सरकारकडून दिव्यांग व्यक्तींना मिळणार मोफत ई रिक्षा, असा करा अर्ज

राज्य सरकार दिव्यांग व्यक्तींना मोफत ई रिक्षा वाटप करण्याच्या तयारीत आहे. राज्यातील दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगता यावे यासाठी नेहमीच नवनवीन महत्वाकांक्षी योजना राबवत असते. राज्य सरकार सुद्धा समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून अशा अपंग आणि दिव्यांग व्यक्तींना लाभ देण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची माहिती देत असते. तसेच याबाबत सर्व निकष पूर्ण करून अर्ज सदर करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांचा लाभ देण्यात येत असतो. अशीच एक आनंदाची बातमी आता राज्यातील असंख्य दिव्यांग व्यक्तींसाठी सरकारकडून मिळाली आहे. आता दिव्यांग व्यक्तींना राज्य सरकारच्या वतीने मोफत ई रिक्षा मिळणार असून त्याचे अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

स्वयं रोजगार साठी मिळणार हरित ऊर्जेवर चालणारा ई रिक्षा

दिव्यांग व्यक्तींना मिळणार मोफत ई रिक्षा. दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात दिनांक 10.06.2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे.

मोफत ई रिक्षा योजनेची उद्दिष्टे

राज्यातील दिव्यांग नागरिकांचे जीवनमान उंचावणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. राज्यात दिव्यांगांची संख्या मोठ्या प्रमाणात असून अशा सर्व नागरिकांना जीवन जगताना आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना रोजगार उपलब्ध व्हावा तसेच त्यांची जीवन जगत असताना येणारी आव्हाने लक्षात घेऊन त्यांना मोफत ई रिक्षा द्वारे सहजरित्या व्यवसाय करणे सोईस्कर होईल हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून या योजनेची अंमलबजावणी राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. ही योजना 2019 पासूनच लागू असून आतापर्यंत अनेक गरजू पात्र लाभार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून मोफत ई रिक्षा वितरण होऊन त्यांना त्यांच्या रोजगार बाबत दिलासा मिळून ही योजना रोजगाराचे एक नवीन सोईस्कर मध्यम म्हणून समोर आले आहे. तरीही जास्तीत जास्त गरजू दिव्यांग नागरिकांनी या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी संबंधित विभागाकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

प्रस्तुत योजनेकरिता एकूण 45,389 इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाच्या कागदपत्रांची छाननी करण्याचे काम महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांचे स्तरावर करण्यात आले असून दिनांक 10.06.2019 व दिनांक 27.09.2023 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तींची पुर्तता करणारे म्हणजेच 100% दिव्यांगत्वाचे प्रमाण असणारे अर्जदार यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले असून सन 2023-2024 या आर्थिक वर्षाकरिता 667 दिव्यांग लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच पात्रतेचे निकष पूर्ण करत नसल्यामुळे काही दिव्यांग अर्जदारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. उर्वरित सर्व दिव्यांग अर्जदार यांचे अर्ज दिनांक 01.04.2024 रोजीपासून पुढील आर्थिक वर्ष सन 2024-2025 मध्ये वर्ग करण्यात येत असल्यामुळे त्यांना नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.

दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत ई रिक्षा योजना सप्टेंबर 2024

नवीन अर्ज करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना मिळणार मोफत ई रिक्षा

समाज कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार सदर योजनेच्या शासन निर्णयामधील काही निकषांमध्ये बदल करण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरू असल्याने सदरची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर केवळ ज्या दिव्यांग व्यक्तींनी यापुर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाहीत अशाच दिव्यांग व्यक्तींकरिता वर्ष 2024-25 अंतर्गत नोंदणी पोर्टल सुरु करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी संदर्भाने दिव्यांग अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्या करिता सदर नोंदणी पोर्टल सकाळी १० वाजे पर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे.

दिव्यांग व्यक्तींना मोफत ई रिक्षा योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत?

१. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.

२.अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान ४०% टक्के असावे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक / सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्रधारक असावा.

३. अर्जदारा कडे दिव्यांगत्वाचे UDID प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

४. अर्जदार हा १८ ते ५५ या वयोगटातील असावा.

५. मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्यांचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील.

६. दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाख पेक्षा अधिक नसावे.

७. लाभार्थी निवड करताना जास्त अपंगत्व असलेल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे निवडीचा क्रम हा अतितीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहील.

अतितीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालविण्याचा परवाना नाकारला असल्यास अशा परिस्थितीत देखील परवाना धारक नसलेल्या अतितीव्र दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत सोबत्याच्या सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य दिले जाईल.

९. अर्जाच्या वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधीत वाहनाची योग्यती काळजी घेण्याचे बंधपत्र सादर करणे आवश्यक राहील. / At the time of submission of the application, the applicant is required to submit a bond/affidavit agreeing to all rules and conditions and taking proper care
of his/her vehicle/e-cart.


१०. अर्जाचा वेळी अर्जदाराने सर्व अटी मान्य असल्याचे तसेच संबंधित वाहनाची योग्य ती काळजी घेण्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे / At the time of application, the applicant agrees to all the conditions and takes proper care of the concerned vehicle. Affidavit given along with the application.


११. जिल्हानिहाय लाभार्थ्यांची घोषणा दिव्यांगांच्या संख्येच्या प्रमाणात केली जाईल / The District wise list of the beneficiaries will be published on portal in proportionate to number of persons with disabilities in each district.


१२. अर्जदार हा शासकीय/निमशासकीय/मंडळे / महामंडळे यांचा कर्मचारी नसावा / The applicant should not be employed by the Government, Semi Government, or any Local body/Corporation.


१३. या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचा कर्जदार असेल तर तो थकबाकीदार नसावा / if the applicant has previously availed a loan from Maharashtra State Handicapped Finance & Development corporation, they should have not defaulted on the given loan.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिये करिता आपण खालील कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे.

१) अर्जदाराचा फोटो / Applicant Photo (only jpeg, jpg,png and gif image with size 15 KB to 100 KB allowed and Photo image
Width and Height less than 800px allowed)

२) अर्जदाराची सही / Applicant Signature (Only jpeg, jpg, png and gif image with size 3 KB to 30 KB allowed)
(Only width:190px,height:50px)

३) जातीचा दाखला / Caste Certificate (Size : 10-500 KB and Format: jpeg, jpg, png and pdf)

४) अधिवास प्रमाणपत्र / Domicile Certificate (Size: 10-500 KB and Format: jpeg, jpg, png and pdf)

५) निवासी पुरावा / Address Proof (Size: 10-500 KB and Format: jpeg, jpg, png and pdf)

६) दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र / Disability Certificate (Size: 10-500 KB and Format: jpeg, jpg, png and pdf)

७) UDID प्रमाणपत्र / UDID Certificate (Size: 10-500 KB and Format: jpeg, jpg, png and pdf)

८) ओळखपत्र / Identity Proof (Size: 10-500 KB and Format: jpeg, jpg, png and pdf)

९) बँक पासबुकचे पहिले पान / First page of Bank Passbook (Size:10-500 KB, and Format: jpeg, jpg, png and pdf)

(१०) अर्जदाराचे प्रतिज्ञापत्रक / Applicant’s Affidavit (Size: 10-500 KB and Format: jpeg, jpg, png and pdf)

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आणि अधिकृत वेबसाईट

सध्या नागपूर विभागाकडून दिव्यांग व्यक्तींना मोफत ई रिक्षा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत असून त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने समाज कल्याण विभागात अर्ज करायचा आहे. राज्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे आपण खाली दिलेल्या नमुना अर्जाची प्रत डाऊनलोड करू शकता. तसेच याआधी अर्ज केला असेल तर तुम्ही खालील संकेतस्थळावर लाभार्थ्यांच्या यादीत आपले नाव पाहू शकता.

https://evehicleform.mshfdc.co.in

आपण जर याआधी या योजनेसाठी अर्ज केलेला असेल तर सदर वेबसाईट वर आपल्याला लाभार्थ्यांची यादी pdf स्वरूपात प्राप्त होईल.

ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत खालील चरणांचा समावेश आहे.

१. सूचना वाचणे / Reading the instructions

२. प्रथमच वापरकर्त्याची नोंदणी (साइन-अप ) / Registration (sign-up) of first-time user

३. ऍप्लिकेशन पोर्टलवर लॉगिन (साइन-इन) करणे / Login (sign-in) to the application portal

४. अर्ज भरणे आणि कागदपत्रे अपलोड करणे / Filling in application form and uploading documents

५. फॉर्मचे पुनरावलोकन करणे, घोषणा तपासणे आणि फॉर्म सबमिट करणे / Reviewing form, checking
declaration and submitting the form.

६. अर्ज ऑनलाईन सबमिशनची पोचपावती / Acknowledgement of submission

ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत काही महत्वाच्या सूचना

पोर्टल उघडल्यानंतर, फॉर्म भरण्याच्या सूचना प्रदर्शित केल्या जातील. नोंदणी करण्यापूर्वी आणि फॉर्म
भरण्यापूर्वी प्रत्येक प्रथमच वापरकर्त्याने या सूचना वाचणे आवश्यक आहे. प्रथमच वापरकर्त्याने नोंदणी/लॉगिन
बटणावर क्लिक केल्यानंतर वापरकर्त्यास साइन-अप / साइन-इन पृष्ठावर निर्देशित केले जाईल. ओटीपी
पाठवा बटनावर क्लिक केल्यानंतर मोबाइल नंबर प्रविष्ट केल्यानंतर, नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठविला जाईल.

नागपूर समाज कल्याण विभागाकडून गरजूंना लाभ घेण्याचे आवाहन

अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात उपलब्ध असून लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात ई-रिक्षा योजनेचे अर्ज जमा करावे तसेच दिव्यांग गरजू लाभार्थ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे. आपल्या जिल्ह्यात सुद्धा सदर योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत का याची समाज कल्याण विभागाच्या कार्यालयाकडून माहिती घ्यावी.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment