दाना चक्रीवादळ (Cyclone Dana) देईल ताशी 120 किमी वेगाने धडक, सावधगिरीचा इशारा

संपूर्ण राज्यभरात मागील काही दिवसांपासून पावसाने हैदोस घातला असून आता दाना चक्रीवादळाचा (Cyclone Dana)सामना करावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अंदमान समुद्रातून तयार झालेलं दाना चक्रीवादळ (Cyclone Dana) हे एक प्रचंड शक्तिशाली वादळ असून 23 ऑक्टोबरपर्यंत बंगालच्या उपसागरात पोहोचणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. 24 ऑक्टोबर रोजी ते ओडिशा-पश्चिम बंगाल किनारपट्टीवर दाना चक्रीवादळ (Cyclone Dana) धडकणार आहे.

या राज्यांना दिले सतर्कतेचे आदेश

दाना वादळ (Cyclone Dana) या चक्रीवादळ बद्दल हवामान खात्याने सावधगिरी बाळगण्याचा संदेश दिला असून ओडिशा-बंगालमधील मच्छिमारांना 23 ते 26 ऑक्टोबर या कालावधीत समुद्रात न जाण्याचा सल्ला सुद्धा दिला आहे. 21 ऑक्टोबर रोजी दुपारपर्यंत अंदमान समुद्रात कमी दाबाची स्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे, असे आय.एम डी. ने म्हटले आहे. 22 ऑक्टोबरपर्यंत चक्रीवादळ दाना (Cyclone Dana) हे पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात खोल दबावात रूपांतरित होईल. तसेच या दाबाचे 24 ऑक्टोबरपर्यंत चक्रीवादळात रूपांतर होईल.

दाना चक्रीवादळ (Cyclone Dana) मुळे मुसळधार पावसाची शक्यता

राज्यातील बऱ्याच भागांत या चक्रीवादळ मुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चक्रीवादळ दाना (Cyclone Dana) च्या प्रभावामुळे हवामान विभागाने येत्या 2 ते 3 दिवसांत राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविला असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पावसासह विजा गर्जना तसेच ढगांचा गडगडाटही दिसून येऊ शकतो, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा थोडा अधिक जोर असू शकतो अशाप्रकारच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत.

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा धुमाकूळ दिसून येत असून येत्या 2-3 दिवसांत पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली असून शेतकऱ्यांनी त्यांचा पिकाची काळजी घेणे गरजेचे आहे. पुढील तीन दिवस पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीला निष्फळ ठरविण्याचे काम सध्या पाऊस करताना दिसत आहे.

मुंबईसह 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा धुमाकूळ दिसून येत असून हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, बीड,धाराशीव, लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दाना चक्रीवादळ (Cyclone Dana) देईल ताशी 120 किमी वेगाने धडक

‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा दिला इशारा (Cyclone Dana update)

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा धुमाकूळ दिसून येत असून राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे, सांगली, नंदुरबार, नाशिक,धुळे या जिल्ह्यांमध्ये आज दिनांक 20 ऑक्टोबर आणि उद्या दिनांक 22 ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच विदर्भातील अकोला, वर्धा, यवतमाळ, वाशिम , बुलडाणा या जिल्ह्यांत सुद्धा मुसळधार पर्जन्यमान होऊ शकते. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी शक्य होईल तेवढी पिकांची काळजी घ्यावी.

अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक सडले

(Cyclone Dana update) मध्यंतरी राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान करून गेल्या पाच दिवसाची विश्रांतीनंतर परतीच्या पावसाची हजेरी पाहायला मिळत असून सद्यस्थितीत राज्याचा विविध जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. राज्यात ठिकठिकाणी विजेच्या गडगडाट सह मुसळधार पाऊस पडत असून गेल्या पाच दिवसानंतर परतीच्या मुसळधार पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक नष्ट झाले असून आता रब्बी पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

या भागांत गारपीट होण्याची शक्यता

(Cyclone Dana update) हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली येथे वादळ आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. तर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरू राहणार असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय जळगाव, नगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, मुंबई, राजस्थान आणि गुजरातमध्ये वादळाचा इशारा देण्यात आला आहे.

काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस

राज्यातील काही भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस झाला असून राज्यातील बऱ्याच ठिकाणी वीज पडून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे पाऊस पडत आहे. राज्यात पुढील तीन, चार दिवस पावसाचा असाच जोर राहणार असून त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट दिली आहे.

तापमानात झाली वाढ

एकीकडे पावसाचा धुमाकूळ तसेच दुसरीकडे मुंबईतून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात उन्हाचा तडाखा बसला आहे. हे उष्ण वारे अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्याने ते आपल्यासोबत मोठ्या प्रमाणात ओलावा घेऊन येत असल्याने मुंबई आणि किनारी भागातील नागरिकांना दमट उष्णतेचा सामना करावा लागत आहे. सांताक्रूझ येथे काल कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. अरबी आणि हिंदी महासागरात हवेच्या कमी दाबामुळे पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते, त्यामुळे मुंबई आणि कोकणात तापमानात वाढ झाली आहे.

कांदा पिकाला मोठे नुकसान

राज्यात होणाऱ्या या परतीच्या मुसळधार पावसामुळे कांद्याच्या रोपवाटिकांमध्ये पाणी साचून कांद्याची रोपे सडू लागली आहेत. परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. कांद्याच्या उत्पादनावर याचा अनिष्ट परिणाम दिसून येणार आहे. इतकेच नाही तर ज्या शेतकऱ्यांना पुन्हा कांदा लागवड करायची आहे. अशा शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने बियाणे विकत घ्यावी लागणार आहेत. यामुळे नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2.0 बद्द्ल संपुर्ण माहिती

मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

राज्याच्या विविध भागात मागील काही दिवसांमध्ये परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू असून त्यामुळे शेतीच्या तसेच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये किंवा तालुक्यांमध्ये मागील काही दिवसात मुसळधार पाऊस झाला.

काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी शेतपिकांचे आणि शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले असून बऱ्याच ठिकाणी शेतात काढून ठेवलेल्या विविध प्रकारच्या पिके अगदी सडली आहेत तसेच सोयाबीन सारखी काढलेली पिके पाण्यात भिजून प्रचंड नुकसान होऊन बळीराजा हवालदिल झाला आहे.

भात, सोयाबीन, तूर, कपाशी, ऊस इत्यादी प्रकारच्या पिकांसह फळबागांचे सुद्धा या परतीच्या पावसात नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून विविध जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment