बांधकाम कामगार पेटी योजना बद्दल संपूर्ण माहिती, apply online

बांधकाम कामगार पेटी योजना 2024 : मागील काही काळापासून राज्यात बांधकाम कामगार पेटी योजना बद्दल अर्ज करण्यासाठी आणि या कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांसाठी विविध महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत असतात. त्यामधील एक नावाजलेली योजना म्हणजेच बांधकाम कामगार पेटी योजना आहे. या योजनेअंतर्गत विविध योजनांचे लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे.

चला तर जाणून घेऊया काय आहे बांधकाम कामगार पेटी योजना, काय आहेत या योजनेचे पात्रता निकष, तसेच बांधकाम कामगार म्हणून विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य असलेली नोंदणी प्रक्रिया, नोंदणी प्रक्रियेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि बांधकाम कामगारांसाठी असलेल्या विविध योजना या सर्व बाबींची सविस्तर माहिती आपण या लेखातून पाहणार आहोत.

काय आहे बांधकाम कामगार पेटी योजना?

बांधकाम कामगारांसाठी सरकारने एक मंडळ स्थापन केले आहे. त्या मंडळाचे नाव आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ. या मंडळामार्फत बांधकाम कामगारांना विविध प्रकारच्या योजनांचे लाभ देण्यात येतात. राज्य सरकारने राज्यातील बांधकाम कामगारांसाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या असून त्या योजनांचा लाभ देण्यासाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ प्रयत्नशील आहे.

बांधकाम कामगारांसाठी घरगुती भांडी संच वाटप योजना शासन निर्णय

इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना
संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नविन बांधकाम जेथे सुरु होते तेथे स्थलांतरीत व्हावे लागते. अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास, पाल्यांचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळवुन घ्यावे लागते. त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांनी दिनांक २७.१०.२०२० रोजीच्या बैठकीत राज्यातील मंडळाच्या १० लक्ष नोंदीत सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांना घरगुती भांडी संच वितरण करण्याबाबतचा ठराव पारित करण्यात आला. सदर ठरावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी
मंडळातील नोंदीत लाभार्थी बांधकाम (ज्याची नोंदणी सक्रिय आहे ) कामगारांच्या घरगुती भांडी संच वितरण योजनेस मंजुरी देण्यात आली आहे.

बांधकाम कामगारांसाठी घरगुती भांडी संच वाटप योजना शासन निर्णय

बांधकाम कामगार महिलांसाठी घरगुती भांडी संच वाटप योजनासंबंधी शासन निर्णय

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदीत इमारत
व इतर बांधकाम कामगार लाभार्थी (ज्याची नोंदणी सक्रिय आहे) यांचेसाठी महाराष्ट्र इमारत
व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने गृहपयोगी वस्तू संच वितरण करण्याच्या
योजनेस शासन मंजुरी देण्यात आली आहे.

बांधकाम कामगार घरगुती भांडी संच योजना अटी व शर्ती आणि अर्ज

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार (ज्याची नोंदणी सक्रिय आहे) या योजनेचा लाभार्थी राहील. नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी (ज्याची नोंदणी सक्रिय आहे) यांनी विहीत नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त (जिल्हा कार्यकारी अधिकारी) / सरकारी बांधकाम कामगार मंडळ यांच्याकडे करावा. सदर भांडी संचात एकूण 30 घरगुती भांडी असणार आहेत. ज्या गृहोपयोगी भांड्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.

फुलंब्री येथे बांधकाम कामगार घरगुती भांडी संच वाटप कार्यक्रम संपन्न

फुलंब्री येथे हॉटेल ऑरेंज फ्लॅटमध्ये 3 ऑगस्ट 2024 रोजी 350 बांधकाम कामगारांना घरगुती भांडी संचाचे रावसाहेब दानवे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी श्री.दानवे म्हणाले की, काही प्राथमिक गरजा अशा असतात ज्यांचा संसारामध्ये वापर अनिवार्य असतो. त्यामुळे कामगारांच्या बऱ्याच गरजा आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्यामुळे सरकारच्या आर्थिक पाठबळ शिवाय पूर्ण होत नाहीत. परिणामी यासाठी विविध योजना राबवून सरकारची मदत महत्त्वाची ठरते.

बांधकाम कामगारांसाठी बांधकाम कामगार पेटी योजना सारख्या विविध योजना सरकारद्वारा अमलात आणल्या जातात. आता केंद्र सरकारकडून घरे बांधण्यासाठी बांधकाम तसेच इतर कामगारांना दोन लाख रुपये जाहीर केले आहेत. अशाप्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कामगारांनी नोंदणी करणे आवश्यक असते. तसेच दरवर्षी न चुकता बांधकाम कामगार नूतनीकरण करून घेणे सुद्धा अतिशय आवश्यक असल्याचे मत रावसाहेब दानवे यांनी कार्यक्रमात व्यक्त केले.

फुलंब्री येथे बांधकाम कामगार घरगुती भांडी संच वाटप कार्यक्रम संपन्न

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात कामगारांना सुरक्षाकवच कार्ड, संसार व सुरक्षा किटचे वाटप

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत सुरक्षा किट वाटप कार्यक्रम 2024

नागपूर येथील गोपालनगर परिसरातील नवनिर्माण गृह संकुलाच्या मैदानावर दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित ‘बांधकाम कामगार मेळाव्यात’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात बांधकाम कामगारांना सुरक्षाकवच कार्ड, संसार आणि बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. बांधकाम कामगार मंडळाद्वारे राज्यातील 38 लाखांपेक्षा जास्त कामगारांची नोंदणी करून अशा कामगारांना विविध योजनांच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा देण्यात येत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तसेच नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात केले. यावेळी बांधकाम कामगार मंडळाचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव, माजी महापौर संदीप जोशी, नगरसेविका सोनाली कडू इत्यादी मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली.

काय आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे उद्दिष्ट

बांधकाम कामगारांची आर्थिक परिस्थितीत सुधारावी तसेच या बांधकाम कामगारांच्या कुटुंबांना बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत सुरक्षा किट वाटप यासारखे विविध प्रकारचे लाभ देऊन अशा कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणे हे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे, परिणामी सरकारचे उद्दिष्ट आहे. राज्यात बरेच बांधकाम कामगार आहेत ज्यांना बांधकाम कामगार पेटी योजना मार्फत लाभ देण्यात आलेला आहे. तसेच इतर संबंधित योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आला आहे.

बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत कोणते साहित्य मिळते?

बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत बांधकाम कामगार मंडळामार्फत राज्यभरात पेटी वाटपाचे कार्यक्रम होत असतात. या पेटीत खालील वस्तू समाविष्ट असतात.

बॅग
रिफ्लेक्टर जॅकेट
सेफ्टी हेल्मेट
चार कप्प्याच्या जेवणाचा डबा
सेफ्टी बूट
सोलर टॉर्च
सोलर चार्जर
पाण्याची बॉटल
मच्छरदाणी जाळी
सेफ्टी बूट
हात मोजे
चटई इत्यादी

बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता व अटी

सदर कामगार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे असावा.

18 वर्षे ते 60 वर्षे वयोमान असलेल्या बांधकाम कामगार व
व्यक्तींनाच या योजने अंतर्गत लाभ देण्यात येतो.

बांधकाम कामगाराने मागील वर्षांमध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आणि तशा स्वरूपाचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणे अनिवार्य असते.

सदर बांधकाम कामगाराने बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत लाभासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदणी करणे बंधनकारक आहे.

सदर बांधकाम कामगार व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असले पाहिजे.

या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगार व्यक्तीच्या पहिल्या 2 अपत्यांसाठीच सदर योजना ग्राह्य धरण्यात येते.

बांधकाम कामगार केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू एखाद्या योजनेमार्फत लाभ घेत असलेल्या कामगाराला बांधकाम कामगार योजने अंतर्गत लाभ मिळू शकत नाही.

इतर क्षेत्रातील विविध कामगार व्यक्तींना बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत लाभ मिळत नाही. या योजनेच्या लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्ती बांधकाम कामगार असणे आवश्यक असते.

बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

सदर कामगाराचे आधार कार्ड

अधिवास प्रमाणपत्र

आधार संलग्न मोबाईल क्रमांक

इमेल आयडी

90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवक किंवा तत्सम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र

सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र

पासपोर्ट आकाराचे 2 फोटो

राशन कार्ड

100 रुपयांच्या बाँड वर शपथ पत्र

बांधकाम कामगार पेटी योजना बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रिया

ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत तुम्हाला जर बांधकाम कामगार पेटी योजना आणि इतर बऱ्याच कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून अर्ज करावा लागेल. सदर अर्ज हा ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येतो. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणी अर्ज घेऊन वर दिलेली सर्व आवश्यक कागदपत्रांची प्रत त्याला जोडावी लागते. सोबतच 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर तुम्ही बांधकाम कामगार असल्याचे शपथपत्र द्यावे लागते. तुम्हाला तुम्ही 90 दिवस काम केलेल्या बांधकाम ठेकेदाराकडून त्याबद्दल कामाचा दिनांक वगैरे टाकून घ्यावा लागतो.

तसेच त्या बांधकाम कामगार विषयी संपूर्ण माहिती भरावी लागते. सदर अधिकृत बांधकाम ठेकेदाराचा नोंदणी क्रमांक तुमच्या अर्जावर असणे आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही तुमच्या अर्जावरील फोटोवर त्या अधिकृत बांधकाम ठेकदाराचा शिक्का आणि सही घेणे आवश्यक आहे. एवढं सगळं करून झाल मी तुम्हाला ग्रामसेवक कडून सही घेऊन तुमच्या अर्जावर जावक क्रमांक वगैरे घ्यायचा आहे.

एकदा ग्रामसेवकांनी 90 दिवस काम केल्याचा दाखला दिला की तुम्हाला जिल्हा स्तरावरील बांधकाम कामगार विभागात जाऊन तुमचा अर्ज सादर करावा लागतो. तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला फक्त 1 रुपया नोंदणी फी भरावी लागते. एकदा तुमची बाधकाम कामगार म्हणून यशस्वीरीत्या नोंदणी पूर्ण झाली की बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत बांधकाम कामगार पेटी योजना तसेच अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण पात्र ठरता.

ग्रामसेवक अर्जावर सही देण्याचे टाळत असल्यास

बऱ्याच गावातील लोकांना एक अडचण येत आहे की जेव्हा ते ग्रामसेवकांकडे त्यांच्या बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत 90 दिवस काम केल्याच्या अर्जावर सही घ्यायला जातात तेव्हा सदर ग्रामसेवक आम्हाला अशाप्रकारचा कुठलाच अधिकार नाही अस सांगून अर्जावर सही देण्यास टाळाटाळ करतात. परिणामी बरेच कामगार बांधकाम कामगार पेटी योजना सारख्या विविध योजनांपासून वंचित राहतात. मात्र या अडचणी लक्षात घेऊन शासनाने 22 सप्टेंबर 2017 रोजी एक शासन निर्णय काढून स्थानिक स्वराज्य संस्थांना बांधकाम कामगार अर्जावर सही देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या https://maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेताक 201709221429231720 असा आहे. या शासन निर्णयाची डाऊनलोड लिंक खाली दिलेली आहे. तुम्ही तो डाऊनलोड करू शकता. जर तुमच्या गावातील ग्रामसेवक तुमच्या बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत लाभासाठी 90 दिवस काम केल्याच्या अर्जावर सही देत नसतील तर शासन निर्णय त्यांना दाखवत येईल. याउपर जर संबंधित ग्रामसेवक अधिकारी सही देत नसतील तर त्यांची वरिष्ठांकडे तक्रार सुद्धा केल्या जाऊ शकते.

घरेलु कामगार महिलांना मिळत आहे 10 हजाराचा घरगुती भांडी संच, असा करा अर्ज

बांधकाम कामगार पेटी योजना लाभासाठी बांधकाम कामगार म्हणून नोंदणीसाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया

बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत लाभासाठी तुम्हाला बांधकाम कामगार म्हणून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असल्यास त्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे. त्या अधिकृत वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे. सदर लिंक वर क्लिक केल्यावर तुम्ही बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर याल.

अर्जदाराची वैयक्तीक माहिती

या संकेतस्थळावर आल्यावर सर्वप्रथम तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल आधार क्रमांक टाकला की तुमच्या आधार सोबत संलग्न असलेल्या मोबाइल नंबरवर एक OTP प्राप्त होईल. हा OTP टाकल्यानंतर तुमच्यासमोर बांधकाम कामगार नोंदणी अर्ज ओपन होईल. या अर्जात सर्वात आधी तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे. ज्यामध्ये त्यांचे संपूर्ण नाव, शिक्षण, वय, राष्ट्रीयत्व, जन्म तारीख, लिंग, गाव, तालुका, जिल्हा इत्यादी माहिती अचूकपणे भरायची आहे.

अधिकृत बांधकाम ठेकेदाराची माहिती

त्यानंतर तुम्हाला तुम्ही ज्या ठेकेदाराकडे बांधकाम केले आहे त्या ठेकेदाराची संपूर्ण माहिती भरायची आहे. यामध्ये ठेकेदाराचे संपूर्ण नाव, त्यांचा नोंदणी क्रमांक, काम सुरू केल्याचा दिनांक, काम केल्याचा शेवटचा दिनांक, काम केल्याचे ठिकाण इत्यादी माहिती व्यवस्थीत भरावी लागेल.

वारसदार बद्दल माहिती

तुम्हाला तुमच्या नंतर कोण वारसदार लावायचे आहेत त्यांचे नाव आणि त्यांचे तुमच्याशी असलेले नाते याबद्दल सविस्तर माहिती भरायची आहे.

बँक खात्याचा तपशील

अर्जदाराला त्यांचा बँक खात्याचा तपशील सदर ऑनलाईन अर्जात भरावा लागेल. यामध्ये बँकेचे नाव बँकेचे ठिकाण, अकाउंट नंबर, आयएफआयएससी कोड इत्यादी माहिती भरायची असणार आहे.

कुटुंबातील सदस्यांची माहिती

त्यानंतर तुमच्यासमोर एक तक्ता येईल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती भरावी लागेल. यामध्ये कुटुंबातील व्यक्तीचे नाव, त्यांचे अर्जदाराशी असलेले नाते, सदस्याचे वय, व्यवसाय, आधार क्रमांक इत्यादी माहिती न चुकता भरायची आहे. एका सदस्याची माहिती पूर्णपणे भरून झाल्यावर तुम्हाला त्याखाली दिलेल्या add new member म्हणजेच नवीन सदस्य जोडा या पर्यायावर क्लिक करा आणि क्रमाक्रमाने तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती भरता येईल.

कागदपत्रे अपलोड प्रक्रिया

बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत लाभासाठी बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईन अर्जाच्या शेवटी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत. ज्यामध्ये तुमचे आधार कार्ड, तुम्ही 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र आणि तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो हे कागदपत्रे अपलोड करायची आहेत. ही कागदपत्रे JPEG किंवा pdf स्वरूपात असावी. तसेच या कागदपत्रांचा आकार हा 2 mb पेक्षा कमी असला पाहिजे.

बांधकाम कामगार नोंदणी अर्जासोबत अपलोड करावयाची कागदपत्रे

अर्जात दिलेली संपुर्ण माहिती अचूकपणे सादर केल्यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे कागदपत्रे अपलोड करणे. यामध्ये तुम्हाला तूमचे आधार कार्ड, तुमचा पासपोर्ट फोटो आणि 90 दिवस काम केल्याचा ग्रामसेवक किंवा तत्सम अधिकाऱ्यांनी दिलेला दाखला. हा दाखला कसा मिळवायचा याची सविस्तर माहिती आपण वर वाचलीच असेल. ही सर्व कागदपत्रे JPEG किंवा PDF स्वरूपात अपलोड करायची आहेत.

तुम्ही वेबसाईटवर मागितलेली सर्व कागदपत्रे यशस्वीरीत्या अपलोड केली की सर्वात शेवटी तुम्हाला व्हेरिफिकेशन कोड म्हणजेच captcha भरुन सबमिट फॉर्म म्हणजेच अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल. म्हणजे तुमचा अर्ज यशस्वीरीत्या सादर केला जाईल. तुमचा अर्ज सादर केला गेला अस सदर वेबसाइटवर एक पॉप अप येईल. याशिवाय तुमच्या मोबाइल नंबर आणि इमेल आयडीवर सुद्धा तुम्हाला अर्ज यशस्वीरीत्या सादर केल्याचा संदेश प्राप्त होईल.

बांधकाम कामगार नोंदणी अर्ज मंजुरी आणि शुल्क भरणा

एकदा तुम्ही बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत लाभासाठी बांधकाम कामगार नोंदणी अर्ज सादर केला की त्या अर्जाची संबंधित अधिकाऱ्यांकडून छाननी आणि पडताळणी केल्या जाईल. जर तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुमच्या मोबाइल क्रमांकावर तशा प्रकारचा संदेश प्राप्त होईल. या साडेसात तुमचा अर्ज मंजूर झाला असल्याची माहिती देण्यात येईल. तसेच बांधकाम कामगार नोंदणी फी भरण्यासाठी तुम्हाला एक लिंक देण्यात येईल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वर येऊन एक रुपया फी ऑनलाईन पद्धतीने भरावी लागेल. आता बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत सुरक्षा किट वाटप यासारख्या असंख्य कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यायला आपण कायदेशीररीत्या पात्र ठराल.

बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी अधिकृत वेबसाईट

https://mahabocw.in/

सदर वेबसाईट वर जाऊन आपण बांधकाम कामगार नोंदणी करू शकता. तसेच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती प्राप्त करू शकता.

खालील उताऱ्यांत बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी असलेल्या बांधकाम कामगार पेटी योजना प्रमाणेच विविध शासकिय योजनांची यादी देत आहोत. या सर्व योजनांबद्दल सविस्तर माहिती तसेच अर्ज डाऊनलोड करण्याची लिंक तुम्हाला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत सुरक्षा प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत सुरक्षा प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न

बांधकाम तसेच अन्य कामगारांच्या वेतनात केंद्र सरकार कडून घसघशीत वाढ

देशातील असंख्य असंगठीत कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या वतीने कामगारांच्या किमान वेतन दरांमध्ये सरकारनं वाढ करण्यात आली आहे. विशेषत: असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अन् आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने परिवर्तनीय महागाई भत्ता (VDA) मध्ये सुधारणा करून किमान वेतन दरांमध्ये घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणत्या कामगारांचे वाढले किमान वेतन?

इमारत बांधकाम कामगार, हमाल, चौकीदार किंवा पहारेकरी, केर काढणे, साफसफाई, घरकाम, खाणकाम आणि शेतमजूर तसेच अनेक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या असंगठीत कामगारांना सुधारित वेतन दरांचा लाभ देण्यात येणार आहे. हे नवीन वेतन दर 1 ऑक्टोबर 2024 पासून संपूर्ण देशात लागू होणार आहेत. वेतनदरांमध्ये शेवटची सुधारणा एप्रिल 2024 मध्ये करण्यात आली होती. किमान वेतन दरांचे कौशल्य स्तरांच्या आधारे वर्गीकरण केले जाते. यामध्ये अकुशल, अर्ध-कुशल, कुशल आणि सर्वाधिक कुशल-तसेच भौगोलिक क्षेत्रानुसार-ए, बी आणि सी असे वर्गीकरण करण्यात येतं.

कामगार श्रेणी नुसार झालेली सुधारित पगारवाढ

शासन निर्णयाप्रमाणे अकुशल कामासाठी उदा. बांधकाम कामगार, झाडूकाम, साफसफाई, हमाली या क्षेत्रातील कामगारांसाठी अ श्रेणीत किमान वेतन दर 783 रुपये प्रतिदिन (मासिक वेतन 20358 रुपये) अर्ध-कुशल कामगारांना प्रत्येक दिवशी 868 रुपये (महिन्याला 22568 रुपये) इतकं असेल.

कुशल आणि अर्ध कुशल कामगारांना नवीन निर्णयानुसार मिळणारे किमान वेतन याप्रमाणे

या निर्णयानुसार कुशल, कारकुनी आणि विना शस्त्र चौकीदार किंवा पहारेकरीसाठी दिवसाला 954 रुपये (महिन्याला 24804 रुपये) तसेच कुशल आणि शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्या चौकीदार किंवा पहारेकऱ्यासाठी 1035 रुपये प्रतिदिन (26910 रुपये) इतका पगार मिळणार आहे. याशिवाय औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांकातील सहा महिन्यांच्या सरासरी वाढीच्या आधारे केंद्र सरकार वर्षातून दोनदा 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबरपासून प्रभावीपणे परिवर्तनीय महागाई भत्ता वाढीत सुधारणा करते. केंद्र सरकारच्या मुख्य कामगार आयुक्त (केंद्रीय) यांच्या संकेतस्थळावर (https://clc.gov.in) कार्य , श्रेणी आणि क्षेत्रानुसार किमान वेतन दरांबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे.

सामाजिक सुरक्षा योजनांची यादी

  • कामगाराच्या विवाहाच्या खर्चासाठी 30,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य
  • बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी 51 हजाराचे अर्थसहाय्य
  • बांधकाम कामगार योजना अंतर्गत मध्यान्ह भोजन योजना
  • प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
  • प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना
  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
  • अटल पेन्शन योजना लाभ
  • कामगारांच्या पाल्यांना पाळणाघर सुविधा
  • कौशल्यवृद्धी योजना लाभ
  • बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ
  • नोंदीत बांधकाम कामगारांकरिता ट्रांझिट कॅम्प ची सुविधा
  • प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) योजना
  • घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना
  • कामगार व कामगार कुटुंबियांची लांब पल्ल्याची सहल
  • बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड

ई श्रम कार्ड मध्ये आले 3 हजार रुपये, घरबसल्या करा चेक, जाणून घ्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया

बांधकाम कामगार कुटुंबांसाठी असलेल्या बांधकाम कामगार पेटी योजना सारख्या इतर शैक्षणिक योजनांची यादी

  • परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती
  • क्रीडा शिष्यवृत्ती योजना
  • साहित्य प्रकाशन अनुदान योजना
  • इयत्ता पहीली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 2500 रुपयांचे आर्थिक सहाय्य
  • इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य
  • इयत्ता दहावी व इयत्ता बारावी मध्ये किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य
  • इयत्ता ॥ वी व इयत्ता 12 वीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी 10,000 रुपयाचे आर्थिक सहाय्य
  • कामगाराच्या मुलांना व पत्नीस पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 20,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य
  • कामगाराच्या मुलांना व पत्नीस वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी । लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य
  • वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिवर्षी 60,000 रुपये आर्थिक सहाय्य
  • शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 20,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य
  • शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 25,000 रुपयाचे आर्थिक सहाय्य
  • बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास MS-CIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती
  • बांधकाम कामगाराच्या आय आय टी वा तत्सम शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
  • कामगारांच्या पाल्यांना इंग्रजीच्या ट्युशन फीसाठी आर्थिक सहाय्य
  • बांधकाम कामगाराच्या पाल्यास पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी तसेच परदेशात उच्च शिक्षण घेण्याकरिता शिष्यवृत्ती
  • सर्वसाधारण शिष्यवृत्ती
  • कामगाराच्या पाल्यांना शिक्षणासाठी टॅबलेट व लॅपटॉप चे वितरण
  • बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक उपयोगाची पुस्तके भेट

बांधकाम कामगारांसाठी असलेल्या विविध आर्थिक योजनांची यादी

  • बांधकाम कामगार योजना
  • आत्महत्याग्रस्त कामगाराच्या कुटुंबाला शासकीय निधी स्वरूपात 5 हजार रुपये
  • कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 5 लाखाची आर्थिक मदत
  • शिवण मशीन अनुदान योजना
  • बांधकाम कामगार पेटी योजना
  • कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या कायदेशीर वारसाला 2 लाखाची आर्थिक मदत
  • नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास अर्थसहाय्याचा लाभ
  • अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) अंतर्गत 2 लाखाचे अर्थसहाय्य
  • अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत 2 लाखाचे अर्थसहाय्य
  • 50 ते 60 वयोगटातील कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता 10 हजारांचे सहाय्य
  • कामगाराचा मृत्यू झाल्यास विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस 5 वर्षासाठी 24 हजाराचे आर्थिक सहाय्य
  • नोंदीत बांधकाम कामगारांना घर खरेदी किंवा घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य
  • बांधकाम कामगारांना बोनस सुविधा
  • बांधकाम कामगारांना सायकल वाटप
  • साहित्य खरेदीसाठी आर्थिक सहाय्य
  • बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत सुरक्षा संच (सेफ्टी किट) चा लाभ
  • बांधकाम कामगारांना वस्तू संच (Essential Kit) चा लाभ
  • बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरण
  • कामगार व त्यांच्या कुटुंबियांना स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण योजना
  • अटल बांधकाम कामगार आवास योजना
  • वाहन चालक प्रशिक्षण योजना

सरकारकडून 10 हजार बांधकाम कामगारांना इस्रायल देशात प्रशिक्षण आणि रोजगाराची सुवर्णसंधी

राज्य सरकारच्या कौशल्य विभाग भागाकडून बांधकाम कामगारांना इस्त्रायल देशात पाठवण्यात बाबत निर्णय घेण्यात येणार आहे. इस्त्रायल देशात सुरू असलेल्या युद्धामुळे आलेली अस्थिरता तसेच उद्योग क्षेत्रात झालेली हानी भरून काढण्यासाठी इस्राईल मध्ये चांगल्या बांधकाम क्षेत्रातील कामगारांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. परिणामी राज्य सरकारच्या कौशल्य विभागाकडून पुढाकार घेण्यात येऊन आता कामगारांना इस्त्रायल देशात पाठवण्यात येणार आहे. इस्रायल जाण्यास इच्छुक कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी कौशल विभागाकडून अर्ज देखील मागवण्यात आलेले आहे.

आता महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना इस्राईलमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार असून तेथे नोकरी सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी जे बांधकाम कामगार इस्रायल देशात रोजगारासाठी जाऊ इच्छित असतील त्यांनी आपापल्या जिल्हा कौशल्य आरोग्य उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात संपर्क साधावा असे देखील सांगण्यात आलेले आहे. यासाठी बांधकाम कामगारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

बांधकाम कामगारांसाठी इस्रायल देशात रोजगारासाठी जाण्याच्या अटी आणि शर्ती

1) अर्जदार हा कुशल आणि अनुभवी बांधकाम कामगार असावा.

2) उमेदवार हा दहावी परीक्षा दिलेली असणे आवश्यक आहे. अर्जदार पास किंवा नापास असला तरी चालेल.

3) अर्जदार बांधकाम कामगाराच25 ते 45 वर्षे वयोगटाचा असावा.

4) बांधकाम कामगाराने इस्रायल देशात रोजगारासाठी जाण्यास महाराष्ट्रात अर्ज करून प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.

5) अर्जदाराने बांधकाम कामगार नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.

6) सदर अर्जदाराकडे पासपोर्ट आणि व्हिसा काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे असणे अनिवार्य आहे.

बांधकाम कामगारांनी दलालांमर्फत फसवणूक टाळावी – कामगार उपआयुक्त अभय गीते, पुणे

सध्या राज्यात अनेक दलाल बांधकाम कामगार नोंदणी तसेच या अन्तर्गत विविध योजनांचे लाभ मिळवून देण्याचा नावाखाली गरीब बांधकाम कामगारांची आर्थिक लूट करण्यास सक्रिय झालेले आहेत. यासाठी राज्यात अनेक ठिकाणी हजर ते दीड हजार रुपये मागितल्या जातात. अशा दलालांची तक्रार करण्याचे आवाहन कामगार उप आयुक्त अभय गीते यांनी केले आहे. जीवित नोंदणीकृत बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ वितरीत करण्यात येतो. बांधकाम कामगारांनी योजनेच्या लाभाच्या अनुषंगाने कोणत्याही मध्यस्थ, दलाल किंवा अन्य कोणत्याही मध्यस्थ व्यक्तिसोबत आर्थिक व्यवहार करू नये.

बांधकाम कामगार भांडी संच वाटप योजना पुर्णपणे मोफत

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या मार्फत बांधकाम कामगारांसाठी घरगुती भांडी संच वितरण योजना’ सुरू करण्यात आली असून ही योजना मोफत आहे. या योजनेसाठी तुम्हाला कुठलीही फी भरावी लागत नाही. तरी जर तुम्हाला कोणी दलाल अथवा तटस्थ व्यक्ती बांधकाम कामगार पेटी योजना तसेच भांडी संचाचा लाभ देण्याचा मोबदल्यात पैशांची मागणी करत असेल अशा व्यक्तीची तक्रार द्यावी. अशा सर्व दलालांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

बांधकाम कामगार नोंदणीसाठी लागते फक्त 1 रू. फी

बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण यासाठी केवळ 1 रुपये नाममात्र शुल्क आकारण्यात येतो. बांधकाम कामगारांचे नोंदणी ओळखपत्र मंडळाच्या कार्यालयातूनच वाटप केल्या जाते. घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत कामगारांची नोंदणी शुल्क १ रुपये तसेच अंशदान शुल्क दरमहा १ रुपये याप्रमाणे वार्षिक १२ रुपये आहे, अशी महत्वपूर्ण माहिती कामगार उप आयुक्त अभय गिते यांच्याकडून देण्यात आली आहे.

राज्यात विविध ठिकाणी बांधकाम कामगार भांडी संच वितरण संपन्न

जळगाव येथे आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते बांधकाम कामगार घरगुती भांडी संच वाटप कार्यक्रम संपन्न

दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी जळगाव येथील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगार महिला आणि पुरुषांसाठी मोफत घरगुती भांडी संच योजना अंतर्गत गृहोपयोगी साहित्य संच (भांडे) वाटप कार्यक्रम आ. सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत नूतन मराठा विद्यालय सभागृह येथे पार पडला. मेहनती कामगार वर्गाला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी सरकार कटीबद्ध असून कामगारांचे देशाच्या विकासातील योगदान वाखाणण्याजोगे आहे, असे प्रतिपादन आ. सुरेश भोळे यांनी बांधकाम कामगार मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.

जळगाव येथे आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते बांधकाम कामगार घरगुती भांडी संच वाटप कार्यक्रम संपन्न

कागल तालुक्यातील उत्तूर या ठिकाणी राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते भांडी वाटप कार्यक्रम संपन्न

दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात येणाऱ्या उत्तूर गावात बांधकाम कामगार बांधवांना राजे समरजितसिंह घाटगे यांच्या शुभ हस्ते बांधकाम कामगार भांडी वाटप योजना अंतर्गत गृहोपयोगी साहित्याचे वाटप आणि संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी भगिनींना मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना घाटगे साहेब म्हणाले की, लाभार्थी भगिनी आणि बांधकाम कामगार बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला समाधान देणारा आणि काम करण्याची उर्मी द्विगुणित करणारा होता. गडहिंग्लज, कागल आणि उत्तूर हे माझे कुटुंबच असून मी या ठिकाणी मतदान नव्हे तर आशीर्वाद मागायला आलो आहे आणि भविष्यातही येईन.” अशाप्रकारचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. गृहोपयोगी भांडी संच मिळाल्याने गावातील महिलांचा आनंद द्विगुणित झाल्याचे दिसून आले.

कागल तालुक्यातील उत्तूर या ठिकाणी समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते भांडी वाटप कार्यक्रम संपन्न

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भांडी वाटप कार्यक्रम संपन्न

श्रीगणेश चतुर्थीच्या मंगल पर्वाचे औचित्य साधून चित्तेपिंपळगाव ता. छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भांडी वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थितांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.

चित्तेपिंपळगाव ता. छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भांडी वाटप

दिनांक 8 सप्टेंबर रोजी पुण्यातील खराडी गावात माता रमाई ग्रुप अँड फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या नोंदीत बांधकाम मजुरांना मोफत भांडी वाटप कार्यक्रम संपन्न

दिनांक 8 सप्टेंबर रोजी पुण्यातील खराडी गावात माता रमाई ग्रुप अँड फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या नोंदीत बांधकाम मजुरांना मोफत भांडी वाटप कार्यक्रम संपन्न

सांगलीत आ. सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते भांडी संच वाटप संपन्न

दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना त्यांच्या शुभ हस्ते बांधकाम कामगार घरगुती भांडी योजना अंतर्गत गृहोपयोगी साहित्य संचाचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार साहेबांनी कामगारांशी त्यांच्याशी संवाद साधत सदिच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी बांधकाम कामगारांनी या बाबत आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.

सांगलीत आ. सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते भांडी संच वाटप संपन्न

बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या लाभार्थ्यांना रविवार 15 सप्टेंबर रोजी रिसोड येथे भावनाताई गवळी यांच्या शुभ हस्ते गृहोपयोगी भांडी किट वाटप करण्यात आली.

बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या लाभार्थ्यांना रविवार 15 सप्टेंबर रोजी रिसोड येथे  भावनाताई गवळी यांच्या शुभ हस्ते गृहोपयोगी भांडी किट वाटप करण्यात आली.

इमारत बांधकाम कामगारांच्या विविध मागण्या

1) महाराष्ट्र कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने महिला कामगारांना पाच हजार रुपये महिना कामगार कल्याणकारी मंडळाकडून मिळावा.

2) नोंदीत कामगारांना दिवाळीसाठी 5 हजार रुपये बोनस म्हणून दिले जायचे. परंतु तीन ते चार वर्षांपासून हा बोनस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी 10 हजार रुपये बोनस देण्यात यावा.

3) कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत तालुकास्तरावर उभारण्यात आलेल्या बीओसी सेंटरवर शासकीय अधिकारी नियुक्त करण्यात यावा.

4) बीओसी सेंटरवर ई निविदा न काढता कर्मचारी भरती केलेली आहे. सदर भरतीमध्ये एससी, एसटी, ओबीसी व अल्पसंख्यांकांचा विचार करुन त्यांचा समावेश करण्यात यावा.

5) पात्र नोंदणीकृत बांधकाम कामगारांना लवकरात लवकर बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत सुरक्षा किट तसेच घरगुती भांडी संच वाटप करण्यात यावे.

बांधकाम कामगारांचा अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

वरील विविध मागण्यांची पूर्तता व्हावी या उद्देशाने बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर ढोल व थाळी बजाव आंदोलन करुन महिला कामगारांचा आक्रोश मोर्चा धडकणार आहे. बांधकाम कामगारांच्या प्रश्‍नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही बांधकाम कामगार व इतर कामगार संघटनेच्या वतीने आंदोलन केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत असंख्य कामगारांना आतापर्यंत लाभ देण्यात आला आहे. तसेच राज्य सरकारकडून बांधकाम कामगारांना विवीध सुविधा युद्धपातळीवर उपलब्ध करून देण्यास सरकार प्रयत्नशील आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना ओळखपत्रांचे वाटप

नागपूर येथे 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना ओळखपत्र वितरीत करण्यात आले. बांधकाम कामगारांना विविध योजनांद्वारे आरोग्य, शिक्षण, घरकुल इत्यादी लाभ देण्यास सरकार युद्धपातळीवर प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बांधकाम कामगारांच्या मेळाव्यात केले. त्यांच्या हस्ते कामगारांना ओळखपत्र, संसार व सुरक्षा किटचे वितरण करण्यात आले.

बांधकाम कामगारांना निवृत्ती पेन्शन देण्याचा प्रस्ताव शासनास सादर होणार

महाराष्ट्र भरातील नोंदीत बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत दिनांक ३ ऑक्टोंबर २०२४ रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय मजदूर संघाशी सलग्न असलेल्या बांधकाम कामगार महासंघाच्या पदाधिकाऱ्यां सोबत मुंबई येथे दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी मंडळ कार्यालयात बैठक पार पडली.

सामाजिक सुरक्षितता देण्याच्या दृष्टीने ६० वर्षांनंतर दर महीना रुपये ३ हजार पेन्शन देण्यात यावी. अशी मागणी भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यानी केली असून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांनी पेन्शन देण्याबाबतचा सकारात्मक प्रस्ताव शासनास सादर करण्यात येईल, असा महत्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबत माहिती बांधकाम कामगार महासंघ प्रदेश अध्यक्ष हरी चव्हाण यांनी दिली.

बांधकाम कामगारांना मिळणार आणखी काही सुविधा

दलालांकडून होणारी बांधकाम कामगारांची पिळवणूक थांबविण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्जाद्वारे तारीख देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ऑनलाईन केलेले लाभ अर्ज जे प्रलंबित आहेत त्यांना तातडीने मंजुरी देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. बांधकाम कामगारांना घरकुल योजनेखाली अर्ज करण्याची पद्धतही सोपी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती हरी चव्हाण यांनी दिली. महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांनी भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या बांधकाम कामगार महासंघाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून न्याय मिळवून घेण्याचे आवाहन हरी चव्हाण यांनी केले आहे.

वाडीत भांडी संच वाटप कार्यक्रम 10 ते 10 ऑक्टोबर पर्यंत वितरीत होणार

वाडी येथील न्यु मंगलधाम सोसायटी मधील सार्वजनिक शिवमंदीराच्या बाजुला असलेल्या मैदानात महाराष्ट्र शासनातर्फे असंघटीत बांधकाम कामगारांना घरगुती भांडी संच वाटपाचा शुभारंभ सोमवार 7 ऑक्टोबर रोजी आमदार समीर मेघे यांच्या हस्ते करण्यात आला असून भांडी संच मिळविण्यासाठी महिलांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. टप्याटप्याने सर्वच पात्र पुरुष आणि महिलांना बांधकाम कामगार भांडी संच वाटप योजना अंतर्गत लाभ मिळणार असून हे शिबीर सोमवार 7 ऑक्टोबर ते गुरुवार 10 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच एकूण 4 दिवस भांडी संच वितरण सुरू राहणार आहे.

वाडीत भांडी संच वाटप कार्यक्रम 10 ते 10 ऑक्टोबर पर्यंत वितरीत होणार

चंद्रपूर जिल्ह्यात भांडी संच वाटप कार्यक्रम संपन्न

चंद्रपूर जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी मोफत गृहपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येत असून आतापर्यंत 4 हजार कामगारांची नोंदणी करण्यात आली असून घरगुती भांडी संच वाटप करण्यात येत आहे. कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून कामगारांच्या जीवनमानात अमुलाग्र बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment