ग्रॅज्युएशन करणाऱ्या मुलींना मिळत आहे एक लाख पर्यंत शिष्यवृत्ती, तत्काळ होतो अर्ज मंजूर

legrand empowering scholarship program-2024-25 : ग्रॅज्युएशन करणाऱ्या मुलींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. तुम्ही मुलगी जर आता पदवीधर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत असेल तर अशा पालकांना पैशांची काळजी करायचं कारण नाही. कारण लेग्रैंड एम्पावरिंग स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 (Legrand Empowering Scholarship Program 2024-25) द्वारे आपल्या मुलीला तिच्या शिक्षणासाठी एक लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती (scholarship) देत आहे. Legrand Company च्या या स्तुत्य उपक्रमामुळे अनेक मुलींना त्यांचे पदवीधर शिक्षण पूर्ण करणे अगदी सोप्पे होणार आहे.

आर्थिक परिस्थिती येते सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या आड

आपल्या देशात बऱ्याच कुटुंबातील मुलामुलींना आर्थिक अडचणींच्या कारणांमुळे आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते. प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि शिकण्याची जिद्द अन् मेहनत घेण्याची तयारी असून सुध्दा निव्वळ पैशांच्या कमतरतेमुळे बऱ्याच होतकरू विद्यार्थ्यांना आपली स्वप्ने विसरावी लागतात ही वस्तुस्थिती आहे. पण आता मात्र आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या हुशार विद्यार्थिनींना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करता येणार असून त्यासाठी लेग्रैंड एम्पावरिंग स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 ((Legrand Empowering Scholarship Program 2024-25)) मोलाचा वाटा उचलणार आहे.

Legrand Empowering Scholarship Program 2024-25 online form filling process

कसे आहे या लेग्रैंड एम्पावरिंग स्कॉलरशिप प्रोग्राम (Legrand Empowering Scholarship Program) चे स्वरूप?

या शिष्यवृत्तीचे एकूण 2 प्रकार आहेत. पहिला म्हणजे सामान्य श्रेणी आणि दुसरा म्हणजे विशेष श्रेणी. लेग्रैंड एम्पावरिंग स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 या उपक्रमाद्वारे अग्रगण्य कंपनी Legrand आता देशातील हुशार विद्यार्थीनींना त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी 1 लाख रूपयांपर्यंत शिष्यवृत्ती देऊन मदत करणार आहे. यासाठी सदर कंपनी कडून अर्ज सादर करण्याचे आवाहन केल्या जात आहे. ही शिष्यवृत्ती सामान्य श्रेणीसाठी शैक्षणिक कामगिरीच्या आधारावर असणार आहे.निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थिनींना त्यांचा पदवीधर अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत 60 टक्के अभ्यासक्रम शुल्क, दरवर्षी कमाल 60 हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच विशेष श्रेणीसाठी शैक्षणिक कामगिरीच्या आधारावर, विशेष श्रेणीतील विद्यार्थ्यांना 80 टक्के अभ्यासक्रम शुल्क, अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत प्रति वर्ष कमाल 1 लाख रुपये दिले जातील.

काय आहेत Legrand Empowering Scholarship Program शिष्यवृत्ती योजनेचे पात्रता निकष?

लेग्रैंड एम्पावरिंग स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 शिष्यवृत्ती कार्यक्रम फक्त भारतातील गुणवंत विद्यार्थिनींसाठीच असणार आहे.

या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार मुलीने भारतातील B.Tech, BE, B.Arch, BBA, B.Com किंवा B.Sc पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असणे अनिवार्य आहे.

अर्जदार विद्यार्थिनीने 2023-24 या शैक्षणिक वर्षात 12 वी उत्तीर्ण केलेली असावी.

अर्जदार विद्यार्थिनीने 10 वी आणि 12 वी मध्ये किमान 70 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले असणे या शिष्यवृत्ती योजनेची प्रमुख अट आहे.

अर्जदार विद्यार्थीनीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

अशाप्रकारचे सोप्पे निकष सामान्य श्रेणीतील विद्यार्थीनींसाठी ठेवण्यात आलेले आहेत.

भारतीय स्टेट बँक फाउंडेशन देत आहे गरीब विद्यार्थ्यांना साडे सात लाखापर्यंत शिष्यवृत्ती,6 वी ते उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी असा करू शकतात ऑनलाईन अर्ज

काय आहे Legrand Empowering Scholarship Program शिष्यवृत्ती योजनेचे उद्दिष्ट?

लेग्रैंड एम्पावरिंग स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 उपक्रमाचा मुख्य उद्देश हा गुणवंत विद्यार्थीनी, अपंग महिला विद्यार्थी, कोविड-प्रभावित विद्यार्थीनी, LGBTQ विद्यार्थीनी, अनाथ विद्यार्थीनी आणि एक पालक असलेल्या विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्राप्त व्हावे यासाठी ही स्काॅलरशिप देण्यात येते. अशा होतकरू गरीब विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणात काहीही आर्थिक अडचण येऊ नये तसेच त्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे असा लेग्रैंड एम्पावरिंग स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 उपक्रमाचा हेतू आहे.

या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख

लेग्रैंड एम्पावरिंग स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 (Legrand Empowering Scholarship Program) शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या लाभासाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज स्वीकारले जाणार असून त्यासाठी 5 सप्टेंबर ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असणार आहे. याची सर्व इच्छुक विद्यार्थिनी तसेच त्यांच्या पालकांनी नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा आणि सदर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

Legrand Empowering Scholarship Program शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

१) विद्यार्थिनींचे आधार कार्ड

२) विद्यार्थिनीने पदवी अभ्यासक्रम साठी प्रवेश घेतल्याचा पुरावा म्हणून महाविद्यालयाची प्रवेश पावती

३) सदर विद्यार्थिनीचे रहिवास प्रमाणपत्र

४) विद्यार्थिनीची बाराव्या वर्गाची गुणपत्रिका

५) विद्यार्थीनीच्या कुटुंबाचे राशन कार्ड

६) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र

७) विद्यार्थिनीचे पॅन कार्ड

८)विद्यार्थीनीच्या जन्माचा दाखला

👉 हे सुध्दा वाचा

बाहेरगावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळत आहेत वर्षाला 51 हजार रुपये

Legrand Empowering Scholarship Program साठी ऑनलाईन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट

जर आपल्याला या योजनेच्या लाभासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्या वेबसाईट ची लिंक पुढीलप्रमाणे आहे.

https://legrandscholarship.co.in

या कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर वेबसाईटच्या होम पेजवर तुम्हाला उजव्या बाजूला apply now असा पर्याय ठळक निळ्या अक्षरात दिसेल त्यावर क्लिक केले की नवीन पेज उघडुन तुमच्या समोर सदर शिष्यवृत्तीचा अर्ज येईल. त्यावर विचारलेली आवश्यक ती संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल. तसेच त्यानंतर वर दिलेले आवश्यक कागदपत्रे फोटो किंवा पीडीएफ स्वरूपात अपलोड करावे लागतील. त्यानंतर तुम्ही दिलेल्या मोबाइल क्रमांकावर एक OTP येईल. तुम्ही OTP यशस्वीरित्या त्यात टाकला की तुमचा फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन तुम्हाला तुमचा अर्ज यशस्वीरीत्या भरल्या गेल्याची सूचना सदर वेबसाईट वर मिळेल.

तसेच तुम्ही दिलेल्या मोबाइल क्रमांकावर सुद्धा अर्ज यशस्वीरीत्या सादर झाला असा संदेश प्राप्त होईल. त्यानंतर सदर अर्जाची छाननी अन् मूल्यमापन होऊन तुम्ही जर सर्व निकषांचे पालन केलेले असेल आणि अर्ज अचूकपणे भरला असेल तर काही दिवसांत तुम्हाला अर्ज मंजूर होण्याचा मेसेज तुमच्या मोबाइल नंबर वर प्राप्त होईल. किंवा तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेटस कधीही दिलेल्या वेबसाईट वर जाऊन चेक करू शकता.

Legrand Company बद्दल माहिती

Legrand Empowering Scholarship Program द्वारे देशातील असंख्य गरीब होतकरू मुलींना मदत करणारी लेग्रांड ही इलेक्ट्रिकल आणि डिजिटल बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चरमधील जागतिक स्तराची कंपनी आहे. या कंपनीचे हेडक्वार्टर Limoges मध्ये असून Legrand 180 पेक्षा जास्त देशांमध्ये बाजारातील उपस्थिती सह 90 देशांमध्ये कार्यरत आहे.

Legrand उत्पादनांची विस्तृत श्रेणी ऑफर करते, याचबरोबर ऊर्जा वितरण, वायरिंग उपकरणे ,होम ऑटोमेशन, स्ट्रक्चर्ड केबलिंग, यूपीएस, लाईटिंग व्यवस्थापन उपाय, केबल व्यवस्थापन औद्योगिक अनुप्रयोग उत्पादने इलेक्ट्रिकल आणि डिजिटल बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चरमधील जागतिक तज्ञ असलेल्या लेग्रँड कंपनीने महिला विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, वित्त आणि विज्ञान या क्षेत्रांत भविष्यातील नेते बनण्यासाठी सक्षम बनवून लाखो भारतीय घरे उजळली आहेत. विविधता, समानता आणि समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रुप लेग्रँड इंडियाच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, शिष्यवृत्तीचे समर्थन भिन्न-अपंग मुलींना आणि LGBTQ+ समुदायांना दिले जाते. आजपर्यंत या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment