राज्यातील असंख्य शेतकरी पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता केव्हा मिळणार यासाठी आतुरतेने वाट पाहत असून या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे. मात्र एक महत्वाचं काम केलं नाही तर पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता मिळणार नाही त्यामूळे ही बातमी संपूर्ण वाचून राहिलेले काम पूर्ण करून घ्या.
केंद्रीय कृषीमंत्र्यांनी सांगीतली तारीख
बिहारमधील पटणा येथे कर्पूरी ठाकूर यांच्या 102 व्या जयंती निमित शुक्रवारी कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता केव्हा मिळणार असा प्रश्न विचारला त्यांनी पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता दिनांक सांगून टाकला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 19 वा हफ्ता दिनांक 24 फेब्रुवारी रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहारमध्ये १९ व्या हप्त्याचं वितरण करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे.
हे काम केले नाही तर मिळणार नाही पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता
सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची माहिती आहे. शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता मिळविण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी. तसेच पीएम किसान योजनेच्या लाभाची स्थिती तपासण्यासाठी योजनेच्या अधिकृत https://pmkisan.gov.in वेबसाईटवर जाऊन होमपेजवरील फार्मर कॉर्नर या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर स्टेटस जाणून घ्या या विकल्पावर क्लिक करा. त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर टाकून खाली कॅपचा नंबर दिलेला असेल तो जसाच्या तसा टाका. यानंतर गेट ओटीपीवर या बटणावर क्लिक करून तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी दिलेल्या रकान्यात व्यवस्थित टाका. एवढी प्रक्रिया पूर्ण केली की तुम्हाला पीएम किसान योजनाच्या मागील सर्व हप्त्याचा तपशील पाहता येणार आहे.
पीएम किसान योजनेची रक्कम वाढून 10 हजार होणार?
राज्यातीलच नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांकडून पीएम किसान योजनेच्या मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी केल्या जात आहे. यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतुदीसह पीएम किसानचा निधी वार्षिक 10 हजार रुपये करण्यात यावा, अशी मागणी होताना दिसून येत आहे. या मागणीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मान देऊन शेजाऱ्यांना नवीन अर्थसंकल्पात हे गिफ्ट देतात का याकडे संपूर्ण देशातील शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे. मात्र पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी मिळेल हे नक्की.
शेतकरी ओळखपत्र (फॉर्मर आयडी) घरबसल्या असा काढा ऑनलाईन
या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून वगळण्यात येणार
शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता दिनांक आपल्याला माहीत पडला आहे. मात्र आता या योजनेतून काही शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे. तर हे शेतकरी कोणते आहेत याची माहिती बघुया. सदर योजनेंतर्गत 2019 पूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या नावावार शेत जमिनीची नोंद आहे फक्त अशाच शेतकऱ्याच्या कुटुंबातील पती-पत्नीपैकी एकाला आणि 18 वर्षांवरील मुलांना लाभ मिळेल असा नियम आहे.
परंतु सध्या राज्यासह देशभरातील बरेच शेतकरी 2019 नंतर शेतजमीन नावावर झालेले शेतकरी तसेच त्याच शेतकऱ्यांची माहेरकडील जमीन नावावर असल्याने त्यांची पत्नी असे एकच कुटुंबातील दोघेही पती पत्नी पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घेत असल्याचे सरकारी यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे. परिणामी अशा बोगस शेतकऱ्यांना या कल्याणकारी योजनांतून वगळण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने ही नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे.
नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा पुढील हफ्ता या दिवशी मिळणार
अधिकृत वेबसाईट वर ही एक चूक केली तर हफ्ता कायमचा बंद होणार
पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता दिनांक कोणता आहे याची माहिती आपण घेतली. मात्र आता जे लाभार्थी पीएम किसान योजनेच्या ऑनलाईन वेबसाईटचा वापर करतात त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे. मोदी सरकारने 2016 साली शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली पीएम किसान सन्मान निधी योजना ही संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त आणि सहाय्यकारी ठरत आलेली आहे. मात्र पीएम किसान ची वेबसाईट आल्यापासून बऱ्याच शेतकऱ्यांची चुकून एक चूक होत आहे. ज्यामुळे पीएम किसान योजनेचे पैसे कायमचे बंद होत आहेत. घाबरु नका मात्र तुमच्या हातून सुद्धा ही चूक होऊ नये यासाठी ही चूक नेमकी आहे तरी काय हे जाणून घेऊया.
साईट वरील या नवीन पर्यायाचा चुकीने झालेला वापर पैसे बंद होण्यास कारणीभूत ठरू शकतो. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर नव्याने Voluntary Surrender of PM-KISAN benefits हा पर्याय समाविष्ट करण्यात असून अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकून या पर्यायाचा वापर केल्या गेल्याने हे लाभार्थी योजनेसाठी अपात्र ठरत आहेत. एकदा का चुकून शेतकऱ्यांनी voluntary surrender म्हणजेच शेतकऱ्याने स्वतः च्या इच्छेने केलेले योजनेच्या लाभाचा त्याग असा त्याचा अर्थ होत असून चुकून या पर्यायाचा वापर शेतकऱ्याच्या हातून झाल्यास अशा लाभार्थ्यांना पुन्हा नव्याने अर्ज सुद्धा करता येत नाही. त्यामुळे पीएम किसान योजनेचे पैसे कायमचे बंद होतात. हे सर्व टाळण्यासाठी आणि पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता तसेच भविष्यातील सर्वच हफ्ते मिळविण्यासाठी ही योजनेची अधिकृत वेबसाईट काळजीपूर्वक हाताळा.