शेतकरी कृषी फवारणी पंप अनुदान योजना, असा करा अर्ज

सुमारे 2 लाख लाभार्थ्यांची लॉटरी द्वारे निवड

राज्य सरकारद्वारा कापूस मुल्य साखळीसाठी १ लाख ६ हजार ३८९ आणि सोयाबीन मुल्य साखळीसाठी १ लाख ३० हजार ३८ असे मिळून एकूण २ लाख ३६ हजार ४२७ शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाच्या योजनेची घोषणा करण्यात आली होती. तसेच यासाठी कापूस आणि सोयाबीन मुल्य साखळीत एकूण ४ लाख ९४ हजार १०३ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. तर एकूण प्राप्त अर्जांपैकी १ लाख ९१ हजार १६९ शेतकऱ्यांची महाडीबीटी पोर्टलवर लॉटरीद्वारे निवड करण्यात आली आहे.

फवारणी पंप अनुदान योजना अंतर्गत फवारणी पंप वाटप

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ द्वारे या बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचा पुरवठा केला जाणार असल्याचे वृत्त आहे. तर सरकार या पंपाची ३ हजार ४२५ रूपये प्रमाणे खरेदी करणार आहे. महाराष्ट्र कृषी विकास महामंडळाकडून क्षेत्रीय स्तरावर या फवारणी पंपाचा पुरवठा केला जाणार असून ज्या शेतकऱ्यांचे सोडतीत नाव निघाले आहे अशा शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधायचा आहे.

शेतकऱ्यांसाठी हितावह निर्णय घेऊन त्यांचे कल्याण करण्यास राज्य सरकार नेहमीच तत्पर असते. फवारणी पंप सारख्या विविध कल्याणकारी योजना राबवून प्रशासन त्याची योग्यरित्या अंमलबजावणी करते आणि शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देते. अशा महत्वाकांक्षी योजनांद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळत असते. अशीच एक नवीन योजना आहे ज्यात शेतकऱ्यांना बॅटरी वर चालणारा फवारणी पंप अनुदान तत्वावर मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया याबद्दल अधिकची माहिती.

काय आहे फवारणी पंप बद्दलची योजना

शेतकऱ्यांना किटकांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतात फवारणी करणे आवश्यक असते. त्यासाठी शेतकऱ्यांना बटरीवर चालणाऱ्या फवारणी पंप ची गरज असते. हा फवारणी पंपासाठी आता शासनाकडून 50 टक्के अनुदान देत असते. या फवारणी पंपाचा लाभ घेण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी अर्ज मागविण्यात येतात. या कृषी योजनेचा लाभ घेऊ इच्छित शेतकऱ्यांनी याबाबत ऑनलाईन अर्ज करायचे असतात.

प्रधानमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून मिळवा भरघोस अनुदान, योजनेबद्दल संपूर्ण माहिती

फवारणी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता

१) अर्जदार शेतकऱ्याकडे आधार कार्ड असले पाहिजे.
२) अर्जदार शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे अगत्याचे आहे. त्यासाठी सातबाऱ्यावर नाव असणे गरजेचे आहे.
३) अर्जदार शेतकरी हा कृषि यांत्रिकीकरण योजनेचा पूर्व लाभार्थी नसावा.
४) अर्जदार शेतकऱ्याने याअगोदर कोणत्याही शासकीय योजनेतून फवारणी पंप करिता अनुदान घेतलेले नसावे.

सौर घर मोफत वीज योजना मार्फत बसवा सोलर पॅनल, संपूर्ण खर्च शासन करेल

अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी

ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे(Battery Operated Sprayer Pump Yojana Online Application)

१) योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकर्‍याचे आधार कार्ड
२) अर्जदार शेतकर्‍याचे रहिवासी प्रमाणपत्र
३) शेतकरयाच्या बँकेचातपशील म्हणजे बँक पासबुक
४) अर्जदार शेतकऱ्याच्या जातिचा दाखला. (अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी लागू असल्यास)
५) अर्जदाराचा आधार सोबत लिंक असलेला मोबाईल क्रमांक

योजनेअंतर्गत फवारणी पंप साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख

राज्य सरकारद्वारे कृषी योजनांच्या माध्यमातून बॅटरीवर चालणारे स्वयंचलित फवारणी पंप यांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना वित्तीय वर्ष २०२४-२५ साठी अर्ज सादर कण्याचे सरकारकडून निवेदन करण्यात आले आहे. सदर अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ऑगस्ट आहे याची सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. सदर अर्ज हे शासनाच्या अधिकृत संकेतस्थळ महाडीबीटी पोर्टल वर करायचे आहेत. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा यासंबंधी खाली सविस्तर माहिती दिलेली आहे.

फवारणी पंपसाठी अर्ज करण्याची पद्धत

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकरी महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतात.
सदर पोर्टल ची लिंक खालीलप्रमाणे आहे.
https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login
सदर संकेतस्थळ हे शेतकऱ्यांसाठी निर्माण करण्यात आले असून त्यामध्ये शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करून इच्छुक शेतकरी विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

फवारणी पंप अनुदान योजना अंतर्गत फवारणी पंप वाटप 2024

या संकेतस्थळावर अर्ज करण्यासंबंधी महत्वाच्या सूचना

सर्वात आधी अर्जदार शेतकऱ्याला महाडीबीटी पोर्टल वर जाऊन शेतकरी नवीन नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे लागेल. नंतर तुम्ही जो मोबाइल नंबर दिलेला आहे त्यावर एक OTP येईल. यासाठी आपण दिलेला मोबाइल क्रमांक आधार सोबत लिंक असणे गरजेचे आहे. त्यानंतर त्यांना त्यांची आवश्यक ती माहिती भरावी लागेल. त्यांची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना शेतकरी लॉग इन पर्यायावर क्लिक करावे लागेल. यशस्वीरीत्या लॉग इन केल्यानंतर अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर नवीन विंडो उघडुन त्यात कृषी यांत्रिकीकरण बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर मुख्य घटक निवडा हा पर्यायावर क्लिक करावे लागेल. नंतर अवजारे आणि उपकरणे यावर क्लिक करून पीक संरक्षण अवजारे निवडावे लागेल. त्यानंतर यंत्र प्रकार शेतकऱ्यांना दिसेल त्यात विविध प्रकारच्या पंपंची यादी दिसेल. त्यापैकी एक पंप निवडून नियम आणि अटी स्वीकारून अर्ज सबमिट करा पर्यायावर क्लिक करावे लागेल. शेवटी अर्जासाठी लागणारे शुल्क भरून तुमचा अर्ज यशस्वीरीत्या भरल्या गेला असल्याची नोटिफिकेशन तुमच्या दिलेल्या मोबाइल नंबरवर तुम्हाला प्राप्त होईल.

राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल चे महत्व

आपण जर एक जागरूक शेक्तती असाल तर आपले सरकारच्या या अधिकृत वेबसाईटवर नक्कीच नोंदणी करून झालेली असेल. कारण सरकारच्या या अधिकृत संकेतस्थळावर आपल्याला सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेकानेक कल्याणकारी योजनांची माहिती मिळेल. आणि थेट अर्ज करून विविध शेतीच्या उपयोगाची उपकरणे आणि औजारे यांचा लाभ घेता येईल. शेतकऱ्यांना कुठ्ल्याही योजनांची सविस्तर माहिती आपल्याला या संकेतस्थळाच्या माध्यमातून सरकार पुरवत असते. आणि जागरूक नागरिक वेळोवेळी या पोर्टल वर लॉग इन करून नवीन नवीन योजनांचा लाभ सुद्धा घेत असतात. फक्त फवारणी पंपच नाही तर ट्रॅक्टर अनुदान योजना, ठिबक सिंचन योजना, तुषार सिंचन योजना, अनेक बियाण्याची अनुदान योजना यांसारख्या विविध योजनांचा लाभ आपल्याला शासनाच्या महाडीबीटी पोर्टकवरून घेता येऊ शकतो.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment