तुती लागवड करून सरकारकडून लाखोंचे अनुदान : राज्यातील बरेच शेतकरी आजच्या या काळात पारंपरिक शेतीला रामराम करून नावीन्यपूर्ण शेतकडे वळताना दिसत आहे. सध्या पारंपरिक शेती करण्याऐवजी शेतकरी नवनवीन प्रयोग करून शेतीत यशस्वी होताना दिसून येतात. या नावीन्यपूर्ण पिकांपैकीच एक महत्वाचं पीक म्हणजे रेशीम. या पिकातून भरघोस उत्पन्न मिळत असल्यामुळे तुती लागवड करण्याकडे असंख्य शेतकरी बांधवांना कल वाढताना दिसून येतो. तुम्हाला सुद्धा तुती लागवड करायची असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.
आता शेतकऱ्यांना तुती लागवड करून सरकारकडून लाखोंचे अनुदान मिळत आहे. कोणत्या योजनेच्या माध्यमातून हे अनुदान मिळत आहे? आणि या अनुदानाची रक्कम किती आहे? तसेच या तुती लागवड करून सरकारकडून लाखोंचे अनुदान मिळविण्यासाठी प्रक्रिया काय आहे? आणि या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतात आणि अर्ज कुठे करायचा या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे सोप्या भाषेत मिळविण्याचा प्रयत्न आपण या माहितीपूर्ण लेखातून करणार आहोत.
तुती लागवड करून प्रती एकर सरासरी अडीच लाखाचे उत्पन्न
शेतकरी मित्रांनो रेशीम शेतीमध्ये प्रत्येक तीन महिन्याला एक याप्रमाणे एका वर्षात चार पिके घेता येतात. एक एकर शेतीमधील तुतीचा पाला रेशीम कीटकाच्या 200 अंडीपुंजासाठी वापरून सरासरी 130 ते 140 किलो रेशीम कोषाचे उत्पादन मिळणे सहजशक्य आहे. एक किलो कोषाला सरासरी 450 रुपये इतका भाव मिळतो. तुती लागवड करून शेतकर्याला एका पिकात सरासरी 55 हजार ते 65 हजार रुपयांचे उत्पन्न घेता येते. जर तुम्हाला एका वर्षात चार पिके घेणे जमले तर मात्र सुमारे अडीच लाख रुपयांचे उत्पन्न फक्त एक एकर शेतीतून हमखास मिळू शकते. आता आपण कोणत्या योजनेतून तुती लागवड करून सरकारकडून लाखोंचे अनुदान मिळते याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
सिल्क समग्र 2 योजना (Silk Samagra 2)काय आहे?
शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता तुती लागवड करून सरकारकडून लाखोंचे अनुदान मिळवून देणाऱ्या या कल्याणकारी योजनेबद्दल अधिकची माहिती द्यायची झाल्यास महारेशीम अभियान अर्थात सिल्क समग्र 2 (Silk Samagra 2) या योजनेंतर्गत एक एकर नविन तुती लागवडीसाठी सर्वसाधारण गटातील शेतकर्यांना 3 लाख 75 हजार रुपये व अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकर्यांसाठी चार लाख 50 हजार रुपयांचे अनुदान देऊन शेतकर्यांना बळ देण्याचे काम केले जात आहे.
रेशीम समग्र 2 (Silk Samagra 2) योजना कधी सुरू झाली?
तुती लागवड करून सरकारकडून लाखोंचे अनुदान मिळविण्यासाठी अर्ज करण्यासाठी आपण आतुर असाल. मात्र या योजनेबाबत थोडी माहिती जाणून घ्या. रेशीम संचालनालयाच्या वतीने केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र 2 ही योजना 2017 सालापासून राबविण्यात येत असून 2025-26 या आर्थिक वर्षात थी योजनेच्या माध्यमातून तुती लागवड करणे, कीटक संगोपन गृह बांधकाम करणे, कीटक संगोपन साहित्य, तुती लागवड फळबागा तयार करणे, बाल कीटक संगोपन केंद्र उभारणे, रेशीम कोषापासून धागा तयार करण्यासाठी मल्टीएंड रिलिंग मशीन या विविध खर्चासाठी अनुदान म्हणून सर्वसाधारण प्रवर्गासाठी 75 टक्के अनुदान आणि अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
तुती लागवडीस एकूण एवढे अनुदान मिळणार
या सिल्क समग्र 2 (Silk Samagra 2) योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रेशीम विकास प्रकल्पासाठी तीन वर्षांच्या कालावधीत अकुशल व कुशल मजुरी सुद्धा सरकारकडून देण्यात येते. तुती लागवड करून सरकारकडून लाखोंचे अनुदान मिळण्याचे स्वरूप जाणून घेतल्यास ही लागवड करण्यासाठी आणि त्याची जोपासना करण्यासाठी 682 दिवसांची तसेच कीटक संगोपन गृहासाठी 213 दिवसंची अशी एकूण 895 दिवसांची मजुरी देण्यात येते.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2.0 काय आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती
तुती लागवड करण्याचे फायदे
तुती लागवड करून सरकारकडून लाखोंचे अनुदान मिळविण्यासाठी अर्ज करण्याआधी तुम्हाला या रेशीम लागवडीचे फायदे काय आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे. एकदा तुती लागवड केल्यानंतर पुढील 12 ते 15 वर्षे झाडे टिकतात. रेशीम शेतीच्या माध्यमातून शेतकर्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने 2016-17 सालापासून रेशीम शेतीचा समावेश महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी या प्रसिद्ध योजनेत (मनरेगा) करण्यात आला आहे. ऊस पिकासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याच्या केवळ तीस ते पस्तीस टक्के पाण्यात सुद्धा रेशीम शेती होऊ शकते, असा अनुभव रेशीम शेती करणारे शेतकरी सांगतात.
