आजकाल बऱ्याच शेतजमिनी क्षारपड होताना दिसत आहेत. यामागे काय कारणे आहेत तसेच या जमिनीचा क्षार कमी करण्यासाठी क्षारपड जमिनीत कोणती पिके घ्यावी जेणेकरुन जमिनीचा क्षार कमी होतो याबद्दल महत्वपूर्ण आपण आजच्या या लेखातून पाहणार आहोत. हा लेख संपूर्ण वाचल्यानंतर जमिनीचा क्षार कमी करण्यासाठी क्षारपड जमिनीत कोणती पिके घ्यावी या महत्वाच्या प्रश्नाचं लाभदायक उत्तर मिळेल याची शाश्वती आहे. मात्र यासाठी शेतजमीन क्षारपड होण्याची कारणे काय असतात याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.
शेतजमीन क्षारपड का होते? ही आहेत कारणे
तुम्ही तुमच्या शेतात सतत जास्त पाणी लागणारे उस या पिकासारखे पीक घेत असाल तसेच वर्षानुवर्षे शेतातील पिकांची फेरपालट करत नसाल तर तुमची शेतजमीन क्षारपड झालीच म्हणून समजा. याचे शास्त्रीय कारण म्हणजे आपल्या राज्यातील जमिनी अग्निजन्य बेसाल्ट खडकापासून बनलेल्या आहेत. परिणामी त्या शेतजमिनीत अल्कधर्मीय खनिजांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. वारंवार एकच पीक घेतल्याने किंवा जास्त पाणी लागणारे पीक शेतजमीनीत घेतल्याने खालच्या थरावरील आहेत खडकांचे विघटन होते. या खनिजांच्या विघटनानंतर त्यांमधून निघालेले मुक्त क्षार जमिनीत साचतात. आणि जमिनीत क्षाराचे प्रमाण वाढते. जमिनीचा क्षार कमी करण्यासाठी क्षारपड जमिनीत कोणती पिके घ्यावी हे सांगण्याआधी जमीन क्षारपड का होते हे तुमच्या लक्षात आलेच आहे तर जमिनीतील क्षार कमी कसे करावे याबद्दल थोड मार्गदर्शन करूच द्या म्हणतो.
या शेतकऱ्यांचे पी एम किसान योजनेचे पैसे कायमचे बंद होणार
जमिनीचा क्षार कमी करण्यासाठी काय करता येईल?
शेतकरी मित्रांनो जमिनीचा क्षार कमी करण्यासाठी क्षारपड जमिनीत कोणती पिके घ्यावी या प्रश्नाकडे वळण्याआधी आपली जमीन क्षारयुक्त झाली आहे हे कसे ओळखावे आणि जमिनीतील या क्षारांचे प्रमाण कमी कसे करता येईल याबद्दल माहिती असू द्या. जमिनीच्या पृष्ठभागावर पांढऱ्या क्षाराचा पांढरा थर जमा होतो. अन् निरीक्षण करायची बाब म्हणजे यामुळे जमिनीचा सामू 8.5 पेक्षा कमी असतो. तसेच जमिनीत असणाऱ्या विद्राव्य क्षाराची विद्युतवाहकता चार डेसी सायमन प्रती मीटरपेक्षा अधिक असते. विनिमय युक्त सोडियम प्रमाण 15 %जास्त नसते.
जमिनीतील क्षाराचे प्रमाण वाढलेल्या शेतजमिनीच्या क्षाराचे प्रमाण कमी करण्यासाठी शेतजमिनींची योग्यप्रकारे मशागत करून 1% उतार द्यावा लागेल. आणि शेती उताराच्या आडव्या दिशेने योग्य अंतरावर चार करावे लागतील. शेतीला पुरेसे पाणी देऊन क्षाराचा निचरा चाराद्वारे शेतजमिनीच्या बाहेर काढावा लागेल. आणि लक्षात घ्या जमिनीतील क्षारांचे प्रमाण कमी करण्यासाठी पिकांची फेरपालट करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. फेरपालटीत हिरवळीची पिके जी असतात त्यांची लागवड करा. याशिवाय सहनशील पिके घ्या. तुमचे बागायती शेत पडीक ठेवण्याची चूक करू नका. आपली शेतजमीन नेहमी लागवडीखाली असली पाहिजे. स्वतः एखाद्या वर्षी करणे शक्य नसेल तर कुणाला करायला द्या मात्र जमीन पडीक पाडू नका. जमिनीचा क्षार कमी करण्यासाठी क्षारपड जमिनीत कोणती पिके घ्यावी याची माहिती आपण घेणार आहोतच.
शेतात विरघळणारे क्षार काढून टाकण्यासाठी शेतात 20 गुंठ्यांचे लहान लहान वाफे तयार करून आणि चांगल्या ओलिताच्या पाण्याचा वापर करून विद्राव्य क्षारांचा निचरा करा. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी 20 ते 25 टन प्रति हेक्टर सेंद्रिय खते मिसळा. क्षारपड शेतजमिनीच्या कसदरपणात सुधारणा करण्यासाठी सच्छिद्र पाईप निचरा प्रणालीचा वापर करा. या पद्धतीचा वापर केल्यास तुमच्या शेतजमिनीत हवा खेळती राहण्यास मदत होईल. एवढेच नाही तर यामुळे शेतजमिनीचा पोत सुधारेल तसेच पाणी मुरण्याचा वेग वाढतो पिकाच्या कार्यक्षमतेत वाढ होते.शेतात पिक अतिशय चांगल्या प्रकारे येईल.असे केल्यास जमिनीवर क्षार साठवण्याची क्रिया मंद होऊन जमीन लागवडीस कार्यक्षम होईल. आता आपण मुख्य माहितीकडे वळूया, म्हणजेच जमिनीचा क्षार कमी करण्यासाठी क्षारपड जमिनीत कोणती पिके घ्यावी तुम्हाला प्रतीक्षा असलेल्या आपल्या लेखाच्या उत्तरार्धाकडे जाऊया.
इस्रायलचे सिंचन व्यवस्थापन कसे फायदेशीर आहे जाणून घ्या
शेतात घ्या ही क्षार सहनशील पिके
शेतकरी मित्रांनो जमिनीचा क्षार कमी करण्यासाठी क्षारपड जमिनीत कोणती पिके घ्यावी याबाबत आता आपण उपयुक्त माहिती जाणून घेणार आहोत.
तुम्हाला जर माहीत नसेल की कोणती अन्नधान्ये पिके क्षार संवेदनशील असतात, तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की उडीद, तूर, हरभरा, मूग, वाटणा, तीळ इत्यादी पिके ही क्षार सहन करण्यास सक्षम असतात. याशिवाय मध्यम सहनशील अन्नधान्य पिकांबाबत सांगायचे झाल्यास गहू, बाजरी, मका, मोहरी, करडई, सोयाबीन, सूर्यफूल, जवस इत्यादी पिके मध्यम सहनशील असतात. तसेच जास्त सहनशील असणारी पिके ऊस, कापूस, भात, ज्वारी इ. असतात.
याशिवाय भाजीपाला पिकांचा विचार केल्यास चवळी, मुळा, श्रावणघेवडा इ.पिके क्षार संवेदनशील असतात. तसेच कांदा, बटाटा, कोबी, टोमॅटो, गाजर इ. पिके मध्यम सहनशील असतात.तसेच पालक, शुगरबीट इ. पिके जास्त सहनशील असतात.
अन्नधान्य आणि पालेभाज्या पिकांबबत आपण माहिती घेतली. आता फळपिकांकडे लक्ष केंद्रीत करूया.
लिंबूवर्गीय फळझाडे क्षार संवेदनशील असतात. तर मध्यम सहनशील पिकांत आंबा, चिकू, डाळिंब, अंजीर, पेरू, द्राक्ष इ. पिकांचा समावेश होतो. आणि नारळ, बोर, खजूर, आवळा हे पिके जास्त सहनशील असतात. संवेदनशील पिकांची लागवड करू नये. शक्यतो मध्यम किंवा जास्त सहनशील पिकांची लागवड केल्यास जमिनीचा क्षार तर नियंत्रित होतोच, शिवाय भरघोस उत्पन्न सुद्धा मिळते. शेतकरी मित्रांनो आपण जमिनीचा क्षार कमी करण्यासाठी क्षारपड जमिनीत कोणती पिके घ्यावी हा लेख संपूर्ण वाचला. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.