सरकारी नोकरी आपल्या देशात एक दुष्कर स्वप्न आहे असेच म्हणावे लागेल. पण नोकरीच्या नदी न लागता एक शेतकरी गाढवाचे दूध विकून महिन्याला चक्क 3 लाखाहून अधिक नफा कमावत आहे, गावर बऱ्याच जणांचा विश्वास बसणार नाही. गाय, म्हैस, शेळीपालन करण्याइतकेच सोप्पे हे गाढव पालन असते. योग्य मार्गदर्शन घेऊन गाढव पालन केल्यास तो आर्थिक प्रगतीसाठी मोलाचा दगड ठरू शकतो यात शंका नाही. आज आपण या लेखातून गाढव पालन करुन स्वतःची आर्थिक भरभराटी करुन घेणाऱ्या एका यशस्वी शेतकरी अन् व्यावसायिकाची यशोगाथा पाहणार आहोत.
गाढव एक उपयुक्त प्राणी
गाढव म्हटल की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो अन् कनिष्ठ प्राणी. गाढव म्हणजे मूर्ख अशा उपाध्या सुद्धा आपल्याकडे प्रसिद्ध आहेत. परंतु गाढव हा एक मेहनती अन् प्रामाणिक प्राणी असून त्याच गाढवाने आज या शेतकऱ्याच्या जिवनात यशाची नवीन पहाट उजळली आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे हा शेतकरी तसेच गाढवाचे दूध विंकुन या शेतकरी भावाने ही कमाल केली तरी कशी याबद्दल सविस्तर माहिती.
गाढवाचे दूध देत आहे महिन्याला 3 लाखांचे उत्पन्न
आपण गाढवाला दिलेल्या विविध उपहासात्मक उपमा यांना दूर ठेवून या शेतकरी बांधवाने गाढवाचे दुध विकून तब्बल 3 लाख रुपये हा शेतकरी बक्कळ कमाई करत आहे. या शेतकऱ्याचे नाव आहे धीरेन सोळंकी. गुजरात मध्ये वास्तव्यास असलेल्या धिरेन भाई यांनी गुजरात मधील पाटण जिल्ह्यात ४२ गाढव पाळले आहेत. गाढवाच्या दुधाला प्रचंड मागणी असते हे आपल्याला ज्ञात असेलच. अनेक दाक्षिणात्य राज्यांना आणि कॉस्मेटिक्स (सौंदर्य प्रसाधने) क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांना गाढवाचे दुध पुरवून ते लाखो रुपयांचा नफा कमवत आहेत.
धीरेन भाईंनी जिद्दीने अडचणींवर मात करत मिळवले यश
गुजरातमध्ये राहणाऱ्या या तरुण शेतकऱ्याला त्याच्या राज्यात गाढवाचा व्यवसाय सुरू करणे हे काही सोप्पे काम नव्हते बर. त्याचे कारण म्हणजे या भागात गाढवाच्या दूधाला फारशी मागणी नाही. त्यामुळे गाढवाचे दूध विक्री हा व्यवसाय सुरु केल्यानंतर आधीचे पाच महिने त्यांच्यासाठी कसोटीचा काळ ठरला. अपेक्षित उत्पन्न काही मिळेना.पण हार मानतील ते धिरेनभाई कसले? गाढवाचे दूध व्यवसाय अंगिकारला आहेच म्हटल्यावर गाढवाचे दुध विकूनच यश मिळवून आर्थिक प्रगती साधायची अस त्यांनी मनाशी पक्क ठरवलं. मात्र आपण राहतो त्या भागात तर गाढवाच्या दुधाला फारशी मागणी नाही मग गाढवाचे दूध विकायचे कुठे आणि कसे हा गंभीर मुद्दा त्यांच्यापुढे जसाच्या तसा शिल्लक होताच. गुजरातच्या लोकांची व्यवसायातील चिकाटीची तुम्हाला माहिती असेलच.
धीरेनभाई लागले कामाला. त्यांनी त्यासाठी सोशल मीडिया, इंटरनेट तसेच त्यांच्या परिचयातून माहिती गोळा करायला सुरुवात केली. गाढवाचे दूध कुठे चांगल्या भावात विकल्या जाऊ शकते याची इत्यंभूत माहिती मिळवली नंतर कर्नाटक आणि केरळमधील कंपन्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. या राज्यात आलेल्या अनेक सौंदर्य प्रसाधनाच्या आघाडीच्या कंपन्यांना त्यांच्या उत्पादनासाठी गाढवाचं दुधाची गरज पडते. याच माहिती मिळाल्यावर धीरेन भाईंनी थेट या कंपन्यांनाच दूध विकायचे ठरविले. गाढवाचे दूध मागणी कमी असल्याने इतर कुठल्याही प्राण्यांच्या तूनलेंत प्रा खूपच अधिक भावात विकल्या जाते. कंपन्यांना आता थेट त्यांच्या कंपनीत दुधाचा पुरवठा होत असल्याने त्यांनी धिरेन भाईंना खूप चांगला भाव देऊन त्यांच्याकडून गाढवाचे दूध विकत घ्यायला सुरुवात केली.
खडतर प्रवासाबद्दल धिरेन भाई यांची प्रतिक्रिया
गुजरातचे व्यापारी धिरेनभाई त्यांच्या या खडतर प्रवासाविषयी सांगताना म्हणाले की त्यांची इच्छा सरकारी नोकरीत करिअर करायची होती. मात्र आज ते म्हणतात, सरकारी शिक्षक झालो असतो तर महिन्याला ३० हजार कमवले असते. आता एवढे पैसै मला 2…3 दिवसांतच मिळतात. बिजनेस टुडे शी बोलताना त्यांनी सांगिलेल्या माहितीनुसार, सरकारी नोकरीच्या मागे लागून वेळ वाया घालवून हातात काहीच पडणार नाही हे कळल्यावर दक्षिण भारतात गाढव पालनाबद्दल माहिती मिळवून त्यांनी गाढवाचे दूध विकून स्वतः साठी रोजगार निर्मिती करायचं धाडशी निर्णय घेतला.
इंटरनेटच्या माध्यमातून तसेच काही जाणकार व्यक्तीच्या मार्गदर्शनातून त्यांनी 8 महिन्यांपूर्वी गाढवांचे फार्म सुरु केल्याचे त्यांनी सांगितलं. आणि हे गाढवाचे दूध विकून आज त्यांच्या या धाडशी निर्णय घेण्याच्या वृत्तीला चांगलेच यश मिळाले अन् तब्बल मासिक उत्पन्न 3 लाख रुपये मिळत असल्याचे ते अभिमानाने सांगतात.
पहिल्या वेळी झाले होते लाखोंचे नुकसान
गाढवाचे दूध विकायचे कोठे याची माहिती नसल्यामुळे धिरेन भाई यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले होते. चक्क ४० लिटर दूध नाल्यात फेकून देण्याची वेळ तेव्हा धीरेनभाई यांच्यावर आली होती. तरीही धीरेन भाई यांनी डगमगून न जाता त्यांच्या शोधक बुद्धीने गाढवाचे दूध हे पावडर बनवून सुद्धा विकता येऊ शकते याची माहिती त्यांनी प्राप्त केली. दूध पावडरची वाहतूक करणे सुद्धा सोप्पे असते हे त्यांच्या लक्षात आले. आधी परराज्यात अन् मग चक्क विदेशात वाहतूक करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आता आंतरराष्ट्रीय बाजारातही धीरेन भाई गाढवाच्या दुधाची पावडर ६३ हजार रुपये किलो भावाने विकून प्रचंड नफा कमावत आहेत.
गाढवाच्या दुध आहे मौल्यवान आणि रामबाण
प्राचीन काळापासून गाढवाच्या दुधाचा संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणावर वापर होत होता हे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वाचलं असेलच. इजिप्तची राणी तर या दुधाने अंघोळ करायची असे संदर्भ सुद्धा इतिहासात आपल्याला सापडतात. वैद्यक शास्त्रातही गाढवाचे दूध हे अनेक व्याधींवर रामबाण औषध म्हणून प्रचलित आहे. यकृताच्या आजारांसह अनेक संसर्गजन्य आजारांमध्ये औषध म्हणून आजही गाढवाच्या दुधाची शिफारस केली जाते. अमेरिकेच्या राष्ट्रीय वाचनालयाच्या एका अहवालानुसार, गाढवाच्या दुधाची रचना ही मानवी दुधासारखीच असल्यामुळे लहान मुलांसाठी विशेषत: ज्यांना गाईच्या दुधाची ॲलर्जी आहे अशा शिशुंसाठी गाढवाचे दूध हा सर्वोत्तम पर्याय म्हणून प्रचलित आहे.
संधी शोधून त्या संधीचे सोने करणारे यशस्वी व्यावसायिक धिरेनभाई
विदेशात सुद्धा हे गाढवाचे दूध प्रचंड महाग विकल्या जाते हे पाहून धिरेन भाईंच्या जीवात जीव आला. त्यांनी या संधीचा भरपूर फायदा करून घेण्याचे ठरवून त्यासाठी आवश्यक पाऊले उचलायचे ठरविले. आधी त्यांच्याकडे फक्त 20 गाढवे होती. त्यामध्ये विस्तार करून त्यांनी हळूहळू अनेक गाढवे विकत घेतली. प्रारंभीच्या काळात या व्यवसायासाठी धिरेन भाईंना गाढवाचे खाद्य, त्यांच्यासाठी गोठा, दवाखाना असा सर्व खर्च धरून त्यांना सुमारे 35 लाख रुपये इतका खर्च आल्याचे ते सांगतात. मात्र अल्पावधीतच हा खर्च निघून त्यांना बक्कळ नफा मिळायला लागला.
गाढवाचे दूध आहे आरोग्यासाठी फायदेशीर
दूध मानवी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक असून त्या दुधात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण नगण्य असते. गाढवाचे दूध हे व्हिटॅमिन A, बी -1, बी -2, व्हिटॅमिन D आणि व्हिटॅमिन E इत्यादी जीवनावश्यक जीवनसत्वांनी परिपूर्ण असल्यामुळे श्वासाच्या विविध व्याधींवर हे एक रामबाण औषध म्हणून वापरल्या जाते. सौंदर्यप्रसाधन प्रॉडक्टसाठी या दुधाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. चेहर्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी गाढवाचे दूध अत्यंत गुणकारी ठरते.
गाय, शेळी, म्हैस यांच्या दुधाची ज्यांना ऍलर्जी असते अशा शिशुंनी किंवा प्रौढ व्यक्तींनी हे दूध प्राशन करणे हा सुद्धा एक प्रभावी पर्याय आहे. गाढवीण एका दिवसात खूप कमी दूध देत असते. तसेच गाढवीणीचे दूध साठवून ठेवणे सामान्य माणसाला शक्य नसते.मात्र त्या दुधाची पावडर तयार करून मोठमोठ्या कंपन्या ते साठवून ठेवतात.त्यामुळे तुमच्या घरी जर गाढव असेल तर त्या गाढवाचे दूध काढल्यानंतर लगेच ते दूध प्राशन करणे लाभदायी असते.
महाराष्ट्रात गाढवाचे बाजार कोठे भारतात?
महाराष्ट्राचं लोकदैवत असेल्या जेजुरीत दरवर्षी भरत असलेली खंडोबा देवाची पौष पोर्णिमा यात्रा प्रसिद्ध आहे. खर्या अर्थाने अठरापगड जातीजमातींची ही यात्रा मनाली जाते. यात भटक्या विमुक्तांची संख्या मोठी असते. यात्रेनिमित्त जेजुरी येथे गाढवांचा बाजार भरतो. आपल्या राज्यात जेजुरी, जुन्नर, माळेगाव, सोनारी या विविध ठिकाणी जरी गाढवांचा बाजार भरत असला तरी मढीचा बाजार सर्वात मोठा व प्रसिद्ध आहे. त्यामुळे शेजारच्या गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतून गाढवाचे व्यापारी गाढव विकायला घेऊन येथे येत असत.
आपल्याकडे गाढवांची किंमत सरासरी किमान 3 ते कमाल 50 हजार रुपये इतकी असते. गुजरातची काठेवाडी गाढवे ही देशी गढवांपेक्षा सशक्त असतात त्यामुळे त्यांना बाजारात चांगला भाव मिळतो. मुख्यत्वे करून कुंभार, बेलदार, कैकाडी, वडार, धोबी, घिसाडी, परीट, सापवाले, गारुडी असे अनेक समाजातील लोक गाढव पालन व्यवसाय करत असतात. मात्र आता गाढव पालन हा व्यवसाय करण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे.
भारतातील पाळीव गाढवांविषयी महत्वाची माहिती
आपल्या देशात पाळीव गाढवांचे एकूण दोन प्रकार पाहायला मिळतात. एक म्हणजे छोटे करडे गाढव व दुसरे म्हणजे मोठे पांढरे गाढव. पहिल्या प्रकारचे गाढव गडद करड्या रंगाचे असून ते भारताच्या बहुतेक भागांत दिसून येतात. दुसऱ्या प्रकारचे गाढव सामान्यपणे गुजरात राज्यातील कच्छ भागात आढळते तसेच त्या गाढवाचा रंग अगदी फिक्कट करड्यापासून तो शुभ्र पांढऱ्यापर्यंत असतो. पहिल्या प्रकारच्या जाधवांची सरासरी उंची ०·८१ मीटर असून दुसऱ्या प्रकारच्या गाढवांची उंची साधारणपणे ०·९३ मीटर असते. रानटी गाढवे हे पाळीव गाढवांमध्ये कधीच मिसळत नाहीत तसेच या दोघांमध्ये आपापसात कधीही प्रजनन होत नाही. पाळीव गाढवांच्या प्रजोत्पादनाचा ठराविक असा काळ नसतो.
पाळीव गाढवाचा उपयोग विशेषकरून ओझी वाहण्यासाठी होतो. ही गाढवे दृढपाद असून त्यांच्या अंगी असलेल्या काटकपणा, चिकाटी आणि सहनशीलता या गुणांमुळे मानवांना उपयुक्त ठरतात. सपाट किंवा डोंगराळ प्रदेशातून किंवा पर्वतावरील कठीण मार्गांवरून दूर अंतरावर जड ओझी वाहून नेण्याच्या कामात गाढवांचा हात इतर कुठलाही प्राणी धरू शकत नाही. ज्या देशांत घोड्यांची संख्या कमी असते किंवा ज्या देशातील लोकांना गरिबीमुळे घोड्यांचा वापर करणे परवडत नाही अशा देशांमध्ये ओझी वाहून नेण्यासाठी तसेच स्वारी करण्यासाठी गाढवांचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. कडकडत्या उन्हात तसेच प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा गाढवे अगदी कणखरपणे त्यांचे कार्य पूर्णत्वास नेतात.
मात्र त्यांच्या शारीरिक शक्तिबाहेर जर त्यांच्यावर आझे लादले गेले, तर नैसर्गिक प्रकृतीनुसार गाढवे ते करू नीट करीत नाहीत किंवा काम न करता एकाच जागी उभी राहतात. याशिवाय त्यांना कुणी क्रूर वागणुक दिली तर त्याचा गाढवे प्रतिकार करतात. त्यांच्या अशा वर्तनामुळेच ती निर्बुद्ध व हेकट असतात असा गैरसमज समाजात रूढ झालेला दिसून येतो. कदाचित म्हणूनच गाढवाच्या स्वभाव विषयक गैरसमजातून त्यांना मूर्ख ठरविणारी कित्येक म्हणी जगभरात रूढ झालेल्या दिसून येतात.
गाढव पालन आहे एकदम सोप्पी गोष्ट
पाळीव गाढवांना सुस्थितीत ठेवण्यासाठी विशेष कष्ट पडत नाहीत किंवा जास्त खर्चही येत नाही. चरबट आणि अगदी थोड्या अन्नावर गाढवे तग धरून काम करू शकतात. बऱ्याच काळपर्यंत ती पाण्याशिवाय सुद्धा राहू शकतात. परिणामी गाढव पालन करणे शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर होते. आजच्या युगात अनेक शेतकऱ्यांनी गाढव पालन करून आपली आर्थिक प्रगती साधून घेतली आहे. जगाने विविध उपहासात्मक उपमा देऊन कायम हिणवलेल्या या प्राण्याने प्राचीन काळापासून ते आजच्या युगात सुद्द्धा सदैव माणसाची मदतच केली आहे.