थंड हवामानात घेतल्या जाणार पीक म्हणून वाटाणा हे एक महत्वाचे अन् भरघोस उत्पादन मिळवून देणारे पीक आहे. आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणावर वाटाणा लागवड करून अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतात. वाटाणा लागवड साठी सुधारित जाती कोणत्या याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. आज तुम्हाला हा लेखातून वाटाणा लागवड साठी सुधारित जाती बद्दल माहिती देत आहोत. जेणेकरून तुम्ही जर तुमच्या शेतात या रब्बी हंगामात वाटाणा लागवड करत असाल तर तुम्हाला पुढे दिलेल्या वाटाण्याच्या सुधारित जातीच्या वाणांची पेरणी करून भरघोस उत्पादन घेता येऊ शकेल. चला तर जाणून घेऊया वाटण्याचे भरघोस उत्पादन मिळवून देणाऱ्या वाटाणा लागवड साठी सुधारित जाती कोणत्या आहेत याची सविस्तर माहिती.
पंत मटर 155
वाटाणा लागवड साठी सुधारित जाती पैकी पंत मटर 155 ही एक संकरीत वाटाणा जात आहे. पंत मटर 13 आणि डीडीआर-27 च्या संकरीकरणाने ही जात तयार केल्या आहे. या जातीच्या वाटाणा शेंगा जर तुम्ही तुमच्या शेतात पेरल्या तर दीड ते 2 महिन्यातच तुम्हाला उत्पादन मिळण्यास सुरूवात होते. ही वाटाणा लागवड साठी सुधारित जाती आपण वापरली तर उत्पादन हे 15 टन प्रति हेक्टरपर्यंत मिळेल. शिवाय हे वाण अनेक रोगांना प्रतिरोधक असल्यामुळे उत्पादनाची हमी निश्चित होऊ शकते.
काशी नंदिनी
भारतीय भाजीपाला संशोधन संस्था वाराणसी या संस्थांकडून वाटण्याची काशी नंदिनी ही जाती विकसित करण्यात आली असून वाटाणा लागवडीसाठी सुधारित जाती पैकी या जातीची लागवड केल्यास पीक वेगाने वाढते तसेच उत्पादन सुद्धा लवकर मिळायला लागते. या जातीच्या वाणाचे रोप हे 47-51 सेमी उंच वाढते तसेच पेरणीनंतर 32 दिवसांनी या जातीच्या पिकाला पहिल्यांदा फूल उमलते. या वाटण्याच्या शेंगांची लांबी 8 ते 9 सेमी इतकी असते. ज्या शेंगीमध्ये 8 ते 9 टपोरे दाणे असतात. 60 ते 65 दिवसात काढणीस तयार होते. जर एक हेक्टर क्षेत्रामध्ये या जातीची लागवड केली तर 110 ते 120 क्विंटल उत्पादन मिळू शकते.
पुसा 3
वाटाणाच्या या वाणाच्या प्रत्येक शेंगेमध्ये सहा ते सात दाणे असतात या जातीचा वाटाणा लागवड केली तर वीस ते 21 क्विंटल प्रति एकर वाटाण्याचे उत्पादन घेता येऊ शकते. वाटाणा लागवड साठी सुधारित जाती पैकी ही जाती सुद्धा भरघोस उत्पादन मिळवून देण्याच्या क्षमतेची आहे. ऑक्टोबर महिन्यात या जातीच्या लागवडीची सुरुवात केल्या जाते. मुख्यत्वेकरून या जातीच्या वाणांची लागवड उत्तर भारतातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर करत असल्याचे पाहायला मिळते. त्या भागाची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊनच वाटाणा लागवड साठी ही सुधारित जाती विकसित करण्यात आलेली आहे. शेतात जा जातीच्या वाणाची लागवड केल्यानंतर 50 ते 55 दिवसात या जातीचे उत्पादन मिळायला सुरुवात होते. एक चांगला पर्याय म्हणून ही वाटाणा लागवड साठी सुधारित जाती वापरली जाऊ शकते.
आर्केडवाटाणा
वाटाणा लागवड साठी सुधारित जाती पैकी या जातीच्या वाटाण्याच्या शेंगांची लांबी आठ ते दहा सेंटीमीटर असून प्रत्येक शेंगमध्ये सुमारे पाच ते सहा वाटाण्याचे दाणे पाहायला मिळतात. या वाटण्याची लागवड केल्यानंतर सुमारे 55 ते 65 दिवसात हे वाटाणा पीक पूर्णपणे उत्पादनास तयार होते. तुम्ही या वाणाची लागवड केली तर अंदाजे 16 ते 18 क्विंटल प्रति एकर शेतात उत्पादन मिळू शकते. वाटाणा लागवड साठी सुधारित जाती पैकी ही जात सुद्धा भरघोस उत्पादन मिळवून देऊ शकते. या जातीच्या वाणाची पेरणी केल्यास चांगले उत्पन्न नक्कीच मिळवता येते. वाटाणा लागवड साठी सुधारित जाती पैकी संशोधित केलेली ही जाती परदेशातील आहे. यूरोप खंडातील या जातीचे वाटण्याचे दाणे तुलनेत चविष्ट असतात.
अर्ली बॅजर
वाटण्याची अर्ली बॅजर ही जाती सुद्धा विदेशात संशोधित केल्या गेली आहे. या जातीच्या शेंगांमध्ये असलेल्या बियांवर सुरकुत्या दिसून येतात तसेच त्याची वनस्पती ही बटू आहे. वाटाणा लागवड साठी सुधारित जाती पैकी या जातीच्या वाणांचे पीक साधारणपणे 50 ते 60 दिवसांत उत्पादनक्षम होते. या जातीच्या वाटण्याच्या शेंग मध्ये सुमारे 5 ते 6 दाणे असतात. अर्ली बॅजर जाती ही परदेशी जात आहे. त्याच्या शेंगांमध्ये तयार झालेल्या बिया सुरकुत्या पडतात. त्याची वनस्पती बटू आहे. त्याचे पीक सुमारे 50 ते 60 दिवसांत तयार होते. या जातीचे वाण अंदाजे 10 टन प्रति हेक्टर इतके उत्पादन देण्यास सक्षम आहे.
काशी उदय
काशी उदया मटार ही वाटाणा लागवड साठी सुधारित जाती पैकी सर्वात आधीच्या जातींपैकी एक असून हा जातीचे संशोधन 2005 मध्ये झालेले आहे. आपल्या राज्याच्या तुलनेत ही जात बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये l लागवडीसाठी जास्त योग्य असते. या जातीच्या वाणाची शेंग अंदाजे 9 ते 10 सेंटीमीटर इतकी लांब आकाराची असते. या जातीची लागवड केल्यास 42 क्विंटल प्रति एकर वाटण्याचे उत्पादन घेता येते.या वाणाच्या उत्पादनास योग्य बाजारभाव सुद्धा मिळतो. या जातीच्या पिकाची वाढ होऊन उत्पादनाची सुरुवात होण्यास सुमारे 2 महिने लागतात.
काशी आगते
काशी ही वाटण्याची एक अशी जाती आहे की जी फार कमी दिवसात उत्पादन देण्यास सक्षम असते. या जातीची लागवड केल्यास तुमचे वाटण्याचे पीक फक्त ५० दिवसांत काढणीयोग्य होते. या जातीच्या शेंगा गडद हिरव्या रंगाच्या दिसून येतात. तसेच या शेंगा सरळ वाढलेल्या असतात. वाटाणा लागवड साठी सुधारित जाती पैकी ही जात तुम्हाला 38 ते 40 क्विंटल प्रति एकर उत्पादन मिळवून देऊ शकते.
