राहुरी कृषी विद्यापीठाचे 18 सुधारित वाण देशपातळीवर प्रसारित

आपल्या राज्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या विविध पिकांच्या 18 वाणांना नवी दिल्ली येथील कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या भारत सरकारच्या गॅझेटमध्ये अधिसूचित करण्यात आले असून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या शास्त्रज्ञांना त्यांच्या यशाची जणू पोचपावती मिळाली आहे. राहुरी कृषी विद्यापीठाचे 18 सुधारित वाण देशपातळीवर प्रसारित करण्यात आल्यामुळे विद्यापीठात आनंदाचे वातावरण आहे.

सुधारित वाणांचे महत्व

सर्वच शेतकरी बांधवांना सुधारित वाणाचे महत्व माहीत आहेच. जमिनीचा प्रकार तसेच त्या त्या भागातील हवामान यानुसार योग्य सुधारित वाणाची निवड करून शेती केल्यास उत्पादनात भरघोस वाढ होऊन शेतकऱ्यांच्या हाती दोन पैसै येतात. पारंपरिक बियाणे वापरून बहुधा शेतकऱ्यांच्या नशिबात नुकसानच जास्त येत असल्याचे आपणाला बघायला मिळते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे राज्यातील एक अग्रगण्य कृषी विद्यापीठांपैकी एक अग्रगण्य विद्यापीठ असून आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी अनेक शेतीविषयक संशोधने करून शेती करण्यास लाभदायक अशा तंत्रज्ञानाचा शोध या राहुरी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी आपल्या अपार कष्टाने संशोधन करून साकार केला आहे.

राहुरी कृषी विद्यापीठाचे 18 सुधारित वाण देशपातळीवर प्रसारित

राहुरी कृषी विद्यापीठाचे 18 सुधारित वाण हे आहेत

भाताचे सुधारित वाण- फुले कोलम
मक्याचे सुधारित वाण- फुले उमेद व फुले चॅम्पियन
ज्वारीचे सुधारित वाण – फुले पूर्वा
करडईचे सुधारित वाण – फुले भूमी
तूरीचे सुधारित वाण – फुले पल्लवी
मूगाचे सुधारित वाण – फुले सुवर्ण
उडदाचे सुधारित वाण – फुले राजन
राजमा पिकाचे सुधारित वाण – फुले विराज
ऊसाचे सुधारित वाण – फुले 15012
घेवड्याचे सुधारित वाण – फुले श्रावणी
गव्हाचे सुधारित वाण – फुले अनुराग
कापसाचे सुधारित वाण – फुले शुभ्रा
टमाटरचे सुधारित वाण- फुले केसरी
चेरी टोमॅटोचे सुधारित वाण – फुले जयश्री
घोसाळे पिकाचे सुधारित वाण – फुले कोमल
वाल/ घेवडा पिकाचे सुधारित वान – फुले सुवर्ण

राहुरी कृषी विद्यापीठाचे 18 सुधारित वाण देशपातळीवर प्रसारित केल्यानंतर कुलगुरूंच्या भावना

शेतकरी मित्रांनो राहुरी कृषी विद्यापीठाचे 18 सुधारित वाण देशपातळीवर प्रसारित झाल्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले असून त्यांनी म्हटले आहे की, “महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सर्वांत जास्त वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारित झाल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. तसेच विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या दृष्टीकोनातून ही फार मोठी गौरवास्पद गोष्ट आहे. दिवसरात्र मेहनत घेऊन विद्यापीठाचे शास्त्रज्ञ शेतकरी वर्गाच्या कल्याणासाठी संशोधन करीत आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीविषयक समस्या दूर करण्यासाठी तसेच नवनवीन शेतीच्या तंत्रज्ञानाचा शोध घेऊन कृषी विद्यापीठ सदैव तत्पर आहे.” शेतकरी मित्रांनो देशपातळीवर राहुरी कृषी विद्यापीठाचे 18 सुधारित वाण प्रसारित होणे ही राज्याच्या विविध कृषी विद्यापीठासाठीच नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी एक अभिमानास्पद बाब आहे.

हरभऱ्याच्या या सुधारित जाती देतील प्रचंड उत्पादन, जाणून घ्या संपूर्ण माहिती

राहुरी कृषी विद्यापिठाविषयी माहिती

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम 1967 अन्वये 1968 साली महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना झाली होती. स्थापनेच्या वेळीच या विद्यापीठास आद्य समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांचे नाव देण्यात आले होते. पंजाबराव कृषी विद्यापीठ अधिनियम 1968 अन्वये वरील महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियमात सुधारणा करण्यात आली. कृषिशिक्षणास विशेष सवलती लाभून कृषिविज्ञानाचा विकास साधणे हा अधिनियमातील सुधारणा करण्यामागील उद्दिष्ट आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात पश्चिम महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नासिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सगळ्या जिल्ह्यांचा समावेश होतो.

राहुरी कृषी विद्यापीठाचे उद्दिष्ट काय आहे?

राज्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कृषिशिक्षण, संशोधन आणि विस्तार या तिन्ही गोष्टींची सांगड घालून कृषिव्यवसायातील समस्यांचे निवारण करणे, हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

कृषी विद्यापीठात अंतर्भूत अभ्यासक्रम आणि सुविधा

महात्मा फुले कृषी विद्यापीठाची पाच घटक महाविद्यालये असून राहुरी येथे पदव्युत्तर शिक्षण संस्था आहे. पदवीपूर्व शिक्षण हे पुणे, धुळे व कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयांतून दिले जाते. विद्यापीठाची स्थापना केल्यानंतर शिक्षणपद्धती तसचं मूल्यमापनाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झालेले आहेत. विद्यापीठामध्ये 1968 पासून पदवीपर्यंतच्या शिक्षणक्रमात त्रिसत व अंतर्गत मूल्यमापन पद्धती अवलंबिण्यात आली होती. त्रिसत्र पद्धतीमध्ये प्रत्यक्ष शेतावर काम करण्याच्या कालमर्यादेत वाढ करण्यात आली असून कार्यानुभवाचा अभ्यासक्रम सुद्धा समाविष्ट करण्यात आला होता. अलीकडेच राहुरी कृषी विद्यापीठाचे 18 सुधारित वाण देशपातळीवर प्रसारित करण्यात आले आहेत.

नंतर सन 1975-76 पासून द्विसत्र पद्धत आणि अंतर्गत मूल्यमापन पद्धती पदवीपूर्व तसेच पदव्युत्तर महाविद्यालयामध्ये लागू करण्यात आली. शिक्षणक्रमातील 10+2+3 या नव्या आकृतिबंधामुळे कृषिशिक्षणाची 1977-78 साली पुनर्रचना करण्यात आली होती. यानुसार बारावीनंतर पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा कालावधी तीन वर्षे करण्यात आला होता. विद्यापीठाने 1983-84 सालापासून 10+2+3 हा आकृतिबंध बदलला आणि त्याऐवजी 4 वर्षांची पदवीपूर्व अभ्यासक्रम सुरू केला आहे. विद्यापीठात ग्रामसेवक आणि सहायक ग्रामसेवक यांचा अनुक्रमे एक वर्ष व सहा महिन्यांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. आता राहुरी कृषी विद्यापीठाचे 18 सुधारित वाण देशपातळीवर प्रसारित केल्यामुळे विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

याशिवाय कुशल कारागिरांना तंत्रज्ञानाची माहिती देणारा एक वर्षाचा प्रशिक्षण कार्यक्रम मांजरी (पुणे) येथे सुरू करण्यात आला असून सकस आहार योजनेमार्फत विद्यापीठीय क्षेत्रातील ग्रामीण भागात काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्याचे प्रशिक्षणवर्गही आयोजित केले जातात. कृषिविस्तार शिक्षण हे राहुरी कृषी विद्यापीठाचे प्रमुख कार्य आहे. प्रात्यक्षिके, सहली, मेळावे इत्यादींचा वापर करून आधुनिक कृषितंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यात येतो. अशातच राहुरी कृषी विद्यापीठाचे 18 सुधारित वाण देशपातळीवर प्रसारित झाल्यामुळे कृषी विद्यापीठाचे महत्व पुन्हा एकदा उघड झाले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment