दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाअंतर्गत दिव्यांग वाहन अनुदान योजना या कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाइल ऑन ई-व्हेइकल) मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
अर्ज कसा करायचा आणि निकष काय?
दिव्यांग वाहन अनुदान योजना लाभासाठी काय निकष आहेत तसेच अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती असून या लेखात दिली आहे. दिव्यांग वाहन अनुदान योजना अंतर्गत लाभ देऊन राज्यातील दिव्यांग व्यक्तींना त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोगजार उपलब्ध व्हावा हा या योजनेचा उद्देश आहे.
दिव्यांग व्यक्तींचे जीवनमान उंचावणे हा उदात्त हेतू
दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाअंतर्गत हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाइल ऑन ई-व्हेइकल) मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. दिव्यांग वाहन अनुदान योजना अंतिम तारीख 6 फेब्रुवारी पर्यंत वाढविण्यात आली आहे.
योजना कधीपासून सुरू आहे?
मित्रांनो दिव्यांग वित्त व विकास महामंडळातर्फे 10 जून 2019 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. दिव्यांग वाहन अनुदान योजना अंतर्गत दिव्यांगांना रोजगारनिर्मिती करण्यास चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, हा शासनाचा हेतू आहे. सव्वा दोन लाख रुपयांचे मोबाईल व्हेइकल या योजनेंतर्गत 100 टक्के अनुदानावर लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहेत.
दिव्यांग वाहन अनुदान योजना अंतिम तारीख 6 फेब्रुवारी
मित्रांनो तुम्हाला जर दिव्यांग वाहन अनुदान योजना अंतर्गत लाभासाठी अर्ज करायचा असेल तर एक महत्वाची गोष्ट जाणून घ्या ती म्हणजे दिव्यांग वाहन अनुदान योजना अंतिम तारीख 6 फेब्रुवारी असून योजनेचा लाभ गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणीची प्रक्रिया २२ जानेवारीपासून करण्यात आली असून, दिव्यांग व्यक्तींकडून 6 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत.
घरेलु कामगार महिलांना मिळत आहेत 10 हजाराची घरगुती भांडी, असा करा ऑनलाईन अर्ज
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट
मित्रानो दिव्यांग वाहन अनुदान योजना अंतिम तारीख काय आहे हे आपण पाहिले. आता या योजनेचा अर्ज कुठे करायचा याबद्दल माहिती घेऊया.
दिव्यांगांना फिरते वाहन योजनेचा लाभ घेण्यासाठी https://register.mshfdc.co.in या वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज करता येतो. सदर लिंकवर क्लिक केल्यानंतर दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे पोर्टल उघडले जाते. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करता येतो. अर्ज कसा करावा हे तुम्ही या लेखात सविस्तर जाणून घेऊ शकता.
योजनेचे निकष आणि अटी
दिव्यांग वाहन अनुदान योजना अंतर्गत लाभासाठी या योजनेचे निकष काय आहेत हे माहीत असणे आवश्यक आहे. दिव्यांग वाहन अनुदान योजना अंतिम तारीख 6 फेब्रुवारी असून तारीख निघून जाण्याआधी ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया या योजनेचे नियम, अटी आणि शर्ती काय आहेत याची माहिती.
1) अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
2) जिल्हा शल्यचिकित्सक किंवा सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले किमान 40% दिव्यंगत्वाचे प्रमाणपत्र असावे.
3) अर्जदार 1 जानेवारी 2024 या तारखेच्या दिवशी 18 ते55 वर्ष या वयोगटातील असावा.
4) मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत पालक अर्ज करण्यास सक्षम असतील.
5) दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसले पाहिजे.
6) अतितीव्र दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांग व्यक्तीस वाहन चालवण्याचा परवाना नाकारल्यास परवानाधारक नसलेल्या अतितीव्र दिव्यांगाच्या सोबतच्या सहाय्याने फिरता मोबाईल व्यवसाय करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.