या रब्बी हंगामात हरभऱ्याचे हे सुधारीत वाण पेरून घ्या भरघोस उत्पादन
अरकेल
या जातीच्या शेंगा आकर्षक गर्द हिरव्या रंगाच्या असतात तसेच साधारणपणे 6 ते 7 सेंमी लांब आढळून येतात. वाटाणा लागवड साठी सुधारित जाती पैकी या वाणाच्या झाडांची उंची 35 ते 45 सेंमी असतें. सुमारे 50 ते 55 दिवसांनी काढणीस तयार होत असल्यामुळे आपण उत्पादन घ्यायला सुरुवात करू शकता.
बोनव्हला
वाटाणा लागवड साठी सुधारित जाती पैकी या जातीच्या शेंगा आकर्षक गर्द हिरव्या रंगाच्या असतात. याशिवाय या पिकाच्या शेंग मधील दाणे हे अत्यंत गोड आणि स्वादिष्ट असतात. या वाणाच्या झाडांची उंची ही मध्यम स्वरूपाची असते. साधारणतः दीड महिन्यांनी शेंगा काढणीस तयार होऊन उत्पादन घ्यायला सुरुवात होते.
मिटीओर
या जातीच्या शेंगा गर्द हिरव्या रंगाच्या असून यांची लांबी सामान्यतः 7 ते 8 सेंमी असते. या वाटाणा लागवड साठी सुधारित जाती बाणाच्या झाडांची उंची 35 ते 45 सेंमी इतकी असते. या वाटाण्याच्या शेंगा 50 ते 60 दिवसांनी काढणीयोग्य होतात. या जातीच्या शेंगातील दाणे गोल गुळगुळीत असून ही जात ऑक्टोबरमध्ये लागवड केल्यास फायदेशीर ठरते.
जवाहर 1
वाटाणा लागवड साठी सुधारित जाती पैकी फिकट हिरव्या रंगाच्या शेंगा येणारी ही जात असून या शेंगा सर्वसाधारणपणे 6 सेंमीपर्यंत लांब पाहायला मिळतात. या जातीच्या पिकाचा उत्पादन कालावधी हा सुमारे 90 दिवसांचा असतो. या वाटाण्याच्या शेंगाच्या दाण्यांना सुरकुत्या पडलेल्या दिसून येतात. या जातीची झाडे ही बुटकी पण सरळ वाढणारी असून या झाडांची सरासरी उंची सुमारे 80 सेंमी इतकी असते.
वाटण्याच्या काही इतर सुधारित जाती
वाटाणा लागवड साठी सुधारित जाती पैकी आपण वर काही जाती बघितल्या. याशिवाय बऱ्याच सुधारित जाती उपलब्ध आहेत. त्यापैकी अर्केल, असौजी, मिटीओर या सुधारित जाती कमी कालावधीत उत्पन्न मिळवून देतात तर मध्यम कालावधीत उत्पादन मिळवून देणाऱ्या जाती या बोनव्हिला, परफेक्शन, न्यु लाईन इत्यादी आहेत. तसेच असौजी, जवाहर – 4, व्ही.एल. – 3, बी. एच. 1 , के.एल. 136, बुंदेलखंड आणि वाई एन. पी. – 29, थॉमस लॅक्सटन या वाटाण्याच्या सुधारित जाती उशिरा उत्पादनक्षम होतात.
बाजरीच्या या सुधारित आणि संकरित वाणांची लागवड करून घ्या लाखों रुपयांचे उत्पन्न
वाटाणा लागवडयोग्य शेतजमिन
तुम्हाला जर वरील वाटाणा लागवड साठी सुधारित जाती पैकी योग्य वाणाची लागवड करायची असेल तर या लागवडीसाठी मध्यम ते भारी निचऱ्याची जमीन असणे आवश्यक आहे. या शेतजमिनीचा सामू 5.5 ते 6.7 असावा. तसेच लागवड करण्या अगोदर उभी आडवी नांगरणी करून 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या देणे महत्वाचे आहे. चढ उतार कमी करण्यासाठी ढेकळे बारीक करून घ्यावेत.
लागवडीचे योग्य अंतर
तुम्हाला तुमच्या शेतात वाटणे पिकाची लागवड या रब्बी हंगामात करायची असल्यास ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा कालावधी उत्तम. लागवडयोग्य शेती तयार करण्यासाठी सरी-वरंबे किंवा सपाट वाफे पद्धतीने 30 × 15 सेंटिमीटर अंतर ठेवा. ही लागवड जर टोकण पद्धतीने करायची असेल तर 30-40 कि.ग्रॅ. बियाणे प्रती हेक्टर लागेल. पेरणी पद्धतीने लागवड करण्यासाठी 70-80 किलो प्रती हेक्टर बियाण्याची गरज पडते.
अशी करा लागवड
सेंद्रिय खत 50 ते 75 किलो पेरणीच्या वेळेस वापरा.बियाणे पेरत असताना त्यात खत टाकावे यामुळे 5 ते 7 दिवसांत अंकुर वर आलेले दिसतील. लागवड सपाट वाफ्यात किंवा सरी वाफ्यावर केल्या जाते. सऱ्यांमध्ये दोन्ही बाजूस बीयाणे टोकून लावण्यात येते. टोकन पद्धतीने पेरणी केल्यास अंदाजे 8 ते 10 किलो बीयाणे प्रती एकर शेतास लागेल. लागवड करत असताना बियाणे अडीच ते तीन सेंटिमीटर खोल पर्यंत पेरावे. जमिनीत पुरेशी ओल असताना लागवड करणे भरघोस उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असते.
वाटाणा शेती खत व्यवस्थापन
वाटाणा पिकास जमिनीचा मगदूर पाहूनच खताची शिफारस केली जाते. त्यासाठी हेक्टरी 15 ते 20 टन शेणखत प्रती हेक्टर द्यावे. 20 ते 30 किलो नत्र, तर 50 ते 60 किलो स्फुरद आणि 50 ते 60 किलो पालाश सुद्धा द्यावे लागते. जमिनीची मशागत करतानाच शेणखत जमिनीत चांगल्या प्रकारे मिसळून एकजीव करून घ्या. तसेच वर दिलेल्या मात्रेत पालाश आणि स्फुरद तसेच अर्धे नत्र, पेरणी करायच्या आधी जमिनीत पेरा किंवा मिसळा. तुमच्याकडे शिल्लक असलेले उर्वरित नत्र पीक फुलावरआल्यावर पिकास द्या.
पाणी व्यवस्थापन
तुमच्या शेतात हरभरा लागवड साठी सुधारित जाती पैकी योग्य वाणाची पेरणी संपन्न झाल्यानंतर हलक्या जमिनीत पाणी लगेच द्या. मात्र सतत पाणी देणे टाळा. शेंगा भरताना नियमित पाणी द्यावे. हिवाळ्यात भीज पाणी द्या. मात्र इतर दिवसांत भीज पाणी न देता टेक पाणी द्या. पाण्याचे प्रमाण जास्त होऊ नये यासाठी हलके पाणी द्या. वाटाणा वरंब्यावर पेरला तर टेक पाणी देता येऊ शकेल. सपाट वाफ्यावर वाटाणा पेरला असेल तर थंडीच्या दिवसांत दुपारच्या वेळी पाणी द्यावे. सकाळी सकाळीच पाणी देणे टाळावे. कारण या वेळेस हवेत आर्दतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे परत पाणी जास्त प्रमाणात झाल्यास तुम्ही पेरलेल्या वाटाणा पिकावर बुरशी रोग पडून त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो.
कीड आणि रोग नियंत्रण
तुम्हाला वाटणे वाटाणा पिकावर पडणाऱ्या रोगांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. वाटाणा पिकावर मावा तसच शेंगा पोखरणारी अळी या किडींचा आणि भुरी, मर रोग यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.
मावा कीड हिरव्या रंगाची असून ती अत्यंत लागट असते. या मावा वाटण्याच्या पानातून रस शोषून घेतात. परिणामी झाडांवर त्याचे अनिष्ट परिणाम दिसून येरून झाडे सुकतात, निस्तेज होतात.
शेंगा पोखरणारी अळी ही सुद्धा हिरव्या रंगाची असते. ही अळी प्रथम शेंगाची साल खाते नंतर शेंगीच्या आत शिरून दाणे पोखरून खाते.
गव्हाच्या या सुधारित जाती देतात एकरी 40 क्विंटल पर्यंत बक्कळ उत्पादन, अशी करा लागवड
या विविध रोगांचा आणि किडींचे नियंत्रण असे करा
तुम्हाला कीड नियंत्रण करण्यासाठी खालील दिलेल्या प्रमाणात फवारणी करणे आवश्यक आहे. यासाठी मॅलॅथिऑन 50 ईसी, 500 मिली किंवा फॉस्फॉमिडॉन 85 डब्ल्यू ईसी, 100 मिली किंवा डायमेथोएन 30 ईसी, 500 मिली किंवा मिथिलडेमेटॉन 25 ईसी, 400 मिली, 500 लिटर पाण्यात मिसळून प्रती हेक्टरी फवारणी करावी. पेरणीनंतर साधारणतः 3 आठवड्यांनी पहिली फवारणी करावी. त्यामुळे या रोगांपासून रक्षण होण्याची शक्यता वाढते. लक्षात ठेवा प्रतिबंध हा उपचार पद्धती पेक्षा जास्त फायदेशीर असतो.
1) भुरी रोग
या रोगामुळे वाटण्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. पानांच्या दोन्ही बाजूंवर पांढरी पावडरीसारखी बुरशी दिसून येणे हे भुरी रोग ओळखण्याची लक्षणे आहेत. रोपाच्या सर्व हिरव्या भागावर हा रोग अत्यंत वेगाने पसरून झाडाची उत्पादनक्षमता खूप कमी होण्यास हा रोग कारणीभूत ठरतो.
असे करा भुरी रोगाचे नियंत्रण
मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या शेतात वर दिलेल्या वाटाणा लागवड साठी सुधारित जाती पैकी योग्य वाण पेरून भरघोस उत्पादन मिळवायचे असेल तर भुरी रोगाचे नियंत्रण करणे हे खूपच महत्वाचे ठरते. यासाठी पुढील प्रमाणात फवारणी करा. मार्फोलीन 250 मिली किंवा पाण्यात मिसळणारे गंधक 80 टक्के 1250 ग्रॅम किंवा डिनोकॅप 40 डब्ल्यू पी 500 ग्रॅम प्रती हेक्टरी 500 लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी/धुरळणी करा. किंवा गंधकाची भुकटी 300 मेश प्रतिहेक्टरी 20 किलो या प्रमाणात फवारणी करा. त्यानंतर 15 दिवसांच्या फरकाने फवारणी / धुरळणी करा.
2) मर रोग आणि नियंत्रणाचे उपाय
मर या रोगाचा प्रसार हा जमिनीतील बुरशीमुळे होतो. मर मर रोगाने ग्रस्त झाडे ही पिवळे पडतात इतकेच नाही तर वाळायला लागतात. पेरणीपूर्वी बियाण्यांना थायरम हे बुरशीनाशक औषध प्रति किलोस ३ ग्रॅम या प्रमाणात चोळा. त्यामुळे या रोगापासून संरक्षण होण्याची शक्यता बळावते.
वाटाणा उत्पादन आणि बाजारभाव
वाटण्याचे पीक फक्त 2 महिने कलावधीचे असल्यामुळे शेतात दुसरे पीक पेरण्यासाठी लवकर शेत मोकळे होते. वाटाणा पिक उत्पादनक्षम झाल्यावर दोन महिन्याच्या कालावधीत 3 ते 4 तोडे होतात. वाटाण्याला बाजारात चांगली मागणी असल्यामुळे चांगला भावसुद्धा मिळतो. 15 ते 18 क्विंटल प्रति एकर माल होतो. दरात चढ उतार होत राहतात. वाटण्याचे सरासरी दर प्रति किलो 50 ते 100 रुपयांपर्यंत मिळत असल्यामुळे भरघोस उत्पादन घेता येऊन छानपैकी अर्थार्जन करता येते.