मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024 : महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. शासनाचा नवीन जि आर आला असून मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024 ला कार्यान्वित करण्यासंबंधी आदेश जारी करण्यात आला आहे. लवकरच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024 पार्श्वभूमी
भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. अशा अडचणीत आलेल्या राज्यातील 7.5 एच.पी पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी “मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024” राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यात मार्च 2024 अखेर 47.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत. सदर ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो.
एकूण ग्राहकांपैकी 16 टक्के कृषी पंप ग्राहक असून उर्जेच्या एकूण वापरा पैकी सुमारे 30 टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो. कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर 39 हजार 246 द.ल.यू. आहे. प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषीपंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो. सद्यस्थितीत मा.महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या काळात 10/8 तास किंवा दिवसा 8 तास थ्री फेज वीजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते.
नैसर्गिक आपत्ती आणि कमी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यमुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे. सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील 7.5 एच.पी पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 अंतर्गत कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे.
मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांनी दिनांक 28 जून 2024 रोजी पावसाळी अधिवेशन 2024 मधील भाषण मध्ये खालीलप्रमाणे घोषणा केली आहे:- “भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे, याची आपल्याला जाणीव आहे. मात्र येत्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. अशा अडचणीत आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे त्यासाठी त्यांना दिलासा देणारी “मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना-2024” मी आता घोषित करीत आहे.
👉 हे सुद्धा वाचा
मोबाईल वरून घरबसल्या करा ई श्रम कार्डचे पैसे ऑनलाईन पद्धतीने चेक
महाराष्ट्र सरकारकडून गांभीर्याने दखल
याद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या विजबिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरविले असून राज्यातील ४४ लाख 3 हजार शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल. याकरिता १४ हजार ७६0 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यानुसार राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024 राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.2. योजनेचा कालावधी:- सदर योजना 5 वर्षांसाठी एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेवून पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
काय आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024 साठी पात्रता
पात्रता :- राज्यातील 7.5 एच.पी पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील.
कशी होणार मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024 ची अंमलबजावणी
योजनेच्या अंमलबजावणीची पध्दती:- एप्रिल 2024 पासून 7.5 एच.पी पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे. शासनास विद्युत अधिनीयम 2003, कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना किंवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देवून त्यानुसार अनुदानीत वीज दर लागू करण्याचे अधीकार प्रदान करण्यास आलेले आहेत. त्यानुसार वीजबील माफ केल्यानंतर सदर वीजदर सवलती पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रीम स्वरुपात वगम करण्यात येईल. सध्या देण्यात येणारी वीजदर सवलत रु.6985 कोटी अधिक वीजबील माफीनुसार सवलत रुपये 7,775 कोटी असे वार्षिक वीजदर सवलती पोटी प्रतीवर्षी रु.14,760 कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील. या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनीस शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल. मागेल त्याला सौर कृषीपंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरविण्यात आले आहे.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024 या कल्याणकारी योजनेमुळे संपूर्ण राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होऊन त्यांच्यावरील आर्थिक बोजा कमी होणार आहे. या योजनेमुळे शेतकरी राजा शेतीकडे अधिकाधिक लक्ष केंद्रित करून समृद्ध आणि सुखी होईल यात शंका नाही.
अंमलबजावणी सुरू, कोल्हापूर जिल्ह्यातील 2 लाख 32 हजार शेतकऱ्यांचे वीज बिल शून्य
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अंतर्गत राज्य सरकारने केलेल्या शेतकर्यांना साडेसात हॉर्स पॉवर्सपर्यंतच्या कृषिपंपांच्या वीज बिलमाफी घोषणेची अंमलबजावणी सुरू झाली असून या योजनेचा जिल्ह्यातील 1 लाख 32 हजार 145 शेतकर्यांना लाभ देण्यात आला आहे. या शेतकरी बांधवांचे वीजबिल माफ झाले असून आता त्यांना वीजबिल शून्य येत आहे. कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील 1 लाख 64 हजार 524 शेतकर्यांकडे कृषिपंपांची 691 कोटी रुपयांची थकबाकी असून त्यापैकी साडेसात एचपी पर्यंतचे 1 लाख 32 हजार 145 शेतकरी असून. या पात्र शेतकर्यांचे वीज बिल मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अंतर्गत माफ केल्या गेले आहे.
संभाजीनगर येथील शेतकऱ्यांना मिळाला लाभ
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वीजबिलांच्या पावतीचे वितरण आणि मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेअंतर्गत आस्थापित कृषिपंपाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी येथे संपन्न झाले. आगामी पाच वर्षे सरकार शेतकऱ्यांचे साडेसात एचपीपर्यंतच्या पंपांचे चालू बिल भरेल असा शासन निर्णय जारी झाला आहे. राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. सरकारने एप्रिल ते जून या कालावधीच्या बिलापोटी २ हजार ७५० कोटी रुपये महावितरणला अदा केल्यामुळे शेतकऱ्यांना महावितरणकडून पावत्या पाठविण्यात येत आहेत.