जिकडे तिकडे माझी लाडकी बहिण योजनेची चर्चा सुरू असताना सरकारने आता सर्व लाडक्या बहिणीसाठी एक खुशखबर जाहीर केली आहे. लाडकी बहिण योजनेचे एकूण 2 हफ्ते महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. माझी लाडकी बहिण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हफ्ता कधी मिळेल याविषयीं महिलांसाठी एक महत्वाची बातमी आहे.
महिलांना आर्थिक पाठबळ मिळावे या उद्देशाने राज्य सरकारने माझी लाडकी बहिण योजना कार्यान्वित केली आहे. माझी लाडकी बहिण योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता देखील कधी मिळणार याबद्दल महत्वपूर्ण माहिती हाती आली आहे.
याआधी पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित दोन हफ्ते पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता मात्र लाडकी बहिण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हफ्ता कोणत्या तारखेला मिळणार याबद्दल लाडक्या बहीणी प्रतीक्षा करत आहेत. त्यांच्यासाठी हे योजनेंतर्गत मिळणारे मासिक दीड हजार रुपये खूप आहेत. घरखर्च भागविण्यासाठी हे पैसे अत्यंत लाभदायक ठरत असल्याचे अनेक महिलांनी बोलून दाखवले आहे.
माझी लाडकी बहिण योजनेचा ऑक्टोबर अआणि नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता जर तुम्हाला तुमच्या बँक खात्यात पाहिजे असेल तर तुमचे बँक खाते आधार सोबत लिंक केलेले असणे अनिवार्य आहे. कारण माझी लाडकी बहिण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हफ्ता सुध्दा dbt प्रणालीद्वारे थेट महिलांचा बँक खात्यात जमा केला गेला आहे.
दोन महिन्यांचे एकत्रित दोन हफ्ते या दिवशी मिळणार
अजित पवार यांची जनसन्मान यात्रा बीड जिल्ह्यातील परळी येथे होती. या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, ही योजना पाच वर्षे अशीच पुढे सुरू राहील. तसेच भाऊबीजेची ओवाळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये १० ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील अशी घोषणाहीअजित पवार यांनी केली.
माझी लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकार झाले सक्रिय
मागील महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण 6 महत्वाचे फेरबदल करण्यात आले असून नियमांत शिथिलता आणली होती त्यामुळे जास्तीत जास्त महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या. या बैठकीत खालील 6 फेरबदल करण्यात आले होते. तसेच माझी लाडकी बहिण योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळण्याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली आहे.
या योजनेबद्दल महत्वाची माहिती
माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील मुली महिलांना देण्यात येत आहे. माझी लाडकी बहिण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हफ्ता मिळण्यासाठी राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांनी बँक खाते आधार सोबत लिंक करण्यासाठी बँकांत एकच गर्दी केली आहे. महिलांना अर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी मदत म्हणून ही महत्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली आहे. सदर योजनेचा लाभ अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलाच घेऊ शकतात.
इतके दिवस चालणार माझी लाडकी बहिण योजना
लाडकी बहिण योजना संदर्भात विरोधकांनी वेळोवेळी अनेक टीकास्त्र झाडले तरीही त्यांच्या टीकेला न जुमानता महायुती सरकारने योजनेच्या कालावधी बद्दल महत्वाची माहिती दिली आहे. या योजनेसाठी पुढील एक वर्षाचा वित्त विभागाकडून निधी मंजूर करण्यात आला असून माझी लाडकी बहिण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हफ्ता मिळावा यासाठी वाट पाहत असलेल्या महिलांना सांगून टाकले आहे मी किमान पुढील 6 महिने तरी या योजनेचे पैसे मिळणार म्हणजे मिळणारच. पुढे जर महायुती सरकार सत्तेत आले तर ही योजना पाच वर्षांसाठी सुरू राहणार असल्याचे मध्यंतरी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले होते.
आज रोजी राज्यातील या योजनेचा अर्ज मंजुर झालेल्या 2 कोटीहून अधिक महीला माझी लाडकी बहिण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हफ्ता मिळण्याची तारीख बद्दल आशावादी आहेत. असंख्य महिला या योजनेतून मिळणाऱ्या तिसऱ्या हफ्त्याच्या रक्कमची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी ही आनंददायी बातमी आहे.
