इस्रायलचे सिंचन व्यवस्थापन आहे जगात उत्कृष्ट, संपूर्ण सिंचन प्रणालीविषयी माहिती

बारामती कृषी प्रदर्शन 2025 मध्ये इस्रायलचे सिंचन व्यवस्थापन दाखविण्यात आले त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात इस्रायलचे सिंचन व्यवस्थापन भारताच्या सिंचन व्यवस्थेपेक्षा किती वेगळे तसेच किती प्रगत आहे? तसेच सिंचनाचे इस्रायली मॉडेल नेमके आहे तरी काय? या सर्व गोष्टींबद्दल कुतूहल निर्माण झाले. इस्रायल हा देश रेताळ तसेच खडकाळ भूपृष्ठ लाभलेला देश आहे. असे असूनही जिद्दीच्या जोरावर आणि योग्य धोरण राबवून या राष्ट्राने शेती क्षेत्रात दैदिप्यमान प्रगती केली आहे.

तर आजच्या या माहितीपूर्ण लेखातून या इस्रायल सिंचन व्यवस्थापन पद्धतीबद्दल महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसेच इस्रायलचे सिंचन व्यवस्थापन पद्धतींचा भारतातील सिंचन व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर काही अनुकूल बदल करून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील उत्पादन वाढीच्या दृष्टीने एक नवीन दालन उघडुन देता येईल का या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.

इस्रायल देशाची कृषी विषयक पृष्ठभूमि

इस्रायलचे सिंचन व्यवस्थापन किती प्रगत आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सर्वात आधी इस्रायल देशाची कृषी विषयक पृष्ठभूमि माहीत असली पाहिजे. इस्रायल हा जगातील शुष्क आणि अर्ध-शुष्क प्रदेशाच्या यादीत यतो. इस्रायल हा जगातील सर्वात दाट लोकसंख्या असलेला एक देश असून हा एक वाळवंटी देश आहे. वारंवार दुष्काळ पडणे, शेतजमिनीचे वाळवंटीकरण होणे, जलद शहरीकरण होऊन पर्यावरण तसेच कृषी क्षेत्राला हानी पोहोचणे, दिवसेंदिवस कमी होत जाणारी नैसर्गिक संसाधने, तांत्रिक अनिश्चितता, अपारंपरिक स्त्रोतांची वाढती किंमत, आधुनिकीकरणमुळे पाण्याच्या गुणवत्तेचा होत असलेला ऱ्हास आणि वाढलेली पाणी टंचाई इत्यादी समस्यांचा सामना करूनही इस्रायलचे सिंचन व्यवस्थापन इतक्या प्रभावी कसे आहे याबाबत जाणून घेणे खूप आश्चर्यकारक आहे.

इस्रायलचे सिंचन व्यवस्थापन आहे जगात उत्कृष्ट, संपूर्ण सिंचन प्रणालीविषयी माहिती

तुम्हाला कदाचित पटणार नाही मात्र वरील सर्व अडथळ्यांपैकी इस्त्राईल शेतीमध्ये पाणी टंचाई ही समस्या देशातील देशातील असंख्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंता करण्यासारखी आहे. इस्रायलचे सिंचन व्यवस्थापन प्रभावी करणे देशासाठी खूपच महत्वाचे आहे, कारण हा वाळवंटी देश पूर्णपणे सिंचनावर अवलंबून आहे. इस्रायलचे सिंचन व्यवस्थापन प्रणालीत शेतीसाठी मुख्य जलस्रोत म्हणजे दाबाची ठिबक सिंचन प्रणाली. ठिबक सिंचनाचा शेतीत पाण्याच्या कार्यक्षमतेचा सर्वाधिक 70 ते 80% प्रभावी वापर केला जातो.

इस्रायलचे सिंचन व्यवस्थापन हे मर्यादित पाण्याचा उत्तम वापर कसा केल्या जाऊ शकतो याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. पाण्याचे पाण्याचा पुनर्वापर, सांडपाणी, पाण्यात मिसळलेले पोषक घटक आणि डिसॅलिनेशन हे इस्त्राईलमधील पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी वापरण्यात आलेले नवे संशोधन आहे. आज इस्रायल देशाने सिंचन जलस्रोतांची समस्या दूर करण्यासाठी नवनवीन प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतील उत्पादकता वाढवण्यासाठी देशातील कोरड्या तसेच वाळवंटी प्रदेशात हा इस्रायलचे सिंचन व्यवस्थापन पद्धतीचा प्रभावीपणे अवलंब करण्यावर भर दिला आहे.

इस्रायल देशाची भौगोलिक परिस्थिती

इस्रायल हा जगातील सर्वात दाट लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक देश असला तरी येथील केवळ 20% जमीन शेतीयोग्य आहे. त्यात सुद्धा देशातील निम्म्या भागाला सिंचन करावे लागते. निम्म्याहून अधिक इस्रायल हा कोरडा किंवा वाळवंटी प्रदेश आहे आणि देशाच्या उर्वरित भागात उंच डोंगररांगा आणि जंगल आहे. सुमारे 20,770 किमीच्या भूभागावरील इस्रायल देश उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या तीन रेखांशाच्या पट्ट्यांमध्ये विभाज्य आहे. इस्रायल देशात वार्षिक सरासरी पर्जन्यमान उत्तरेला 600 ते 700 मिमी तसेच दक्षिणेला 30 मिमी इतके आहे. इस्रायलची लोकसंख्या 6.0 दशलक्ष आहे, त्यापैकी 90% लोक शहरी भागात तसेच 10% ग्रामीण भागात राहतात.

इस्रायलचे सिंचन व्यवस्थापन आहे जगात उत्कृष्ट, संपूर्ण सिंचन प्रणालीविषयी माहिती

या देशातील शेतकरी कुटुंबांची संख्या 25,000 आहे. तसेच देशाच्या एकूण रोजगारापैकी 3.1%, म्हणजेच सुमारे 67,000 व्यक्तींच्या समतुल्य एकट्या कृषी रोजगाराचे योगदान आहे. एकूण क्षेत्रापैकी, जिरायती जमीन 6,52,000 हेक्टर इतकी असून प्रत्यक्षात सिंचन केलेले क्षेत्र 2,30,000 हेक्टर किंवा अंदाजे 35% कोरडवाहू जमिनीचे आहे. या देशातील शेतजमिनीचा प्रकार हा माती आणि हवामानाच्या परिस्थितीनुसार बदलतो. येथील प्रत्येक शेतकऱ्याजवळ सुमारे 7 हेक्टर शेतजमीन आहे. आता आपण इस्रायलचे सिंचन व्यवस्थापन नेमके काय आहे याबद्दल माहिती घेऊया.

दहापट उत्पन्न मिळवून देणारी काळ्या टोमॅटोची लागवड करून मिळवा लाखो रुपये नफा

इस्रायलचे सिंचन व्यवस्थापन पद्धतीचे एकूण चार प्रकार

सरकारच्या वतीने इस्रायल देशामध्ये पाण्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक उपाय करण्यात आले आहेत. इस्रायलचे सिंचन व्यवस्थापन प्रणालीत प्रमुख चार घटक आहेत ते म्हणजे ठिबक सिंचन, सांडपाण्याचा पुनर्वापर, समुद्राच्या पाण्याचे विलवणीकरण आणि भूजलाचा इष्टतम वापर. या चारही घटकांचा वापर अतिशय प्रभावीपणे करून या देशाने शेती क्षेत्रात दैदिप्यमान प्रगती साधली आहे. इस्रायलमधील सिंचन व्यवस्थापन पद्धतीबद्दल अधिक माहिती द्यावयाची झाल्यास इस्रायलमध्ये पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पायाभूत गुंतवणुकीसह संस्थात्मक आणि नियामक सुधारणा सुद्धा सरकारकडून करण्यात आल्या आहेत.

इस्रायलमध्ये बहुतांश ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केला जातो. हीच इस्रायली पद्धती आपल्या देशातील शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर सिंचनासाठी वापरतात. इस्रायल सिंचन व्यवस्थापन पद्धतीतठिबक सिंचन या प्रभावी पद्धतीमुळे पाणी थेट वनस्पतींच्या मुळांपर्यंत पोहोचते तसेच पाण्याचा अपव्यय कमी होऊन पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत सुद्धा होते. या देशात आधीच पाण्याची कमतरता असल्यामुळे जे पाणी दुसऱ्या कामांसाठी वापरून खराब होते त्याच सांडपाण्यावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रक्रिया करून ते पुन्हा वापरता यावे हा दृष्टीने पाऊले उचलून त्यात यश प्राप्त केले. आज इस्रायल देशात सांडपाण्याचा मोठ्या प्रमाणात पुनर्वापर केला जातो.

