घरात नवीन पाळणा हलण्याचा आनंद कुणाला शब्दात सांगता येणे शक्य नाही. अशा संपूर्ण परिवारात जणू स्वर्गमय चैतन्यरूपी वातावरण असते. आता तुमचा पुत्रप्राप्ती चा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी सरकारकडून चक्क 6 हजार रुपये बाळंतीण महिलेच्या बँक खात्यात या योजनेद्वारे जमा करण्यात येतात. सदर योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना. चला तर या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
महिला सशक्तीकारणावर शासनाचा भर
केंद्र आणि राज्य सरकार नेहमीच महिलांचे बळकटीकरण आणि आर्थिक सक्षमीकरण करण्यावर भर देत असते. देशातील तसेच राज्यातील महिलांसाठी केन्द्र तसेच राज्य शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. सध्या चर्चेत असलेली तुफान प्रसिद्ध झालेली राज्य सरकारची माझी लाडकी बहिण योजना याच एक उदाहरण आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सुमारे अडीच कोटी महिलांना मासिक दीड हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. अशा प्रकारे राज्यातील महिलांना अनेकानेक लोकोपयोगी योजनांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होताना दिसून येतो. अशीच एक कल्याणकारी योजना आहे ती प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना.
प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना मार्फत बाळंतीण महिलेला थेट तिच्या खात्यात 6 हजार रुपयांचे आर्थिक मदत अनुदान स्वरूपात देण्यात येते.
“प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना” चे उद्दिष्ट काय आहे?
राज्यात बरेच परिवार हे मोलमजुरी करून चरितार्थ चालविणारे आहेत. त्यांना बाळाचा जन्म झाल्याच्या अवस्थेत आर्थिक अडचणी येतात. दवाखान्यात खूप खर्च होतो. अशा परिस्थितीत त्यांच्या नवजात बाळांना योग्य पोषण मिळाले पाहिजे. या काळात आईची आणि बाळाची योग्यरित्या काळजी घेतल्या गेली पाहिजे.
गर्भवती महिलांची योग्य पद्धतीने काळजी न घेतल्याने त्यांचे होणारे बाळ कुपोषित राहण्याचा धोका संभवतो. या काळात अशा नवीन जन्मलेल्या बाळांना आणि आईला अनेक दुर्धर आजार होण्याचा संभव असतो. परिणामी त्यांच्या आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी घेण्यासाठी ही आर्थिक मदत करण्यात येत आहे. गर्भवती महिला आणि त्यांच्या बाळांना सृदृढ आणि उत्कृष्ट दर्जाचे पोषण मिळावे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
एकूण तीन टप्प्यात मिळतात या योजनेचे पैसे
प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना लाभाचे पैसे एकूण तीन टप्प्यात लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा होतात. पहिल्या टप्प्यात 1 हजार रूपये आणि दुसऱ्या तसेच तिसऱ्या टप्प्यात प्रत्येक वेळी 2…2 हजार रुपये मिळतात. तसेच उर्वरित 1 हजार रुपये संबंधित सरकारी दवाखान्याकडून देण्यात येतात.
👉 हे सुध्दा वाचा
महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत, जाणुन घ्या संपूर्ण माहिती
कधी झाली प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेला सुरुवात?
१ जानेवारी २०१७ रोजी केंद्र सरकार द्वारा या योजनेचा प्रारंभ झाला आहे. पीएम मातृत्व वंदना योजनेचे लाभार्थी होण्यासाठी काही पात्रता आहेत. त्या खालीलप्रमाणे
१) लाभ घेण्यासाठी गरोदर महिलेचे वय १९ पेक्षा जास्त असावे. म्हणजेच महिला प्रौढ असावी
२) सदर महिला किंवा तिचे कुटुंब आयकर भरत नसावी.
३) सदर महिलेचे बँकेत खाते असावे.
४) सदर महिलेने गरोदरपणाच्या काळात योग्य सरकारी किंवा खासगी रुग्णालयात अर्भकाची सोनोग्राफी द्वारे डॉक्टरांच्या कडून तपासणी केलेली असावी.
५) फक्त पहिल्या अपत्या साठीच सदर योजनेचा लाभ देण्यात येतो.
6) दुसरे अपत्य जर मुलगी असेल तरच या योजनेचा लाभ मिळतो. दुसरे अपत्य मुलगा असल्यास सदर योजनेचा लाभ घेता येत नाही.
प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना साठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी
१)रहिवासी प्रमाणपत्र
२)शिधापत्रिका
३) बँक पासबुक
४)दवाखान्याचे प्रमाणपत्र
५) पासपोर्ट आकाराचा फोटो
अशाच कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
सर्व महिलांनी सजग होऊन अशा प्रकारच्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन वेळोवेळी प्रशासनाकडून करण्यात येते. प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेच्या माध्यमातून सदर बाळंतीण महिलेला आणि तिच्या नवजात शिशुला चांगले पोषण मिळणे शक्य होऊन आर्थिक अडचणींच्या या काळात एक आर्थिक आधार मिळतो.
या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे?
प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना अंतर्गत लाभाचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
सदर अर्ज हा गावातील आशा सेविका किंवा सरकारी दवाखान्यात करावा लागतो. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली की तुम्हाला मातृत्व वंदन योजनेच्या माध्यमातून थेट महिलेच्या बँक खात्यात 6 हजार रुपये जमा होतात.
या योजनेबद्द्दल अधिक माहिती कोठे मिळेल?
प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेत पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया तसेच इतर महत्त्वपूर्ण माहितीसाठी पुढील वेबसाईट ल7 भेट द्यावी.
https://web.umang.gov.in/landing/department/pmmvy.html
या संकेतस्थळावर आपल्याला इत्यंभूत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.