हतबल झालेल्या शेतकऱ्याने शेतातील कोथिंबीर केली उद्धवस्त : एकतर निसर्ग शेतकरी वर्गाला साथ देत नाही. ज्यावेळी साथ देतो तेव्हा इतर आव्हानांचा सामना करायला बळीराजा भाग पडतो. अशाच एका संतापलेल्या शेतकऱ्याला नैराश्यातून त्याच्या शेतातील कोथिंबीर ट्रॅक्टरच्या साहाय्याने उद्ध्वस्त करावी लागली आहे. शेतातील कोथिंबीर उद्ध्वस्त करण्यामागील नेमके कारण जाणून तुम्हाला सुद्धा हळहळ वाटल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटल्या जाते. मात्र या शेतकरी राज्याच्या आयुष्यात सुखाचे क्षण फारच कमी येतात अन् जीवनभर अनेक आव्हानांचा मुकाबला करून जीवन व्यतीत करावे लागते. अशातच निसर्गाचा कोप झाला तर तो अधिकच उद्विग्न होतो.
नाशिकमधील शेतकऱ्याने उद्ध्वस्त केला शेतातील कोथिंबीर
नाशिकच्या चांदवड तालुक्यातील तिसगाव येथील शेतकरी बाजीराव बागुल यांनी त्यांच्या शेतात एक ते दीड एकर शेतात कोथिंबीर लागवड करून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा ठेवली होती. या पिकासाठी सदर शेतकऱ्याने खूप मेहनत घेऊन कोथिंबीर पीक मोठ्या प्रमाणावर घेतले. आता त्याच्या मेहनतीचं फळ मिळायची वेळ आली होती. त्यांनी या कोथिंबिरीची पहिली काढणी मजुरांच्या साहाय्याने केल्यामुळे त्यांचा खर्च झाला.
लागवड करण्यापासून ते काढणी करण्यासाठी बराच खर्च झाला. मात्र जेव्हा ते बाजारात विक्रीसाठी कोथिंबीर घेऊन गेले तेव्हा त्यांच्या कोथिंबिरीस कवडीमोल भाव मिळाला. त्यातून मिळालेले पैसे मजुरांचे पैसे व गाडी भाडे देण्यासाठी सुद्धा पुरेसे नव्हते. त्यामुळे त्यांना उष्र पैसे घेऊन मजुरांची मजुरी देण्याची वेळ आली. यामुळे पुरत्या संतापलेल्या बागुल यांनी नैराश्यातून आणि संतपतून घरी थेट भाड्याने ट्रॅक्टर काढले आणि त्यांच्या शेतात पोहोचले. आणि संपूर्ण शेतातील कोथिंबीर नांगर फिरवून उध्वस्त केला. होणारा खर्च आणि एकरी उत्पादन खर्च याचा मेळ बसत नसल्याने हतबल झालेल्या या शेतकऱ्याने शेतातील उभे पीकच मातीमोल केले.
दुष्काळात तेरावा महिना, भाड्याने आणलेले ट्रॅक्टर झाले नादुरुस्त
जेव्हा बागुल यांनी हतबल होऊन शेतातील पीक नष्ट करायला शेतात भाड्याने आणलेला ट्रॅक्टर टाकला तेव्हा काही वेळाने तो ट्रॅक्टर सुद्धा नादुरुस्त झाला. तो भाड्याने आणलेला ट्रॅक्टर दुरुस्त करण्यासाठी त्यांना अजून खर्च पडला. शेतातील कोथिंबीर कवडीमोल भावात विकून काही फायदा नाही. वाहतुकीचा खर्च सुद्धा निघणार नाही याची कल्पना असल्याने कोरडे यांनी त्यांचा शेतातील कोथिंबीर पीक भाड्याने ट्रॅक्टर आणून नांगर फिरवला. मात्र नांगर फिरवत असताना अचानक ट्रॅक्टर मध्ये बिघाड झाला. त्यावेळी पुन्हा फिटर आणून सदर ट्रॅक्टरची दुरुस्ती या सगळ्यात शेतकऱ्याला आर्थिक झळ सोसावी लागली.
अबब! या व्यक्तीने केली चक्क डोक्यावर गव्हाची शेती, कारण जाणून व्हाल चकित
शेतकऱ्यांची व्यथा कोण जाणून घेणार?
राज्यातील बरेच शेतकरी अल्पभूधारक असून ते आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत ही वस्तुस्थिती आहे. निसर्गाने लहरीपणा दाखवून जर एखाद्या हंगामातील पीक उद्ध्वस्त केले तर अशा शेतकऱ्याला पूर्वपदावर यायला बरेच कष्ट सहन करावे लागतात. घर चालवणार की कर्ज फेडणार याची चिंता त्यांना कायम लागून राहिलेली असते. जेव्हा शेतातील पीक चांगले होते तेव्हा जर योग्य बाजारभाव मिळाला नाही तर मात्र झालेला खर्च सुद्धा निघत नाही. अशा परिस्थितीत कमकुवत मनाचे शेतकरी यातून सुटण्याचा दुसरा कोणताही मार्ग दिसत नसल्याचे पाहून जीवनाचा दोर कापून कुटुंबीयांना कधीच न भरता येणारे अनेक दुःख देऊन जातात.
जगातील पहिला संपूर्ण सेंद्रिय शेती करणारा देश भूतान, नैसर्गिक संपन्नता लाभलेले राष्ट्र
काही शेतकरी संतप्त होऊन उद्याच्या काळजीत जीवन जगतात. अनेक ताण तणाव मनावर सहन करून आजचा बळीराजा जगत असतो. पोटच्या लेकराप्रमाणे जपलेल्या पिकाला जेव्हा तो उद्ध्वस्त करण्याचा मानसिकतेत येतो तेव्हा त्याच्या मनाला किती असह्य वेदना होत असतील याची कल्पना न केलेलीच बरी. सरकारने शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे यासाठी काहीतरी प्रयत्न करणे अगत्याचे आहे.