इस्रायलचे सिंचन व्यवस्थापन आहे जगात उत्कृष्ट, संपूर्ण सिंचन प्रणालीविषयी माहिती

याशिवाय इस्रायलमध्ये समुद्राच्या पाण्याचे विलवणीकरण करण्यात येते. म्हणजेच समुद्राच्या खारट पाण्यावर प्रक्रिया करून तर वापर करण्यालायक शुद्ध बनविल्या जाते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इस्रायलमध्ये भूजलाचा इष्टतम वापर करण्यात येतो. भूजल म्हणजेच जमिनीत असलेले पाणी. आधीच कमी पावसाचे प्रमाण असलेल्या या देशात पावसाचे पाणी वाहून समुद्राला मिळू दिल्या जात नाही. यासाठी सरकार विविध उपाययोजना करून पाणी जमिनीतच मुरेल याबद्दल शेतकऱ्यांना जागृत तर करतेच, शिवाय विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करून भूजल पातळीत वाढ करण्यासाठी कायम तत्पर असते. इस्रायलचे सिंचन व्यवस्थापन आपल्या देशात सुद्धा राबविणे ही काळाची गरज आहे.

इस्रायल देशातील विविध नेत्यांचा पाणी व्यवस्थापन करण्यात असलेला मोलाचा वाटा

मित्रांनो आज आपण इस्रायलचे सिंचन व्यवस्थापन किती प्रगत आहे याबाबत या देशाची स्तुती करत असलो तरी हा प्रवास काही पाहिजे तितका सोप्पा अजिबात नव्हता. इतिहासात डोकावून पाहिल्यास 1948 मध्ये देशाने आपले स्वातंत्र्य घोषित करण्यापूर्वीच, झिओनिस्ट नेते त्याच्या पहिल्या आणि मुख्य समस्येचे निराकरण करण्यासाठी उपाय शोधत होते – संपूर्ण देशात गोड्या पाण्याचे समान वितरण कसे करावे.

इस्रायलचे सिंचन व्यवस्थापन आहे जगात उत्कृष्ट, संपूर्ण सिंचन प्रणालीविषयी माहिती

1937 मध्ये स्थापित झालेल्या इस्रायलच्या राष्ट्रीय जल कंपनी मेकोरोटने राष्ट्रीय जलवाहक बांधले. हे एक क्रॉस-कंट्री पाणी पुरवठा नेटवर्क असून 1964 मध्ये पूर्ण झाले. विशेष म्हणजे हा इस्रायलचा सर्वात मोठा जलप्रकल्प आहे जो गॅलीली समुद्र (लेक किनरेट), उच्च लोकसंख्या असलेल्या मध्य इस्रायल आणि कोरड्या दक्षिणेकडील भागात पाणी हस्तांतरित करण्यासाठी डिझाइन केला गेलेला आहे. 2010 मध्ये इस्रायलच्या राष्ट्रीय जल कंपनीने भूमध्य सागरी किनाऱ्यावरील डिसॅलिनेशन प्लांटमधून पाणी वाहून नेण्यासाठी करण्यासाठी नॅशनल वॉटर कॅरियरचा विस्तार करण्यात यश मिळवले.

आता सामान्य शेतकरी सुद्धा अशा पद्धतीने करू शकतात शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर

सन 1959 मध्ये सिम्चा ब्लास आणि येशायाहू या पिता-पुत्र जोडीने ठिबक सिंचन तंत्रज्ञान विकसित करण्यास सुरुवात केली. ही पद्धत ट्यूब, व्हॉल्व्ह आणि ड्रिपर्सचे नेटवर्क वापरते जे जवळजवळ 100% पाणी थेट लोकांच्या मुळांमध्ये जाते. त्यामुळे शेती उत्पादनाशी तडजोड न करता पिके वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा वापर कमी होऊन पाण्याची बचत होते. 1986 साली इस्रायल देशाने सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करण्यास सुरुवात केली, त्यामुळे वाढत्या मागणी आणि पाणीपुरवठ्याची उपलब्धता यांच्यातील अंतर कमी झाले.

इस्रायलचे सिंचन व्यवस्थापन आहे जगात उत्कृष्ट, संपूर्ण सिंचन प्रणालीविषयी माहिती

इस्रायलचे इतर देशांना मोलाचे सहाय्य

इस्रायलचे सिंचन व्यवस्थापन आधुनिक तसेच नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा परिचय करून देते. यामध्ये अगदी पाण्याची प्रभावी साठवण कशी करावी यापासून ते पाण्याची वाहतूक तसेच शेतकऱ्यांना यासाठी आर्थिक मदत करून, शक्य तितके उपाय राबविणे या सगळ्या गोष्टीत जातीने लक्ष घालून कोरड्या आणि वाळवंटी जमिनीतील शेतीमध्ये क्रांती घडवून आणली आहे. इस्रायलने चीन, भारत, व्हिएतनाम, तैवान, इटली, ब्राझील, मेक्सिको, दक्षिण कोरिया, पोलंड, रशिया, कॅनडा आणि युनायटेड स्टेट्स या देशांमध्ये जल तंत्रज्ञान सामायिक केले आहे आणि स्वीकारले आहे.

इस्त्रायल पॅलेस्टिनी प्राधिकरण आणि जॉर्डन राज्याला मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा तर करतोच, शिवाय पाणी व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान त्याच्या शेजाऱ्यांसोबत सामायिक करणारे असे हे राष्ट्र आहे. पॅलेस्टिनी आणि जॉर्डनच्या समकक्षांना सांडपाणी संकलन आणि उपचार, पाण्याचा पुनर्वापर यावर चर्चासत्रे या देशाकडून देण्यात देतात.

एक प्रभावी आणि प्रगत कृषी राष्ट्र म्हणून उदय

सुरुवातीपासूनच इस्रायलला हे समजले आहे की पाणी हा एक दुर्मिळ स्त्रोत आहे. आणि म्हणूनच या मौल्यवान संसाधनाचे प्रभावीपणे आणि कार्यक्षमतेने व्यवस्थापन करण्यासाठी अनेक वर्षांपासून ज्ञान आणि सतत तंत्रज्ञान विकसित केले आहे. इस्रायलचे सिंचन व्यवस्थापन इतके प्रगत आहे की, आज जगाच्या अनेक देशांच्या अहवालात इस्रायलचे जलसंवर्धन, सांडपाणी पुनर्वापर, विलवणीकरण आणि सिंचन तंत्रज्ञानासाठी इस्रायलच्या नाविन्यपूर्ण पध्दतींची चर्चा आज संपूर्ण जगात करण्यात येत आहे.

बापरे! शेतात एवढ्या सगळ्या कामांसाठी होतो ड्रोनचा वापर

आज जागतिक अनेक भागात विशेषतः मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका आणि दक्षिण आशियामध्ये, पाण्याचा ताण आणि पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.जो हवामान बदल आणि प्रचंड लोकसंख्येच्या वाढत्या मागणीमुळे वाढला आहे. इस्त्रायलचे सिंचन व्यवस्थापन पद्धतीचे हे अभूतपूर्व यश आणि जल व्यवस्थापनातील कौशल्य या राष्ट्रांसाठी एक मॉडेल म्हणून समोर आले आहे.

पाणी संवर्धन, water conservation

भारताने इस्रायलकडून काय शिकावे?

आजही भारताच्या अनेक भागांत उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होते. राज्यातील विविध भागांत विशेषतः विदर्भात लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा 4…5 किमी पर्यंत पायपीट करावी लागते. आपल्या देशात आजही भूजल पातळी वाढविण्यासाठी पाणी अडवून जमिनीत मुरण्यासाठी नेटाने प्रयत्न होताना दिसून येत नाही. जागतिकीकरणामुळे कंपन्यांना करोडो लिटर पाणी लागते. त्यात लाखो लिटर सांडपाणी वाया जाते. या संडण्याच्याचा इस्रायल देशाप्रमाणेच आपल्या देशात सुद्धा पुनर्वापर झाल्यास पाण्याचे अनेक प्रश्न मार्गी लागतील यात शंका नाही. इस्रायलच्या पावलावर पाऊल टाकून आपण सुद्धा त्यांचे तंत्रज्ञान अनुकरण जर आपल्या देशातील पाण्याची उपलब्धता वाढविण्यात यशस्वी झालो, तर एक आर्थिक महासत्ता म्हणून उदयास आल्याशिवाय राहणार नाही.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment