मागील काही वर्षांपासून महिला सबळीकरणावर सरकारचा विशेष भर आहे. महिलांची आर्थिक, सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा, हा उद्देश समोर ठेवून शासनाने लखपती दिदी ही योजना सुरू कार्यान्वित आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना १ ते ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे. परंतु, लखपती दिदी ही योजना फक्त बचत गटाशी संबंधित महिलांसाठीच आहे. आज आपण लखपती दीदी योजनेसंबंधी संपुर्ण माहिती सविस्तर पाहणार आहोत. लखपती दिदी योजनेचे उद्दिष्ट, योजनेचे स्वरूप, योजनेत सामाविष्ट घटक, योजनेसाठी असलेली पात्रता, योजने अंतर्गत अर्थसहाय्य मिळण्यासाठी लागणारी कागदपत्रे या सर्वच बाबतीत सखोल मार्गदर्शन तुम्हाला या लेखातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
लखपती दीदी योजनेचे स्वरूप आणि उद्दिष्ट
देशातील आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या महिलांसाठी केंद्र सरकारकडून कार्यान्वित करण्यात आलेली योजना म्हणजे लखपती दिदी योजना केंद्र सरकारने महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी लखपती दीदी ही एक महत्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे. या योजने अंतर्गत बचत गटातील महिलांना रोजगार निर्मितीसाठी एक ते पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. याशिवाय महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सक्षम करण्यासाठी विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महिलांचे जीवनमान उंचावून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे हा लखपती दिदी योजनेच्या अंमलबजावणीचा मुख्य उद्देश आहे. तत्कालीन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या भाषणात ०१ फेब्रुवारी २०२४ रोजी स्पष्ट केले होते की,देशात ९ कोटी महिलांचा समावेश असलेले सुमारे ८३ लाख बचत गट ग्रामीण सामाजिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम होत आहेत. आतापर्यंत लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून १ कोटी महिलांना लाभ देण्यात आला आहे. केंद्र सरकार कडून लखपती दिदी योजनेचे उद्दिष्ट २ कोटी संख्येवरून ३ कोटी महिला इतके करण्यात आले आहे.
लखपती दिदी योजनेत समाविष्ट बाबी
पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात लखपती दिदी योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत देशभरातील खेड्यातील 3 कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणात महिलांना प्लंबिंग, एलईडी बल्ब बनवणे आणि ड्रोन चालवणे आणि दुरुस्ती करणे अशा विविध रोजगार विषयक कौशल्यांचे प्रशिक्षण देणे इत्यादी बाबी सामाविष्ट आहेत. सदर योजना प्रत्येक राज्यातील स्वयं-सहायता बचत गटांमार्फत चालविली जाते. त्यामुळे फक्त बचत गटाच्या महिलांसाठी हा योजनेची संरचना करण्यात आली आहे.
लखपती दिदी योजनेमार्फत देशातील विविध राज्यातील बचत गटाच्या सदस्य असलेल्या महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने 1 ते 5 लाख रुपये पर्यंत त्यांच्या बचत गटामार्फत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. आजपर्यंत असंख्य महिला सदर कल्याणकारी योजना कार्यान्वित झाल्यामुळे स्वयंरोजगार प्राप्त करून त्यांची आर्थिक भरभराटी झाली आहे.
लखपती दिदी योजनेसाठी लागणारी पात्रता
लखपती दीदी या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेसाठी पात्रतेच्या अटी शर्ती आणि निकष प्रत्येक राज्यांमंध्ये काही प्रमाणात विभिन्न आहेत. त्यामुळे या योजनेच्या पात्रतेचे सामान्य निकष समजून घ्या.
1) लाभार्थी महिला संबंधित राज्याची रहिवाशी असावी.
2) सदर अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा अधिक नसावे.
3)या योजने अंतर्गत अर्ज करणाऱ्या महिलेचे वय 18 ते 50 या वयोगटातील असणे आवश्यक आहे.
4) या योजनेसाठी अर्ज करणारी महिला बचत गटाची सदस्य असणे (या योजनेच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभासाठी) बंधनकारक आहे.
लखपती दीदी योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
1) अर्जदार महिलेचे आधार कार्ड
2) अर्जदार महिलेचे अधिवास प्रमाणपत्र
3) अर्जदार महिलेचे पॅन कार्ड
4) अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र
5) शैक्षणिक कागदपत्रे
6) महिलेचे बँक खाते
7) पासपोर्ट आकाराचा फोटो
8) अर्जदार महिलेचा मोबाइल क्रमांक
9) शपथपत्र किंवा हमीपत्र
10) अर्जदार महिला बचत गटाशी संबंधित असल्याचा पुरावा
11) राशन कार्ड
लखपती दिदी योजनेमार्फत कर्ज आणि प्रशिक्षण इत्यादी लाभ मिळविण्यासाठी अर्ज कसा करायचा
- या योजनेचा लाभ मिळवू इच्छित असणाऱ्या महिलांनी बचत गट सुरू करणे अनिवार्य आहे. त्या अंतर्गत अशा महिलांना ‘सेल्फ हेल्प ग्रुप’ व्यवसाय योजना तयार करावी लागेल.
- तुमचा व्यवसाय आराखडा तयार करून झाल्यानंतर तुमच्या बचत गट मार्फत हा आराखडा आणि अर्ज सरकारकडे पाठवायचा आहे.
- तुम्ही एकदा लखपती दीदी योजने अंतर्गत अर्ज सादर केला की त्या अर्जाचे मूल्यमापन केल्या जाईल. तुम्ही योजनेसाठी आवश्यक अटी, निकष आणि पात्रता या सर्व बाबतीत पूर्तता केली असल्यास तुमचा अर्ज स्वीकारण्यात येईल. तुमचा अर्ज पास झाला तर तुम्ही लखपती दिदी योजनेअंतर्गत मिळणारे बिनव्याजी कर्ज तसेच रोजगार विषयक प्रशिक्षण या विविध सवलतींचा लाभ घेऊ शकता.
- या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात 5 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्जही पुरविण्यात येते.
लखपती दीदी योजनेद्वारे मिळणारे लाभ
महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने एखाद्या व्यवसायात आपले भाग्य अजमावू पाहणाऱ्या इच्छुक बचत गटातील सदस्य स्त्रियांना व्यवसाय व्यवसायातील बारकावे तसेच व्यवसाय वृद्धीसाठी लागणारे कौशल्य यासंबंधी योग्य मार्गदर्शन विविध ट्रेनिंग पुरवून या योजनेतून मार्गदर्शन केल्या जाते.
देशातील स्त्रियांना अर्थार्जन करता यावे यासाठी आर्थिक साक्षरता कार्यशाळांचे आयोजन केले जाते. या ट्रेनिंग सत्रांत त्यांना बजेट, गुंतवणूक, काटकसर व बचत, नियोजन इत्यादी व्यवसायाशी संबंधित बाबींची इत्यंभूत माहिती पुरविण्यात येते.
लखपती दीदी योजना मार्फत सरकार लघु कर्ज सुद्धा उपलब्ध करून देत असल्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील महिलांना लघु उद्योग, सुरू करणे सुलभ होते.
लखपती दीदी योजनेअंतर्गत स्त्रियांसाठी अत्यल्प दरात विमा संरक्षण सुद्धा प्रदान करण्यात येते. परिणामी अशा स्त्रियांच्या परिवाराला सुरक्षा सुरक्षा कवच प्राप्त होते.
महिलांच्या उत्पादनाची विक्री मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी महिलांना विविध प्रकारच्या बाजार विषयक सवलती तसेच मार्गदर्शन देण्यात येते.
अशाप्रकारे केंद्र सरकारकडून विविध प्रकारच्या सोयी सवलती उपलब्ध करून देण्यात येतात त्यामुळे बचत गटातील महिलांना रोजगार निर्मितीसाठी मोलाचा हातभार लागतो.
लखपती दिदी योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया
या योजने अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट
तुम्हाला जर लखपती दिदी योजनेत ऑनलाईन अर्ज सादर करायचा असेल तर पुढे दिलेल्या वेबसाईट वर जावे लागेल. सदर वेबसाईटची लिंक https://lakhpatididi.gov.in/how-do-i-become-a-lakhpati-didi/ ही असून या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला सर्वप्रथम तुमची नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी साठी तुम्हाला रजिस्टर या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आधार कार्डचा क्रमांक टाकून तुमच्या आधार सोबत संलग्न मोबाइल नंबरवर आलेला OTP टाकून एकदा तुमची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर त्यांनंतर तुमच्या समोर एक अर्ज उघडेल. हा अर्ज तुमच्या बचत गटामार्फत भरल्या जाणार आहे हे लक्षात घ्या.
हा अर्ज भरताना तुम्हाला तुमची अन् तुमच्या बचत गटाची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. तसेच वर दिलेले आवश्यक कागदपत्रे तुम्हाला सदर वर अपलोड करावे लागतील. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली की तुम्हाला सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्ही नोंदणी करतेवेळी दिलेला मोबाइल नंबर आहे त्यावर एक OTP येईल. हा OTP टाकून तुम्ही अर्ज यशस्वीरीत्या सादर करू शकता. एकदा अर्ज सादर केला की तो तुम्ही सदर वेबसाईटवर ट्रॅक सुद्धा करू शकाल. तुमचा अर्ज मंजूर किंवा नामंजूर झाल्याचा इमेल तसेच तुमच्या मोबाइल वर याबाबत संदेश सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल.
अर्ज सादर करण्याची ऑफलाईन पद्धत
सदर योजने अंतर्गत तुम्हाला जर ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असेल तर तुमच्या जिल्ह्यातील लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योग विभागाशी संपर्क करावा लागेल. सदर कार्यालयात तुम्हाला या योजनेचा ऑफलाईन अर्ज प्राप्त होईल. तो अर्ज तुमच्या बचत गटामार्फत पूर्णपणे भरून तुम्हाला जिल्हा स्तरावरील कार्यालयात सादर करता येईल. मात्र अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्रे सादर करायला विसरू नका. तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येईल तसेच 1 ते 5 लक्ष रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज सुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल.
मोलकरीण योजना अंतर्गत महिलांना मिळत आहेत 10 हजाराची घरगुती भांडी, असा करा अर्ज
पीएम मोदींनी केले 11 लाख लखपती दीदी महिलांना प्रमाणपत्र वितरीत
देशभरातील ११ लाख लाखपती दिदींना जळगावातील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २५ ऑगस्टला प्रमाणपत्र वाटप केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १.०४ लाख लखपती दीदींना समावेश आहे. याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी २५०० कोटी रुपयांचा फिरता निधी प्रदान केला होता. एकूण ४.३ लाख बचत गटांच्या अंदाजे ४८ लाख सदस्यांना याचा लाभ देण्यात आला.
लखपती दीदी योजनेत महाराष्ट्र राज्य पाचव्या क्रमांकावर
एनडीए सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या कार्यकाळात ११ लाख लखपती दीदी तयार करण्याचे सरकारचे ध्येय होते. मात्र अद्यापपर्यंत १५ लाख लखपती दीदी तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये आपले राज्य पाचव्या क्रमांकावर आहे. प्रमुख राज्ये खालील प्रमाणे आहेत.
बिहार – १,८१,२६० महिला
उत्तरप्रदेश – १,७३,५२० महिला
पश्चिम बंगाल – १,७०,४०० महिला
आंध्रप्रदेश – १,२२,२६० महिला
महाराष्ट्र – १,०४,५२० महिला
नाशिक जिल्ह्यात 52 लाख लखपती दीदी
नाशिक जिल्ह्यात वार्षिक एक लाख रुपयांपेक्षा जास्त कमावत असलेल्या महिलांना लखपती दीदी अशी ओळख निर्माण करत आहेत. यंदाच्या वर्षासाठी एक लाख ११ हजार महिलांना लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट असून, यांपैकी आतापर्यंत ५२ हजार महिलांचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय उद्दिष्ट
मालेगाव (नऊ हजार ८००), बागलाण (आठ हजार ६१६), त्र्यंबकेश्वर (सहा हजार ३२), येवला (सहा हजार ५४९), नांदगाव (सहा हजार ४३६), इगतपुरी (सहा हजार ४७३), सिन्नर (सात हजार ५२४), देवळा (सहा हजार ४९८), चांदवड (सहा हजार ६६०), सुरगाणा (पाच हजार ६४), पेठ (सहा हजार ५१३), नाशिक (नऊ हजार ४८), दिंडोरी (आठ हजार ५९०), निफाड (नऊ हजार ८३६), कळवण (सात हजार ७६०).
2023 पर्यंत एक कोटीच्या वर लखपती दीदी महिलांची झाली संख्या
२०२३ पर्यंत १ कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेअंतर्गत महिलांना वेगवेगळे स्किल ट्रेनिंग देऊन त्यांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत केली जाते.या योजनेत महिलांना १ ते ५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. विशेष म्हणजे या लखपती दीदी योजनेमध्ये मिळणाऱ्या कर्जावर कुठल्याही प्रकारचे व्याज आकारल्या जात नाही.
लखपती दीदी योजनेचा प्रारंभ कधी झाला?
मोदी सरकारने १५ ऑगस्ट २०२३ रोजी ही योजना सुरु केली होती. या योजनेत महिलांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षण तर दिले जाते शिवाय आर्थिक सहाय्य सुद्धा देण्यात येते. लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून महिलांना १ ते ५ लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तसेच या कर्जावर कोणत्याही प्रकारचे व्याज लागत नाही. या योजनेअंतर्गत महिलांना ट्रेनिंग देण्यात येते. या ट्रेनिंग मध्ये त्यांना अनेक गोष्टी शिकवल्या जातात. तसेच व्यवसाय कसा करायचा याबाबत टीप्स सुद्धा दिल्या जातात. चला तर जाणून घेऊया लखपती दीदी या महत्वाकांक्षी योजनेविषयी सविस्तर माहिती.