आज जगभरात कृषी क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन दिसून येत आहे. तंत्रज्ञानाने इतकी दैदिप्यमान प्रगती केली आहे की पृथ्वीवरच काय तर अंतराळात सुद्धा शास्त्रज्ञ शेतीसाठी अनुकूल वातावरण तयार करून रोपांची यशस्वी लागवड आणि वाढ करताना दिसत आहेत. अंटार्क्टिका खंडात शेती करणे शक्य आहे का अशाप्रकारचा प्रश्न अनेक लोकांना पडतो. त्याचे कारण सुद्धा तसेच आहे.
अंटार्क्टिका खंडात बर्फाळ प्रदेश असल्यामुळे अतिशय थंड वातावरण आहे. शेतीसाठी लागणारे वातावरण या प्रदेशात असेल का असा प्रश्न सामान्य लोकांना पडणे स्वाभाविक आहे. आजच्या या माहितीपूर्ण लेखात आपण अंटार्क्टिका खंडात शेती करणे शक्य आहे का या प्रश्नाचे उत्तर सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वात आधी जाणून घेऊया अंटार्क्टिका खंडातील भौगोलिक परिस्थिती कशी आहे याची माहिती.
अंटार्क्टिका खंडाची भौगोलिक परिस्थिती
अंटार्क्टिका ( Antarctica ) हा पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक खंड आहे. हा खंड सर्वांत दक्षिणेस वसला असून पृथ्वीचा दक्षिण ध्रुवही या खंडावर आहे. हा खंड ट्रान्सअंटार्क्टिक पर्वतरांगांनी विभागला गेला आहे. पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागरांच्या दक्षिण टोकालाच दक्षिण महासागर अथवा दक्षिणी महासागर म्हणतात. अशा दक्षिण महासागराने अंटार्क्टिका खंड वेढला गेला आहे.
हा खंड इतर सर्व खंडांपेक्षा अधिक थंड, कोरडा, प्रचंड वारे वहात असणारा व सर्वांत जास्त सरासरी उंची असणारा खंड आहे. म्हणूनच अंटार्क्टिका खंडात शेती करणे शक्य आहे का? याविषयी मनात कुतूहल निर्माण होते. लक्षात घ्या १,४४,२५,००० वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असणारा अंटार्क्टिका खंड हा ऑस्ट्रेलिया, युरोप या खंडांपाठोपाठ आकारमानाने तिसरा सर्वांत लहान खंड आहे. याचा ९८ टक्के पृष्ठभाग बर्फाने व्यापलेला आहे.
या खंडात जीवसृष्टी आहे का?
अंटार्क्टिका खंडात शेती करणे शक्य आहे का? असा प्रश्न तर नंतर पडतो मात्र त्याआधी या बर्फाच्छादित प्रदेशात जीवसृष्टी अस्तित्वात आहे का या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणे आवश्यक आहे. कारण इतक्या अतिथंड परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवणे साजिवांसाठी काही सोप्पं काम नाही. तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की, अंटार्क्टिकावर जीवसृष्टी बहुतेक नाहीच, असे म्हणता येईल.
वनस्पती बाबतीत विचार केल्यास काही शेवाळ्याच्या जातीच्या वनस्पती व एकदोनं प्रकारची फुलझाडे आणि गवताचे प्रकार इतकंच काहीच चित्र आपल्याला दिसून येते. या अतिथंड खंडाच्या किनाऱ्यावरील बर्फ वितळून झालेल्या डबक्यांत काही अतिसूक्ष्म जीव आढळतात. याशिवाय काही कीटक, कोळी व सूक्ष्मजीव या खंडावर अस्तित्वात आहेत अस शास्त्रज्ञांनी शोधून काढलय.
येथील जमिनीवरील सर्वांत मोठा प्राणी म्हणजे अंदाजे अडीच मिलीमीटर लांबीचा घरातल्या माशीच्या जातीचा बिनपंखाचा प्राणी हा आहे. खंडभोवतीच्या समुद्रात मात्र विपुल जलचर प्राणी आहेत. देवमासे व सीलमासे येथे वास्तव्य करतात. देवमाशांच्या शिकारीचे हे सर्वात मोठे क्षेत्र आहे. या अंटार्क्टिका खंडात येणाऱ्या पक्ष्यांची संख्या मात्र आश्चर्य वाटण्याइतकी मोठी आहे. या खंडात वर्षभर वास्तव्य करणाऱ्या एकमेव पक्षी म्हणजे याशिवाय सी पेट्रेल व साउथ पोलर स्कुआ यांसारखे पक्षी मधूनमधून या खंडात येऊन वास्तव्य करतात.
या खंडातील शेतीसंबंधी रोचक इतिहास
पृथ्वीच्या दक्षिणेकडील भागात वनस्पती आणि अन्न कसे वाढवायचे हे मागील एका शतकापेक्षा अधिक काळ संशोधनाचे सक्रिय क्षेत्र आहे. अंटार्क्टिका खंडात शेती करणे शक्य आहे का तर याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला सुमारे 120 वर्ष इतिहासात माहिती घ्यावी लागेल. 1902 साली ब्रिटीश चिकित्सक आणि वनस्पतिशास्त्रज्ञ रेजिनाल्ड कोएटलिट्झ यांनी अंटार्क्टिक मातीत अन्न निर्मितीसाठी वनस्पती वाढविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यांनी मॅकमुर्डो साउंडमधून थोडी माती गोळा केली आणि मोहिमेच्या जहाजावर असलेल्या स्कायलाइटखाली बॉक्समध्ये मोहरी आणि क्रेस वाढवण्यासाठी त्या मातीचा प्रभावी वापर केला.
त्यांच्या या कष्टाचे चीज झाले आणि कोएट्लिट्झने या वनस्पतीचे पुरेसे उत्पादन घेतले. स्कर्व्हीच्या उद्रेकादरम्यान त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांनी त्यांची या रोगांची लक्षणे दूर करण्यासाठी स्वतः पिकविलेल्या हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या. त्यांनी केलेल्या या सुरुवातीच्या प्रयोगाने हे दाखवून दिले की अंटार्क्टिक माती उत्पादनक्षम असू शकते आणि येथेच अंटार्क्टिका खंडात शेती करणे शक्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर मिळते. ध्रुवीय मोहिमेदरम्यान शास्त्रज्ञ ताज्या अन्नाच्या गरजेपोटी पुरेशा वनस्पती पिकवतात. ज्यामुळे मोहिमेदरम्यान या शास्त्रज्ञांना पोषक अन्न खायला मिळते.
भारतातील सर्वात श्रीमंत शेतकरी 2024 आहे एक महिला, अंबनीला सुद्धा टक्कर देईल इतकी संपत्ती
अंटार्क्टिका खंडात शेती करण्याचे प्रयत्न
अंटार्क्टिका खंडात शेती करणे शक्य आहे का? तर हो आंशिक स्वरूपात तर ते शक्य आहे असेच दिसते. जगातील विविध देशांतील शस्त्रज्ञांकडून केल्या गेलेल्या अंटार्क्टिक लँडस्केपमध्ये थेट वनस्पती वाढवण्याचे प्रारंभिच्या प्रयत्नांना कमी यश मिळाले. 1904 मध्ये स्कॉटिश वनस्पतिशास्त्रज्ञ रॉबर्ट रुडमोस-ब्राऊन यांनी 22 थंड-सहिष्णु आर्क्टिक वनस्पतींमधून बिया लावून पहिल्या. मात्र त्यांनी लावलेल्या या सर्व बिया उगवण्यास अयशस्वी ठरल्या. शास्त्रज्ञ रुडमोज-ब्राऊनने पर्यावरणीय परिस्थिती आणि त्यांच्या वाढीस मदत करण्यासाठी जीवशास्त्रज्ञ नसल्यामुळे असे झाले असल्याचा त्यांचा निष्कर्ष जाहीर केला.
अंटार्क्टिका खंडात शेती करणे शक्य आहे का याचे उत्तर मिळविण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले. अंटार्क्टिक लँडस्केपमध्ये नॉननेटिव्ह वनस्पतींचा परिचय करून देण्याचे बरेच प्रयत्न विविध देशांकडून करण्यात आले. मात्र बहुतांश प्रयत्न अयशस्वी ठरले असे म्हणता येईल. अंटार्क्टिका खंडाची माती स्वतःच काही वनस्पतींच्या जीवनास आधार देऊ शकते. म्हणजेच या प्रदेशात माती वनस्पती उगवू शकते. मात्र कठोर भौगोलिक वातावरण रोपांच्या लागवडीसाठी अनुकूल नसते अस निष्कर्ष प्रारंभीच्या शास्त्रज्ञांनी काढला.
शास्त्रज्ञांनी वनस्पती वाढीसाठी शोधली प्रभावी शक्कल
अंटार्क्टिका खंडात शेती करणे शक्य आहे का? याबद्दल आता निश्चितच आपल्या मनात संभ्रम निर्माण झाला असेल यात शंका नाही. तर तुमच्या मनाचे समाधान करण्यासाठी पुढील माहिती जाणून घेऊयात. तर 1940 च्या दशकापर्यंत अनेक राष्ट्रांनी अंटार्क्टिकामध्ये दीर्घकालीन संशोधन केंद्रे उभारण्यास सुरुवात केली होती. बाहेर रोपे वाढवणे अशक्य असल्याने, या स्थानकांवर राहणाऱ्या काही लोकांनी अन्न आणि भावनिक आरोग्य दोन्ही मिळण्यासाठी हरितगृहे बांधण्याची जबाबदारी घेतली.
परंतु त्यांच्या लवकरच लक्षात आले की अंटार्क्टिक माती ही मोहरी आणि क्रेसच्या पलीकडे असलेल्या बहुतेक पिकांसाठी अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे. साधारणपणे एक किंवा दोन वर्षांतच तिची सुपीकता पूर्णपणे कमी होऊ जाते. यावर उपाय म्हणून 1960 च्या दशकापासून लोकांनी हायड्रोपोनिक्सच्या मातीविरहित पद्धतीकडे लक्ष वेधण्यास सुरुवात केली.
अंटार्क्टिकाच्या थंड वातावरणात यशस्वीरित्या अन्न वाढवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ग्रीनहाऊसमध्ये याची प्रचिती शास्त्रज्ञांना आली. ही अशी प्रणाली ज्यामध्ये कृत्रिम आणि नैसर्गिक प्रकाशाच्या मिश्रणाखाली रासायनिकदृष्ट्या वर्धित पाण्यात बुडवून त्यांची मुळे असलेली वनस्पती वाढवता येणे शक्य होते.
अबब! 8 फूट खोल पाण्यात ज्वारीची शेती, मशागत खर्च शून्य, मिळते प्रचंड उत्पादन
कृत्रिम वातावरण निर्मिती करून शेती
जगभरातील अनेक शास्त्रज्ञांनी ग्रीनहाऊसमध्ये हायड्रोपोनिक तंत्राचा वापर करून अंटार्क्टिका खंडात शेती करून पाहिली. ती या कृत्रिम वातावरणात यशस्वी सुद्धा झाली. मात्र अंटार्क्टिक वातावरणाचा वापर पिके वाढवण्यासाठी होत नव्हता. त्याऐवजी शास्त्रज्ञ या शेतीसाठी कृत्रिम परिस्थिती निर्माण करत होते. अंटार्क्टिका खंडात शेती करणे शक्य आहे का? हो आहे मात्र कृत्रिम वातावरण निर्मिती करून शेती करणे शक्य आहे.
सन 2015 पर्यंत अंटार्क्टिकावर किमान 43 वेगवेगळ्या सुविधा होत्या जिथे संशोधकांनी कधी ना कधी झाडे उगवली होती. या सुविधा वैज्ञानिक प्रयोगांसाठी उपयुक्त ठरल्या अन् अनेक अंटार्क्टिक रहिवाशांनी म्हणजेच शास्त्रज्ञांनी हिवाळ्यात ताज्या भाज्या खाण्यास सक्षम असल्याबद्दल कौतुक केले आणि या खंडातील अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही या ताज्या भाज्यांना त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी मोठे वरदान मानले.
या खंडात शेती शक्य आहे का? निष्कर्ष
मित्रांनो अंटार्क्टिका खंडात शेती करणे शक्य आहे का? या प्रश्नाचे संयुक्तिक उत्तर देण्याची वेळ आली आहे. याचे उत्तर म्हणजे सामान्य लोकांना या अतिथंड परिस्थितीत शेती करता येणे निव्वळ अशक्य आहे. तसेच अशा अतिथंड आणि मानवी जीवनास अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचा बचाव करणे सुद्धा कार्य आहे. मात्र शास्त्रज्ञ लोकांना काही विशिष्ट परिस्थितीत येथे वनस्पती वाढीसाठी लागणारे कृत्रिम अनुकूल वातावरण निर्मिती करून म्हणजेच हरितगृहात आंशिक दृष्ट्या शेती करणे सहजशक्य आहे. मात्र या शेतीला काही मर्यादा आहेत. पृथ्वीच्या इतर खंडातील जमिनीवर ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर शेती केल्या जाते तशी शेती अंटार्क्टिका खंडावर करणे सध्यातरी अशक्यप्राय गोष्ट आहे. तर या माहितीपूर्ण लेखाबद्दल तुम्हाला काय वाटते याबद्दल कॉमेंट करून नक्की आपला अभिप्राय द्या.