मागील महीन्यात या योजनेसंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
१) माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी आता बँक पोस्ट खाते सुद्धा ग्राह्य धरण्यात येईल.
२)महिलेचा परराज्यात जन्म झाला आहे पण सध्या ती लग्न करून महाराष्ट्रात राहत असेल तर पतीचे कागदपत्रे जोडून अशा महिलेला माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ देण्यात येईल
३) ग्रामस्तरीय बैठकीत आता दर शनिवारी पात्र लाभार्थी महिलांच्या याद्या वाचून दाखवाव्या लागणार आहेत आणि चुकदुरुस्ती सुद्धा करून घेण्यात येणार आहे.
४)केंद्र सरकारच्या योजनेचा सध्या लाभ घेत असलेल्या महिलांना सुद्धा माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळण्यासाठी ग्राह्य धरण्यात आले आहे पण अशा महिलांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.
५)ज्या महिलांचे नुकतच लग्न झाले आहे अशा महिलांना तत्काळ राशन कार्ड मध्ये नाव समाविष्ट करणे एकदम शक्य होत नाही म्हणूनच सरकारने अशा महिलांना सुद्धा नियमांत सुत दिली असून आता अशा महिलांना त्यांच्या पतीचे नाव आधारकार्ड वर असेल तरी अशा नवविवाहित महिला माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. त्यांना फक्त आधार कार्ड अन् विवाह नोंदणी दाखला या दोन कागदपत्रांची पूर्तता राशन कार्ड वरील त्यांच्या नाव नसल्यामुळे करावी लागणार आहे.
6) या योजने अंतर्गत आशा स्वयंसेविका यांना सुद्धा एक गोड बातमी सरकारने घेतलेल्या आजच्या बैठकीतील निर्णयामध्ये दिलेली आहे. महाराष्ट्रतील सर्व आशा स्वयंसेविका यांना सानुग्रह अनुदान योजना कार्यान्वित करण्यात आली आहे ज्यामध्ये ऑन ड्युटी अपघाती मृत्यू झाल्यास सदर आशा स्वयंसेविका ला 10 लाख तसेच अपंगत्व आल्यास 5 लाखाची रक्कम मिळणार आहे
हे सुध्दा वाचा👉
मोबाईलवरून घरबसल्या चेक करा ई श्रम कार्ड योजनेचे पैसे
सर्वसामान्य जनतेची कागदपत्रांसाठी झालेली धावपळ, अनेक शासकीय कर्मचारी, सीएससी ऑपरेटर नी केलेली लूट याकडे सरकार गांभीर्याने दखल घेत आहे. सर्व महिलांचा समावेश माझी लाडकी बहिण योजनेत व्हावा या दृष्टीकोनातून सरकारने सर्वच कठीण कागदपत्रे यांचे निकष बदलून सर्व महिलांकडे सहजासहजी उपलब्ध असतील अशा कागदपत्रांची अट ठेवून सर्व लाडक्या बहिणीसाठी अत्यंत सोयीस्कर अशी माझी लाडकी बहिण योजना ची अंमलबजावणी करण्यात येत आह
या तारखेला मिळाला माझी लाडकी बहिण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हफ्ता
माझी लाडकी बहिण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हफ्ता आपल्या बँक खात्यात कधी जमा होईल याबद्दल सर्व लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. अशा लाडकी बहिण योजना अंतर्गत पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे. काही मीडिया रिपोर्ट नुसार माझी लाडकी बहिण या महत्वाकांक्षी योजनेचा तिसरा हफ्ता येत्या 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केल्या गेला, अस अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केले.
ज्या महिलांना त्यांचे बँक खाते त्यांच्या आधार सोबत सीड (seed) केलेले नाही त्यांनी ते करून घ्यावे. तसेच तुमचे बँक खाते निष्क्रिय असेल तर बँकेत जाऊन ekyc करून ते सक्रिय करून घ्यावे. म्हणजे ऐनवेळी योजनेचे पैसे थेट तुमच्या बँकेत यायला कुठलाही अडथळा येणार नाही.