शेतकरी राजाच्या लाडक्या बैलांचा सण आला, बैल पोळा सणाचे महत्त्व

Last Updated on: 9 September 2026

पोळा (बैल पोळा) २०२६ हा महाराष्ट्रातील बळीराजाचा आणि त्यांच्या लाडक्या बैलांचा अत्यंत महत्त्वाचा व आनंदाचा सण आहे. सन २०२६ मध्ये हा सण तिथीनुसार १० सप्टेंबर २०२६ रोजी (श्रावणी अमावास्येला) मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. हा सण शेतीमध्ये वर्षभर राबणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून विश्रांती दिली जाते. सकाळी त्यांना नदीवर नेऊन अंघोळ घातली जाते, त्यांच्या शिंगांना रंग लावून, पाठीवर नक्षीदार झूल आणि गळ्यात घुंगरांच्या माळा घालून सुंदर सजवले जाते. घरात महिला बैलांच्या आवडीची गोड पुरणपोळी आणि इतर पकवान्ने बनवून त्यांना नैवेद्य भरवतात व त्यांची आरती ओवाळतात. संध्याकाळी गावागावांमध्ये वाजत-गाजत बैलांची भव्य मिरवणूक (तोरण तोडणे) काढली जाते. आधुनिक युगात यांत्रिकीकरण वाढले असले, तरी महाराष्ट्र पर्यटनाच्या माहितीनुसार, हा सण आजही शेतकरी आणि प्राण्यांमधील अतूट भावनिक नात्याचे आणि संस्कृतीचे दर्शन घडवतो. चला तर जाणून घेऊया वर्षभर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कार्यात इमाने इतबारे मदत करणाऱ्या बैलांच्या बैल पोळा सणाबद्दल संपूर्ण माहिती.

शेतकऱ्यांच्या आवडत्या सर्जा राजांचा सण बैल पोळा

शेतकरी राजाच्या लाडक्या बैलांचा सण आला, बैल पोळा सणाचे महत्त्व

बैल पोळा सणाच्या दिवशी शेतकरीवर्ग त्यांच्या गायी आणि बैलांची विशेष सेवा आणि पूजा करत असतात. पोळा हा सण महाराष्ट्र, मध्य प्रदेश तसेच छत्तीसगड इत्यादी राज्यांत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. बैल पोळा उत्सव दरवर्षी भाद्रपद महिन्यातील (भादोन) अमावास्येच्या दिवशी साजरा केला जात असतो. इंग्रजी कॅलेंडर अनुसार बैल पोळा सण यंदा 10 सप्टेंबर 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. आपल्या विदर्भात बैल पोळा सलग दोन दिवस साजरा केला जातो. पहिला दिवस मोठा पोळा आणि दुसरा दिवस तान्हा पोळा म्हणून साजरा केला जातो.

गायी/ बैल शेतकऱ्यांसाठी भरभराटीचे प्रतीक

आपल्या देशात सुमारे 70 टक्के खेड्यातील भारतीय शेतकरी बैल आणि गायींच्या सहाय्याने शेती करतात हे खरे आहे. बैल सुद्धा आपल्या मालकाप्रती प्रामाणिक असतो. मालकाने सोपविलेले काम तो पूर्णत्वास नेत असतो. याच कारणामुळे या प्राण्यांना देवरुपी मानून वर्षातून अनेक वेळा त्यांची पूजा केली जाते. आपल्या राज्यात खेड्यांत आजही असंख्य घरांच्या दारात गायी-बैल इत्यादी पाळीव जनावरे आढळतात.

बैल पोळा सणाविषयी पौराणिक कथा

दिवाळी सणाचे महत्व आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या.

बैल पोळा सणाबद्दल एक पौराणिक कथा सुद्धा प्रचलित आहे. त्या कथेनुसार एकदा कंस द्वारे कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षसाला पाठवविण्यात आले होते. तेव्हा कृष्णाने त्या पोलासुर राक्षसाचा वध केला होता. तो दिवस श्रावण अमावास्येचा होता.म्हणून या दिवशी बैल पोळा सण साजरा करण्यात येतो अशी आपल्या देशातील लोकांची धारणा आहे.

बळीराजाची आपल्या सर्जा राजांबद्दल आत्मीयता

विदर्भातील शेतकऱ्यांच्या अनुसार ज्या शेतकऱ्याच्या अंगणात जितके जास्त गायी आणि बैल दिसतात तो शेतकरी अधिक धनवान समजला जातो. शेतकऱ्यांसाठी गाई बैल हे केवळ प्राणी नसून त्यांचे स्थान घरातील एक सदस्य म्हणुनच आहे असेच सगळे सांगतात. नाशिकमध्ये द्राक्ष, डाळिंब, कांदा, मराठवाड्यात सोयाबीन-ज्वारी, नागपुरात संत्री किंवा बुलढाण्यात कापूस पिकवणारे मोठे उत्पादक शेतकरी अनेक ट्रॅक्टर असूनही गाई-बैलांना घराबाहेर बांधणे हा स्वतःसाठी एकप्रकारचा सन्मान समजतात. या गायी-बैलांमुळेच आज आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत, अशी प्रबळ धारणा प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात कायम असते. हे प्राणी फक्त शेतकऱ्यांसाठी मेहनत करत नाहीत तर त्यांच्याप्रती कमालीचे प्रामाणिक आढळतात.

बैल पोळा हा सण कसा साजरा केला जातो?

भाद्रपद अमावस्येच्या एक दिवस आधी शेतकरी गायी आणि बैलांना दोरीपासून मुक्त केल्या जाते.. हळद आणि मोहरीचे तेल अंगावर लावून बैलांना मसाज करतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे बैलपोळ्याच्या दिवशी गाई-बैलांना नदीवर नेऊन आंघोळ घालण्यात येते. घरी आणून बैलांना मस्तपैकी सजवले जाते. त्यांच्या गळ्यात घंटा असलेली नवीन माळ घातली जाते. बैलांच्या शिंगांना रंग देण्यात येतो. तसेच त्यावर धातूची अंगठी आणि कपडे चढविल्या जाते. आणि त्यांच्या कपाळाला तिलक लावून त्यांना हिरवा चारा आणि गूळ खायला घातल्या जातो.

👉 हे सुध्दा वाचा

दिवसाला 30 लिटर दूध देणारी मुऱ्हा म्हैस शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यवसायासाठी वरदान

बैल पोळा बैलाची आंघोळ

शेतकरी मानतो बैलांचे आभार

शेतकरी बांधव आपल्या बैलांना पुरणपोळी देखील खाऊ घालतात. शेतकऱ्याच्या घरातील सर्व सदस्य या प्राण्यांसमोर हात जोडून आपल्या शेतीत मेहनत केल्याबद्दल बैलांचे धन्यवाद म्हणतात.

गावागावात बैलांचा भरतो भव्य पोळा

बैल पोळ्याचा दिवशी सर्व गावकरी मोठ्या संख्येने जमतात. गावातील वेशीच्या आवारातील पटांगणात ढोल-ताशे, लेझीम वाजवत गावोगावी मिरवणूक काढली जाते. घराघरातील ग्रामीण महिला घराबाहेर थांबून मिरवणुकीतून आलेल्या बैलांना तिलक लावून त्यांची पूजा करतात. अनेक शेतकरी त्यांचे बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवसापासून नवीन पिके घेण्यासाठी आपल्या शेतात पुन्हा कामाला लागतात.

विदर्भात साजरा केला जातो तान्हा बैल पोळा

विदर्भातील बऱ्याच भागात बैल पोळा हा सण सलग दोन दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी मोठा बैल पोळा आणि दुसऱ्या दिवशी छोटा बैल पोळा. मोठ्या पोळ्याच्या दिवशी शेतकरी बैलाला सजवून त्याची पूजा केली जाते, तर तान्ह्या बैल पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याची लहान मुले त्यांच्यासाठी आणलेले मातीचे बैल सजवून घरोघरी नेत असतात. त्या बदल्यात या बकगोपालांना लोक पैसे किंवा भेटवस्तू देऊन खुश करत असतात.

बैलांच्या साजाचे साहित्य महागले

बैल पोळ्याच्या सण वर यावर्षी महागाईचे सावट पसरले असून बैलांना सजविण्यासाठी लागणारे रंगीबेरंगी कासरे, बिकनी गोंडे, बाशिंग जोडी, वेसण, गोंडे, झुले, तोडे, घुंगरू, दोर, झुल आदी साजाच्या सामानाची किंमत 30 टक्यांनी वाढल्याने शेतकरी बैल साजाच्या सामान खरेदी करताना हात आखडता घेत आहेत. सध्या शेतीतील उत्पादन निघाले नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळता नाही त्यामुळे यंदाचा पोळा शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात फिकट होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

राज्यात बैलांची संख्या घटली

विदर्भासह संपूर्ण राज्यात एकेकाळी घरोघरी बैल जोडी दिसून यायची. मात्र आता प्रगत कृषी यांत्रिकीकरण मुळे शेतकऱ्यांच्या अंगणासमोर बैलांची संख्या तुरळकच दिसते. एकूण शेतकऱ्यांपैकी गावोगावी मोजक्या शेतकऱ्यांकडे बैल पाहायला मिळतात. त्यामुळे बैल साजाचे साहित्य घेण्यासाठी शेतकऱ्यांची म्हणावी तेवढी गर्दी यंदा दिसून येत नाही. या कारणांमुळे या बाजारात मंदी आल्याचे काही बैल साजाच्या सामानाचे विक्रेते सांगतात.

शेतकरी बांधवांसाठी 2 शब्द

तर शेतकरी मित्रांनो बैल पोळा समाची तुमची तयारी कशी सुरू आहे हे कॉमेंट करून नक्की सांगा. तसेच ह बैल पोळा सण तुमच्या आयुष्यात वैभव आणि भरभराटी घेऊन येईल ही सदिच्छा देऊन तुम्हाला तुमच्या शेतीत भरगच्च उत्पन्न कसे घेता येईल याची माहिती घेण्यासाठी आपण आतुर असाल तर या वेबसाईटवर शेतकऱ्यांना उपयुक्त अशा सगळ्याच शेतीविषयक बातम्या, शेतीच्या योजना अन् यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा यांचे विस्तृत लेख आपल्याला उपलब्ध करून देण्यात येतात. सर्व शेतकऱ्यांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

पोळा 2026 – सविस्तर FAQ

पोळा 2026 कधी आहे?

पोळा 2026 हा महाराष्ट्रातील पारंपरिक सण असून, यावर्षी पोळा 11 सप्टेंबर 2026 रोजी, शुक्रवार साजरा केला जाणार आहे.पोळा सण का साजरा केला जातो?पोळा हा मुख्यतः बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. शेतीच्या कामात वर्षभर शेतकऱ्याला साथ देणाऱ्या बैलांची या दिवशी पूजा करून त्यांचा सन्मान केला जातो.पोळा सणाला बैलांची पूजा कशी केली जाते?पोळ्याच्या दिवशी बैलांना आंघोळ घालून त्यांना सजवले जाते. त्यांच्या शिंगांना रंग लावला जातो, अंगावर झूल किंवा सजावटीचे कपडे घातले जातात. त्यानंतर बैलांची पूजा करून आरती केली जाते आणि नैवेद्य दाखवला जातो.पोळ्याच्या दिवशी बैलांना शेतीच्या कामासाठी वापरले जाते का?सामान्यतः पोळ्याच्या दिवशी बैलांना शेतीच्या कामापासून विश्रांती दिली जाते. हा दिवस त्यांच्या सन्मानाचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो.पोळा 2026 महाराष्ट्रात कोणत्या दिवशी आहे?महाराष्ट्रात पोळा 2026 शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे.पोळ्याला बैलांना कोणते पदार्थ खाऊ घातले जातात?परंपरेनुसार बैलांना पुरणपोळी, गोड पदार्थ, चारा आणि इतर नैवेद्य दिला जातो. मात्र प्राण्यांच्या आरोग्याचा विचार करून त्यांच्या पचनास योग्य आणि सुरक्षित पदार्थच द्यावेत.पोळ्याला बैलांना सजवण्यासाठी काय वापरले जाते?बैलांना रंगीत झूल, गोंडे, माळा, घंटा, कासरे आणि इतर पारंपरिक सजावटीच्या वस्तूंनी सजवले जाते. शिंगांवरही पारंपरिक पद्धतीने रंगकाम केले जाते.पोळा आणि बैलपोळा यात काय फरक आहे?पोळा आणि बैलपोळा हे अनेक ठिकाणी एकाच सणासाठी वापरले जाणारे शब्द आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात या सणाला बैलपोळा असेही म्हटले जाते.पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी काय महत्त्व असते?पोळा हा शेतकरी आणि पशुधन यांच्यातील नाते अधोरेखित करणारा सण आहे. पारंपरिक शेतीमध्ये बैलांचे महत्त्व मोठे असल्याने त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही विशेष परंपरा आहे.पोळ्याच्या दिवशी बैलांची मिरवणूक काढली जाते का?होय. अनेक गावांमध्ये सजवलेल्या बैलांची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली जाते. गावानुसार पोळा साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये काही फरक असू शकतो.पोळ्याला घरी काय तयारी केली जाते?पोळ्याच्या निमित्ताने घराची स्वच्छता केली जाते, रांगोळी काढली जाते, विविध पारंपरिक पदार्थ तयार केले जातात आणि बैलांच्या पूजेसाठी आवश्यक साहित्याची तयारी केली जाते.पोळा 2026 निमित्त बैलांना रंग लावताना कोणती काळजी घ्यावी?बैलांच्या त्वचेला किंवा डोळ्यांना त्रास होणार नाही, असे सुरक्षित रंग वापरावेत. डोळे, नाक आणि तोंडाच्या आसपास रंग लावणे टाळावे. सजावटीच्या वस्तू फार घट्ट बांधू नयेत.पोळा सणाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व काय आहे?पोळा हा केवळ धार्मिक सण नसून महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. शेती, शेतकरी आणि पशुधन यांच्यातील परस्परावलंबित्वाची जाणीव करून देणारा हा सण आहे.पोळा 2026 निमित्त बैलांना विश्रांती का दिली जाते?वर्षभर शेतीची कामे करणाऱ्या बैलांना पोळ्याच्या दिवशी आराम मिळावा आणि त्यांच्या श्रमांचा सन्मान व्हावा, या भावनेतून त्यांना कामापासून विश्रांती देण्याची परंपरा आहे.पोळा सण कोणत्या भागात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो?पोळा महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि कृषिप्रधान भागांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि महाराष्ट्रातील इतर ग्रामीण भागांतही या सणाला विशेष महत्त्व आहे.पोळा 2026 बद्दल थोडक्यात काय लक्षात ठेवावे?पोळा 2026 — 10 सप्टेंबर 2026, शुक्रवार. हा सण शेतकऱ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा दिवस असून, बैलांची पूजा, सजावट, मिरवणूक आणि कृतज्ञता व्यक्त करणे ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा
लेखक : भूषण इंगळे
लेखक : भूषण इंगळे
मुख्य विश्लेषक (सरकारी योजना व कृषी क्षेत्र)
लेखक महाराष्ट्रातील विविध **सरकारी योजना, आधुनिक शेती तंत्रज्ञान, शेतकरी कल्याण, रोजगार आणि फायनान्स** अशा महत्वपूर्ण विषयांचे अभ्यासक व लेखक आहेत. आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी बांधवांपर्यंत अत्यंत अचूक, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती सोप्या भाषेत पोहोचवणे, हेच त्यांच्या "कामाची बातमी" या व्यासपीठाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Leave a Comment