उन्हाळ्यात फळपिके लागवड करून कमवा बक्कळ नफा, जाणून घ्या कोणती आहेत ही फळे

शेतकरी मित्रांनो जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात आपण आलो आहोत. आता लगबग सुरू आहे ती उन्हाळी पिकांची. आजचा हा लेख उन्हाळ्यात लागवड करून भरघोस उत्पन्न देणाऱ्या काही फळपिकांच्या लागवड विषयी आहेत. उन्हाळ्यात फळपिके लागवड करून तुम्ही अगदी अल्पावधीतच उत्पादन घेऊ शकाल. चला तर जाणून घेऊया कोणती आहेत ही फळे आणि उन्हाळ्यात फळपिके लागवड का फायदेशीर ठरेल याबद्दल सविस्तर माहिती अगदी सोप्या भाषेत.

द्राक्ष लागवड

उन्हाळी फळपिके लागवड करायची असल्यास तुम्ही द्राक्ष लागवडीला प्राधान्य देऊ शकता. द्राक्ष लागवड करण्यासाठी जानेवारी-फेब्रुवारी हे 2 महिने योग्य ठरतात. या द्राक्षापासून रस तसेच वाइन बनवण्यासाठी वापरतात. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या द्राक्ष लागवडीसाठी हवामान उष्ण आणि कोरडे लागते. तसेच जमीन पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी. द्राक्षांच्या गुणवत्तेनुसार त्यांना योग्य आणि फायदेशीर ठरणारा बाजारभाव हमखास मिळतो.

उन्हाळ्यात फळपिके लागवड करून कमवा बक्कळ नफा, द्राक्ष लागवड

पपई लागवड

उन्हाळी फळपिके लागवड करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत असलेल्या दुसऱ्या फळात पपई फळ येते. पपई हे एक असे फळ आहे की ज्या फळाला अगदी वर्षभर प्रचंड मागणी असते. उन्हाळ्यात फळपिके लागवड करताना जर तुम्ही पपई लागवड करण्याचा विचार करत आहात तर पुनर्लावणीसाठी योग्य वेळ जानेवारी-फेब्रुवारी महिना ही आहे. पपई या उन्हाळ्यात फळपिके लागवड साठी हलकी वाळूची जमीन आणि उबदार हवामान उपयुक्त ठरते. उन्हाळ्यात फळपिके म्हटले तर शेतकऱ्यांना पपई पिकाची नक्की आठवण होतेय पिकाचा कालावधी फक्त 6 ते 8 महिन्यांचा असतो, परिणामी उन्हाळ्यात फळपिके लागवड म्हटल की पपई या पिकाकडे अधिक उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून पहिल्या जाते.

संत्रा लागवड

प्रचंड मागणी असलेले हे फळ असून हिवाळ्यात याची मागणी मोठ्या प्रमाणात असते. संत्र्याची लागवड सुद्धा इतर उन्हाळी फळपिके लागवड करणाऱ्या इतर फळ पिकांसारखीच जानेवारी आणि फेब्रुवारी महिना ही योग्य आणि उपयुक्त अशी वेळ लागवड करण्यासाठी आहे. संत्रा किकला चिकणमाती आणि वाळू मिश्रित चिकणमाती आकाखा शेतजमिनीत अगदी उत्तम प्रकारे वाढून बक्कळ उत्पन्न मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या आवडीचे तसेच विश्वासाचे पीक आहे. आपल्याला माहीतच आहे की संत्रा या फळात क जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते. बाजारात संत्र्याची नेहमीच मोठ्या प्रमाणावर मागणी दिसून येते.

उन्हाळ्यात फळपिके लागवड करून कमवा बक्कळ नफा, संत्रा लागवड

ढगाळ वातावरणात फळपिकांची अशी घ्या काळजी

स्ट्रॉबेरी लागवड

शेतकरी मित्रांनो आजकाल स्ट्रॉबेरी पिकाला विशेष महत्व तसेच प्रचंड मागणी असल्यामुळे उन्हाळ्यात फळपिके लागवड करण्यासाठी तुम्ही स्ट्रॉबेरी लागवड करण्यास सुद्धा प्राधान्य देऊ शकता. मात्र हे पीक थंड हवामानाच्या ठिकाणी चांगल्याप्रकारे येते. उन्हाळी फळपिके लागवड म्हटल मी जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने लागवडीसाठी उकृष्ट असतात. स्ट्रॉबेरी लागवड करण्यासाठी जमीन ही 5.5 पीएच ते 6.6 पीएच सामू असलेली चिकांमातीची जमीन उपयुक्त ठरते. श्रीमंत लोकांचे आवडीचे लीक असल्यामुळे शहरातील मोठमोठे सुपरमार्केट तुमचे लोक सर्वोत्तम भावाला खरेदी करतात. याशिवाय अनेक व्यापारी स्ट्रॉबेरीची थेट खरेदी करतात. उन्हाळ्यात फळपिके लागवड करून बक्कळ नफा कमावण्यासाठी स्ट्रॉबेरी लागवड एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

केळी लागवड

आपल्या देशातील सर्वात जास्त आवडल्या जाणारे केळी हे फळ आहे. या फळात सेल्युलोज मुबलक प्रमाणात असून ते मानवी आरोग्यास अत्यंत लाभदायी असते. उन्हाळ्यात फळपिके लागवड करायचं म्हटल तर केळी पिकाचा विचार केला जाणार नाही हे शक्यच नाही. राज्यातच काय तर संपूर्ण राज्यात शेतकरी केळी लागवड करण्यास प्राधान्य देतात. चांगला नफा मिळवून देण्याचं सामर्थ्य असलेलं हे पीक आहे. मात्र ओलसर हवामानात हे पीक घेतल्या जात असून केळीसाठी खोल सुपीक शेतजमीन आवश्यक असते. केळी फळाला बाजारात सतत प्रचंड मागणी असल्यामुळे केली पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान होण्याचा धोका अगदीच नगण्य असतो. उन्हाळ्यात फळपिके लागवड करण्याचा विचार करणारे बहुसंख्य शेतकरी केली लागवडीकडे उत्पन्न देणारे पीक या नजरेने बघतात.

उन्हाळ्यात फळपिके लागवड करून कमवा बक्कळ नफा, केळी लागवड

फळबाग लागवड करण्यासाठी उपयुक्त माहिती

उन्हाळ्यात फळपिके लागवड करायचे जर तुम्ही पक्के ठरवले असेल तर काही महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

पूर्वमशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर फळझाडांच्या लागवड अंतराच्या शिफारशीनुसार योग्य लांबी, रुंदीचे खड्डे घेऊन हे खड्डे पोयटा माती, पालापाचोळा, शेणखत, जैविक खते, ट्रायकोडर्मा, सिंगल सुपर फॉस्फेट, शिफारशीत कीडनाशक पावडर यांच्या मिश्रणाने भरून घ्या.
शेतकरी मित्रांनो फळबाग लागवडीसाठी खड्डे काढण्यापूर्वी कोणत्या लागवड पद्धतीने लागवड करावयाची आहे, याचा विचार करून मगच त्यानुसार खड्डे खोदून घ्या. प्रत्येक पद्धतीत दोन झाडांतील अंतर आणि दोन ओळींतल्या अंतराप्रमाणे खड्डे काढा.

खडकाळ जमिनीत तब्बल 120 टन ऊसाचे उत्पादन घेणारा जिद्दी शेतकरी

फळबागेसाठी शक्‍यतो सपाट जमीन वापरा. जमिनीचा उतार 2 किंवा 3 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नसला पाहिजे हे सुद्धा लक्षात घ्या. ज्या जमिनीचा उतार 15 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे, त्या ठिकाणी टप्पे करून ठिबक सिंचन पद्धत वापर करून फळपिकांची लागवड करा.
जमिनीचा उतार दक्षिण-पश्‍चिम दिशेला असल्यास फळझाडांसाठी उत्तम राहील. याचे कारण सांगायचे झाल्यास पिकात हवा उष्ण व कोरडी राहून पीक चांगल्याप्रकारे उत्पादन मिळवून देते. एकदा का तुम्ही जमीन निवडली की मग जमिनीची चांगल्याप्रकारे मशागत करून घ्या. मातीचा प्रातिनिधिक नमुना घेऊन जमिनीची तपासणी सुद्धा करून घ्या. तसेच खतांचे योग्य नियोजन करणे सुद्धा आवश्यक आहे.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment

error: Content is protected !!