शेतकऱ्यांसाठी खुशखबर, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा चौथा हफ्ता बँक खात्यात जमा

राज्यातील असंख्य शेतकरी वर्गासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हफ्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. परळी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत चौथा हफ्ता आज राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला.

नमो शेतकरी योजना चोथा हफ्ता वितरीत, देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

राज्यातील बहुसंख्य शेतकरी नमो शेतकरी योजनेचा चौथा हफ्ता कधी येणार याची आतुरतेने वाट पाहत होते. आता त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे या हेतूने राज्य सरकारने केंद्र सरकारच्या (प्रधानमंत्री) पी एम किसान निधी योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची सुरुवात केली होती.

आधीचे बाकी असलेले हफ्ते सुद्धा वितरीत

या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्वच पात्र शेतकऱ्यांना आज चौथा हफ्ता वितरीत करून त्यांच्या शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या पैशांमध्ये एकप्रकारचा मोलाचा वाटा उचलला आहे. जा शेतकऱ्यांचे तांत्रिक अडचणींमुळे आधीचे हफ्ते बाकी होते, अशा शेतकऱ्यांना सुद्धा राहिलेले सर्व हफ्ते वितरीत करण्यात आले आहेत.

शासनाच्या शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना

राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत असते. नुकतीच एक महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने सुरू केली असून या योजनेचे नाव मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना असे असून या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे पुढील 5 वर्षाचे वीजबिल मोफत करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे. या योजनेमुळे राज्यातील बहुसंख्य शेतकरी बांधवांचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे.

परळी येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

परळी येथील कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील शेतकरी बांधवांना बऱ्याच दिवसापासून नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हफ्त्याची प्रतीक्षा होती. तांत्रिक अडचणीमुळे ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत काही हफ्ते मिळाले नाहीत, त्यांना सुद्धा ते मिळावे यासाठी सरकार युद्ध पातळीवर अंमलबजावणी करत असल्यामुळे या योजनेचा चौथा हफ्ता वितरीत करण्याच्या कमी विलंब झाला.


आता शेतकरी बांधव मिळालेल्या चौथ्या हफ्त्याचा निधी त्यांचा बँक खात्यात लागून पुरते सुखावले आहेत. आधी माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत आणि त्या पाठोपाठ आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून महायुती सरकारने सर्व जनतेला खुश केले आहे, हे मात्र नक्की

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment