मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना २०२४
वयाची साठी ओलांडली की माणसे अगदीच हळवी होऊन जातात. त्यांचे विचारविश्र्वच जणू बदलते. संसाराची गाडी ओढून ओढून कुणी थकून गेलेलं असतं. पण आता मुले हाताशी आलेले असतात आणि जवळपास सर्व जबाबदाऱ्या पार पाडून झालेल्या असतात. अशा या वयाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक म्हणून सवलती सुद्धा शासनाकडून मिळालेल्या असतात. जीवनाचा पूर्वार्ध त्यांनी कष्टाने जगून जबाबदारीतून मुक्त झालेले असतात. अशा वयात बऱ्याच लोकांना ओढ लागते ती देवाच्या भक्तीची.
देवाच्या भक्तीत लीन होऊन जाण्यात त्यांना काही वेगळीच मजा वाटत असते. बरेच आर्थिक दृष्ट्या सबळ असलेले लोक वयाची साठी ओलांडल्या नंतर त्या त्या धर्मातील पवित्र प्रसिद्ध धार्मिक स्थळी जाऊन येत असतात. पण काही लोकांच्या अशा तीर्थक्षेत्र दर्शनाची इच्छा आर्थिक समस्येमुळे पूर्ण होण्याची त्यांना कुठलीच आशा दिसत नाही. या वयात घरी पैसे मागणे त्यांना जमत नाही. एकतर मुलांवर घर सांभाळण्याची जबाबदारी असते, त्यात त्यांना आपल्या मुलावर अधिकच आर्थिक ओझं टाकायची हिम्मतच होत नाही. मन मारून देवदर्शन करण्यासाठी तीर्थक्षेत्र यात्रा करण्याचा बेत लांबणीवर टाकला लागतो.
अर्ज करण्यास मिळाली मुदतवाढ
मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना अंतर्गत 65 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना तीर्थ दर्शनासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे. या योजनेसाठी मागील काही महिन्यांपासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली होती. मात्र आता सरकारने पुन्हा एकदा या योजनेचा ऑफलाइन अर्ज करण्यासाठी 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. समाज कल्याण विभागाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना अंतर्गत लाभासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करून सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले जात आहे.
तीर्थक्षेत्र दर्शन योजना अंतर्गत पहिली रेल्वे कोल्हापुरातून
मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन या योजनेंतर्गत राज्यातील पहिली रेल्वे दिनांक. 28 सप्टेंबर 2024 रोजी 800 लाभार्थ्यांना घेऊन अयोध्येला रवाना होणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातून या योजनेसाठी साठ वर्षांवरील नागरिकांचे एकूण 2,146 अर्ज विभागाला प्राप्त झाले होते. एकूण अर्जांपैकी 1 हजार 983 अर्ज पात्र ठरले. जिल्ह्याला लोकसंख्येच्या तुलनेत 1 हजार लाभार्थ्यांची मर्यादा असल्याने आणि रेल्वेतून एकावेळी फक्त 800 लाभार्थ्यांना घेऊन जाता येत असल्यामुळे लॉटरी ड्रॉ पद्धतीने अंतिम लाभार्थी यादी काढण्यात आली.
असा असेल तीर्थक्षेत्र दर्शन योजना यात्रेचा कार्यक्रम
शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी कोल्हापूर स्थानकावरून ही विशेष ट्रेन पात्र लाभार्थ्यांना घेऊन अयोध्या धामला रवाना होणार आहे.ती रेल्वे दिनंक 30 सप्टेंबर रोजी अयोध्येत पोहोचेल. दर्शनानंतर दिनांक 1 ऑक्टोबर रोजी ही ट्रेन परतीच्या प्रवासाला निघून दि. 3 रोजी कोल्हापुर येथे पोहोचेल. यादरम्यान प्रवास काळातील निवास आणि भोजनाची व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना उद्दिष्ट
अशाच वयोवृध्द व्यक्तींसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना सुरू केली आहे. विविध धर्माच्या वयोवृध्द लोकांची तीर्थक्षेत्र जाऊन आपल्या इष्ट देवतेच दर्शन घेण्याची त्यांनी मनोमन असलेली इच्छा पूर्ण करता यावी, या हेतूने मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना स्वरूप
सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहील. तीर्थस्थळांची यादी लेखाच्या खाली दिली आहे त्या प्रमाणे असेल. सदर यादीमधील स्थळे कमी होऊ शकतात अथवा स्थळांमध्ये वाढ होऊ शकते. सदर योजनेंतर्गत निर्धारित तीर्थ स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती रु. ३०,०००/- इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इ. सर्व बाबींचा समावेश असेल.
मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना लाभासाठी लाभार्थ्यांची पात्रता काय आहे?
१) लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
२) लाभार्थ्यांचे वय ६० वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असावे.
३) लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये पेक्षा कमी असावे.
“मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना” च्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे
१) मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज
२) लाभार्थ्यांचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड
३) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्रातील जन्माचा दाखला/15 वर्ष आधीचे मतदान कार्ड/शाळा सोडल्याचा दाखला/रेशन कार्ड
४) तहसीलदार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला किंवा पिके किंवा केशरी रेशन कार्ड
५) वैद्यकीय प्रमाणपत्र
६) पासपोर्ट आकाराचा फोटो
७) जवळच्या नातेवाईकाचा भ्रमणध्वनी क्रमांक
८) सदर योजनेच्या अती शर्तिंचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
👉 हे सुध्दा वाचा
वयोश्री योजना काय आहे? काय लाभ मिळतो? संपूर्ण माहिती
मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना अंतर्गत लाभार्थ्यांची निवड कशी होणार?
प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे
पुढील प्रक्रियेनुसार केली जाईल.
१. प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल, ज्यामध्ये
अर्जदारांच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला
जाईल. विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरीद्वारे लॉट्सचे संगणकीकृत
ड्रॉ) प्रवाशांची निवड केली जाईल. कोट्यातील १०० टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रतिक्षा यादी देखील
तयार केली जाईल.
२. निवडलेला प्रवासी प्रवासाला न गेल्यास, प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तीला प्रवासास
पाठवता येईल.
३. निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि
समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमांद्वारे प्रसारित केली जाईल.
४.फक्त निवडलेली व्यक्ती तीर्थयात्रेला जाऊ शकेल. तो / ती त्याच्यासोबत इतर कोणत्याही व्यक्तीला घेऊन जाऊ शकणार नाही.
५. जर पती-पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरीत निवड झाली असेल आणि
दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीत निवड झाली नसेल, तर आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय, पुणे
त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील.
मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना अंतर्गत प्रवास प्रक्रिया कशी असेल?
१. जिल्हास्तरीय समितीने निवडलेल्या प्रवाशांची यादी आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांचेकडे
सुपूर्द केली जाईल.
२. निवडलेल्या प्रवाशांची यादी प्रवासासाठी अधिकृत टुरिस्ट कंपनी / एजन्सीला देण्यात येईल.
३. नियुक्त अधिकृत टुरिस्ट कंपनी / एजन्सी टूरवरील प्रवाशांच्या गटाच्या प्रस्थानाची व्यवस्था
करेल,
४. प्रवाशांच्या प्रवासासाठी आवश्यक त्या सुविधा आणि कोणत्या सुविधा देण्यात याव्यात याचा
निर्णय राज्य शासन घेईल.
५. सर्व यात्रेकरूंना प्रवासासाठी नियोजित स्थळी त्यांच्या स्वखर्चाने पोहोचावे लागेल.
(अ) रेल्वे / बसने प्रवास :-
१. जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे प्रवाशांची सुरक्षा आणि आरोग्याशी
संबंधित व्यवस्था सुनिश्चित केली जाईल.
२. प्रवास सुरू झाल्यावर, प्रवासी प्रवासाच्या मध्यभागी असल्यास त्याला प्रवास सोडायचा असेल
तर त्याला सरकारकडून तशी सुविधा दिली जाणार नाही आणि विशेष परिस्थितीत, प्रवास मध्यमार्गी सोडणे आवश्यक असल्यास, उपस्थित मार्गदर्शकाच्या परवानगीने स्वखर्चाने ते करण्याची परवानगी दिली जाईल.
प्रवाशांचा गट कशा स्वरूपाचा असेल?
मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना अंतर्गत प्रवास केवळ एकत्रितपणे आयोजित केला जाईल. सदर गट राज्य शासन किंवा शासनाने
अधिकत केलेल्या प्राधिकरण / एजन्सीद्वारे निश्चित केले जातील शासनाने विहित केलेली किमान प्रवाशी संख्या उपलब्ध झाल्यावरच प्रवासाला सुरुवात होईल.
(४)मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना अंतर्गत अर्ज करणाऱ्या व्यक्तीने ऊपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून त्यांचा थेट
फोटो काढता येईल आणि KYC करता येईल. यासाठी अर्जदाराने खालील माहिती आणणे
आवश्यक आहे.
१. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र ( रेशनकार्ड)
२. स्वतःचे आधार कार्ड
मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना लाभासाठी मूळ अर्जदारासह जीवनसाथी / सहाय्यकाच्या प्रवासासंबंधीच्या तरतुदी :-
१. ७५ वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकापैकी एकाला त्याच्यासोबत
नेण्याची परवानगी असेल. परंतु अर्जदाराने त्याच्या अर्जात असे नमूद करणे आवश्यक आहे
की, त्याचा जीवनसाथी / सहाय्यक देखील प्रवास करण्यास इच्छुक आहे.
२. ७५ वर्षावरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असले तरीही प्रवासी सहाय्यक
अर्जदारासोबत प्रवास करू शकेल.
३. प्रवासात सहाय्यक घेण्याची सुविधा तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा अर्जदाराचे वय ७५ वर्षांपेक्षा
जास्त असेल आणि त्याने एकट्याने रेल्वे प्रवासासाठी अर्ज केला असेल. अर्जदाराचे वय ७५
वर्षांपेक्षा कमी असल्यास सहाय्यकांना परवानगी दिली जाणार नाही.
४. सोबत प्रवास करताना जोडीदारासोबत मदतनीस घेण्याची सोय नसेल. जर दोन्ही पती-
पत्नीचे वय ७५ वर्षांपेक्षा जास्त असेल आणि अर्जामध्ये मदतनीस नोंदणीकृत असेल, तर तो
पाठविला जाऊ शकतो.
५. सहाय्यकाचे किमान वय २१ वर्षे ते कमाल ५० वर्षे असावे. एखादा मदतनीस प्रवासात
घेतल्यास, त्याला देखील त्याच प्रकारच्या सुविधा मिळतील ज्या प्रवाशाला परवानगी आहे.
सहाय्यक शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरुस्त असावा.
६. प्रवासी, पती-पत्नी आणि सहाय्यकांनी प्रवासाशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे
बंधनकारक असेल.
(४) अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून त्यांचा थेट
फोटो काढता येईल आणि KYC करता येईल. यासाठी अर्जदाराने खालील माहिती आणणे
आवश्यक आहे.
१. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र ( रेशनकार्ड)
२. स्वतःचे आधार कार्ड
तात्पुरत्या यादीचे प्रकाशन :-
अर्ज प्राप्त झाल्यानंतर, पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल/ॲप वर जाहीर केली जाईल.
पात्र अंतिम यादीतील अर्जदार दुर्देवाने मयत झाल्यास सदर अर्जदाराचे नाव लाभार्थी यादीतून
वगळण्यात येईल.
१७. मूळ अर्जदारासह जीवनसाथी / सहाय्यकाच्या प्रवासासंबंधीच्या तरतुदी :-
१. ७५ वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकापैकी एकाला त्याच्यासोबत
नेण्याची परवानगी असेल. परंतु अर्जदाराने त्याच्या अर्जात असे नमूद करणे आवश्यक आहे
की, त्याचा जीवनसाथी / सहाय्यक देखील प्रवास करण्यास इच्छुक आहे.
२. ७५ वर्षावरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असले तरीही प्रवासी सहाय्यक
अर्जदारासोबत प्रवास करू शकेल.
३. प्रवासात सहाय्यक घेण्याची सुविधा तेव्हाच उपलब्ध होईल जेव्हा अर्जदाराचे वय ७५ वर्षांपेक्षा
जास्त असेल आणि त्याने एकट्याने रेल्वे प्रवासासाठी अर्ज केला असेल. अर्जदाराचे वय ७५
वर्षांपेक्षा कमी असल्यास सहाय्यकांना परवानगी दिली जाणार नाही.
४. सोबत प्रवास करताना जोडीदारासोबत मदतनीस घेण्याची सोय नसेल. जर दोन्ही पती-
पत्नीचे वय ७५ वर्षांपेक्षा जास्त असेल आणि अर्जामध्ये मदतनीस नोंदणीकृत असेल, तर तो
पाठविला जाऊ शकतो.
५. सहाय्यकाचे किमान वय २१ वर्षे ते कमाल ५० वर्षे असावे. एखादा मदतनीस प्रवासात
घेतल्यास, त्याला देखील त्याच प्रकारच्या सुविधा मिळतील ज्या प्रवाशाला परवानगी आहे.
सहाय्यक शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरुस्त असावा.
६. प्रवासी, पती-पत्नी आणि सहाय्यकांनी प्रवाशासोबत संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक असेल.
इतर लोकांच्या प्रवासावर निर्बंध :-
मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना अंतर्गत प्रवासासाठी निवडलेल्या व्यक्तीलाच प्रवास करता येईल. प्रवासाचा खर्च देण्याची तयारी असली तरीही तो प्रवासात इतर कोणत्याही व्यक्तीला सोबत घेऊन जाऊ शकणार नाही. फक्त निवड केलेली व्यक्ती ट्रेन आणि वाहनांमध्ये प्रवास करतील आणि प्रत्येक सीट / बर्थमध्ये फक्त एकच व्यक्ती प्रवास करेल. प्रवासादरम्यान प्रवाशाला कोणतीही निवड न केलेली व्यक्ती, इतर कोणतेही नातेवाईक किंवा लहान मूल इत्यादींना सोबत नेण्याची परवानगी दिली जाणार नाही.
अतिरिक्त खर्चाबाबत:-
कोणत्याही प्रवाशाला प्रवासादरम्यान देवस्थान व विभागाने ठरवून दिलेल्या
निकष / सुविधांव्यतिरिक्त इतर सुविधा घ्यायच्या असतील, तर त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भाराची
जबाबदारी संबंधित प्रवाशाची राहील.
१४. प्रवासादरम्यान प्रवाशांकडून अपेक्षा :-
१. प्रवाशांना कोणतेही ज्वलनशील पदार्थ किंवा मादक पदार्थ कोणत्याही स्वरूपात वाहून नेण्यास
प्रतिबंध राहील.
२. राज्याची/देशाची प्रतिमा खराब होणार नाही अशा रितीने यात्रेकरूंनी यात्रेच्या प्रतिष्ठेनुसार
वागावे.
३. प्रवासी त्यांच्या नियुक्त संपर्क अधिकारी / व्यवस्थापक यांच्या सूचनांचे पालन करतील.
४. वरील आचारसंहितेचे पालन करण्याच्या इराद्याबाबत प्रवाशांकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाईल.
५. प्रवाशांना विभागाच्या विहित प्रणालीमध्ये सहकार्य करावे लागेल आणि शिस्तीत सहकार्य करणे
अपेक्षित आहे. कोणताही प्रवासी इतर प्रवाशांची गैरसोय होईल असे वर्तन करणार नाही.
६. साधारणपणे, ट्रेनमध्ये बर्थवर झोपण्याची वेळ रात्री १०.०० ते सकाळी ६.०० पर्यंत असेल आणि
प्रवासी त्यांच्या संबंधित बर्थवर झोपतील. विभागीय गरजेनुसार यावेळी काही बदल केले जाऊ
शकतात.
अर्ज करण्याची प्रक्रिया :-
मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना अंतर्गत अर्ज पोर्टल/मोबाईल ॲपद्वारे / सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात.
त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे:-
(१) पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
(२) ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू
केंद्रात उपलब्ध असेल.
(३) अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.
मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना अपात्रतेचे निकष
(१) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
(२) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/
भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर
निवृत्तीवेतन घेत आहेत असे सदस्य पात्र ठरणार नाहीत. तथापि रु. २.५० लाखापर्यंत उत्पन्न असलेले
बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
(३) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
(४) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड / कॉर्पोरेशन/ उपक्रमाचे
अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
(५) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.(६) प्रवासासाठी शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही
संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे जसे की टीबी, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोनरी अपुरेपणा,
कोरोनरी थ्रोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इ.
(७) अर्जासोबत, ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावेलागेल. (हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून १५ दिवसांपेक्षा जास्त जुने नसावे)
(८) जे अर्जदार मागील वर्षांमध्ये लॉटरीत निवडले गेले होते, परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही
त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही, अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरविले जाणार नाही.
(९) जर असे आढळून आले की अर्जदार / प्रवाशाने खोटी माहिती देऊन किंवा कोणतीही तथ्ये लपवून अर्ज केला आहे ज्यामुळे तो / तिला प्रवासासाठी अपात्र ठरते, तर त्याला / तिला कधीही योजनेच्या लाभांपासून वंचित ठेवता येईल. सदर योजनेच्या “पात्रता” व “अपात्रता” निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.
आतापर्यंत 123 कोटी 73 लाखाचे अनुदान वितरीत
मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत दि.14 ऑक्टोबर 2024 पर्यंत राज्यातील आधार प्रमाणीकरण झालेल्या 4 लाख 12 हजार 113 पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे प्रति लाभार्थी तीन हजार प्रमाणे 123 कोटी 63 लाख रुपये अनुदान वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. जेष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या या कल्याणकारी योजनेमुळे अनेक गरीब वृद्ध नागरिकांचे देव दर्शन करण्याचे स्वप्न मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून साकार होत आहे हे मात्र नक्की.
सदर योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 9 ऑक्टोबर 2024 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील 40 हजार 220 पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटीव्दारे निधी वर्ग करुन करण्यात आला होता. या योजनेअंतर्गत राज्यात 17 लाख 83 हजार 175 ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. या अर्जाची छाननी व आधार प्रमाणीकरणाचे काम शिघ्रगतीने प्रगतीपथावर आहे.
तीर्थक्षेत्र दर्शन योजना अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील 800 लाभार्थी अयोध्येला रवाना
मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या 800 भाविकांना अयोध्येला घेऊन जाणारी विदर्भातील पहिली रेल्वेगाडी आज भंडारारोड रेल्वे स्थानक वरठी येथून निघाली असून जेष्ठ नागरिक तीर्थ दर्शनासाठी विशेष रेल्वेने मार्गस्थ झाले आहेत.
यात्रा कालावधीत सर्व शासकीय अधिकारी ज्येष्ठ यात्रेकरूंची सेवा करतील. या योजनेतून आयआरसीटीसी कडून चांगल्या गुणवत्तेचा मोफत चहा, नाष्टा, जेवण दिले जाणार आहे. जिल्ह्यातून २९८३ अर्ज आले होते. लोकसंख्येच्या प्रमाणात ८०० चा कोटा प्रथम आला असून यात पारदर्शकपणे निवड झालेल्या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. विदर्भातून यात्रेकरूंची पहिली गाडी येथून रवाना होणे हा भंडारा जिल्ह्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे.
तीर्थक्षेत्र दर्शन योजना अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील 800 लाभार्थी अयोध्येला रवाना
800 प्रवाशांना घेऊन छत्रपती संभाजीनगर येथून ट्रेन तीर्थक्षेत्र दर्शनासाठी अयोध्येला रवाना
मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना अंतर्गत दिनांक 6 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथून ८०० जेष्ठ नागरिकांना घेऊन जाणारी जिल्हयातील पहिली रेल्वे अयोध्येकडे रवाना झाली. संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते तसेच गृह निर्माण मंत्री अतुल सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर या योजनेसाठी पात्र ठरलेल्या ज्येष्ठ नागरिक यात्रेकरुंना निरोप देण्यात आला. पालकमंत्री श्री. सत्तार यांनी हिरवा झेंडा दाखवून रेल्वे अयोध्येला रवाना केली.