तुती लागवड शेतीस पूरक असून दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन या इतर व्यवसायाप्रमाणे एक फायदेशीर व्यवसाय, असून अत्यंत कमी खर्चात शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून आरामात करता येऊ शकतो. नवीन तुती लागवड पद्धत व नवीन किक संगोपन पद्धत यामुळे हा व्यवसाय करण्यासाठी मजुरांची संख्या सुद्धा कमी लागते. कुटुंबातील व्यक्ती सुद्धा या सोप्या कामात हातभार लावू शकतात. शिवाय तुती लागवड करून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न घेता येते. तुती लागवड करून सरकारकडून लाखोंचे अनुदान मिळत असल्यामुळे या अत्यंत फायदेशीर रेशीम फायदे सुद्धा आपल्याला माहीत असले की दुप्पट फायदा होईल यात शंका नाही.
शेतात खड्डा खोदून सरकारकडून मिळवा 4800 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात
याशिवाय तुती लागवडीपासून निर्माण झालेला पक्का माल खरेदी करण्याची आणि निश्चित दर मिळवून देण्याची शाश्वती दिल्यामुळे तुती लागवडीतून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या बळकट होण्याची सुवर्णसंधी निर्माण होते. विशेष म्हणजे ही शेती करण्यासाठी विशिष्ट जमीन लागत नाही. पाण्याचा निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत तुती लागवड करता येते. तुती पिकाला उन्हाळ्यात एप्रिल आणि मे महिन्यात पाणी जरी मिळाले नाही तरी तुती मरत नाही. जेव्हा पाणी उपलब्ध असेल तेव्हा ते दिल्यानंतर तुतीचे पीक पुन्हा झपाट्याने वाढते. परिमाण आठ महिने पाण्याची सोय असलेल्या शेतकरी बांधवांना सुद्धा तुती लागवड करणे शक्य होते. अल्प बागायतदार शेतकऱ्यांपासून ते जास्त क्षेत्र असलेल्या बागायतदारांना तुतीची लागवड करून प्रचंड उत्पादन मिळविणे शक्य होते. आता तुती लागवड करून सरकारकडून लाखोंचे अनुदान मिळवून शेतकऱ्यांना आर्थिक प्रगती साधता येणार आहे.
सिल्क समग्र 2 योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करता येतो?
तुम्हाला जर तुती लागवड करून सरकारकडून लाखोंचे अनुदान मिळवायचे असेल. तर त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला रेशीम संचालनालयाची अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर जावे लागेल. https://mahasilk.maharashtra.gov.in
या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे मुख्यपृष्ठ येईल. यामध्ये साईन अप या पर्यायावर क्लिक करून New user म्हणजेच नवीन वापरकर्ता या पर्यायावर क्लिक करून I Agree पर्यायावर क्लिक करून संमती दिल्यानंतर Stake Holder पर्याय दिसेल त्यामध्ये Farmer – Mulberry/Tasar हा पर्याय दिसेल. त्यावर क्लीक केले म्हणजे तुमच्यापुढे तुती लागवड करून सरकारकडून लाखोंचे अनुदान मिळविण्यासाठी करण्यात येणारा अर्ज उघडेल. अर्ज करताना अर्जदार शेतकऱ्यांनी त्यांची सर्व माहिती अचूकपणे भरून शेवटी स्वतः चा पासपोर्ट साईजचा फोटो,आधार कार्ड व बँक पास बुक ची फोटो कॉपी अपलोड करावी लागेल. शेवटी सबमिट पर्यायावर क्लिक केल्यानंतर शेतकऱ्याचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन झाल्याचा संदेश प्राप्त होईल. तुम्हाला तुमच्या मोबाइल स्क्रीनवर सुद्धा अर्ज यशस्वीपणे सादर केल्या गेला अशी सूचना दिसेल.
या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी
शेतकरी मित्रांनो एकदा का तुम्ही ऑनलाईन नोंदणी सादर केला मी पुढील टप्पा म्हणजे संबंधित जिल्हा रेशीम कार्यालयास भेट देऊन खालील कागदपत्रे त्यांच्याकडे सादर करावी लागतील.
1) अर्जदार शेतकऱ्याचा सात बारा
2) अर्जदार शेतकऱ्याचा आठ अ उतारा
3) बँके पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत
4) मनरेगा जॉब कार्ड
5) आधार कार्ड ची झेरॉक्स
6) योजनेसाठी लागणारे नोंदणी शुल्क
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणीचे काम पूर्ण होऊन तुमच्या अर्जाची छाननी करून तुम्हाला सिल्क समग्र 2 (Silk Samagra 2) या योजनेच्या माध्यमातून तुती लागवड करून सरकारकडून लाखोंचे अनुदान मिळेल.