प्रति हेक्टर 10 ते 12 क्विंटल उत्पादन देणाऱ्या या जातीच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण 35 ते 40 टक्के इतके दिसून येते. संपूर्ण राज्यात या वाणाची लागवड केल्या जाऊ शकते. विशेष करून जिरायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या वाणाची लागवड करणे फायदेशीर ठरते.
शेतकरी मित्रांनो जगामध्ये मोहरीचे क्षेत्र आणि उत्पादनाचा विचार केल्यास आपल्या देशाचा प्रथम क्रमांक लागतो. भारतात उत्तर प्रदेश, बिहार या राज्यासह इतर बऱ्याच भागात मोहरीच्या तेलाचा वापर खाद्यतेल म्हणून मोठ्या प्रमाणात केल्या जातो. मोहरीच्या तेलाचा वायर करून बनवलेली लोणची जास्तकाळ टिकतात. मोहरीमध्ये तेलाचे प्रमाण सरासरी 30 ते 48% आहे. पांढऱ्या मोहरीतील तेलाचे प्रमाण 25 ते 33% असते. मोहरीच्या बियांचा उपयोग मसाल्यामध्ये केल्या जातो. तेल काढून झाले की उरलेला पदार्थ म्हणजेच मोहरीची पेंड जनावरांना खाद्य म्हणून तसेच झाडांना सेंद्रिय खत म्हणून सुद्धा याचा वापर होतो. हे सेंद्रीय खत झाडांची कोवळी पाने भाजीसाठी उपयुक्त असते.
भरघोस उत्पादन देणाऱ्या भुईमुगाच्या 15 सुधारित जाती जाणून घ्या
भरघोस उत्पादन मिळविण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स
शेतकरी बांधवांनो जर तुम्ही मोहरी सुधारित जात तुमच्या शेतात लागवड करून भरघोस उत्पादन घेण्याचा निर्धार केला असेल तर लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडा. पिकाच्या लागवडीस अशी शेतजमीन योग्य आणि पोषक असते.
मोहरी पिकाला थंड आणि कोरडे हवामान चांगले मानवत असल्यामुळे ऑक्टोबर महिन्यातच वेळेवर पेरणी करून घ्या.
जमिनीची पूर्वमशागत करताना एक खोल नांगरट करून दोन कुळवाच्या पाळ्या द्या. तसेच ढेकळे फोडून जमीन चांगली तयार करा.
मोहरी पीक रब्बी हंगामात घेतले जाते. मोहरीची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात केलेली उत्तम असते हे लक्षात असू द्या.
तुम्ही जर मोहरी सुधारित वाण शेतात पेरायचे ठरविले असेल तर पेरणी करण्यापूर्वी 1 किलो बियाण्यास 2 ग्रॅम थायरम किंवा डायथेन एम 45 ही बुरशीनाशके लावून बीजप्रक्रिया करायला अजिबात विसरू नका.
मोहरीचे बियाणे आकाराने लहान असते त्यामुळे योग्य प्रमाणात पेरणीसाठी बारीक वाळू किंवा मातीमध्ये मिसळून पेरणी करा. पेरणी पाभरीच्या साहाय्याने 54×15 सें.मी. अंतरावर आणि 3 ते 4 सें.मी. खोलीवर पेरणी करा. मात्र जास्त खोलवर पेरणी करू नका.
शेतकरी मित्रांनो मोहरी हे पीक आंतरपीक म्हणून सुद्धा घेता येते. तुम्ही जर मुख्य पीक गहू घेत असाल तर गहू आणि मोहरी 4 : 2 या प्रमाणात पट्टा पध्दतीने लागवड करा म्हणजे अत्यंत लाभदायक ठरेल.
फक्त मोहरी पिकाची लागवड केल्यास पेरणीसाठी प्रति हेक्टरी 5 किलो बियाणे लागते तर आंतरपीक म्हणून मोहरी लागवड करत असाल तर त्यासाठी दोन ते अडीच किलो वाणाची गरज पडते.
मोहरी पिकाच्या उत्तम वाढीसाठी खत व्यवस्थापन खूप महत्वाचे असते.पेरणी करण्यापूर्वी हेक्टरी 25 किलो नत्र आणि 45 किलो स्फुरद, बियाण्यापासून 4 ते 5 सें. मी. दूरवर लहानलहान सन्या काढून योग्यरित्या द्या. आणि उर्वरित नत्राचा दुसरा हफ्ता म्हणजेच हेक्टरी 25 किलो नत्र पेरणीनंतर बरोबर एका महिन्याने द्या.
मोहरी पिकाला एकरी अंदाजे 25 ते 30 हजार रुपये खर्च येतो. तर सुमारे 70 ते 90 हजार रुपयांचे उत्पादन होते. म्हणजेच निव्वळ नफा 45 ते 60 हजार रुपये प्रति एकर मोहरी लागवडीसाठी मिळतो. या कारणांमुळेच मोहरीची शेती एक फायद्याचा सौदा ठरत आहे. आपण सुद्धा मोहरी लागवड करून अपेक्षित उत्पादन घेण्याचे आपले उद्दिष्ट नक्कीच साध्य करू शकता.