राज्यात अनेक लोकांचा प्राथमिक व्यवसाय हा शेती आहे. शेतीला जोडधंदा म्हणजे दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांच्या सर्वात आवडीचा जोडधंदा आहे. जास्त दूध देणारी निरोगी काय कशी ओळखावी याबद्दल अनेक दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे गाय खरेदी करताना त्यांची फसवणूक होताना दिसून येते. त्यामुळे जास्त दूध देणारी निरोगी गाय कशी ओळखावी याबद्दल काही महत्वाच्या बाबी माहीत असणे आवश्यक असते. चला तर जाणून घेऊया दुग्ध व्यवसायात यशस्वी होण्यासाठी गाय खरेदी करताना जास्त दूध देणारी निरोगी गाय कशी ओळखावी याबद्दल संपूर्ण माहिती.
निरोगी गाय कशी ओळखावी?
शेतकरी मित्रांनो जेव्हा तुम्ही गाय खरेदी करायला जाता त्यावेळी ती गाय निरोगी आहे की नाही हे कळायला हवेच. मात्र हे ओळखायचे कसे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर गायीचे व्यवस्थित निरीक्षण केल्यास सदर गाय ही निरोगी आहे की आजारी आहे याबद्दल तुम्हाला अचूकपणे ओळख करणे सहज शक्य होऊ शकते. जास्त दूध देणारी निरोगी गाय कशी ओळखावी हे जाणून घेताना गाईच्या शरीरावरील विविध अवयव आणि गाईचे वर्तन यावरून तुम्ही जास्त दूध देणारी निरोगी गाय कशी ओळखावी याबद्दल पुरेसे ज्ञान जाणून घेऊ शकता. यासाठी गाईचे कान व्यवस्थित तपासा. कान जर खाली वाकलेले असतील तर ती गाय आजारी आहे असे समजावे. कारण निरोगी गायीचे कान हे एकदमच खाली झुकलेले अजिबात नसतात.
भदावरी म्हशीची ही वैशिष्ट्ये, म्हणूनच आहे दूध व्यावसायिकांची पहिली पसंती
ज्या गाईचे कान हालचाल करत आहेत आणि टवटवीत आहेत तसेच कान एकदमच खाली झुकलेले नाहीत अशा गाई निरोगी समजल्या जातात. याशिवाय गाईचे शेपूट हे गाईच्या कासेला स्पर्श करत असले पाहिजे. गायीची लांबी 5 ते साडेपाच फूट इतकी असावी. गाय जर काही खात नसेल गुपचूप एका जागी पडून असेल तर अशा अवस्थेत ती आजारी आहे असा त्याचा अर्थ आहे. गाय विकत घेताना शक्यतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेताची गाय खरेदी करणे उत्तम ठरते. गायीचे शरीर चकचकीत आणि कुठेही इजा झाली नसावे. शारीरिक दृष्ट्या कमकुवत गायींची दूध देण्याची क्षमता कमी असते.
गाय जास्त दूध देणारी आहे हे ओळखण्याची आणखी काही लक्षणे
जास्त दूध देणारी निरोगी गाय कशी ओळखावी याबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी कल्पना आली असेल. मात्र अजून यात काही महत्वाच्या गोष्टी तपासणे आवश्यक असते. गायीचे शरीर हे सुडौल बांधा कायिक असावा. निरोगी गाय ही सरळ ताठपणे चालते. झुकल्यागत चालत नाही. चालताना गाईच्या सर्व पायांमधील अंतर हे सारखे असायला हवे. याशिवाय गाईच्या शरीराचा आकार हा पाचारीसारखा असावा. याचा अर्थ म्हणजे गाईच्या शरीराचा मागील भाग हा रुंद पसरट आणि शेवटी निमुळता असावा. गायीचे डोळे हे चमकदार आणि मान ही बारीक असायला हवी. गाईची कास ही पोटाला व्यवस्थित चिकटलेली असावी. गाईच्या पोटामध्ये आणि कासेमध्ये जास्त अंतर नसावे. कासेच्या त्वचेवर शिरांचे जाळे चांगले असावे. याशिवाय कासेचे चारही टप्पे पूर्णपणे विकसित झालेले असावेत. गाईच्या स्तनांची ठेवणं नेटकी असावी.
दूधाच्या व्यवसायासाठी वरदान ठरलेली मुऱ्हा म्हैस देते दिवसाला 25 ते 30 लिटर दूध
गाय खरेदी करताना विक्रेत्याला हे प्रश्न विचारा
मित्रांनो जास्त दूध देणारी निरोगी गाय कशी ओळखावी याबद्दल आता तुम्हाला चांगली आणि पुरेशी माहिती मिळाली असेल अशी आशा आहे. जेव्हा तुम्ही गाय खरेदी करायला जाता तेव्हा गाय विकणाऱ्या व्यक्तीला गायीबद्दल काही प्रश्न विचारणे अतिशय आवश्यक असते, जेणेकरून आपली फसवणूक होऊ नये. सर्वप्रथम विक्रेत्याला गाईची वंशावळ आणि इतिहास माहीत असला पाहिजे. याची विचारणा करा. यावरून ती गाय अस्सल आहे की नाही हे तुम्हाला कळू शकेल.
आणखी विचारायचे प्रश्न म्हणजे गाईचे किती वेत झालेले आहेत याची माहिती घेणे. लक्षात घ्या गाईच्या दुधाचे सर्वाधिक उत्पन्न हे पहिल्या पाच वेतांतच मिळत असते. त्यामुळे आपण विकत घेत असलेली 2 ते 3 वेत झालेली असणे आवश्यक असते. गाय खरेदी करत असताना त्यांचे दोन वेळा दूध काढून बघा. असे केल्याने तुम्हाला गाईच्या दूध देण्याच्या क्षमतेचा थोडाफार अंदाज येईल. गायीची प्रवृत्ती शांत असली पाहिजे म्हणजे ती कोणालाही दूध काढू देईल. शक्यतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या कालावधीत गुरांची खरेदी करणे हे सर्वात उत्तम. गाईच्या दुधाचे सर्वात जास्त उत्पादन हे वेताच्या 90 दिवसानंतर मिळते.
जास्त दूध देणाऱ्या भारतातील काही प्रसिद्ध जाती
मित्रांनो जास्त दूध देणारी निरोगी गाय कशी ओळखावी याबद्दल आता तुमच्या मनात किंचितही शंका नसेल. मात्र कोणत्या जातीच्या गायी विकत घ्याव्या, जेणेकरून भरपूर दूध उत्पादन मिळेल आणि दुधाच्या व्यवसायात यशस्वी होता येईल हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. तर शेतकरी मित्रांनो जर्सी गाय ही तुमच्या सर्वांच्या परिचयाची आहे. याशिवाय भारतातील सर्वोत्कृष्ट दूध देणाऱ्या जाती म्हणजे गीर, साहिवाल आणि लाल सिंधी, काळी कपिला, या गायींना त्यांच्या भरपूर दूध उत्पादनामुळे नेहमीच जास्त मागणी असते. या गायी जगातील विविध देशांमध्ये सुद्धा निर्यात केल्या जातात. वरील सर्व गायींचे पालन जास्तीत जास्त दूध उत्पादनासाठी भारतातच काय तर जगभरात केला जातो.