लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन अर्जाची स्थिती अशी घ्या जाणून

“लाडकी बहिण योजना” चा ऑनलाईन अर्ज केला आहे तर मग ऑनलाईन अर्जाची स्थिती अशी घ्या जाणून
सध्या सर्वत्र “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” ची चर्चा सुरू असून जवळपास सव्वा कोटी महिलांनी या योजनेत ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट केलेले आहेत. बऱ्याच महिलांनी या योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या नारी शक्ती अधिकृत ॲप मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला आहे. तरीही बऱ्याच महिलांना ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केलेली त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती समजण्यास कठीण वाटत आहे. तर आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना संबंधी ऑनलाईन अर्ज केलेल्या महिलांनी अर्जाची स्थिती कशी जाणून घ्यायची याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

माझी लाडकी बहिण योजना काय आहे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना द्वारे एकनाथ शिंदे यांनी पात्र महिलांना दरमहा 1500 रू मानधन देण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने सर्व महिला वर्ग ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत व्यस्त आहेत कारण येत्या रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजेच १९ऑगस्ट ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित दोन हफ्ते एकुण 3000 रू जमा करणार आहेत.
ज्या महिलांनी नारी शक्ती ॲप वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केले आहेत त्यांना त्यांचा अर्जासमोर खालील प्रमाणे ऑप्शन दिसत आहेत. ते ऑप्शन काय आहेत याबद्दल सामान्य महिलांना समजेल अशा स्वरूपात माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

माझी लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज स्थिती कशी पहावी याबद्दल मार्गदर्शन

Pending To Be Submitted (माझी लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज स्थिती)

काही महिलांच्याअर्जासमोर Pending to be submitted असा दाखवत आहे, याचा अर्थ असा आहे की आपण अर्ज ऑनलाईन पद्धतीने यशस्वीरीत्या जमा केला आहे परंतु सध्या तो पडताळणी साठी संबधित अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला नाही. जर आपल्याही अर्जात Pending to be submitted अस दाखवत असेल तर अजिबात घाबरायच कारण नाही. थोड्याच दिवसात आपला अर्ज सुद्धा पडताळणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे जाणार आहे आणि त्या अर्जाची पडताळणीची पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे.

In Review (माझी लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज स्थिती)

ज्या महिलांच्या ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जासमोर In Review अस लिहून येत आहे त्याचा अर्थ हा आहे की अशा महिलांचा अर्ज पडताळणीसाठी प्रक्रियेत आहे आणि लवकरच अर्ज मंजूर की नामंजूर अस पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ॲप वर कळविण्यात येणार आहे. सध्या सर्वच अर्ज पडताळणी चे काम सुरू असल्यामुळे या प्रक्रियेत काही आठवडे सुद्धा लागू शकतात. त्यामुळे महिलांनी जास्त मानसिक ताण न घेता अर्जाची पुढील स्थिती येईपर्यंत वाट पाहायची आहे.

Approved (माझी लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज स्थिती)

ज्या महिलांच्या ऑनलाईन अर्जासमोर Approved अस लिहिलेलं आहे त्यांच्यासाठी आता खरी खुशखबर आहे. अशा सर्व महिलांचा ऑनलाईन अर्ज आहे मंजूर झाला असा त्याचा अर्थ असून अशा महिलांना आता काहीच करायची गरज नसून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असा त्याचा अर्थ आहे

घरेलु कामगार महिलांना मिळणार घरगुती भांडी संच, काय आहे मोलकरीण योजना

Disapproved (माझी लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज स्थिती)

ज्या महिलांच्या ऑनलाईन अर्जासमोर Disapproved अस लिहून येत आहे अशा महिलांसाठी मात्र थोडीशी चिंतेत टाकणारी बाब आहे. Disapproved चा अर्थ असा होतो की तुमचा ऑनलाईन अर्ज नामंजूर झाला आहे. तरीही अशा महिलांनी एकदमच निराश होण्याची काही गरज नाही. आपण अर्जासोबत प्रविष्ट केलेल्या कागदपत्रांमध्ये काहीतरी त्रुटी असल्यामुळे आपला अर्ज जरी नामंजूर झाला असला तरीही अशा महिलांना पुन्हा योग्य कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी काही दिवसांची सवलत देण्यात येणार आहे. या दिवसांमध्ये आपण कागदपत्रात असलेल्या त्रुटी दूर करून पुन्हा कागदपत्रे नारी शक्ती ॲप मध्ये पुन्हा सबमिट करायचे आहेत. म्हणजे पुन्हा आपल्या अर्जाची पडताळणी करून योग्य कागदपत्रे असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ दिल्या जाणारच आहे.

Rejected (माझी लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज स्थिती)

ज्या महिलांच्या ऑनलाईन अर्जासमोर Rejected असे लिहिलेले आहे अशा महिला मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना साठी पात्र नाहीत असा त्याचा अर्थ आहे. अशा महिलांना पुन्हा अर्ज करता येणार नाही किंवा अर्जात बदलही करता येणार नाही. परिणामी ज्या महिलांचा ऑनलाईन अर्ज Rejected आहे अशा महिलांना माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेता येणार नाही.

सर्वसामान्य महिलांना पडणारे काही सामान्य प्रश्न

ग्रामीण भागात बऱ्याच महिलांना एक प्रश्न पडला आहे की ऑनलाईन पद्धतीने नारी शक्ती ॲप वर अर्ज केल्यानंतर पुन्हा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे का? तर या बाबतीत जर तुम्ही नारी शक्ती ॲप वर यशस्वीरीत्या ऑनलाईन अर्ज सादर केला असेल तुम्हाला पुन्हा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अजिबात गरज नाही. ज्या महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येत नाहीत, अशा महिला वंचित राहू नयेत म्हणून त्यांच्यासाठी सरकारने त्यांचे अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने भरुज घेण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका , ग्रामसेवक तसेच इतर अधिकाऱ्यांकडे दिली आहे.

ज्या महिलांनी सदर ॲप वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज यशस्वीरीत्या दाखल केला असेल अशा महिलांना अंगणवाडी सेविका किंवा इतर कुणाकडेही ऑफलाईन अर्ज देण्याची गरज नाही. मात्र शासनाच्या इतर विभागाकडून ज्या महिला लाभ घेत आहेत, (उदा. पीएम किसान योजनेची लाभार्थी महिला) अशा महिलांना ऑफलाईन अर्ज अंगणवाडी सेविका/ग्रामसेवक/आशा स्वयंसेविका यांच्यापैकी कोणाही कडे सबमिट करायचा आहे.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment