बाजारात विकल्या जातोय सिमेंट पासून बनलेला कृत्रिम लसूण,जनतेच्या आरोग्याशी खेळ

सर्वसामान्यांपासून ते श्रीमंत लोकांच्या किचन मध्ये अतिशय आवश्यक असलेल्या लसूण चे भाव सध्या झपाट्याने वाढलेले आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात लसूण विकत घेणं हे सर्वसामान्य जनतेसाठी एक दुष्कर खरेदी झाली आहे. लसणाचा काळाबाजार करणाऱ्या ठगांनी याचा फायदा घेण्यासाठी एक अजब गजब शक्कल लढवली असून बनावट लसूण बनवून त्याची विक्री करून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी मोठा प्लॅन केल्याचे स्पष्ट झाले आहे.

लसुण Garlic

तुमच्या आमच्या रोजच्या जेवणातील भाजीत असलेला अविभाज्य घटक म्हणून लसूण सर्वमान्य आहे. लसूण आपल्या आरोग्यासाठी हितकर असतो. तसेच घरातील भाजीची चव स्वादिष्ट बनविण्यास खूपच गुणकारी असतो. पण काही लोक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सिमेंटचा कृत्रिम लसूण बनवून बाजारात विकत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे नागरिकांत एकच तारांबळ उडाली आहे.

अकोल्यात समोर आला धक्कादायक प्रकार

सदर गंभीर प्रकरण समोर आले आहे ते अकोल्यात. अकोला शहरातील बहुतांश भागात फेरीवाले रोज भाजीपाला विक्रीसाठी घेऊन फिरत असतात. यापैकी काही फेरीवाल्यांकडे डुप्लिकेट(भेसळयुक्त) लसूण विक्री करत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. अकोला शहरातील बाजोरिया नगर परिसरात राहणाऱ्या पोलीस विभागातून सेवानिवृत्त झालेल्या सुभाष पाटील यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सुभाष पाटील लसूण भेसळीची माहिती देताना
सुभाष पाटील लसूण भेसळीची माहिती देताना

अकोल्यात बाजोरिया नगर भागातील ग्राहकांनी फेरीवाल्याकडून लसूण विकत घेतला. त्यानंतर जेव्हा भाजीला फोडणी देण्यासाठी लसूण सोलत असताना या लसणाच्या पाकळ्या वेगळ्या झाल्या नाहीत… त्यामुळे स्थानिक सुभाष पाटलांच्या पत्नीने चाकूने लसणाच्या पाकळ्या कापल्या. त्यावेळी तो लसूण नसून सिमेंटचा खडा असल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं. तर हा डूपलीकेट लसूण बाजारात कसा आणि कोणी आणला याबाबत प्रशासनाने सखोल चौकशी करण्याची मागणी परिसरातून होत आहे. अशाप्रकारे लसूनाची भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा जो अवैध मार्ग वापरला जात आहे, त्याबद्दल सर्व नागरिकांनी सजग होणे अत्यंत आवश्यक आहे.

👉 हे सुध्दा वाचा

करटोली भाजीचे हे औषधी उपयोग पाहून थक्क व्हाल, गुणकारी भाजी सर्व व्याधींवर भारी

लसूण काळाबाजार माफिया सक्रिय

भेसळ माफियांनी सिमेंटपासून बनवलेल्या या डुप्लिकेट लसणावर पांढऱ्या रंगाचा वापर सुद्धा चतुराईने केलेला असल्याचे आढळते. राज्याच्या बहुतांश शहरामध्ये सध्या लसणाचे भाव हे सुमारे 300 ते 350 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचले असून लसणाचा काळाबाजार करणाऱ्या टोळ्या बाजारपेठेत कार्यरत झाल्या आहेत. या भेसळ माफियांच्या टोळ्या फेरीवाल्यांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे लसूण खरेदी करताना काळजीपूर्वक खरेदी करण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.

अन्नभेसळ घटनांत वाढ

मागील काही वर्षांपासून अन्नात भेसळीचं प्रमाण प्रचंड वाढलंय.. कधी पोह्यात, तांदळात प्लास्टिकचे तुकडे, कधी पाणीपुरीत एसिड युक्त मीठ तर कधी शेंगदाण्यात लाल रंगाचे खडे टाकून ग्राहकांना केवळ लुटल्या जात नसून त्यांच्या आरोग्यास घातक असा खेळ खेळल्या जात आहे. अशा परिस्थितीत आता लसणाच्या नावाखाली सिमेंटचे खडे आणि क्लोरीन ब्लिच चेकोटिंग करून सामान्य जनतेची फसवणूक केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणी तातडीने पावले उचलून अशी भेसळ करणाऱ्यांविरोधात सक्त कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

मध्यंतरी चिनी बनावटीच्या लसूणचा होता देशाच्या काही भागांत सुळसुळाट

मध्यंतरी चीनचा बनावट लसूण भारतीय बाजारपेठेत विकला जात असल्याची माहिती समोर होती. चीनमधून बनावट लसनाची ओळख पटवून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी नेपाळ आणि बांगलादेशच्या सीमा ओलांडून होणारी तस्करी रोखण्यासाठी घाऊक विक्रेते आणि गोदामांवर स्निफर कुत्रे तैनात केले होते. तसेच त्यांच्या स्थानिक गुप्तचरांना सतर्क केले होते.या चीनच्या बनावट लसणाची सर्वाधिक विक्री ही बिहार, उत्तर प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये होत असल्याचा अहवालमध्ये सांगण्यात आले होते.

या राज्यांमध्ये नेपाळच्या मार्गे हा बनावट लसूण आणला जातोय. सन 2014 मध्ये बुरशीने संक्रमित लसूणाची आयात होत असल्याचं लक्षात आल्यानंतर भारताने चिनी लसणाच्या आयातीवर बंदी घालण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्यात सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 1.35 कोटी रुपये किमतीचा 64,000 किलो चीनी लसूण जप्त केला होता. पण आता देशांतर्गत बाजारपेठेत असे अन्नभेसळ माफिया सक्रिय झाल्याने प्रशासनाला त्यांचा चोख बंदोबस्त करणे गरजेचे आहे. सामान्य नागरिकांच्या खिशालाच नाही तर आरोग्याला झळ पोहोचविणारा हा धक्कादायक प्रकार आहे.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment