देशात बरेच असे होतकरू विद्यार्थी आहेत ज्यांच्या शिक्षणाच्या आड त्यांची आर्थिक परिस्थिती येऊन त्यांच्या शिक्षणात खंड पडतो. अशाच विद्यार्थ्यांसाठी HDFC Bank स्कॉलरशिप प्रोग्राम घेऊन आली आहे. या HDFC Bank Parivartan’s Educational Crisis Scholarship Support (ECSS) Programme अंतर्गत देशातील पहिली ते पदव्युत्तर शिक्षणासाठी सन 2024-25 साठी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणार आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे HDFC Bank स्कॉलरशिप आणि काय आहेत या शिष्यवृत्तीसाठी लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत.
घटकनिहाय इतकी आहे HDFC Bank शिष्यवृत्ती
HDFC Bank स्कॉलरशिप ही पहिली ते पद्व्यात्तर शिक्षण घेत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना मिळणार आहे. इयत्ता पहिली ते सहावी या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सन 2024-25 साठी 15 हजाराची HDFC Bank स्कॉलरशिप देणार आहे. तसेच 8 वी ते 12 वी आणि पॉलिटेक्निक तसेच आयटीआय डिप्लोमा करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना वार्षिक 18 हजाराची आर्थिक मदत या HDFC Bank स्कॉलरशिप द्वारे देणार आहे. या शिष्यवृत्ती अंतर्गत पदवी अभ्यासक्रम मध्ये शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना वर्षाला 30 हजार तसेच प्रोफेशनल पदवी अभ्यासक्रम मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 50 हजार रुपयांची HDFC Bank स्कॉलरशिप देण्यात येणार आहे.
HDFC Bank Parivartan’s Educational Crisis Scholarship Support (ECSS) Programme अंतर्गत पदव्यूत्तर शिक्षण घेत असलेल्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना 35 अन् प्रोफेशनल पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 75 हजार रुपयांची HDFC Bank स्कॉलरशिप मिळणार आहे.
इयत्ता 1 ते 12 वी तसेच आयटीआय आणि पॉलिटेक्निक साठी HDFC Bank स्कॉलरशिप साठी पात्रता निकष
1) अर्जदार विद्यार्थी हा भारतीय नागरिक असावा.
2) 1 ते 12 वी तसेच आयटीआय आणि पॉलिटेक्निक यापैकी शिक्षण घेत असावा
3) अर्जदाराने मागील शैक्षणिक वर्षात किमान 55 टक्के गुण प्राप्त केलेले असले पाहिजे.
4) अर्जदार विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
5) ज्या गरीब विद्यार्थ्यांना मागील 3 वर्षात आर्थिक अडचणींमुळे शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत अशा विद्यार्थ्यांना HDFC Bank स्कॉलरशिप देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.
स्टेट बँक देते गरीब विद्यार्थ्यांना साडेसात लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती
आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात?
1) पासपोर्ट आकाराचा फोटो
2) मागील शैक्षणिक वर्ष 2023-24 ची गुणपत्रिका
3) सध्या शिक्षण घेत असल्याचा दाखला उदा. बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा विद्यालयाचे आयडी कार्ड किंवा प्रवेश घेतल्याची पावती किंवा शुल्क भरल्याची पावती
4) अर्जदार विद्यार्थ्याचे बँक खाते तपशील
5) सरपंच, ग्रामसेवक, तहसीलदार यांसारख्या तत्सम अधिकाऱ्यांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र
6) विद्यार्थ्याचे प्रतिज्ञापत्र
7) एखाद्या कुटुंबात मागील तीन वर्षात घडली असलेली आपत्ती (वैकल्पिक)
पदवी किंवा प्रोफेशनल पदवी अभ्यासक्रम यासाठी HDFC Bank स्कॉलरशिप साठी पात्रता निकष
1) अर्जदार विद्यार्थी हा भारतीय नागरिक असावा.
2) अर्जदार हा पदवी किंवा प्रोफेशनल पदवी अभ्यासक्रम यापैकी शिक्षण घेत असावा.
3) अर्जदाराने मागील शैक्षणिक वर्षात किमान 55 टक्के गुण प्राप्त केलेले असले पाहिजे.
4) अर्जदार विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
5) ज्या गरीब विद्यार्थ्यांना मागील 3 वर्षात आर्थिक अडचणींमुळे शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत अशा विद्यार्थ्यांना HDFC Bank स्कॉलरशिप देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात?
1) पासपोर्ट आकाराचा फोटो
2) मागील शैक्षणिक वर्ष 2023-24 ची गुणपत्रिका
3) सध्या शिक्षण घेत असल्याचा दाखला उदा. बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा विद्यालयाचे आयडी कार्ड किंवा प्रवेश घेतल्याची पावती किंवा शुल्क भरल्याची पावती
4) अर्जदार विद्यार्थ्याचे बँक खाते तपशील
5) सरपंच, ग्रामसेवक, तहसीलदार यांसारख्या तत्सम अधिकाऱ्यांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र
6) विद्यार्थ्याचे प्रतिज्ञापत्र
7) एखाद्या कुटुंबात मागील तीन वर्षात घडली असलेली आपत्ती (वैकल्पिक)
परदेशातील ही कंपनी देते ग्रॅज्युएशन करणाऱ्या मुलींना 1 लाखापर्यंत शिष्यवृत्ती
पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी HDFC Bank स्कॉलरशिप लाभासाठी पात्रता निकष
1) अर्जदार विद्यार्थी हा भारतीय नागरिक असावा.
2) अर्जदार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर अभ्यासक्रम मध्ये शिक्षण घेत असावा.
3) अर्जदाराने मागील शैक्षणिक वर्षात किमान 55 टक्के गुण प्राप्त केलेले असले पाहिजे.
4) अर्जदार विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
5) ज्या गरीब विद्यार्थ्यांना मागील 3 वर्षात आर्थिक अडचणींमुळे शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत अशा विद्यार्थ्यांना HDFC Bank स्कॉलरशिप देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात?
1) पासपोर्ट आकाराचा फोटो
2) मागील शैक्षणिक वर्ष 2023-24 ची गुणपत्रिका
3) सध्या शिक्षण घेत असल्याचा दाखला उदा. बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा विद्यालयाचे आयडी कार्ड किंवा प्रवेश घेतल्याची पावती किंवा शुल्क भरल्याची पावती
4) अर्जदार विद्यार्थ्याचे बँक खाते तपशील
5) सरपंच, ग्रामसेवक, तहसीलदार यांसारख्या तत्सम अधिकाऱ्यांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र
6) विद्यार्थ्याचे प्रतिज्ञापत्र
7) एखाद्या कुटुंबात मागील तीन वर्षात घडली असलेली आपत्ती (वैकल्पिक)
HDFC Bank स्कॉलरशिप उपक्रमाचे उद्दिष्ट आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख
देशातील अग्रणग्य बँकेपैकी एक आघाडीची बँक म्हणजे HDFC बँक. या बँकेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत ही शिष्यवृत्ती देण्यात येत असून देशातील गरीब पण हुशार आणि होतकरू विद्यार्थी जे आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे शिक्षण घेणे ज्या विद्यार्थांना शक्य होत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आर्थिक पाठबळ पुरविणे हा HDFC Bank स्कॉलरशिप उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. तुम्हाला जर या HDFC Bank शिष्यवृत्ती उपक्रमाचा लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. लक्षात घ्या सदर शिष्यवृत्ती 2024-25 या आर्थिक वर्षाच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2024 ही आहे. जास्तीत जास्त गरीब विद्यार्थ्यांना या HDFC Bank स्कॉलरशिप बद्दल माहिती देऊन त्यांना मदत करा. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातुन कुणाला तरी आपली स्वप्ने साकार करण्यासाठी मोलाचा हातभार लागू शकतो.
HDFC Bank स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आणि वेबसाईट
विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला HDFC Bank स्कॉलरशिप लाभासाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा असेल तर त्यासाठी https://www.hdfcbankecss.com/ या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल. यावर एक नवीन येथे स्कॉलरशिप बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल. तसेच सर्वात खाली उजव्या बाजूला apply now अशाप्रकारचे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होऊन तुम्ही buddy4study ही वेबसाईट ओपन होईल.
जर तुम्ही आधीच या वेबसाइटवर नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला लॉग इन करावे लागेल. नोंदणी केलेली नसेल तर register now या पर्यायावर क्लिक करून तुमची वैयक्तिक माहिती भरून नोंदणी करावी लागेल. यानंतर तुमच्यासमोर HDFC Bank स्कॉलरशिप लाभासाठी जो अर्ज आहे तो उघडेल. यात तुम्ही विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरावी. तसेच माहिती भरून झाल्यावर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
कागदपत्रे ही jpeg किंवा pdf स्वरूपात असावी हे लक्षात घ्या. एकदा तुम्ही माहिती भरून कागदपत्रे अपलोड केली की सबमिट फॉर्म या पर्यायावर क्लिक करायचे आहे. एवढे केले की तुमचा अर्ज यशस्वीरीत्या सादर केला असल्याचा एक पॉप अप तुम्हाला दिसेल तसेच नोंदणी करताना तुम्ही दिलेल्या मोबाइल क्रमांकावर तसेच ईमेल आयडीवर तुम्हाला तशा प्रकारचा संदेश प्राप्त होईल.
अशी होणार निवड
तुमचा सदर केलेला अर्ज पडताळून त्याची छाननी करण्यात येईल. जे विद्यार्थी HDFC Bank स्कॉलरशिप साठी निवड केल्या जातील त्यांची एक telephonic discussion व्दारे संभाषण होऊन खात्री केल्या जाऊ शकते. शेवटी HDFC Bank स्कॉलरशिप साठी अंतिम निवड करून पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ही शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात येईल.