अबब! 8 फूट पाण्यात ज्वारीची शेती, मशागत खर्च नाही, भरघोस उत्पन्न

आज जागतिक स्तरावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसाय प्रगतिशील होत आहे. आज पृथ्वीवरच काय तर अंतराळात सुद्धा शेती करणे शास्त्रज्ञांनी शक्य केले आहे. आज आपण गुजरात जिल्ह्यातील तापी राज्यातील शेतकरी 8 फूट पाण्यात ज्वारीची शेती कशी करतात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. खरे तर अशी पाण्यात सुद्धा शेती केल्या जाते का यावर आपला विश्वास बसणे थोडे कठीण होऊन जाते. मात्र तापी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ही किमया करून दाखवली आहे.

अशा प्रकारच्या शेतीला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी या शेतकऱ्यांनी काय वेगळे केले याची माहिती निश्चितच तुम्हाला आवडेल याची खात्री आहे. 8 फूट पाण्यात ज्वारीची शेती करण्यासाठी येथील शेतकऱ्यांना काय कष्ट पडतात?, किती खर्च येतो?, तसेच त्यांचे नियोजन कसे असते इत्यादी सर्व बाबींचा उलगडा आपण या लेखातून करणार आहोत.

जमिनीची मशागत कशी करतात येथील शेतकरी?

तब्बल 8 फूट पाण्यात ज्वारीची शेती करण्यासाठी तापी जिल्ह्यातील शेतकरी शेतीची मशागत कशी करतात याबद्दल जाणून घेऊयात. तर या शेतीला कुठ्ल्याही प्रकारची मशागत करण्याची आवश्यकता पडत नाही. एकदा पेरणी केली की झाल काम. इतर सामान्य शेतकऱ्यांसारखे निंदणी, वखरणी, खुरपणी, फवारणी यांसारख्या मशागती कराव्या लागत नाही. 8 फूट पाण्यात ज्वारीची शेती करण्यासाठी खर्च सुद्धा फक्त पेरणीसाठी लागेल तेवढाच.

अबब! 8 फूट पाण्यात ज्वारीची शेती, मशागत खर्च नाही, भरघोस उत्पन्न

अशी होते पाण्याखालील पिकाची वाढ

तापी जिल्ह्यातील शेतकरी ही अचंभित करणारी 8 फूट पाण्यात ज्वारीची शेती करण्यासाठी जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत ज्वारीची लागवड करून घेतात. यानंतर मॉन्सूनची सुरुवात होते. पाऊस पडला की ज्वारीची रोपे उगवायला सुरुवात होते. ज्वारीचे हे पीक ऑगस्ट महिन्याच्या शेवटी साधारणपणे 3 ते 4 फूट वाढते. ज्वारीच्या पिकाचा वरचा भाग तयार झाला की ज्वारीचे रोपं हे पाण्याखाली असूनही योग्यरीत्या वाढू शकते कारण या पिकाची पाण्यात तग धरण्याची क्षमता जास्त असते. ज्वारीच्या पिकाच्या वरील भागास पिंनॅकल असे म्हणतात. ज्वारीच्या रोपात स्टार्क मुबलक प्रमाणात असते. कणीस भरण्यासाठी अन् त्यात दाणे तयार करण्यासाठी हे रोप या स्टार्कचा वापर करते.

ज्वारीच्या पिकाचे पहिले पान ज्याला फ्लॅग लिव्ह असे म्हणतात ते पान या संपूर्ण रोपाला मुख्य प्रकाश संशलेषण तयार करण्याचे कार्य करते. शेवटी पीक तयार होऊन कापणी करण्याची वेळ येते तेव्हा 4 ते 5 शेतकरी बोटीच्या साहाय्याने शेतात जातात आणि बोटीवर बसूनच कापणी करतात. ही कापणी थोडी वेळखावू स्वरूपाची असते. मात्र या 8 फूट पाण्यात ज्वारीची शेती करून मिळालेल्या ज्वारीचे दाणे हे टपोरे आणि चवीला अत्यंत गोड असतात. ज्यामुळे बाजारात या ज्वारीला चांगला भाव मिळतो.

अबब! 8 फूट पाण्यात ज्वारीची शेती, मशागत खर्च नाही, भरघोस उत्पन्न

पाण्यात शेती करण्याची कल्पना कशी सुचली?

तापी जिल्ह्यातील नदीकाठी शेती असणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांची शेती ही मागील 2 दशकांपासून पाण्याखाली असल्यामुळे पडून होती. मात्र मागील काही वर्षांपासून येथील शेतकरी ज्वारी, हरभरा आणि मका यांची लागवड करतात. या भागातील बहुतांश शेती ही उकाई पाणलोट क्षेत्रात येत असल्यामुळे येथील शेतकरी जून जुलै महिन्यात त्यांच्या शेतात पेरणी करतात. नंतर ज्वारीची रोपे काकट स्वरूपाची असल्यामुळे इतक्या पाण्यात सुद्धा जोमाने वाढतात.

जगातील सर्वात गरीब बुरुंडी देशात अशी करतात शेती, ऐकून व्हाल चकित

काढणी आणि एकूण एकरी उत्पादन

अशाप्रकारची कठीण मानल्या जाणारी शेती करून येथील शेतकरी चांगले उत्पन्न मिळवितात. 8 फूट पाण्यात ज्वारीची शेती करण्यासाठी इतर खर्च नसल्यामुळे फक्त लागवड करून मोकळे झालेले शेतकरी ज्वारीचं पिकं काढणी करण्यास योग्य झाले की लाकडी होडीच्या साहाय्याने कणीस कापणी करतात. एका एकरातील पिकाची काढणी करण्यासाठी या शेतकऱ्यांचे 10 ते 12 तास जातात. तब्बल आठ फूट पाण्यात ज्वारीची शेती करून तापी जिल्ह्यातील बरेच शेतकरी हे एकरी 10 ते 15 क्विंटल उत्पादन आरामात घेतात.

अशाप्रकारे या शेतकऱ्यांचे उत्पन्न या 8 फूट पाण्यात ज्वारीची शेती करून भरघोस वाढण्यास मदत होते. आधी काही शेतकऱ्यांनी हा प्रयोग करून पाहिला होता. पाण्यात केल्या जाणाऱ्या या शेतीतून चांगले उत्पादन मिळत असल्याचे बघून ज्या शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली असल्यामुळे पडीक पडून राहत होती त्यांनी सुद्धा आता त्यांच्या शेतीत लागवड करून चांगली आर्थिक मिळकत मिळवत आहेत, असे एका शेतकऱ्याने बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

जगातील सर्वात जास्त गव्हाचे उत्पादन घेणारे 5 देश

या पाण्यातील शेतीला काय म्हणतात?

शेतकरी मित्रांनो तापी जिल्ह्यातील शेतकरी अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने करत असलेल्या या शेतीला हायड्रोपोनिक्स शेती असे म्हणतात. तापी जिल्ह्यातील सुमारे 100 किलोमीटर लांबीचा परिसर हा पाण्याखाली येतो म्हणजेच पाणलोट क्षेत्रात येतो. या भागातील शेतकरी इतक्या विपरीत परिस्थितीत सुद्धा ज्वारी या पिकशिवाय ऊस आणि हत्ती गवताची लागवड करतात. मात्र ही 8 फूट पाण्यात ज्वारीची शेती करण्यासाठी या शेतकऱ्यांनी त्यांची विशिष्ट पद्धत तयार केली आहे.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment