महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) मार्फत नि:शुल्क तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) मार्फत नि:शुल्क तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) छत्रपती संभाजीनगर व जिल्हा उद्योग केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२५–२६ या कालावधीसाठी नि:शुल्क तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विशेषतः सर्वसाधारण व अनुसूचित जाती प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती व महिलांसाठी राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश स्वयंरोजगार निर्माण करणे, उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक व व्यवस्थापकीय कौशल्ये विकसित करणे हा आहे.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) विषयी माहिती

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ही महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्यातील विविध औद्योगिक विकास महामंडळांच्या पुढाकाराने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. MCED मार्फत सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती व महिलांना औद्योगिक व उद्योजकीय प्रशिक्षण दिले जाते. उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन, प्रकल्प अहवाल, कर्ज योजना, बाजारपेठेचे ज्ञान आणि कौशल्य विकास हे या संस्थेचे मुख्य कार्य आहे.

प्रशिक्षण कार्यक्रमांचा तपशील

या नि:शुल्क तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे खालील दोन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

१) वेल्डिंग टेक्निशियन प्रशिक्षण

वेल्डिंग टेक्निशियन हे तांत्रिक कौशल्यावर आधारित प्रशिक्षण असून उद्योग, वर्कशॉप, फॅब्रिकेशन युनिट तसेच स्वयंरोजगारासाठी उपयुक्त आहे.
हे प्रशिक्षण दोन महिन्यांचे असून सर्वसाधारण घटकासाठी आहे. या प्रशिक्षणासाठी एकूण ३० प्रशिक्षणार्थींची निवड केली जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवार स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात किंवा औद्योगिक क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळवू शकतात.

२) डिशेस (अगरबत्ती) बनविणे प्रशिक्षण

डिशेस/अगरबत्ती बनविणे हे महिलांसाठी व लघुउद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त प्रशिक्षण आहे. कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्याची संधी या प्रशिक्षणातून मिळते.
हे प्रशिक्षणही दोन महिन्यांचे असून सर्वसाधारण घटकासाठी आहे. या प्रशिक्षणासाठी ३० प्रशिक्षणार्थींची निवड केली जाणार आहे. घरगुती उद्योग, स्वयंरोजगार व स्थानिक बाजारपेठेसाठी हा व्यवसाय फायदेशीर ठरतो.

प्रशिक्षण कालावधी व प्रशिक्षणार्थी संख्या

दोन्ही प्रशिक्षण कार्यक्रमांचा कालावधी दोन महिने आहे. प्रत्येक प्रशिक्षणासाठी ३० उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. एकूण मर्यादित जागा असल्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.

औद्योगिक अभ्यासक्रमात समाविष्ट विषय

या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये केवळ तांत्रिक ज्ञानच नाही तर उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे विविध विषय समाविष्ट आहेत. यामध्ये औद्योगिक व्यक्तिमत्त्व विकास, उद्योग संधींची ओळख, उद्योग व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल तयार करणे, शासकीय कर्ज योजनांची माहिती, बाजारपेठ व्यवस्थापन, विपणन कौशल्य, संभाषण कौशल्य, बाजारपेठेचा अभ्यास, उद्योग नोंदणी प्रक्रिया इत्यादींचा समावेश आहे.

प्रवेशासाठी पात्रता

या प्रशिक्षणासाठी उमेदवारांची काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. उमेदवाराचे वय सर्वसाधारण प्रवर्गासाठी १८ ते ४५ वर्षे आणि अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १८ ते ५० वर्षे असावे. उमेदवार कोणत्याही वित्तीय संस्था किंवा बँकेचा थकबाकीदार नसावा. यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस प्रशिक्षणात प्रवेश दिला जाईल. उमेदवार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. पूर्ण वेळ प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

प्रवेशासाठी उमेदवारांनी काही आवश्यक कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे. प्रशिक्षणार्थी किमान ७ वी उत्तीर्ण असावा व जातिचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. ओळखपत्रासाठी आधार कार्ड किंवा रेशन कार्ड आवश्यक आहे. मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला किंवा टी.सी. सादर करावी लागेल. पासपोर्ट साईज ३ फोटो आवश्यक आहेत. राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक असून खात्याचा तपशील द्यावा लागेल. वरील सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे अनिवार्य आहे.

प्रशिक्षण शुल्क, मानधन व प्रमाणपत्र

हे प्रशिक्षण पूर्णतः नि:शुल्क असले तरी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर मानधन दिले जाईल. एका महिन्यासाठी रुपये १००० आणि दोन महिन्यांसाठी रुपये २००० मानधन दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

निवड प्रक्रिया

MCED मार्फत प्रशिक्षणासाठी निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. कार्यबल समितीमार्फत पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना पुढील प्रशिक्षणाबाबत माहिती देण्यात येईल.

अर्ज सादर करण्यासाठी संपर्क माहिती

अर्ज सादर करण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील संपर्कावर संपर्क साधावा.
कार्यक्रम आयोजक व संपर्क व्यक्ती – रितेश शाक्य
मोबाईल क्रमांक – ९६५७२५२४८२

चौकशी व प्रवेशासाठी अधिकृत संपर्क

चौकशी व प्रवेशासाठी खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल.
श्रीमती भारती सोसे – प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, छत्रपती संभाजीनगर, मोबाईल – ९४०३६८३१७३
श्री. सुदाम थोरे – विभागीय अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, छत्रपती संभाजीनगर
श्री. स्वप्निल राठोड – महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, छत्रपती संभाजीनगर

MCED छत्रपती संभाजीनगर कार्यालयाचा पत्ता

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED),
अ-३८, एम.आय.डी.सी. परिसर,
रेल्वे स्टेशन रोड जवळ,
छत्रपती संभाजीनगर.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment