पी एम किसान आणि नमो शेतकरी महा सन्मान योजनेबद्दल अत्यंत महत्वाचा अपडेट: नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान आणि नमो शेतकरी महा सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2-2 हजार म्हणजेच एकूण 4 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. मात्र आता या दोन्ही योजनेची नवीन नियमावली लागू केली असून या नवीन नियमांमुळे अनेक शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार नाही. कोणते आहेत ते शेतकरी जे यापुढे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेसाठी अपात्र ठरतील तसेच काय आहेत पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या हे नवीन नियम, चला सविस्तर जाणून घेऊयात.
दोन्ही योजनांमुळे शेतकऱ्यांना मिळतो आर्थिक आधार
देशातील करोडो शेतकऱ्यांना पीएम किसान तसेच राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान योजना अंतर्गत आर्थिक मदत देण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या या कल्याणकारी योजनेनंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांना वर्षात तीन टप्प्यात 6000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात वाटप केल्या जातात. केंद्र सरकारच्या धरतीवरच महाराष्ट्र सरकारने राज्यातील असंख्य शेतकऱ्यांचे आर्थिक हित लक्षात घेऊन नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकार सुद्धा नमो शेतकरी महासन्मान योजनेतून पात्र शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ पुरवीत आहे.
दोन्ही योजनेसाठी नवीन नियमावली जाहीर
केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना या दोन्ही योजनांसाठी आता नवी नियमावली शासनाकडून लागू करण्यात आली असून या नवीन नियमानुसार वारसा हक्क वगळता ज्यां शेतकऱ्यांनी सन 2019 आधी जमीन खरेदी केली असेल अशा सर्व शेतकऱ्यांना आता पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान या दोन्ही योजनेचा लाभ मिळू शकणार नाही.
याशिवाय आता पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करताना पात्र शेतकऱ्यांना पती पत्नी आणि मुलांचेही आधार जोडणे अनिवार्य असणार आहे. सातबारावर नाव असणाऱ्या कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनांचा लाभ मिळणार आहे. शासनाकडून लागू करण्यात आलेल्या या नव्या नियमानुसार लाभार्थ्यांच्या यादीतून अपात्र शेतकऱ्यांची नावे वगळण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
या कारणांमुळे नवी नियमावली केली लागू
तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल की इतक्या वर्षांनी नवीन नियमावली लागू करण्यामागे सरकारचा काय उद्देश असेल बरं? तर या प्रश्नाचे उत्तर आहे की पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान या दोन्ही योजनांचा लाभ अनेक बोगस शेतकरी घेताना सरकारच्या निदर्शनास आले आहे. केंद्र सरकारने 2019 मध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने पीएम किसान सन्मान योजना सुरू होती.
सदर योजनेंतर्गत 2019 पूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या नावावार शेत जमिनीची नोंद आहे फक्त अशाच शेतकऱ्याच्या कुटुंबातील पती-पत्नीपैकी एकाला आणि 18 वर्षांवरील मुलांना लाभ मिळेल असा नियम आहे. परंतु सध्या राज्यासह देशभरातील बरेच शेतकरी 2019 नंतर शेतजमीन नावावर झालेले शेतकरी तसेच त्याच शेतकऱ्यांची माहेरकडील जमीन नावावर असल्याने त्यांची पत्नी असे एकच कुटुंबातील दोघेही पती पत्नी पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घेत असल्याचे सरकारी यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे. परिणामी अशा बोगस शेतकऱ्यांना या कल्याणकारी योजनांतून वगळण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने ही नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे.
वारसाहक्काचा सविस्तर नियम घ्या जाणून
शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नाही याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
नव्या नियमावलीनुसार पात्र लाभार्थी शेतकऱ्याचे निधन झाले असेल आणि वारसा हक्काने 2019 नंतर सुद्धा जमिनीची नोंद झाली असेल, तरी असे वारसा हक्काने सात बारा उताऱ्यावर नाव काय शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लाभ मिळणार आहे. कुटुंबाची व्याख्या पती पत्नी आणि 18 वर्ष खालील अपत्ये. तुम्हाला समजण्यास सोप्पे व्हावे यासाठी एक उदाहरण देऊन सांगणे उचित ठरेल समजा एका शेतकऱ्याकडे 1 एकर शेतजमीन आहे. आणि त्याला एकूण चार मुले आहेत. त्या चारपैकी एक मुलगा 18 वर्षापेक्षा कमी वयाचा असून बाकी मुले सज्ञान म्हणजेच 18 वर्षांवरील आहेत.
समजा त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. आता त्या मृत शेतकऱ्याच्या नंतर त्याच्या चारही मुलांची आणि पत्नीची वारसा हक्काने नोंद केल्या जाईल. आता त्या एक एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्याच्या सात बारा उताऱ्यावर एकूण 5 सदस्यांचे वारसाहक्काने नाव आले असेल. अशावेळी त्या मृत शेतकऱ्याची पत्नी, त्याचा लहान मुलगा यांचे एक कुटुंब ग्राह्य धान्यात येऊन सदर शेतकऱ्याच्या पत्नीला पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल.
आता त्याची तीन मुले सज्ञान आहेत त्यामुळे त्यांनी जर या योजनेसाठी अर्ज सादर केला तर त्यांचे तिघांचे सुद्धा वेगवेगळे कुटुंब (लग्न झाले नसेल तरीही, मात्र सात बारा उताऱ्यावर नाव असेल तरच) ग्राह्य धरल्या जाऊन त्यांना तिघांना सुध्दा पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान या दोन्ही योजनांचा लाभ मिळू शकेल.
हे शेतकरी ठरणार अपात्र, होऊ शकते कार्यवाही
एकच कुटुंबातील पती आणि पत्नी यांच्या दोघांच्याही नावावर स्वतंत्र (वेगवेगळ्या) सात बाऱ्यावर जरी नाव असेल तरीही त्या दोघांपैकी नवरा किंवा बायको यापैकी कुण्या एकाच व्यक्तीला लाभ घेता येईल. दोन्ही व्यक्तींना लाभ मिळणार नाही. यामध्ये जर पती पत्नी दोघेही पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान या दोन्ही योजनांचा लाभ घेताना आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.
रब्बी हंगामासाठी 100 टक्के अनुदान असलेली बियाणे अनुदान योजना, असा करा ऑनलाईन अर्ज
याशिवाय सरकारी किंवा निमसरकारी नोकरी करत असलेले किंवा आयकर भरत असलेल्या शेतकरी या योजनांचा लाभ घेऊ शकणार नाहीत. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी 2019 नंतर शेती विकत घेतली असेल अशा शेतकऱ्यांना सुद्धा पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नाही.
चिपळूण तालुक्यातील 1800 अर्ज नामंजूर
पीएम किसान आणि नमो सन्मान योजनेच्या नवीन नोंदणीसाठी शासनाकडून नवीन नियमावली लागू करण्यात आली असून त्यामुळे या दोन्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या चिपळूणमधील 1800 शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. काही पती-पत्नींच्या २०१९ नंतर जमीन नावे झालेले तसेच माहेरकडील जमीन नावावर आहे, म्हणून पती-पत्नी अर्ज नोंदणी करून या योजनेचा लाभ घेत आहेत. ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर लाभार्थींचे निधन झाले असेल तर वारसा हक्काने जमिनीची नोंद झाली असल्यास पती किंवा पत्नी पैकी एकालाच या योजनेचा लाभ मिळत असतो.