पंढरपुरी म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी एक उत्तम पर्याय

पंढरपुरी म्हैस पालन संपूुर्ण माहिती : महाराष्ट्र राज्यात बहुसंख्य शेतकरी शेती हा प्रमुख व्यवसाय करतात. निव्वळ शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून न राहता बरेचसे शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. अशा दुग्ध व्यवसायासाठी अत्यंत लाभदायक अशी पंढरपुरी म्हैस ही भरघोस दूध देणारी एक म्हशीची प्रजाती आहे. आज आपण दूध व्यवसायात एक मैलाचा दगड ठरलेली पंढरपुरी म्हैस कशी पाळावी, या म्हशीचे वैशिष्ट्ये तसेच दूध देण्याची क्षमता या सगळ्या बाबींवर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. पंढरपुरी म्हैस ही राज्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांसाठी आणि फुढ व्यावसायिकांसाठी त्यांची पहिली पसंद आहे. यामागे या जातीच्या म्हशीचे अनेक वैशिष्ट्ये आहेत. चला तर जाणून घेऊया या पंढरपुरी म्हशीबद्द्दल अधिक माहिती.

पंढरपुरी म्हशीबद्दल आवश्यक माहिती

मागील दीड शतकापासून पंढरपूर भागातील गवळी समाज पंढरपुरी म्हैस पाळत आलेला आहे. पंढरपुरी म्हैस ही कोरड्या हवामानास अनुकूल असून जास्त दूध देणारी एक स्थानिक जात आहे . राज्यातील हवामानात आणि तापमानात तग धरणारी तसेच कमी पावसाचे प्रमाण असलेल्या भागात लागवड होत असलेल्या ज्वारी, बाजरी, मका या पिकाच्या चाऱ्यावर ही म्हैस अधिक दूध उत्पादन देण्यास संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. या जातीच्या म्हशी सोलापूर, सांगली तसेच कोल्हापूर जिल्ह्यात बहुसंख्य शेतकरी पाळतात.

पंढरपुरी म्हशीची ओळख अशी करा

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर शेतीला जोड व्यवसाय म्हणून पंढरपुरी म्हैस पाळायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला या म्हशीची ओळख करता येणे आवश्यक आहे. कारण बाजारात म्हैस खरेदी करताना तुम्हाला जर या म्हशी बद्दल योग्य ती माहिती नसेल तर तुम्हाला फसवल्या जाऊ शकते. पंढरपुरी म्हैस ही आकाराने मध्यम असते. या जातीच्या म्हशीचा चेहरा लांबट व निमुळता असतो.
पंढरपुरी म्हशीचा रंग काळा किंवा राखाडी असतो.

याशिवाय या म्हशींची शिंगे लांब खांद्याच्या पलीकडे तसेच तलवारीच्या आकारासारखी धारदार असतात. या म्हशीची लांबी अंदाजे 100 सेंटीमीटर पर्यंत असते. पंढरपुरी जातीच्या म्हशींच्या कानाची लांबी 20 ते 24 सेंटीमीटरपर्यंत आढळते. या जातीच्या म्हशीची कास पोटाला चिकटलेली असते तसेच सड लंब गोलाकार असतात. कासेचा रंग फिकट काळसर असतो. या जातीच्या म्हशींची ठेवणं अत्यंत आकर्षक असते. एका प्रौढ पंढरपुरी म्हशीचे वजन सरासरी 380 ते 400 किलो तसेच रेड्याचे वजन 450 ते 500 किलोग्रॅम असते.

भरघोस दूध देणारी भदावरी जातीची म्हैस मिळवून देईल लाखोंचे उत्पन्न

पंढरपुरी म्हैस

पंढरपुरी म्हैसपालन एकदम सोप्पे

पंढरपुरी म्हैस शेतकऱ्यांत खूपच लोकप्रिय असण्याचे कारण म्हणजे या जातीच्या म्हशी अत्यंत कमी तसेच निकृष्ट चारा खावून सुध्दा दूध देण्याच्या बाबतीत एक नंबर असतात. शेतकऱ्यांच्या शेतातील निकृष्ट वाळलेल्या कूटार अन् कुट्टी अशाप्रकारचे वैरण खावून सुद्धा भरघोस दूध देण्यास प्रसिद्ध आहेत. दूध व्यवसाय करणारे व्यावसायिक तसेच अल्पभूधारक शेतकरी किंवा भूमिहीन शेतमजूर सुद्धा या म्हशींचे पालन करून रोजगाराचे एक प्रभावी साधन वापर करू शकतात.

आज अनेक लोक दुग्ध व्यवसायातून लाखोंची कमाई करत असल्याचे आपणास प्रसारमाध्यमांतून पाहायला मिळते. तुम्ही जर शेतीसाठी एखादा जोडधंदा शोधत असाल तर दुग्ध व्यवसायाकडे एक प्रभावी व्यवसाय म्हणून विचार केला जाऊ शकतो. आणि दुग्ध व्यवसाय सुरू करायचा असे मनाशी पक्के केलेल्या शेतकऱ्यांसाठी पंढरपुरी म्हैस एक हमखास उत्पन्न मिळवून देणारे साधन ठरू शकते.

मुऱ्हा जातीची म्हैस देते दिवसाला 25 लिटर पर्यंत दूध, मिळवून देते भरघोस उत्पन्न

पंढरपुरी म्हशीची दूध देण्याची क्षमता

मित्रांनो पंढरपुरी म्हैस ही अत्यंत काटक असते. या म्हशीची रोगप्रतिकारशक्ती सुद्द्धा चांगली असते. त्यामुळे या जातीच्या म्हशी सहजासहजी आजारी पडत नाहीत. कधितरी आजारी पडल्या तरीही त्या उपचारानंतर लवकरच बऱ्या होतात. या म्हशीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यांच्यामध्ये कृत्रिम रेतनाच्या माध्यमातून गर्भधारणेचे प्रमाण देखील जास्त असते. या म्हशींची व्यवस्थीत काळजी घेतल्यास दररोज 12 ते 15 लिटर दूध देण्याची क्षमता या पंढरपुरी म्हशींत असते. पंढरपुरी म्हशीच्या दुधात फॅटचे प्रमाण 8% असते. तसेच एक लिटर दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण 6 ग्रॅम पर्यंत असते.

पंढरपुरी म्हशीची किंमत आणि बाजार

एका प्रौढ पंढरपुरी म्हशीची किंमत सुमारे 1 ते 3 लाख रुपयांच्या दरम्यान असते. या जातीच्या म्हशी आपल्याला कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील पशू बाजारात उपलब्ध होऊ शकतात. तसेच आपल्याला या जातीची म्हैस विकत घ्यायची असल्यास यूट्यूब तसेच फेसबुकवर सुद्धा आवश्यक ती माहिती मिळू शकेल. फेसबुक वर अनेक ग्रुप आहेत ज्यामध्ये आपण या जातीच्या म्हशिंबद्दल खरेदीच्या दृष्टीकोनातून अधिक माहिती घेऊ शकाल.

याशिवाय पंढरपुरी म्हैस बद्दल प्रात्यक्षिक व्हिडिओ सुद्धा यूट्यूबवर उपलब्ध आहेत. आपण व्हिडिओ बघून या जातीच्या म्हशींचे लालन पालन करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींची माहिती मिळवून म्हैस विकत घेऊन दुग्ध व्यवसायाचा श्रीगणेशा करू शकता. हा लेख तुम्हाला कसा वाटला याबाबत खाली कॉमेंट करून अवश्य आपला अभिप्राय द्यावा जेणेकरुन अजून असेच माहितीपूर्ण लेख लिहायला प्रेरणा मिळेल.

म्हशींबद्दल तुम्हाला माहित नसलेली माहिती

आपल्या देशात दूध उत्पादनासाठी विविध भागांसाठी वेगवेगळ्या म्हशींचे पालन केल्या जाते. उत्तर भारतात मुर्दाड, निलीरावी, भदावरी, पश्चिम भारतामध्ये जाफराबादी, सुरती, मेहसाणा मध्य भारतात नागपुरी, पंढरपुरी, मराठवाडी, जेरांगी, कालाहंडी, संबळपूर आणि दक्षिण भारतामध्ये तोडा, साउथ कॅनरा, गोदावरी या प्रजातींच्या म्हशी पाळल्या जातात.

आता आपल्या राज्याबद्दल बोलायचं झाल्यास महाराष्ट्रामध्ये पूर्णाथडी, पंढरपुरी, मराठवाडी, नागपुरी यासह मुऱ्हा, मेहसाणा, सुरती, जाफराबादी या प्रजातीच्या म्हशी शेतकरी, शेतमजूर तसेच दूध व्यावसायिक हे मोठ्या प्रमाणावर पाळून उत्पन्नाच्या बाबतीत खूपच फायदेशीर असे अर्थार्जन करून यशस्वी झाल्याचे पाहायला मिळते.

जगातील एकूण म्हशींपैकी 95% पेक्षा जास्त म्हशी आपल्या आशिया खंडात सापडतात. एकूण दूध उत्पादनातील आशिया खंडाचा वाटा 55 ते 57% इतका आहे. आशिया खंडातील म्हशी या पाण्यात डुंबणाऱ्या म्हशी म्हणून ओळखल्या जातात. तर इंडोनेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, चीन आणि मलेशिया या देशातील म्हशी चिखलात लोळणाऱ्या म्हशी म्हणून लोकप्रिय आहेत.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment